वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w86 १२/१ पृ. ४-७
  • देवापुढे नीतिमान—कसे?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देवापुढे नीतिमान—कसे?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • आम्हास देवासोबत नीतिमान राहाण्याची गरज का आहे
  • “समर्थना” विषयी कॅथोलीक दृष्टीकोन
  • प्रॉटेस्टन्ट दृष्टीकोन
  • कॅथोलीक किंवा प्रॉटेस्टन्ट “समर्थन” नव्हे
  • पवित्रशास्त्र काय शिकविते?
  • तुम्ही देवासोबत चांगल्या भूमिकेत आहात का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
  • मार्टिन ल्यूथर आणि त्याचा वारसा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • यहोवाचे साक्षीदार प्रोटेस्टंट धर्माचे आहेत का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
  • देव आपल्यावरील त्याच्या प्रेमाचे प्रमाण देतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
w86 १२/१ पृ. ४-७

देवापुढे नीतिमान—कसे?

“देव म्हणतो, मी सात्वीक आहे.” “नविन कराराचे” न्यूगिनी पिडजिनच्या आलीकडील आवृतीत “समर्थन” (दोषी नसल्याचे शाबीत करणे) या मार्गी स्पष्टपणे सादर केले आहे. हे केवढे ही पुरातन वाटो ही गोष्ट इंग्रजी भाषेतील पुष्कळ पवित्रशास्त्रात “समर्थन” किंवा “नीतिमान असल्याची घोषणा” जसे रोमकर ५:१६ मध्ये व्यक्‍त केली आहे त्यापाठीमागील मुलभूत भूमिका निवेदीत करतो.

दुसऱ्‍या बाजुस पहाता, पुष्कळ लोक म्हणतात: ‘मी सभ्य जीवन व्यतित केले आहे. मला शक्य आहे तेंव्हा मी इतरासाठी चांगले ते करतो. माझ्या घडविणाऱ्‍यास भेटण्याची मी तयारी केलेली आहे’ समर्थन याचा अर्थ स्व–समर्थन असल्याचे ते स्पष्टपणे समजतात. पवित्रशास्त्रानुसार “समर्थना”चे धर्मतत्वाचा संबध देव ज्यामार्गाने आम्हाकडे लक्ष देतो व ज्यामार्गी तो आम्हासोबत व्यवहार करतो त्याज सोबत आहे. यहोवा “निर्माणकर्ता” आहे. (यशया ४०:८) तो “सर्व पृथ्वीचा न्यायधीश” आहे. (उत्पत्ती १८:२५) यास्तव, तो ज्यामार्गी आम्हास समजतो त्यापेक्षा कोणतीही दुसरी गोष्ट महत्वाची नाही.

आम्हास देवासोबत नीतिमान राहाण्याची गरज का आहे

पवित्रशास्त्र यहोवा बाबत म्हणते: “तो दुर्ग आहे; त्याची कृत्ये परिपूर्ण आहेत त्याचे सर्वच मार्ग न्यायाचे आहेत; तो विश्‍वासू देव आहे, त्याच्याठायी अधर्म नाही, तो न्यायी व नीतिमान आहे.” (अनुवाद ३२:४) तो नीतिमत्वतेचा मुर्तिमंत आहे. निर्माणकर्ता व जीवन दाता यानाते; काय बरोबर वा काय चूक हे निश्‍चीत करण्याचा, दर्जा घालून देण्याचा त्याच्या जवळ हक्क आहे. जे काही देवाचा दर्जा यासोबत जुळणारे आहेत ते नीतिमान आहे.

अशाप्रकारे त्यांच्या निर्माणकर्त्याच्या म्हणण्यानुसार जगण्याचे त्याने निवडीले तर देव त्याच्या बुद्धीमान प्राणीमात्रांनी पोहंचलेच पाहीजे असा दर्जा घालून देतो, तो दर्जा किंवा मर्यादा चुकविणे यासच पवित्रशास्त्र मूळ भाषेत पाप संबोधीते, यास्तव पाप हे, अनीतिमत्वता आहे. ते देवाने जे चांगले व वाईट म्हटले त्यासाठी तोकडे पडणे आहे. परिणामतः पाप हे अव्यवस्था, स्वैराचाराचे स्वरूप आहे.—१ योहान ५:१७; ३:४.

यहोवा “अव्यवस्थेचा नव्हे तर शांतीचा देव आहे.” (१करिंथकर १४:३३) मुलतः त्याचे सर्व प्राणीमात्र स्वर्गात व पृथ्वीवर पुर्णत्वात होते. त्यांना मुक्‍त इच्छा बहाल केली होती. (२ करिंथकर ३:१७) त्यांनी “देवाच्या मुलांच्या गौरवयुक्‍त मुक्‍तत्तेचा” आनंद लुटला होता. (रोमकर ८:२१) त्याच्या नीतिमान दर्जाची कदर केली गेली होती तोवर शांती व सुव्यवस्था संपुर्ण विश्‍वात नांदत होती. प्रथमतः स्वर्गात व त्यानंतर पृथ्वीवर कांही प्राणीमात्र देवासमोर स्वैराचारी बनले, त्याच्या अधिकार गाजविण्याच्या हक्कास अवमानीले तेंव्हा अव्यवस्था विश्‍वात शिरली. देवाने बरोबर व चूक याच्या घालून दर्जापासून ते ढळले. त्यांनी लक्ष्य चुकविले व अशाप्रकारे स्वतःस पापी बनविले.

हेच आमचे प्रथम पालक आदाम व हव्वेचे प्रकरण होते. (उत्पत्ती ३:१–६) “ . . . अशाप्रकारे पाप जगात आले व पापाच्या द्वारे मरण शिरले; आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसामध्ये अशाप्रकारे मरण पसरले.” (रोमकर ५:१२) त्यांच्या बंडाळीपासून पापाने “मरणाच्या योगे राज्य” केले, कारण आदामाची संतती देवाच्या नीतिमान दर्जास “पाप करून उणी पडली” (रोमकर ५:२१; ३:२३) या कारणास्तव आमची निकड देवासोबत नीतिमान राखण्याची आहे.

“समर्थना” विषयी कॅथोलीक दृष्टीकोन

ख्रिश्‍चन असल्याचा दावा करणारे सर्व चर्च देवासोबत समेट करून घेण्याची गरज ओळखून आहेत. तथापि हे कोणत्यामार्गी प्राप्त करावे याच्या समजूतीत व देवापुढील ख्रिस्ती भूमिका यात कॅथोलिक व प्रॉटेस्टन्ट तत्वप्रणालीत फरक आहे.

कॅथोलीक मत प्रतिपादन करताना द कॅथोलीक एन्सायक्लोपेडीया म्हणते: “स्व–समर्थन दाखविते की मनुष्य ज्या आत्म्याने मलतः झालेल्या पापी स्थीतीतून बदलला आहे त्यापासून बदल किंवा परिवर्तन, त्यामध्ये तो आदामाचे मुल म्हणून जन्मला होता त्यातून येशू ख्रिस्त दुसरा आदामाद्वारे दया व इश्‍वरी पुत्रत्वाचा लाभ.” अ कॅथोलीक डीक्शनरी पुढे स्पष्ट करते: “ज्या द्वारे प्रौढांना मृत्यु व पाप या स्थीतीतून उचलून देवाची मैत्री व कृपेत आणण्याच्या पद्धतीत आम्ही येथे स्वतःस मर्यादा घालतो; पाच वर्षाखालील मुलांच्या बाबतीत चर्च शिकविते त्यांना त्यांच्या स्वतःच्या कोणत्याही हालचाली शिवाय बाप्तीस्म्या मध्ये निष्पापी केले जाते.”

थोडक्यात म्हणायचे झाल्यास कॅथोलीक चर्च शिकविते की “स्वसमर्थना”ची कृती देवाची आहे जेथे व्यक्‍ती कॅथोलीक विश्‍वासात बाप्तीस्मा घेते तिला दैवी “दयेच्या” देणगीने नीतिमान व पवित्र केले जाते. असा ही दावा केला आहे की अशाप्रकारचे स्वसमर्थन (१) स्वतःची व्यक्‍तीगत गुणवत्ता किंवा सत्कर्मे यांनी वाढवता येते (२) नाशवंत पापाद्वारे व अविश्‍वासाद्वारे गमाविले जाते; (३) प्रायश्‍चीताच्या दृढीकरणाने ते पुन्हा प्राप्त केले जाते. या योजनेत दोष निवारण झालेल्या कॅथोलीक व्यक्‍तीने त्याची पातके धर्मगुरुपुढे कबुल करून विमोचन प्राप्त केलेच पाहीजे. कोणतीही “तात्पुरती शिक्षा”a पापविमोचनानंतर असेल त्याची भरपाई सत्कर्माने केली जावू शकते.

प्रॉटेस्टन्ट दृष्टीकोन

१६व्या शतकाच्या सुरवातीस या स्वैराचाराच्या व्यापाराने प्रॉटेस्टन्ट क्रांतीस पेटविले. कॅथोलीक उपाध्याय मार्टिन लूथरने त्याचे ९५ प्रबंध जे त्याने जर्मनी विटनबर्ग मधील कैसल चर्चच्या दरवाज्यावर १५१७ मध्ये लावीले त्यात यापद्धतीवर कडाडून हल्ला केला होता. वस्तुतः अधिकृत कॅथोलीक तत्वःप्रणाली विरूद्धची लुथरची असंमती यापेक्षा ही पुढे सरसावली होती. तिने समर्थनाच्या सर्व चर्च तत्व प्रणालीवर झडप घातली. याची खात्री देतांना अ कॅथोलीक डीक्शनरी म्हणते: “पातक्यास देवापुढे शुद्ध करण्याची पद्धती वरील विश्‍वासातील तफावत हा कॅथोलीक्स व प्रॉटेस्टन्ट यांच्या मधील क्रांतीच्या वेळेचा प्रमुख वादविषय होता. ‘जर ही तत्वप्रणाली’ (म्हणजेच केवळ विश्‍वासाने समर्थन करणे) ‘खोटी,’ ठरली तर लुथर त्याच्या टेबल टॉक मध्ये म्हणतो की आम्ही सर्व संपल्या समान आहोत.’”

‘केवळ विश्‍वासाने समर्थन करणे’ असे म्हणण्याचा लुथरचा नेमका अर्थ काय होता? कॅथोलीक यानाते लुथर हे शिकला होता की मनुष्याच्या समर्थनात बाप्तीस्मा, व्यक्‍तीगत चांगुलपणा व सत्कृत्ये, त्याच प्रमाणे धर्मउपाध्याय जो पापाची कबुली ऐकतो व पापाचे विमोचन करतो व भरपाईची कृत्य लागू करतो त्याने दृढीकरणामध्ये लागू केलेल्या प्रायाश्‍चीताची किमंत समाविष्ठ आहे.

देवासोबत शांती स्थापण्याच्या त्यांच्या प्रयत्नात लुथरने समर्थनाच्या रोमन तत्वप्रणालीच्या सर्व स्रोतांना पारखीले ज्यात उपसाव, प्रार्थना व स्व–शिक्षा यांचा समावेश होता परंतु त्याचा कांहीच उपयोग झाला नाही. असंतुष्टपणामुळे त्याने स्तोत्र व पौलाची पत्रे पुन्हा पुन्हा वाचली व मानवाच्या दोषाचे देव निकारण करतो ते केवळ त्यांच्या चांगुलपणा, सत्कृत्ये किंवा प्रायाश्‍चीताने नव्हे तर त्यांच्या विश्‍वासामुळे अशा निष्कर्षाने त्यास सरतेशेवटी मनशांती प्राप्त झाली. तो याविचाराने अति आवेशी झाला की त्याने “केवळ विश्‍वासामुळे समर्थन” यात त्याने त्याच्या रोमकर ३:२८च्या जर्मन भाषांतरात “विश्‍वासा” अगोदर “केवळ” ह्‍या शब्दाची भर घातली!b

बहुतेक प्रॉटेस्टन्ट चर्च मुलभूततेत “समर्थनाची दया विश्‍वासाद्वारे,” या लुथरच्या दृष्टीकोनास लागू करून आहेत. परिणामतः हेच पूर्वीचा फ्रेन्च क्रांतिवीर जॅक्यूज लीव्हफर डीं इटाप्लसने व्यक्‍त केले होते. कॅथोलीक व प्रॉटेस्टन्ट यांच्यामधील समर्थनाविषयीच्या मतभेदाबाबत अ कॅथोलीक डिक्शनरी म्हणते: “कॅथोलीक समर्थनास, मानवास शुद्ध बनविण्याचे कार्य समजतात; प्रॉटेस्टन्ट, एकाद्यास केवळ शुद्ध घोषित करणे व मानणे, म्हणजेच खरोखरी एकादा लायक आहे असे समजतात. ख्रिस्तास त्याच्या पापाबद्धल जमेस धरले जाते.

कॅथोलीक किंवा प्रॉटेस्टन्ट “समर्थन” नव्हे

कॅथोलीक तत्वप्रणाली ती “मनुष्यास खरोखरी शुद्ध केले” जी दैवी दया बक्षिस म्हणून बहाल केली त्यामुळे एकादा बाप्तीस्म्याच्या वेळेस नीतिमान होतो असा दावा करते तेव्हा पवित्रशास्त्रापुढे ही जाते. बाप्तीस्मा नव्हे तर ख्रिस्ताने ओतलेले रक्‍त मुळ पापास धूवून टाकते (रोमकर ५:८, ९) देवा करवी खरोखरी नीतिमान बनविले जाणे व नीतिमान असल्याचे जमेस धरणे किंवा गणणे यामध्ये बरीच भिन्‍नता आहे. (रोमकर ४:७, ८) कोणताही प्रामाणिक कॅथोलीक पापा विरूद्धच्या त्याच्या संघर्षात त्यास खरोखरी नीतिमान बनविले नाही हे जाणून लढा देईल. (रोमकर ७:१४–१९) तो खरोखरी नीतिमान होता तर त्याच्यापाशी धर्मगुरु जवळ जावून कबूली देण्यास पाप नसणारच.

यापेक्षा आधिक, कॅथोलीक तत्वप्रणाली पवित्रशास्त्रानरूप आहे तर, पातकाविषयी जागृत असणारा कॅथोलीक त्याची पातके देवाजवळ येशू ख्रिस्ताद्वारे विमोचन मागून कबूल करील. (१ योहान १:९–२:२) मानवी याजकाची “समर्थनाच्या” कोणत्याही स्थरावरील मध्यस्थी यास पवित्रशास्त्रीय आधार नाही, चांगुलतेचा संचय ज्यावर स्वैरचाराचे तत्व आधारले आहे त्यालाही नाही.—इब्रीकर ७:२६–२८.

समर्थनाविषयीची प्रॉटेस्टन्ट समज जसे की ख्रिश्‍चनास ख्रिस्ताच्या बलीदानामुळे नीतिमान घोषित केले जाणे हे निसंशयीपणे पवित्रशास्त्र शिकवणीजवळ आहे. तथापि, काही प्रॉटेस्टन्ट चर्च शिकवितात “केवळ विश्‍वासाद्वारे समर्थन” जे आम्ही नंतर पाहू, हे प्रेषित पौल व याकोबा करवी सादर केलेल्या कारणमीमंसेकडे दुर्लक्ष करते. या चर्चेसची अध्यात्मिक स्व–संतुष्ट मनोवृती ही “एकादा तारण झाले की सर्वकाळचे तारण” या ब्रिद वाक्यात दिसून येते. कांही प्रॉटेस्टन्ट विश्‍वासतात की ख्रिस्तावरील विश्‍वास तारणासाठी पुरेसा आहे म्हणून समर्थन बाप्तीस्म्यापूर्वी येते.

विशिष्ठ प्रॉटेस्टन्ट चर्चेस विश्‍वासाने समर्थन याविषयी शिकविताना फ्रेंच सुधारक जॉन केलव्हीन यास अनुसरतात व व्यक्‍तीगत नशीब शिकवितात, अशाप्रकारे ते मुक्‍त इच्छेच्या पवित्रशास्त्रीय तत्वास धिक्कारतात. (अनुवाद ३०:१९, २०) यास्तव समर्थना विषयीची कॅथोलीक किंवा प्रॉटेस्टन्ट समज पूर्णपणे पवित्रशास्त्राच्या एकवाक्यतेत नाही असे म्हटले जावू शकते.

पवित्रशास्त्र काय शिकविते?

तथापि पवित्रशास्त्र “समर्थनाच्या” तत्वाची निश्‍चीतपणे शिकवण, किंवा कोणत्यामार्गी मानव देवापुढे नीतिमान दर्जा प्राप्त करून घेवू शकतो ते सांगते. आम्ही यापूर्वीच देवासोबत चांगल्या भूमिकेत का असावे याची आवश्‍यकता पाहीली आहे, आम्ही सर्वजण देवाची मुले म्हणून नव्हे तर “क्रोधाची मुले” म्हणून जन्मलो. (इफिसकर २:१–३) देवाचा क्रोध आम्हावर राहतो अगर नाही हे आम्ही त्याच्या म्हणजे पवित्र व नीतिमान देवासोबत समेट करण्याचा दयावंत तरतुदीचा स्विकार करतो किंवा नाही यावर अवलंबून आहे. (योहान ३:३६) ती प्रेमळ तरतुद “ख्रिस्त येशूने चुकती केलेली खंडणी” आहे.—रोमकर ३:२३, २४.

प्रेषित पौल दाखवितो की ख्रिस्ताची खंडणी दोन आशा सामोऱ्‍या आणते एक “पृथ्वीवरील” व दुसरी “स्वर्गिय” आहे. तो लिहीतो: “कारण त्याच्या ठायी सर्व पुर्णता वसावी व त्याच्या वधस्तंभावरील रक्‍ताद्वारे शांती करून त्याच्या द्वारे जे सर्व काही आहे ते सर्व, ते पृथ्वीवरील असो किंवा स्वर्गातील असो त्याचा स्वत: बरोबर त्याच्याद्वारा समेट करावा हे पित्याला बरे वाटले.”—कलस्सैकर १:१९, २०.

या दोन्हीतील एका आशेत सहभागी होण्यासाठी, देवासोबत नीतिमान दर्जात येण्यात जरूरीचे आहे, आणि केवळ “येशू ख्रिस्तावर विश्‍वास” ठेवणे पेक्षा यात भरपूर गोवले आहे. ज्या ख्रिश्‍चनास स्वर्गिय आशा आहे व ज्यांना पृथ्वीवरील चिरकालीक जीवनात जिवंत राहण्याची आशा आहे त्यात काय समाविष्ट आहे ते समजावून घेण्याकरता ज्यांनी तुम्हास हे मासीक दिले त्या यहोवाच्या साक्षीदारा सोबत पत्रिशास्त्रातून या विषयाची चर्चा करण्यास कुचराई करू नका.

[तळटीपा]

a  कॅथोलीक तत्वप्रणाली प्रमाणे पाप करण्यात दोषीपणा व दोन प्रकारची शिक्षा—सार्वकालीक किंवा तात्पुरती यांचा समावेश आहे. दोषी व सार्वकालीक शिक्षेची भरपाई दृढीकरणाचे प्रायाश्‍चीताने होते. तात्पुरती शिक्षा ही याच जिवनात सत्कृत्यांनी आणि पश्‍चातापी कृतीने किंवा नंतरच्या जीवनात परगेटरीच्या अग्नीतील जिवनात भरपाई झालीच पाहिजे. स्वैराचार पक्षपाती अगर तात्पुरत्या शिक्षेची पूर्ण [अमर्यादीत] क्षमा ख्रिस्त, मेरी व संत यांचे चागुंलपण जे “चर्चच्या भांडारात” राखून ठेवले आहे ते लागू करण्यात येते. सत्कर्मात ज्याची सर्व आचाराच्या बाबतीत आवश्‍यकता आहे त्यात पायी यात्रा किंवा चांगल्या उपक्रमासाठी आर्थिक साहाय्य अंतर्भूत आहे. भूतकाळात धर्मयुद्धासाठी व कॅथेडरल इमारती, चर्चेस व दवाखानेया साठी अशाप्रकारे अर्थिक निधी उभारला.

b  लुथरने याकोबाच्या पत्राच्या स्थानावर संशय व्यक्‍त केला त्याचा अध्याय दोन मधील विवाद की कृतीविना विश्‍वास मृत आहे हे प्रेषित पौलाने “कर्मावाचून” समर्थन या सोबत मतभेदात आहे. (रोमकर ४:६) प्रेषित पौल हा यहुदी नियमशास्त्राच्या कर्माविषयी बोलत होता हे ओळखण्यात तो अपयशी ठरला.—रोमकर ३:१९, २०, २८.

[५ पानांवरील संक्षिप्त आशय]

द कॅथोलीक चर्च शिकविते की समर्थन मानवास वास्तविक नीतिमान बनविते परंतु ते समर्थन नाशवंत पापाने नष्ट होते, किंवा कदाचित चांगुलपणाने वाढविले जावू शकते

[६ पानांवरील संक्षिप्त आशय]

पुष्कळ प्रॉटेस्टन्ट समर्थनावर किंवा केवळ विश्‍वासाने नीतिमान घोषित करण्यावर विश्‍वास ठेवतात व ख्रिस्ताच्या खंडणीवरील विश्‍वास तारणाची खात्री देतो. कांही विश्‍वासतात की नीतिमत्वता नशिबी लीहीली आहे.

[७ पानांवरील संक्षिप्त आशय]

पवित्रशास्त्र शिकविते की मनुष्यास मुक्‍त इच्छा आहे व ख्रिस्ताची खंडणी दोन आशा एक स्वर्गिय व दुसरी पृथ्वीवरील सामोरी आणते. दोन्ही आशा देवासमोर नीतिमान दर्जा प्राप्त करण्यास समाविष्ट करून आहेत.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा