वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w86 ४/१ पृ. १९-२४
  • शांती, निर्भयता आणि ‘श्‍वापदाची मूर्ती’

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • शांती, निर्भयता आणि ‘श्‍वापदाची मूर्ती’
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • श्‍वापदाची अद्यावत “मूर्ती”
  • श्‍वापदावरील स्वारी
  • शांतीकरता जोर नाही
  • शांतीप्राप्त्यर्थ उचललेली आवश्‍यक पावले
  • निवड करण्याची वेळ
  • दोन विक्राळ श्‍वापदांबरोबर लढत देणे
    प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे!
  • प्रकटीकरण​—देवाच्या शत्रूंबद्दल यात काय सांगितलं आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
  • प्रकटीकरणाची श्‍वापदे—त्यांचा काय अर्थ होतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • मोठ्या बाबेलवर दंडाज्ञा बजावणे
    प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे!
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
w86 ४/१ पृ. १९-२४

शांती, निर्भयता आणि ‘श्‍वापदाची मूर्ती’

“मी आत्म्याने संचरित झालो असताना त्याने मला रानात नेले; तेव्हा देवनिंदात्मक नावांनीभरलेल्या आणि सात डोकी व दहा शिंगे असलेल्या किरमिजी रंगाच्या श्‍वापदावर बसलेली एक स्त्री माझ्या दृष्टीस पडली.”—प्रकटीकरण१७:३.

१. योहानाने दृष्टांतात पाहिलेल्या सात डोकी व दहा शिंगाच्या श्‍वापदाबाबत आम्ही विचारशील का असावयास हवे?

या भीतीदायक श्‍वापदाचे दृश्‍य प्रेषित योहानाने एका इश्‍वर प्रेरित दृष्टांतात पाहिले. पण अशा प्रकारे पाहणारा योहान केवळ एकटाच नाही. बहुधा तुम्हीही या श्‍वापदाला पाहिले असेल किंवा निदान त्याच्याबद्दल वर्तमानपत्रात वाचले असेल. तर मग, तुम्हाला ते श्‍वापद कळले का?

२, ३. योहानाने आपल्या दृष्टांतात अनुक्रमाने कोणकोणत्या प्राण्यांना पाहिले?

२ अर्थात, आज आम्ही या श्‍वापदाला पाहतो तेव्हा योहानाने वर्णिलेले त्याचे स्वरुप आम्हाला दिसत नाही. योहानाने ज्याला पाहिले ते “प्रभूच्या दिवशी” या पृथ्वीवर अस्तित्वात असणाऱ्‍या कशाचे तरी लाक्षणिक प्रतीक होते. (प्रकटीकरण १:१०) आज आम्ही त्याची पूर्णता पाहात आहोत. जे बेढब आकाराचे श्‍वापद योहानाने पाहिले ते यहोवाचा त्याच्याविषयीचा दृष्टिकोण व्यक्‍त करते—ते त्याला बिलकूल आवडत नाही! योहानाने आपल्या दृष्टांतात दियाबल सैतानाला खाली पृथ्वीवर “आपला काळ थोडा आहे हे ओळखून अतिशय संतप्त होऊन” आला असल्याचे आधी बघितले. (प्रकटीकरण १२:१२) त्याने आणखी, सैतानी जगाच्या राजकारणी व्यवस्थेला सात डोकी व दहा शिंगे असणाऱ्‍या, मानवजातीच्या “समुद्रा” तून बाहेर पडलेल्या अजस्त्र पशूच्या रुपात पाहिले होते. (प्रकटीकरण १३:२; १७:१५; यशया ५७:२०; लूक ४:५, ६) या श्‍वापदाचा सर्व मानवजातीवर अधिकार होता, आणि लोकांना आपल्या उजव्या हातावर व कपाळावर ‘श्‍वापदाचे चिन्ह’ करुन त्याला आपले पाठबळ आहे हे दाखविण्यासाठी जबरदस्तीने भाग पाडले जात होते.—प्रकटीकरण १३:७, १६, १७.

३ या श्‍वापदाची मूर्ति लोकांनी तयार केली हे योहानाने पाहिले होते. (प्रकटीकरण १३:१४, १५) हीच मूर्ती त्याने, वरील दृष्टांतात, प्रकटीकरणाच्या १७व्या अध्यायात जे वर्णन दिले आहे ते पाहताना पहिली. ही सात डोकी व दहा शिंगांची “मूर्ती” भावी काळच्या घटनांमध्ये महत्वपूर्ण भूमिका पार पाडणार आहे त्यामुळे तिची ओळख प्राप्त करुन घेणे आम्हासाठी महत्वपूर्ण आहे. पण हे कसे करता येईल?

श्‍वापदाची अद्यावत “मूर्ती”

४, ५. दृष्टांतातील श्‍वापदाची डोकी कशाचे प्रतिनिधित्व करीत होती?

४ एका दिव्यदूताने योहानाला याविषयीची जी माहिती दिली ती आम्हाला साहाय्यक ठरु शकते. तो म्हणाला: “ती सात डोकी म्हणजे सात डोंगर आहेत; त्यावर ती स्त्री बसली आहे. आणि ती सात राज्येही आहेत: त्यापैकी पाच पडले आहेत, एक आहे व एक अद्याप आला नाही; तो आल्यावर त्याला थोडा वेळ राहावे लागेल.” (प्रकटीकरण १७:९, १०) “राजे” व “डोंगर” यांचा उल्लेख—जो पवित्र शास्त्रात नेहमी राजकीय सत्तांचे प्रतिनिधित्व दर्शवितो—सूचित करतो की श्‍वापदाची डोकी सरकारांची सूचकता आहे. (यिर्मया ५१:२५) तर मग, कोणती सात सरकारे यात मोडतात?

५ बरे, योहानाच्या काळापर्यंत पाच आधीच पडले होते, एक त्यावेळी हयात होते व एक यावयाचे होते. पवित्र शास्त्र इतिहासात पाच प्रमुख साम्राज्ये बहरली, त्यांनी देवाच्या लोकांना जाचले व योहानाच्या काळाआधी त्यांचे पतन झाले: मिसर, अश्‍शुर, बाबेलोन, मेद–पारस आणि ग्रीस. योहान हयात होता त्यावेळी रोमी साम्राज्य सत्तेवर होते. योहानाच्या मृत्यूनंतर काही शतकांनी रोमी साम्रज्य प्रबळ जागतिक सत्ता या अर्थी दृश्‍यातून लोपले व त्याऐवजी ब्रिटीश साम्राज्याने आपला जम बसविला. लवकरच या साम्रज्याच्या पश्‍चिम वसाहतींनी स्वातंत्र्य मिळविले आणि ब्रिटनशी संलग्न राहून आंग्लो–अमेरिकन जागतिक सत्ता उभारली. हा तो “राजा” आहे जो योहानाच्या काळात ‘अद्याप आला नव्हता.’ आता जे श्‍वापद योहानाने पाहिले त्याचा आणि डोक्या द्वारे सूचित असणाऱ्‍या सात साम्राज्यांचा आपसात कोणता संबंध होता? “तेच आठवा राजा आहे. तो त्या सातांपासून झालेला आहे.”—प्रकटीकरण १७:११.

६. (अ) श्‍वापदाच्या शिंगांचा काय अर्थ होत होता? (ब) कोणत्या अर्थी त्यांना “अद्याप राज्य मिळाले” नव्हते?

६ श्‍वापदाला दहा शिंगे होती हे आठवा. याबद्दल स्वर्गदूत म्हणाला: “जी दहा शिंगे तू पाहिली ती दहा राजे आहेत, त्यांना अद्यापि राज्य मिळाले नाही, तरी त्यांना श्‍वापदाबरोबर एक तास राजांच्यासारखा अधिकार मिळतो.” (प्रकटीकरण १७:१२) पवित्र शास्त्रात दहा ही संख्या पृथ्वीवरील गोष्टींची पूर्णता दाखविते. तद्वत, ही शिंगे पथ्वीभरातील सर्व सरकारी सत्ता आहेत, ज्या श्‍वापदाला “प्रभुच्या दिवशी” थोड्या काळासाठी (“एकतास”) आपले पाठबळ देतात. यात सातव्या जागतिक सत्तेचा तसेच ‘श्‍वापदाच्या इतर सहा डोक्यांपासून’ जी आता जागतिक साम्राज्ये राहिली नाहीत तरी त्यापासून उद्‌भवलेल्या आधुनिक सरकारांचा समावेश आहे. हे “राजे” योहानाच्या काळात अस्तित्वात नव्हते.a आता त्यांना अधिकार मिळालेला असल्यामुळे ते “आपले सामर्थ्य व अधिकार श्‍वापदाला देतात.”—प्रकटीकरण १७:१३.

७, ८. (अ) योहानाने पाहिलेले श्‍वापद कोणते होते, ज्याचे वर्णन प्रकटीकरणाच्या १७व्या अध्यायात आहे? (ब) त्याचा डोकी व शिंगाशी कसा संबंध आहे?

७ आता तुम्हाला श्‍वापदाची ओळख मिळते का? होय, ते “ओसाडीचा अमंगळ पदार्थ” आहे जो लीग ऑफ नेशन्स या नात्याने सामोरे आला व आता ते संयुंक्‍त राष्ट्रसंघाच्या रुपात अस्तित्वात आहे. (मत्तय २४:१५; दानीएल १२:११) ही संघटना ‘सात जागतिक साम्राज्यातून कशी झालेली’ आहे? या अर्थी की सबंध श्‍वापदीय संघटना, आठव्या साम्राज्याप्रमाणे जणू आधीच स्थापित सरकारामार्फत अस्तित्वात आणली गेली, ज्याविषयीचे प्रस्तुतीकरण प्रामुख्यत्त्वे अँग्लो–अमेरिकन जागतिक साम्राज्याद्वारे केले जाऊन तिला पाठबळ दिले गेले.

८ पुढे दिव्यदूताने योहानास सांगितले: ती “दहा शिंगे” “श्‍वापदास आपले सामर्थ्य व अधिकार देतात.” (प्रकटीकरण १७:१३) खरे पाहता, त्या डोक्यांकरवी व शिंगाकरवी सूचित असणाऱ्‍या सरकारांच्या पाठबळाशिवाय श्‍वापदाला सामर्थ्य वा ताकद मिळणार नाही. ते का? कारण ती त्याची नुसती मूर्ती आहे. (प्रकटीकरण १३:१४) इतर सर्व मूर्त्यांप्रमाणे ही सुद्धा निर्जिव आहे. (यशया ४४:१४–१७) तिच्याठायी काही जीव असलाच तर तो तिच्या समर्थकांकरवी आहे. (प्रकटीकरण १३:१५) वेळोवळी या समर्थकांनी काही निर्णायक हालचाली संयुक्‍त राष्ट्रसंघाकरवी करविल्या जसे कोरियन युद्धाच्या बाबतीत घडले.

९. श्‍वापदाविषयीच्या आमच्या ओळखीस कशी पुष्टी मिळते?

९ श्‍वापदाविषयीच्या आमच्या ओळखीस दिव्यदूताने दिलेल्या आणखी एका वर्णनामुळे पुष्टी मिळते: “जे श्‍वापद तू पाहिले ते होते, आणि नाही, ते अथांग डोहातून वर येणार आहे व नाशाप्रत जाणार आहे.” (प्रकटीकरण १७:८) या भविष्यवादाचा काही अंश पुरा झाला आहे. दुसऱ्‍या महायुद्धाने लीग ऑफ नेशन्सचा संपूर्ण नाश केला. जेव्हा १९४२ मध्ये यहोवाच्या साक्षीदारांना या भविष्यवादाची पूर्ण समज मिळाली तेव्हा लीग–श्‍वापदाबद्दल “ते. . . नाही” असे म्हणता येऊ शकत होते.b पण १९४५ मध्ये ते “अथांग डोहातून” संयुक्‍त राष्ट्र संघ असे “वर” आले. तर मग ते शांती व निर्भयता आणण्याच्या आपल्या ध्येयाची पूर्ति करण्यात यशस्वी होणार का? भविष्यवाद म्हणतो, नाही. उलट, ते “नाशाप्रत जाणार आहे.”

श्‍वापदावरील स्वारी

१०, ११. (अ) योहानाच्या दृष्टांतातील श्‍वापदावर कोण आसनस्थ झाले होते? (ब) दृष्टांताच्या या भागाची पूर्णता आमच्या काळात कशी होत आहे?

१० या श्‍वापदाबाबतीत आणखी एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का? त्याच्यावर एका “स्त्री” ची स्वारी आसनस्थ झाली होती. तिची ओळख खोट्या धर्माचे जागतिक साम्राज्य,” “मोठी बाबेल, कळवंतिणीची व पृथ्वीवरील अमंगळपणाची आई” अशी मिळते. (प्रकटीकरण १७:३–५, १५) जगाच्या धर्मांनी दोन्ही संघटनांना ‘हाकून’ त्यांना त्यांच्या मार्गाने जाण्याचे मार्गदर्शन पुरविले का? होय, खासपणे ख्रिस्तीधर्मराज्याच्या धर्मांनी.

११ उदाहरणार्थ, लीग ऑफ नेशन्सच्या सभांना उपस्थित राहिलेल्या अमेरीका, ब्रिटन आणि स्कँडीनेवियन देशाच्या प्रॉटेस्टंट चर्चच्या प्रतिनिधींच्या बाबतीत “धार्मिक उत्साहास अनरुप असे काही” तरी गोष्टींचे वर्णन डच वार्ताहर पिरे वान पासेन यांनी केले. १९४५ मध्ये अमेरिकेतील फेडरल कौन्सिल ऑफ द चर्चेस ऑफ ख्राईस्ट ने घोषित केले: “संयुक्‍त राष्ट्र संघटनेच्या रोगनिवारक व सृजनशील हालचालीच्या सतत विस्तारसाठी काम करीत राहण्याचा आमचा निर्धार आहे.” १९६५ मध्ये सहावे पोप पॉल यांनी निरिक्षिले की त्यांना या संघटनेत “पृथ्वीवरील मानवजातीच्या प्रगतिसाठी असणाऱ्‍या देवाच्या प्रेमळ व श्रेष्ठ योजनांचे प्रतिबिंब—जेथे शुभवर्तमानात असणारा स्वर्गीय संदेश पार्थिव रुप घेतो त्याचे प्रतिबिंब” आढळले. खरेच, धार्मिक पुढाऱ्‍यांनी या संघटनेला “देवनिंदात्मक नावांनी” भूषित केले आहे.—प्रकटीकरण १७:३; पडताळा मत्तय २४:१५; मार्क १३:१४.

शांतीकरता जोर नाही

१२. संयुक्‍त राष्ट्र संघटनेचे पुरस्कर्ते आणि देवाचे राज्य यांच्यात कोणते संबंध राहिले आहेत?

१२ संयुक्‍त राष्ट्रसंघ देवाच्या राज्यासोबत बरोबरचे संबंध ठेवून नाही. खरे पाहता, संघाचे पाठीराखे त्या राज्याचा विरोध करतात. दूताने योहानास म्हटले होते: “[दहा शिंगे] कोकऱ्‍याबरोबर लढतील, परंतु कोकरा त्यांस जिंकिल, कारण तो प्रभूंचा प्रभू व राजांचा राजा आहे, आणि जे त्याच्याबरोबर, पाचारण केलेले, निवडिलेले व विश्‍वासू आहेत तेही हा विजय मिळवितील.” (प्रकटीकरण १७:१४) या भविष्यवादाच्या पूर्ततेनुरुप राष्ट्रांनी या अंतसंमयात सर्वदा ‘कोकऱ्‍याबरोबर लढत दिली’ आहे. त्यांनी त्याच्या राज्याचे जे राजदूत होते त्यांचा विरोध व छळ केला. तथापि कोकरा अजिंक्य आहे तसेच देवाच्या राज्याची सुवार्ता बंदीसत्र, तरुंगवास आणि मृत्यू घडला तरी सातत्याने पुढे नेणारे त्याचे पृथ्वीवरील सेवकही अजिंक्य आहेत.—मत्तय १०:१६–१८; योहान १६:३३; १ योहान ५:४

१३. खऱ्‍या शांतीसाठी संयुक्‍त राष्ट्रसंघ हा केव्हाही जोर का ठरू शकणार नाही?

१३ संयुक्‍त राष्ट्रसंघ हा खऱ्‍या शांतीकरता जोर कधीच ठरू शकणार नाही. त्याच्यावरील स्वारी, “मोठी बाबेल” ही इतिहासात अति दुष्ट युद्धकर्ती आहे व शिवाय ती “पवित्र जनांच्या रक्‍ताने व येशूच्या साक्षीच्या रक्‍ताने मस्त झालेली आहे.” (प्रकटीकरण १७:६) त्या संघटनेला पाठबळ पुरविणाऱ्‍या राष्ट्रांनी केलेल्या युद्धाने ही पृथ्वी रक्‍ताने न्हाऊन निघाली आहे. (मत्तय २४:६, ७) त्यांच्या मागे असणारी शक्‍ती, दियाबल सैतान, “मोठा अजगर” हाही काही शांतीकर्ता नाही. (प्रकटीकरण १२:९, १७; १३:२) असे हे शत्रू जिवंत असेपर्यंत मानवजातीला निर्भयतेचा कधीही अनुभव घेता येणार नाही, त्यांना काढून टाकलेच पाहिजे.

शांतीप्राप्त्यर्थ उचललेली आवश्‍यक पावले

१४. (अ) योहानाच्या दृष्टांतात श्‍वापदावरील स्वारीचे काय झाल्याचे दिसले? (ब) याची पूर्णता कशी होईल?

१४ विनाशात पहिला क्रमांक खोटया धर्माचा आहे, जो अगदी अनपेक्षितरित्या नष्ट होईल. ते या प्रकारे घडेल: “जी दहा शिंगे वे जे श्‍वापद तू पाहिले ती कळवंतिणीचा द्वेष करतील व तिला ओसाड व नग्न करतील. तिचे मांस खातील व तिला अग्नीत जाळून टाकतील.” तो मानवजातीला केवढा मोठा धक्का वाटेल! (प्रकटीकरण १७:१६; १८:९–१९) संयुक्‍त राष्ट्रसंघातील प्रबळ, राष्ट्रीयवादी “शिंगे” हा नाशकारक अनर्थ तिच्यावर आणतील. ही गोष्ट, येशूने, “अमंगळ पदार्थ” “यरुशलेम” यास ओसाड करील हा वदविलेला भविष्यवाद केवढया प्रकर्षाने आमच्या लक्षात आणविते! (मार्क १३:१४–२०; लूक २१:२०) तथापि, ही दंडाज्ञा वस्तुतः राष्ट्रे पुरी करीत असली तरी देवाने ख्रिस्ती धर्मराज्यासहित असणाऱ्‍या ‘मोठ्या कळवंतिणीवर’ जो दंड व्यक्‍त केला आहे त्याची ते खरेपणाने पूर्ति करीत असतील. याचा परिणाम? खोटा धर्म “ह्‍यापुढे कधीही सापडणार नाही.”—प्रकटीकरण १७:१; १८:२१.

१५, १६. (अ) “मोठे संकट” काय आहे? (ब) ते कोणता परिणाम आणील (क) सैतानाला मानवजातीची भावी शांती बिघडवून टाकण्यापासून कसे रोखले जाईल?

१५ येशूने म्हटले की ख्रिस्तीधर्मराज्याचा विनाश हा ‘जगाच्या प्रारंभापासून आतापर्यंत आले नाही व पुढे कधीही येणार नाही अशा मोठ्या संकटाची’ सुरुवात असेल. (मत्तय २४:१५, २१) हे संकट चालू असतानाच देवाचे राज्य सैतानी संघटनेच्या सर्व राजकीय व व्यापारी विभागावर दंडाज्ञा बजावील. (दानीएल २:४४) योहान आता राजा आपल्या हालचालीत पुढे सरसावत असल्याचे पाहतो: “मी स्वर्ग उघडलेला पाहिला; तो पहा, एक पांढरा घोडा आणि विश्‍वसनीय व सत्य असा म्हटलेला एक स्वार त्याच्यावर बसलेला मला दिसला. तो नीतीने न्यायनिवाडा करतो व लढतो.” त्याच्याविरुद्ध पृथ्वीवरील राजकीय राष्ट्रे आपणासोबत “श्‍वापदाची मूर्ति” घेऊन उभे ठाकले आहेत. या युद्धाचा परिणाम काय दिसणार? परत एकदा, शांती भंगविणाऱ्‍यांचा नाश!—प्रकटीकरण १९:११, १९–२१.

१६ हे झाल्यावर शांतीला बाधक ठरणारे नुसते एक मोठे अडखळण उरेल: स्वतः दियाबल सैतान. मानवजातीच्या या थोर शत्रूला कसे असमर्थ बनविले जाईल त्याचे वर्णन योहान पुढे देतो: “नंतर मी एका देवदूताला स्वर्गातून उतरताना पाहिले. त्याच्याजवळ अथांग डोहाची किल्ली होती; व त्याच्या हाती मोठा साखळदंड होता. त्याने दियाबल व सैतान म्हटलेला जुनाट साप म्हणजे तो अजगर यास धरिले आणि त्याला एक हजार वर्षापर्यंत बांधून राहण्यासाठी टाकले.”—प्रकटीकरण २०:१–३.

निवड करण्याची वेळ

१७. खऱ्‍या शांतीचे अवलोकन करण्याची इच्छा धरणाऱ्‍या वैयक्‍तिकांनी आता कोणती पावले उचलण्यास हवीत?

१७ मानवजातीकरता बदल होण्याचा हा केवढा भव्य काळ! संघटना व सरकारांचे उच्चाटन होते वेळी वैयक्‍तिकांना अशावेळी काय होईल ते त्यांच्या वैयक्‍तिक निवडीवर अवलंबून असेल. यहोवा देवाने प्रेमाने हे घोषित केले की, मोठे संकट येण्याआधी “प्रथम सर्व राष्ट्रात सुवार्ता गाजविली पाहिजे.” (मार्क १३:१०) शांतीप्रिय लोकांना मोठ्या बाबेलातून ‘बाहेर पडण्याचे’ आमंत्रण दिले जात आहे. (प्रकटीकरण १८:४) ख्रिस्तीधर्मराज्यात राहणाऱ्‍या लोकांना ‘डोंगराकडे पळून जाण्याचे’ आर्जविले जाते. (लूक २१:२१) देवाच्या राज्याच्या अधीन होणाऱ्‍यांनी ‘श्‍वापदाचे चिन्ह करुन घेण्याचे’ टाळले पाहिजे. (प्रकटीकरण १४:९–१२; योहान १७:१५, १६) अशा सरळ अंतःकरणाचा एक मोठा लोकसमुदाय “मोठ्या संकटातून” बाहेर पडेल. (प्रकटीकरण ७:९–१४) खरे म्हणजे सैतानी व्यवस्थेसोबत कोणी नाश होण्याची गरज आहेच असे काही नही.—नीतीसूत्रे २:२१, २२.

१८, १९. (अ) मोठे संकट कधी सुरु होईल याबद्दल काय म्हणता येऊ शकते? (ब) ख्रिश्‍चन त्या वेळेसाठी आत्ताच कशी तयारी करीत आहेत?

१८ पृथ्वीस हादरविणाऱ्‍या या सर्व घटना केव्हा घडतील? आज जगभरात “सुवार्ता” ऐकविली जात आहे. “अमंगळ पदार्थ” त्याच्या जागी आहे. (मत्तय २४:१४–१६) खरे पाहता, ‘श्‍वापदाची मूर्ति’ आपल्या अस्तित्वाच्या दुसऱ्‍या अंकात आहे व ती आता ‘नाशाप्रत जाण्याच्या’ बेतात आहे. (प्रकटीकरण १७:८) “चिन्ह” याची पूर्णता दाखविते की आम्ही, १९१४ मध्ये येशूची जी उपस्थिती आरंभिली तिच्या ७२व्या वर्षात आहोत. (मत्तय २४:३) येशूने म्हटले: “तुम्ही या सर्व गोष्टी पाहाल तेव्हा तो जवळ, दाराशीच, आहे असे समजा. मी तुम्हास खचित सांगतो. हे सर्व पूर्ण होईपर्यंत ही पिढी नाहीशी होणारच नाही.” (मत्तय २४:३३, ३४) यास्तव, ते “मोठे संकट” अगदी जवळ असले पाहिजे. यापेक्षा आणखी काही प्रशस्त आम्हास सांगता येईल का? सध्या तरी नाही.

१९ प्रेषित पौलाने भाकित केले: “‘शांती आहे, निर्भय आहे’ असे ते म्हणतात तेव्हा . . . त्यांचा अकस्मात नाश होतो.” (१ थेस्सलनीकाकर ५:३) त्यामुळेच मोठे संकट हे सर्वसाधारण मानवजातीकरता मोठा आश्‍चर्याचा धक्का देईल. तरीपण ख्रिश्‍चनांसाठी हे आश्‍चर्याचे नसणार. ते येत आहे हे त्यांना ठाऊक आहे; याकारणास्तव ते येशूची ही सूचना अनुसरतात: “तुम्ही तर होणाऱ्‍या ह्‍या सर्व गोष्टी चुकवावयास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागृत राहा.”—लूक २१:३६.

२०. मोठे संकट कधी येईल हे आता यावेळी ख्रिश्‍चनांना का सांगता येत नाही?

२० तरीपण, मोठे संकट नेमके केव्हा भडकेल ते ख्रिश्‍चनांना आधी सांगता येत नाही. यहोवाने “तो दिवस व ती घटका” प्रकटविलेली नाही. (मार्क १३:३२; मत्तय २४:४२) यामुळेच संयुक्‍त राष्ट्र संघाने १९८६ हे “आंतरराष्ट्रीय शांतीचे वर्ष” घोषीत केले असले तरी ख्रिश्‍चन त्या घटनेकडे मोठ्या उत्कंठेने लक्ष देऊन आहेत. पण त्यांना, पौलाच्या वर उद्धृत केलेल्या शब्दाची हे कार्य पूर्णता करणारे आहे की नाही हे अगाऊ घोषीत करता येत नाही. तरीपण, ‘श्‍वापदाची मूर्ति’ व “अमंगळ पदार्थ” यांची अर्थसूचकता लक्षात आणून दिल्याबद्दल ते यहोवाला कृतज्ञ आहेत. त्यामुळेच या संघटनेकडे ते, यहोवा पाहतो त्या दृष्टीने पाहतात आणि शांती आणण्याच्या त्या संघटनेच्या प्रयत्नांकरवी स्वतःची दिशाभूल होऊ देत नाही.

२१. (अ) सध्याही ख्रिश्‍चनांना कोणत्या शांतीचा अनुभव मिळत आहे? (ब) ते कशाकडे आत्मविश्‍वासपूर्वक पाहू शकतात?

२१ ‘जागृत राहणारे’ आणि स्वतःला देवाच्या राज्याच्या अधीन ठेवणारे आता सुध्दा शांतीचा अनुभव घेत आहेत. “शांतीचा देव” यहोवा त्यांच्याबरोबर असतो व त्यांना “सर्व बुद्धीसामर्थ्याच्या पलिकडे असणारी देवाची शांती” प्रदान करतो. (फिलिप्पैकर ४:७, ९) ते, फार दूरवर नाही अशा काळाकडे आपली दृष्टी लावून आहेत, जेथे यशयाच्या या सुंदर भविष्यवादाची पूर्णता त्यांना पाहावयास मिळेल: “नीतीमत्तेचा परिणाम शांती व तिचे फळ सर्वकाळचे स्वास्थ्य व निर्भयता होईल; आणि माझे लोक शांत स्थळी, निर्भय वसतिस्थानात व सुखाश्रमात राहतील.” (यशया ३२:१६–१८) ही निर्भयता जगव्याप्त स्वरूपाची असेल. (यशया ११:९) ती खरी शांती असेल कारण यहोवा स्वतः तिचा मूल स्रोत राहील.

[तळटीपा]

a योहानाच्या काळापेक्षा आजचे राजकीय दृश्‍य अगदीच वेगळे आहे. त्याकाळी संयुक्‍त राष्ट्रसंघाचे सदस्य असणारी राष्ट्रे बहुतेक अस्तित्वात नव्हती. त्यामुळे त्यांना “अद्याप राज्य मिळाले नाही” हे खऱ्‍या अर्थाने म्हणता येईल. यात मिसरसारख्या थोडयांचा अपवाद आहे. पण अशाही देशात शतकाभरांच्या काळात इतके सत्तांतर होत आले की त्यामुळे दिव्यदूताचे म्हणणे अद्याप खरे ठरते की: आता अधिकारावर असलेल्या सरकारांना योहानाच्या काळी “अद्याप राज्य मिळाले” नव्हते.

b दुसरे जागतिक महायुद्ध सर्वत्र पेटत असता वॉचटॉवर संस्थेच्या अध्यक्षांनी सप्टेंबर २०, १९४२ रोजी यहोवाच्या साक्षीदारांच्या न्यू वर्ल्ड थिऑक्रॅटिक अधिवेशनात “शांती–ती टिकेल का?” हे व्याख्यान दिले. त्यात त्यांनी प्रकटीकरणाच्या १७व्या अध्यायाचा आधार घेऊन हे स्पष्ट केले की इतरांना वाटते त्याप्रमाणे दुसऱ्‍या जागतिक महायुद्धाचे पर्यवसान हर्मगिद्दोनात होणार नाही. प्रथमतः अक्रियाक स्थितीच्या डोहातून ‘शांतीचे श्‍वापद’, राजकारणी सत्तांबरोबर जणू लाक्षणिकपणे ‘एक तासा’ साठी राज्य करण्यासाठी वर आले पाहिजे.

तुम्हाला आठवते का?

◻ प्रकटीकरणाच्या १७व्या अध्यायातील श्‍वापदाची काही वैशिष्ट्ये कोणती आहेत?

◻ हे श्‍वापद कशाचे प्रतिनिधित्व करते?

◻ हे लाक्षणिक श्‍वापद कधीच शांती का आणू शकणार नाही?

◻ देवाचे राज्य सरतेशेवटी मानवजातीला शांती व निर्भयता कशी देईल?

◻ या ज्ञानापासून वैयक्‍तिकांना कसा लाभ मिळू शकतो?

[२१ पानांवरील संक्षिप्त आशय]

पोप पौल सहावे यांनी संयुक्‍त राष्ट्र संघामध्ये “पृथ्वीवरील मानवजातीच्या प्रगति साठी असणाऱ्‍या देवाच्या प्रेमळ व श्रेष्ठ योजनांचे प्रतिबिंब” निरिक्षिले.

[२३ पानांवरील चित्रं]

शांतीप्रिय लोकांना मोठ्या बाबेलातून ‘बाहेर पडण्याचे’ आमंत्रण दिले जात आहे

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा