“अमंगळ पदार्थ” शांती आणण्यात असमर्थ ठरतो
“यरुशलेमेस सैन्याचा वेढा पडत आहे असे पाहाल, तेव्हा . . . जे यहुदीयात असतील त्यांनी डोंगराकडे पळून जावे.”—लूक २१:२०, २१.
१, २. (अ) संयुक्त राष्ट्र संघटनेसारख्या संस्थेद्वारा मानव कधीही शांती का आणू शकणार नाही? (ब) देव पृथ्वीवर कशी शांती आणील?
संयुक्त राष्ट्र संस्थेसारख्या संघटनेमार्फत लोकांनी शांती व निर्भयता आणण्याचा कितीही पराकोष्ठचा प्रयत्न केला तरी त्यांना यात केव्हाही यश मिळणार नाही. पण का? कारण आज मानवजात देवासोबत शांतीसंबंधात नाही आणि खरे पाहता, दीर्घकाळची सुरक्षितता मानवाने आपल्या निर्मात्याबरोबर शांतीचे नाते राखण्यावर अवलंबून आहे. (स्तोत्रसंहिता ४६:१–९; १२७:१; यशया ११:९; ५७:२१) तर मग ही समस्या कशी सोडविली जाईल? याबाबतीत, यहोवाने स्वतः या प्रकरणात हात घातला आहे ही आनंददायी गोष्ट आहे. शांती व निर्भयता या गोष्टी या पृथ्वीवर देवाचा पुत्र येशू द्वारे चालविलेल्या देवाच्या राज्यामार्फत सरतेशेवटी आणल्या जातील. याच येशूच्या जन्मप्रसंगी देवदूतांनी हे गीत गायिले होतेः “उर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यात शांती.”—लूक २:१४; स्तोत्रसंहिता ७२:७.
२ पहिल्या शतकात येशूने देवाच्या राज्याची ग्वाही दिली आणि शांतीप्रिय लोकांना देवाचे पुत्र बनण्याची तसेच आपणासोबत त्या राज्यात सहराज्यकर्ते बनण्याची संधीही प्रस्तुत केली. (मत्तय ४:२३; ५:९; लूक १२:३२) यानंतर ज्या घटना घडल्या त्या आमच्या या शतकात घडलेल्या घटनांशी अगदी सदृष्य आहेत. त्यांच्या परीक्षणामुळे मानवाची “शांती व निर्भय”तेची संघटना संयुक्त राष्ट्रसंघ याच्या भावी मार्गाक्रमणाबद्दल बरेच काही शिकण्यास मिळू शकेल.
यहुदी लोका निवड करतात
३. येशूच्या काळी कोण आंतरराष्ट्रीयपणे शांती व निर्भयता राखण्याचा प्रयत्न करीत होते, पण याला पूर्ण यश का येऊ शकत नव्हते?
३ येशूच्या काळी रोमी साम्राज्य बहुतेक पृथ्वीवर आपला अंमल चालवीत होते; आणि शांती व निर्भयतेविषयी त्याच्या स्वतःच्या कल्पना होत्या. आपल्या सैन्याद्वारे त्याने त्या काळी ज्ञात असणाऱ्या बहुतेक जगात ज्याला ते पॅक्स रोमाना (रोमी शांती) म्हणत त्याची प्रस्थापना केली होती. पण ही पॅक्स रोमाना चिरकाल शांती ठरू शकणार नव्हती कारण मूर्तिपूजक रोम व त्याचे सैन्य मानव व देव यांच्यातील समेट कधीही घडवून आणू शकले नाही. तद्वत, येशूने ज्याचा प्रचार केला ते देवाचे राज्य अधिक श्रेष्ठ दर्जाचे होते.
४. येशूच्या प्रचाराबद्दल बहुतेक यहुद्यांनी कशी प्रतिक्रिया दर्शविली? तरीपण, पहिल्या शतकात हळुवारपणे कशाची वाढ झाली?
४ तथापि, येशूच्या बहुतेक देशवासीयांनी देवाच्या राज्याचा धिक्कार केला. (योहान १:११; ७:४७, ४८; ९:२२) देशाच्या अधिपतींनी येशूला राष्ट्रीय सुरक्षिततेला धोक्यात आणणारा असे मानून मरणंदडाच्या शिक्षेस पात्र ठरविले. त्यांनी ही ओरड केली: “कैसराशिवाय आम्हास राजा नाही.” (योहान ११:४८; १९:१४, १५) तरीपण, काही यहुद्यांनी व नंतर पुष्कळ विदेश्यांनी येशू हा देवाने निवडलेला राजा अशी मान्यता दिली. (कलस्सैकर १:१३–२०) त्यांनी पुष्कळ देशात प्रचार केला. त्याकाळी यरुशलेम ख्रिश्चनांच्या आंतराष्ट्रीय संघटनेच केंद्र बनले.—प्रे. कृत्ये १५:२; १ पेत्र ५:९.
५, ६. (अ) यहुदी व रोम यांच्यातील नातेसंबंधाचे काय झाले? (ब) येशूने कोणता इशारा दिला, व त्याने इ.स. ७० मध्ये ख्रिश्चनांचे जीवन कसे वाचविले?
५ यहुद्यांनी ख्रिस्ताऐवजी कैसराला निवडले तरीही यरुशलेम व रोम यांच्यातील संबंध लवकरच बिघडले. यहुद्यांच्या झेलट्स्ने वा पक्षाने रोमी साम्राज्याविरुद्ध गनिमी कुयुत्तया आरंभिल्या ज्याचे परिवर्तन सरतेशेवटी इ.स. ६६ मध्ये युद्ध सुरु होण्यात दिसले. रोमी सैन्यतुकडीने पॅक्स रोमाना पुनर्स्थापण्याचा प्रयत्न राखला, यामुळे यरुशलेम लवकरच वेढयाखाली आले. ख्रिश्चनांसाठी ही गोष्ट अर्थसूचक होती. कित्येक वर्षे आधी येशूने या बाबतीत इशारा दिलाच होता की, “यरुशलेमेस सैन्याचा वेढा पडत आहे असे पाहाल तेव्हा ती ओसाड पडण्याची वेळ जवळ आली आहे असे समजा. त्यावेळेस जे यहुदीयात असतील त्यांनी डोंगराकडे पळून जावे, जे यरुशलेमेत असतील त्यांनी बाहेर निघून जावे.” (लूक २१:२०, २१) यरुशलेमेला आता वेढा पडला होता आणि ख्रिश्चन त्यातून पळ काढण्याच्या संधीची वाट पाहत होते.
६ हे लवकरच घडले. रोमी सैन्य मंदिराचा तट दुर्बल करण्याच्या बेतात होते व पुष्कळ यहुदी शरणागति पत्करण्याचा तयारीत होते तेवढयात रोमी सुभेदार सेस्टीयस गॉलस ने अनपेक्षितपणे आपले सैन्य काढून घेतले व तो निघून गेला. या संधीचा उपयोग झेलट्स्ने पुनः आपली सैन्याची फळी उभारण्यासाठी केला पण ख्रिश्चनांनी संधि साधून त्या नाशपात्र शहरातून पळ काढला. इ.स.७० मध्ये रोमी सैन्य परत आले, त्याने यरुशलेमाच्या तटाभोवती तळ दिला व या खेपेला मात्र शहराचा नाश झाला. ही ऐतिहासिक विपत्ती आज आम्हावर कसा परिणाम करते? याबाबतीतः येशूच्या इशाऱ्याने त्याच्या अनुयायांचे जीवन वाचविले त्याप्रमाणे तो आजही आम्हासाठी अर्थ राखून आहे.
एकापेक्षा अधिक पूर्णता
७-९. (अ) यरुशलेमाला सैन्याने वेढा देण्याविषयीच्या येशूच्या भविष्यवादाची पूर्णता एकापेक्षा अधिक आहे हे आम्ही कसे जाणतो? (ब) दानीएलाचे पुस्तक वाचताना ध्यान देऊन वाचणे या गोष्टीला कशी पुष्टी देते?
७ येशूने हा इशारा, एका महत्वपूर्ण प्रश्नाचे उत्तर देताना जो दीर्घ भविष्यवाद वदविला त्याचा भाग होता. त्याच्या शिष्यांनी विचारले होते: “या गोष्टी [यहुदी मंदिराचा नाश] केव्हा होतील आणि आपल्या उपस्थितीचे आणि व्यवस्थीकरणाच्या समाप्तीचे चिन्ह काय, हे आम्हास सांगा.” या प्रश्नाचे उत्तर देताना येशूने पुष्कळ घटना असणारे एक चिन्ह दिले ज्यात यरुशलेमास वेढा पडणार ही घटनाही होती. (मत्तय २४; मार्क १३; लूक २१) येशूच्या मृत्यूनंतरच्या काही वर्षात या भविष्यवादाच्या पुष्कळ घटना पूर्ण झाल्या व त्यांचा कळस इ.स. ७० मध्ये यरुशलेमाचा व यहुदी व्यवस्थीकरणाचा नाश होण्यात दिसला.—मत्तय २४:७, १४; प्रे.कृत्ये ११:२८; कलस्सै १:२३.
८ तथापि, शिष्यांनी येशूच्या “उपस्थिती” विषयीचीही विचारणा केली होती. ही घटना पवित्र शास्त्र सबंध जगाच्या व्यवस्थीकरणाच्या समाप्तीसोबत जोडते. (दानीएल २:४४; मत्तय २४:३, २१) येशूची आध्यात्मिक उपस्थिती आणि जागतिक व्यवस्थीकरणाचा अंत या गोष्टी पहिल्या शतकात घडल्या नसल्यामुळे येशूच्या भविष्यवादाची भावी व भव्य पूर्णता होणार व त्यात पहिल्या शतकातील घटना मोठ्या पूर्णतेचा नमुना पुरविणार अशी अपेक्षा धरता येते. यामध्ये येशूने यरुशलेमेच्या नाशासंबंधीचा जो इशारा दिला होता त्याची भव्य पूर्णता होण्याचेही अपेक्षिता येईल.
९ ही गोष्ट, आम्ही तो इशारा पवित्र शास्त्राच्या आणखी दोन पुस्तकात ज्या पद्धतीने लिखित करण्यात आला त्याचे परीक्षण केल्यास अधिक स्पष्ट होऊ शकते. मत्तयात वेढा देणाऱ्या सैन्याचे वर्णन “दानीएल संदेष्ट्याच्या द्वारे सांगितलेला ओसाडीचा अमंगळ पदार्थ” असे केले आहे. (मत्तय २४:१५) मार्कच्या अहवालात हा “अमंगळ पदार्थ” “नसावा तेथे उभा असलेला” दाखविला गेला आहे. (मार्क १३:१४) मत्तयाचा अहवाल म्हणतो की हा “अमंगळ पदार्थ” दानीएलाच्या पुस्तकात सुद्धा उल्लेखिला गेला आहे. खरे पाहता, “अमंगळ पदार्थ” ही संज्ञा त्या पुस्तकात तीन वेळा आढळतेः एकदा (अनेकवचनी संदर्भात) दानीएल ९:२७ मध्ये, जेथे, इ.स. ७० मध्ये यरूशलेमाचा विध्वंस झाला त्यावेळी जो भविष्यवाद पूर्ण झाला त्याचा भाग आढळतो व नंतर दानीएल ११:३१ व दानीएल १२:११ मध्ये ती संज्ञा दिसते. या नंतरच्या दोन शास्त्रवचनानुसार “अमंगळ पदार्थ” त्या स्थानी “नेमिलेल्या वेळी” किंवा “अंतसमयी” दिसणार होता. (दानीएल ११:२९; १२:९) आम्ही या “अंतसमया”त १९१४ पासून जगत आहोत; त्यामुळेच येशूचा इशारा आजही लागू होतो.—मत्तय २४:१५.
ख्रिस्तीधर्मराज्याची निवड
१०, ११. आमच्या शतकातील घटना पहिल्या शतकातील घटनांशी कशा सदृश्य ठरल्या आहेत?
१० आमच्या शतकात ज्या घटना घडल्या त्या पहिल्या शतकाच्या नमुन्याप्रमाणेच आहेत. जसे त्या काळी होते तसे आजही जागतिक दृश्यात एक साम्राज्य वर्चस्व गाजवीत आहे. हे आधुनिक साम्रज्य आंग्लो–अमेरिकन जागतिक सत्ता आहे जे शांती व निर्भयतेच्या स्वकल्पना मानवाजातीवर बिंबविण्याचा मोठा प्रयास करीत आहे. पहिल्या शतकात दैहिक इस्राएलांनी येशूचा, देवाचा अभिषिक्त राजा या अर्थी धिक्कार केला होता. १९१४ मध्ये येशूची, यहोवाचा सिंहासनाधिष्ठ राजा या नात्याने “उपस्थिति” सुरु झाली. (स्तोत्रसंहिता २:६; प्रकटीकरण ११:१५–१८) परंतु, ख्रिस्तीधर्मराज्याच्या राष्ट्रांसहित सर्व राष्ट्रांनी त्यास ओळखण्याचे नाकारले. (स्तोत्रसंहिता २:२, ३, १०, ११) खरे पाहता, याच वेळी ते सर्व आंतरराष्ट्रीय सार्वभौमत्व प्राप्तीस्तव जागतिक अशा तुंबळ युद्धात गुंतले होते. यहुदी धर्मनेत्यांप्रमाणे ख्रिस्ती धर्मराज्यातील धर्मपुढाऱ्यांनी येशूचा धिक्कार करण्यात पुढाकार घेतला. १९१४ पासून ते सातत्याने राजकारणी आखाडयात गुंतले व त्यांनी देवाच्या राज्याच्या सुवार्तेच्या प्रचारास विरोध केला.—मार्क १३:९.
११ तरीसुद्धा, येशूच्या काळाप्रमाणे आजही पुष्कळांनी आनंदाने यहोवाच्या राजास ओळखले व जगभरात देवाच्या राज्याची सुवार्ता घोषित करण्यात सहभाग दिला. (मत्तय २४:१४) आता पंचवीस लाखापेक्षा अधिक यहोवाचे साक्षीदार देवाच्या राज्यास निष्ठावंतपणा व्यक्त करून आहेत. (प्रकटीकरण ७:९, १०) हे जगाच्या राजकारणी गोष्टीत तटस्थ आहेत. शांती व निर्भयता आणण्याविषयी यहोवाच्या व्यवस्थेवर त्यांचा पूर्ण विश्वास आहे.—योहान १७:१५, १६; इफिसकर १:१०.
आजचा “अमंगळ पदार्थ”
१२. आजचा “अमंगळ पदार्थ” कोणता?
१२ तर मग आज, “अध्वस्त करणारा ओसाडीचा अमंगळ पदार्थ” कोण आहे? पहिल्या शतकात तो पदार्थ रोमी सैन्य होते ज्याला यरुशलेमात पॅक्स रोमाना लादण्यासाठी पाठविण्यात आले होते. तथापि, आधुनिक काळात पहिले जागतिक महायुद्ध लढणाऱ्या राष्ट्रांना शांती लादण्यासाठी सार्वत्रिक युद्धाच्या वापरा विषयी भ्रमनिरास झाला; त्यामुळे त्यांनी एका नव्या गोष्टीचा शोध लावला: जागतिक शांती टिकवून ठेवण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय संघटन. या संघटनेने आपले जीवन लीग ऑफ नेशन्स या नावाने सुरु केले व ते अद्याप संयुक्त राष्ट्रसंघ या नावाने टिकून आहे. हाच तो आधुनिक “ओसाडीचा अमंगळ पदार्थ” होय.
१३, १४. (अ) “अमंगळ पदार्थ” याविषयी ख्रिस्ती धर्मराज्याने कोणती फाजील विवेचने मांडली? (ब) ही मुर्तिपूजा का होती व त्यामुळे हा “अमंगळ पदार्थ” कोणत्या स्थानी आला?
१३ ज्याचे “अमंगळ पदार्थ” असे भाषांतर दानिएलाच्या पुस्तकात आहे तो शिक्कत या इब्री शब्दाचा विचार लक्षात घेणे मनोरंजक आहे. पवित्र शास्त्रात हा शब्द मूर्त्या वा मूर्तिपूजा याच्या अनुषंगाने प्रामुख्यत्वे वापरण्यात आला आहे. (१ राजे ११:५, ७) हे लक्षात घेउन लीग बद्दल धार्मिक पुढाऱ्यांनी जी विवेचने केली ती वाचा:
“मानवाच्या जागतिक संघटनेचे हे दृश्य . . . देवाचे राज्य याशिवाय आणखी दुसरे काय आहे?” “राष्ट्रांच्या लीगचे मूळ शुभवर्तमानात आहे.” (अमेरिकेतील फेडरल कौन्सिल ऑफ चर्चेस ऑफ खइस्ट) “[लीग ऑफ नेशन्सचा] प्रत्येक हेतू व कार्य, येशू ख्रिस्ताच्या शिकवणीत जी देवाची इच्छा प्रकट झालेली दिसते तिची पूर्णता आहे हे दाव्याने म्हणता येईल.” (चर्च ऑफ इंग्लंडचे बिशप) “आमची ही सभा लीग ऑफ नेशन्सची प्रशंसा करते व तिला आमचे पाठबळ व सर्व ख्रिश्चनांच्या प्रार्थनांची पुष्टी देते कारण ही लीग [पृथ्वीवर शांती] आणण्याचे एकमात्र उपलब्ध साधन आहे.” (ब्रिटनमधील बाप्टिस्ट, काँग्रिगेशनालिस्ट आणि प्रेस्बीटेरियन यांची सर्वसाधारण सभा) “[लीग ऑफ नेशन्स] ही एकमात्र संस्था पोपच्या प्रतिष्ठित सिंहासनातून ज्या इच्छा वारंवार वदविण्यात आल्या त्यांची पूर्ति करु शकणारी संघटना आहे.”—कार्डिनल बोऊर्न, वेस्टमिन्स्टरचे आर्चबिशप.
१४ राष्ट्रांनी देवाच्या राज्याचा नुसता धिक्कार केला नाही तर शांती आणण्यासाठी स्वतःची संघटनाही स्थापिली तेव्हा ही बंडखोरीच व्यक्त झाली. ख्रिस्ती धर्मराज्याच्या पुढाऱ्यांनी या संघटनेची देवाचे राज्य व शुभवर्तमान याजशी संबंध दाखवून तीच “एकमात्र उपलब्ध साधन” आहे असे म्हटले तेव्हा ती मुर्तिपूजा होती. ते तिला देवाच्या राज्याच्या पदावर, “पवित्र स्थानी” ठेवीत होते. त्यामुळे ही संघटना ‘नसावी तेथे उभी असलेली’ खरेपणाने दिसली. (मत्तय २४:१५; मार्क १३:१४) आणि आता तर हेच धार्मिक पुढारी देवाच्या प्रस्थापित राज्याकडे नव्हे तर लीगचा वारस संयुक्त राष्ट्र संघ याकडे लोकांना निर्देश करीत आहेत.
ख्रिस्तीधर्मराज्यास धोका
१५, १६. ख्रिस्ती धर्मराज्य व ‘अमंगळ पदार्था’स पाठबळ देणाऱ्या राष्ट्रांतील संबंधामध्ये कोणता वाढता कल दिसत आहे?
१५ ख्रिस्ती धर्मराज्यातील धर्मांनी लीग ऑफ नेशन्स व तिच्या वारसाची देवाच्या राज्याऐवजी निवड केली असली तरी त्यांचे या संघटनेच्या इतर मित्र राष्ट्रांसोबतचे संबंध आता विपरीत होत आहेत. हे अगदी, यहुदी व रोम यांच्यात जसे घडले तसेच घडत आहे. १९४५ पासून संयुक्त राष्ट्र संघाने आपणात अधिकाधिक अशा राष्ट्रांना सामील करुन घेतले जी एकतर ख्रिस्तेतर आहेत वा ख्रिस्ती मतविरोधी आहेत. यामुळेच ख्रिस्ती धर्मराज्यास आता बऱ्याची अपेक्षा नाही.
१६ शिवाय, कित्येक देशात ख्रिस्तीधर्म राज्यातील धर्म आणि देश यांच्यात बाचाबाची निर्माण झाली आहे. पोलंडमध्ये कॅथोलिक चर्च तेथील आमदानीचा विरोधी पक्ष असल्याचे दिसते. उत्तर आयर्लंड व लेबनन यात ख्रिस्ती धर्मराज्यातील धर्मांनी शांती व निर्भयते विषयीच्या समस्या अधिकच तीव्र केल्या आहेत. शिवाय ख्रिस्ती धर्मराज्याच्या धर्मांनी यहुदी झेलट्स् प्रमाणे अशा काहींची निर्मिती करून हिंसाचारास प्रोत्साहन दिले आहे. याप्रकारे प्रॉटेस्टंटीयांच्या वर्ल्ड कौन्सिल ऑफ चर्चेसनी दहशतावादी संघटनांना देणग्या दिल्या तर कॅथोलिक पाळक जंगलात गनिमी सैनिक बनून लढत देतात आणि क्रांतीकारक सरकारांच्य सेवेत राहतात.
१७. (अ) आधुनिक काळचे यरुशलेम काय आहे? (ब) त्याचे शेवटी काय होईल?
१७ ख्रिस्ती धर्मराज्यातील धर्म व रा यांच्यातील संबंध केवढे विपरीत होतील हे फक्त वेळच सांगू शकेल. तरीपण पहिल्या शतकातील घटनांनी या सर्व गोष्टींचा शेवट कसा होईल ते आधीच प्रतिछायित केले होते. येशूने आधीच ताडले होते त्याप्रमाणे पहिल्या शतकात रोमी सैन्याने सरतेशेवटी यरुशलेमाचा मोठ्या संकटासहित नाश घडवून आणला. या भविष्यवादीत नमुन्याच्या खरेपणास अनुलक्षून रा संयुक्त राष्ट्रसंघासोबत मिळून “यरुशलेम” म्हणजे ख्रिस्तीधर्मराज्याच्या धर्म साच्यावर हल्ला चढवितील व त्याचा नाश करतील.—लूक २१:२०, २३.
डोंगराकडे पळा
१८. “अमंगळ पदार्थ” आपल्या जागी उभा आहे हे पहाताच नम्र अंतःकरणाच्या लोकांनी काय केले पाहिजे?
१८ पहिल्या शतकात “अमंगळ पदार्थ” दिसल्या बरोबर ख्रिश्चनांपाशी पळ काढण्याची संधी उपलब्ध झाली. हे त्यांनी त्वरेने करावे असा येशूने त्यांना सल्ला दिला, कारण ही संधि किती काळ मिळणार होती हे त्यांना ज्ञात होणारे नव्हते. (मार्क १३:१५, १६) याचप्रकारे आजच्या नम्र अंतकरणाच्या लोकांना “अमंगळ पदार्थ” अस्तित्वात असल्याचा दिसत आहे तर त्यांनी लागलेच ख्रिस्ती धर्मराज्याच्या धर्मवर्तुळातून बाहेर पडण्यास हवे. त्यांचा तेथील निवास प्रत्येक सेकंदागणिक त्यांचे आध्यात्मिक जीवन अधिक धोक्यात आणतो, आणि कोण जाणे, बाहेर पडण्याची ही संधि किती काळासाठी उघडी असणार?
१९, २०. (अ) यरुशलेमाभोवती रोमी सैन्याचा वेढा पडलेला पहिल्या शतकातील ख्रिश्चनांनी पाहिला तेव्हा त्यांनी काय केले? (ब) आज ‘डोंगर’ कोणास सूचित करतो आणि तेथे नम्र अंतःकरणाच्या लोकांना पळ काढण्यासाठी कशाने चालना दिली पाहिजे?
१९ लूकच्या शुभवर्तमानाने त्याच्या काळातील ख्रिश्चनांना हा इशारा वदविला की “यरुशलेमास सैन्याचा वेढा पडत आहे” हे दिसत असता पळ काढावा. आम्ही आधी पाहिले आहेच की ते सैन्य इ.स. ६६ मध्ये आले आणि पळ काढण्याची संधि ही तेव्हाच, म्हणजे त्याच वर्षी सेस्टीयस गॉलसने आपले सैन्य माघारे नेले तेव्हा खुली झाली. ख्रिश्चनांनी पलायन केल्यावर यहुदी व रोमी यांचे मध्ये, यरुशलेमेभोवती नव्हे तरी युद्ध धुमसत होते. साम्राज्यशहा निराने व्हेस्पासियन याला पॅलेस्टाईनला पाठविले व तेथे ६७ व ६८ साली यशस्वी मोहीमा पार पाडल्या गेल्या. यानंतर निरो निवर्तला आणि व्हेस्पासियन साम्रज्यवारसा मिळविण्याच्या मागे लागला. त्याला इ.स. ६९ मध्ये साम्रज्यशहा बनविले गेल्यानंतर त्याने आपला पुत्र टायटस याला यहुदी युद्धाचा शेवट करावयाला पाठविले. इ.स.७० मध्ये यरुशलेमाचा नाश झाला.
२० हे सर्व कसे काय घडते ते पहाण्यासाठी ख्रिश्चन अर्थातच यरुशलेमात थांबून राहिले नाही. वेढा घालणारे सैन्य प्रथमतः दिसताच त्यांनी ओळखले की ते शहर तेव्हा भयंकर धोक्यात होते. याचप्रमाणे आजही, ख्रिस्ती धर्म राज्याच्या नाशाला कारणीभूत ठरणारे साधन आता दिसले आहे. तद्वत, ख्रिस्ती धर्मराज्य धोक्यात आलेले आहे हे आम्ही पाहता क्षणीच आम्ही ‘डोंगराकडे’ म्हणजे यहोवाने आपल्या इश्वरशासित संघटनेत जे आश्रय स्थान पुरविले आहे तेथे ‘पळून जाण्यास हवे.’ ख्रिस्तीधर्मराज्यावर होणारा पहिला हल्ला व त्याचा अंतिम विध्वंस यात निदान श्वास घेण्याची उसंत मिळेल इतका वेळ असेल हा आधार इतर कोणतेही भविष्यवाद देत नाहीत. खरे म्हणावयाचे तर या प्रतिपक्षीय युद्धात विरामाची काहीही गरज नसणार. नम्र अंतःकरणाच्या लोकांनी ख्रिस्ती धर्मराज्यातून आत्ताच पळ काढला तर ती सूज्ञतेची गोष्ट असेल.
यरुशलेम व ख्रिस्तीधर्मराज्य
२१. “अमंगळ पदार्थ” यरुशलेमाच्या अंतसमायाच्या शेवटाला का दिसला, पण तोच या शतकात या व्यवस्थीकरणाच्या अंतसमयाच्या आरंभी का दिसला?
२१ पहिल्या शतकात “अमंगळ पदार्थ” यरुशलेमाच्या नाशाच्या नेमक्या आधी दिसला व आज त्याचे आधुनिकीकरण या जगाच्या समाप्ति काळाच्या आरंभी दिसले हा फरक कसा या बद्दल आम्हाला नवल वाटू द्यावे का? नाही, कारण प्रत्येक प्रकरणात हा “अमंगळ पदार्थ” ज्यावेळी आपल्या लोकांनी पळ काढावा असे यहोवाला वाटत होते त्याच क्षणी दिसला. पहिल्या शतकात, प्रचार करता यावा यासाठी ख्रिश्चनांना यरुशलेमेत काही काळ राहावे लागले. (प्रे.कृत्ये १:८) पण इ.स. ६६ हे वर्ष आले, जेव्हा की नाश हा समीप होता तो “अमंगळ पदार्थ” दिसला व त्याने त्यांना पळून जाण्यासाठी सावधान केले. पण आज आधुनिक यरुशलेमात ‘राहायचे’ म्हटले तर त्याचा अर्थ, ख्रिस्तीधर्मराज्याच्या धार्मिक परिसराचा एक भाग बनणे असा होतोa अशा या भ्रष्ट व धर्मत्यागी वातावरणात राहून यहोवास स्वीकारणीय अशी सेवा सादर करणे अगदीच अशक्य आहे. याच कारणामुळे, जगाच्या समाप्तीकाळाच्या आरंभालाच हा “अमंगळ पदार्थ” दिसला व त्यामुळे ख्रिश्चनांना पळ काढण्याचा इशारा मळाला. ख्रिस्ती धर्मराज्याबाहेर होणारे हे पलायन आता वाढत आहे. प्रत्येकाला, तो “अमंगळ पदार्थ” त्याच्या स्थानी आहे हे त्याला दिसताच पळ काढण्याची सूचना मिळालेली असते.
२२. अद्याप कोणत्या प्रश्नांची उत्तरे हवीत?
२२ तरीपण आम्हाला विचारावे वाटते की, हे अत्यंत अनपेक्षित कार्य, संयुक्त राष्ट्रसंघातील लष्करी बळाद्वारे होणारा ख्रिस्तीधर्मराज्याचा विनाश कशामुळे प्रवृत्त होईल? हे केव्हा घडेल? यामुळे आमच्या पृथ्वीवर शांती व निर्भयता येण्यास कसा वाव मिळेल? या प्रश्नावद्दल आम्ही पुढील लेखात चर्चा करणार आहोत.
[तळटीपा]
a अशीच तुलना, इ.स.पू. ५३७ मध्ये यहुद्यांनी जेथून पळ काढला ते बाबेलोन शहर आणि जेथून आज ख्रिश्चन पळ काढतात ते आधुनिक मोठे बाबेल यामध्ये करता येईल.—यशया ५२:११; यिर्मया ५१:४५; प्रकटीकरण १८:४.
तुम्हास आठवते का?
◻ ‘अमंगळ पदार्था’ विषयी येशूने दिलेल्या भविष्यवादाची आधुनिक काळाची पूर्णता का असण्यास हवी?
◻ “अमंगळ पदार्थ” आज कोण आहे व तो त्याच्या जागी केव्हापासून आहे?
◻ येशूच्या भविष्यवादातील आधुनिक काळचे यरुशलेम कोणते आहे?
◻ लूक २१:२०, २१ पळ काढण्याच्या निकडीस पाहण्याची कशी मदत देते?
◻ नम्र अंतःकरणाचे लोक पळून जेथे जातात तो “डोंगर” कोणता आहे?
[१६ पानांवरील संक्षिप्त आशय]
ख्रिस्ती धर्मराज्याच्या पुढाऱ्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाचा संबंध देवाचे राज्य व शुभवर्तमान यांच्याशी जोडला तेव्हा ती मुर्तिपूजा होती