वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w86 ११/१ पृ. ९
  • योहान मार्ग तयार करतो

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • योहान मार्ग तयार करतो
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
  • मिळती जुळती माहिती
  • योहान मार्ग तयार करतो
    सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य
  • योहान मार्ग तयार करतो
    बायबलमधून शिकू या!
  • तो मशीहाचा अग्रगामी होता
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • येशूचा बाप्तिस्मा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
w86 ११/१ पृ. ९

येशूचे जीवन व उपाध्यपण

योहान मार्ग तयार करतो

बारा वर्षाच्या येशूला मंदिरातील गुरुजनांना प्रश्‍न विचारीत असलेल्या घटनेला आता सतरा वर्षे लोटली आहेत. आता इ.स. २९चा वसंत ऋतु आहे आणि आता येशूचा चुलत भाऊ योहान, जो यार्देन नदीच्या आसपासच्या प्रदेशामध्ये सुवार्ता घोषित करीत आहे त्याचे नाव बहुतेकांच्या तोंडी झाले आहे असे दिसते.

योहान हा खरोखरच दिसावयास व बोलावयास छाप पाडण्याजोगा मनुष्य आहे. त्याचे वस्त्र उंटाच्या केसाचे आहे व त्याच्या कमरेला कातडयाचा कमरबंद आहे. त्याचा आहार टोळ व रानमध आहे. पण त्याचा संदेश? “पश्‍चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.”

हा संदेश त्यांच्या ऐकणाऱ्‍यांना प्रोत्साहनात्मक खरोखरच आहे. पुष्कळांना त्यांच्या वागण्यात बदल करून जीवनातील अनपेक्षित गोष्टींना टाळण्याची व त्यासाठी आवश्‍यक असणाऱ्‍या पश्‍चातापाची गरज समजून आली. त्यामुळे यार्देनेच्या आसपासच्या सर्व प्रदेशातून आणि यरूशलेमातूनही पुष्कळ संख्येने लोक योहानाकडे येऊ लागले व तो त्यांचा यार्देनेच्या पाण्यात बुडवून बाप्तिस्मा करू लागला. पण का?

देवाच्या नियमशास्त्रा विरूद्धतेत केलेल्या पापापासून वळलेल्या लोकांना चिन्हासाठी अथवा स्विकृती म्हणून योहान त्यांचा बाप्तिस्मा करी. पण जेव्हा परूशी व सदूकी हे धर्मपुढारी यार्देनेकडे आले तेव्हा योहान त्यांचा कडक निषेध करतो. तो म्हणतो: “अहो, सापाच्या पिलांनो, पश्‍चातापास योग्य असे फळ द्या.”

योहानाची इतकी ख्याति बघून परूशी लोक याजक व लेवी यांना योहानाकडे पाठवितात. ते विचारतात: “आपण कोण आहात? ज्यांनी आम्हाला पाठविले त्यांना आम्ही उत्तर द्यावे म्हणून स्वतः विषयी आपले काय म्हणणे आहे हे सांगा.”

योहान विवेचन सादर करतो: “यशया संदेष्ट्याने सांगितल्याप्रमाणे, ‘यहोवाचा मार्ग नीट करा’ असे ‘अरण्यात ओरडणाऱ्‍याची वाणी मी आहे.’” जो राजा होणार अशा मसीहाचा लोकांनी स्विकार करावा म्हणून योहान त्यांची अंतःकरणे सिद्ध करीत आहे. यासंबंधी योहान म्हणतो: “माझ्यापेक्षा समर्थ असा कोणी येत आहे, त्याच्या वहाणा उचलावयास देखील मी योग्य नाही.”

अशाप्रकारे, “स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे” हा योहानाचा संदेश जाहीर ग्वाही देत होता की, यहोवाचा निवडलेला राजा येशू ख्रिस्त याच्या उपाध्यपणाची लवकरच सुरवात होणार आहे. योहान १:६–८, १५–२८; मत्तय ३:१–१२; लूक ३:१–१८; प्रे. कृत्ये १९:४.

◆ योहान कशाप्रकारचा मनुष्य आहे?

◆ योहान लोकांचा बाप्तिस्मा का करतो?

◆ राज्य जवळ आले आहे असे योहान का म्हणतो?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा