येशूचे जीवन व उपाध्यपण
येशूचा बाप्तिस्मा
योहानाने साक्षीचे कार्य सुरु करून सहा महिने झाल्यानंतर, आता ३० वर्षाचा झालेला, येशू यार्देनेकडे त्याच्या जवळ येतो. कोणत्या कारणासाठी बरे? सहज भेट देण्यास? योहानाने आपल्या कामात केवढी प्रगती साधली यामध्ये येशू आस्थेवाईक आहे का? नाही, येशू योहानाला त्याचा बाप्तिस्मा करण्यास सांगत आहे.
परंतु योहान त्याला मना करीत म्हणतोः “आपल्या हातून मी बाप्तिस्मा घ्यावा, असे असता आपण माझ्याकडे येता हे काय?” त्याचा चुलत भाऊ येशू हा देवाचा खास पूत्र आहे हे योहानाला माहीत आहे. का बरे, येशूला गर्भवती असलेली, मरिया, त्यांना भेटावयास गेली असता योहानाने आपल्या आईच्या उदरात उल्हासाने उडी घेतली होती! योहानाची आई अलिशिबा हिने ह्याबद्दल त्याला नंतर सांगितले असणार यात काही शंका नाही. शिवाय येशूच्या जन्मासंबंधी देवदुतांनी केलेली घोषणा आणि तो जन्मला त्या रात्री मेंढपाळांसमोर देवदुतांची उपस्थिती त्या गोष्टीही तिने त्याला सांगितल्या असतील.
ह्यावरून येशू हा योहानाला अनोळखी नाही. आणि तसेच तो जो बाप्तिस्मा करतो तो येशूसाठी नाही हे त्याला माहीत आहे. पापांपासून वळुन पश्चाताप करणाऱ्यांकरिता तो बाप्तिस्मा आहे, पण येशू तर पापविरहीत आहे. तथापि, योहानाचा हा आक्षेप असला तरी येशू त्याला गळ घालतो: “आता हे होऊ दे, कारण ह्या प्रकारे सर्व धर्माचरण पुर्णपणे करणे हे आपणाला उचित आहे.”
मग येशूचा बाप्तिस्मा करणे हे उचित का आहे? कारण येशूचा बाप्तिस्मा हा पापापासूनच्या पश्चातापासाठी नव्हता, तर त्याने स्वतःला पित्याच्या इच्छेप्रमाणे करण्याचे प्रस्तुत केले याचे द्योतक आहे. येशू हा सुतार होता, पण आताची वेळ ही देवाने जी सेवा करण्याकरिता त्याला पृथ्वीवर पाठविले त्याची सुरुवात करण्याची आहे. येशूचा बाप्तिस्मा करते वेळी काहीतरी विलक्षण घडणार अशी अपेक्षा योहान बाळगुन होता असे तुम्हास वाटते का?
योहान नंतर असे कळवितो: “ज्याने मला पाण्याने बाप्तिस्मा करावयास पाठविले त्याने मला सांगितले होते की ज्या कोणावर आत्मा उतरत असताना पाहाशील तोच पवित्र आत्माने बाप्तिस्मा करणारा आहे.” ह्यावरून तो कोणाएकाचा बाप्तिस्मा करीत असता देवाचा आत्मा येईल याची तो अपेक्षा बाळगून होता. कदाचित याकरताच, येशू पाण्यातून बाहेर आल्यावर देवाचा आत्मा कबुतराच्या रूपात त्याच्यावर आला हे पाहून योहानाला आश्चर्य वाटले नाही.
पण ह्यापेक्षा आणखीन काहीतरी येशूच्या बाप्तिस्म्यावेळी घडले. आकाश उघडले गेले व अशी वाणी झाली: “हा माझा पुत्र, मला परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे.” ही कुणाची वाणी होती बरे? येशूची स्वतःची वाणी होती का? कदापि नाही! ती देवाची वाणी होती. हे स्पष्ट आहे की येशू हा देवाचा पूत्र आहे, पुष्कळ लोक म्हणतात त्याप्रमाणे तो स्वतः देव नाही. मत्तय ३:१३–१७; लूक ३:२१–२३; १:३४–३६, ४४; २:१०–१४; योहान १:३२–३४; इब्री १०:५–९.
◆ येशू योहानाला अनोळखी का नव्हता?
◆ पापविरहित असताही येशूने बाप्तिस्मा का घेतला?
◆ येशूबद्दल योहानाला जी माहिती असावी ती लक्षात घेता येशूवर देवाचा पवित्र आत्मा आला तेव्हा योहानाला बहुधा आश्चर्य का वाटले नसावे?