वडीलांनों, तुमच्या मेंढपाळकत्वाच्या जबाबदाऱ्या गंभीरतेने पूर्ण करा
“तुम्हाला सोपून दिलेल्या देवाच्या कळपाचे पालन करा.”—१ पेत्र ५:२.
१. देवाची मर्जी लाभलेल्या माणसांची सूचकता मेंढरांकरवी दर्शविली जावी हे का योग्य आहे?
यहोवा देवाकडून कृपा लाभलेल्या मानवांची सूचकता मेंढराकरवी केली जावी हे किती उचित आहे बरे! मेंढरे गरीब स्वभावाचे प्राणी आहेत व ती त्यांच्या मेंढपाळाचा आवाज ओळखतात व लगेच त्याच्या मागे जातात. याचप्रमाणे देवाचे मेंढरासमान लोक स्वतःला उत्तम मेंढपाळ येशू ख्रिस्त याकरवी निरवू देता. ते त्याला ओळखतात, त्याच्या वाणीस प्रतिसाद देतात व त्याचे नेतृत्व आनंदाने स्विकारतात. (योहान १०:११–१६) अर्थातच, चांगल्या मेंढपाळाशिवाय मेंढरे घाबरतात व निराधार बनतात. तद्वत, येशू ख्रिस्ताने लोकांना, “मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे गांजलेले व पांगलेले” असे पाहिलेले पाहून त्याला त्यांच्या विषयीचा कळवळा साहजिक वाटला होता.—मत्तय ९:३६.
२. इस्राएलांच्या (निर्दयी) मेंढपाळांच्या वर्चस्वाखाली त्रास सहन करणाऱ्या मेंढंरासमान लोकांबद्दल यहोवाला कसे वाटत होते?
२ शास्त्रवचनीय दृष्टया “मेंढरे” असे ज्यांना संबोधिण्यात आले आहे अशा प्रामणिक अंतःकरणाच्या लोकांच्या आध्यात्मिक कल्याणाबद्दल यहोवा देव गाढ आस्था राखून आहे. उदाहरणार्थ, इस्राएलात जबाबदार पदी असणाऱ्या ज्या लोकांनी मेंढरांकडे दुर्लक्ष करून स्वार्थपणे स्वतःचेच पोषण केले अशा “इस्राएलांच्या मेंढपाळाबद्दल यहोवाने यहेज्केल संदेष्टयामार्फत अनर्थ घोषित केला. पण यहोवा त्या मेंढरांना त्या त्रासात तसेच राहू देणार नव्हता. या कारणास्तव त्याने म्हटले: “मी हरवलेल्यांस शोधीन, हाकून दिलेल्यांस परत आणीन, घायाळांस पट्टी बांधीन, रोग्यांस बळ देईन.”—यहेज्केल ३४:२–१६.
३. येशू ख्रिस्ताने मेंढरांविषयीची कळकळ कशी दाखवली?
३ उत्तम मेंढपाळ येशू ख्रिस्ताला मेंढरासमान लोकांबद्दल अशीच कळकळ वाटते. या कारणास्तव आपले स्वर्गारोहण होण्याच्या आधी येशूने मेंढरांबद्दल योग्य काळजी व्यक्त केली जाण्यास हवी अशी इच्छा बोलून दाखविली. त्याने प्रेषित पेत्राला “माझ्या मेंढरांस चार, माझ्या लहान मेंढरांची काळजी घे, माझ्या लहान मेंढरांस भरव” असे म्हटले. (योहान २१:१५–१७) मेंढरांकडे प्रेमळ लक्ष देण्याचे चालू राहावे याची खात्री व्हावी म्हणून येशूने “काही मेंढपाळ” देऊ केले की ज्याकरवी “ख्रिस्ताच्या शरीराची उभारणी होत राहावी.”—इफिसकर ४:११, १२.
४. आत्म्याने नियुक्त झालेल्या “वडीलांना” पौलाने काय करण्याचे आर्जविले?
४ मेंढरासमान लोकांबद्दल देव व ख्रिस्ताला एवढे गाढ प्रेम व कळकळ आहे तर देवाच्या लोकांकरता सह मेंढपाळ असणे ही तर खूपच जबाबदार नेमणूक आहे. याकरता प्रेषित पौलाने इफिस येथील आत्म्याने नियुक्त असणाऱ्या “वडीलांना” “देवाच्या मंडळीचा संभाळ” तिजकडे योग्य ते लक्ष देऊन करण्याविषयी आर्जविले. (प्रे. कृत्ये २०:१७, २८) तर मग, नियुक्त वडील या जबाबदारीची योग्य काळजी कशी वाहू शकतात?
मेंढपाळांना प्राप्त होणारे मार्गदर्शन
५. पेत्राने आपल्या सह देखरेख्यांना कोणती सूचना दिली?
५ येशूच्या मेंढरांना भरविण्याबद्दलची अपेक्षा ज्याच्याबाबत धरली गेली होती त्या प्रेषित पेत्राने सोबतच्या देखरेख्यांना म्हटले: “तुम्हाला सोपून दिलेल्या देवाच्या कळपाचे पालन करा. करावे लागते म्हणून नव्हे, तर देवाच्या इच्छेप्रमाणे संतोषाने त्याची देखरेख करा; द्रव्यलोभाने नव्हे तर उत्सुकतेने करा. तुमच्या हाती सोपविलेल्या लोकांवर धनीपण करणारे नव्हे तर कळपाला कित्ते व्हा.” (१ पेत्र ५:१–३) पवित्र आत्म्याने नियुक्त झालेल्या वडीलांना या सूचनेचा अवलंब कसा करता येईल ते आपण पाहू या.
६. कोणता मनोदय राखून वडीलांनी “देवाच्या कळपाची” सेवा करावी?
६ पेत्राने सह वडीलांना आर्जविले होते: “तुम्हास सोपून दिलेल्या देवाच्या कळपाचे पालन करा. करावे लागते म्हणून नव्हे तर . . . संतोषाने . . . करा.” आध्यात्मिक मेंढपाळ या नात्याने सेवा करण्याचा ज्यांना हक्क प्राप्त झाला आहे अशांनी ते काम कुरकुरत, मेंढरांची काळजी घेणे भाग पडते या अर्थी करू नये. हे एक त्रासदायक काम आहे किंवा कळपाची देखरेख करण्यासाठी दुसऱ्यांनी आपल्याला रेटेले आहे या अर्थी त्यांना या कामाची जबरदस्ती वाटू देता कामा नये. उलटपक्षी त्यांनी स्वसंतोषाने ही सेवा करावी. (पडताळा स्तोत्रसंहिता ११०:३) इतरांचे भले करण्याची इच्छा एखाद्याठायी असते त्यावेळी ते तो पूर्ण अंतःकरणाने, स्वतःला पुढे सारून आणि इतर सर्व कामे बाजूला सारून करतो. स्वेच्छापूर्ण वडील आपला वेळ व श्रम मुक्तपणे देतो. मेंढरे चुकीच्या दिशेने जाण्याची शक्यता आहे हे त्यांना ठाऊक असते याकरताच देव जशी मेंढरासमान लोकांबद्दल काळजी दाखवून आहे त्याचेच अनुकरण करून त्यांची त्यांना मदत देण्याची इच्छा असते. मार्गावरून चुकलेल्या इस्राएलांसाठी यहोवाची कळकळ इतकी तीव्र होती की त्याने त्यांना हे शब्द पुकारून सांगितले: “ज्यांस माझे नाम प्राप्त झाले नव्हते त्यांस मी म्हणालो: ‘पहा, मी आहे, हा मी आहे!’”—यशया ६५:१.
७, ८. (अ) मेंढपाळकत्वाचे काम अनीतीने पैसा न मिळवता करावे याचा काय अर्थ होतो? (ब) उत्सुकतेने सेवा करणे म्हणजे काय?
७ पेत्राने म्हटले की मेंढपाळकत्वाचे काम “द्रव्यलोभाने नव्हे तर उत्सुकतेने करा”वे. नियुक्त वडीलांना मेंढरावर भार होण्याची इच्छा नसते. अशीच प्रेषित पौलाची वृत्ति होती कारण तो थेस्सलनीकातील ख्रिश्चनांना म्हणाला: “बंधूनो, आमचे श्रम व कष्ट ह्यांची आठवण तुम्हास आहे. तुम्हातील कोणाला आमचा भार होऊ नये म्हणून आम्ही रात्रंदिवस कामधंदा करून तुम्हापुढे देवाच्या सुवार्तेची घोषणा केली.” त्याने त्यांना आणखी हे स्मरण दिले: “आम्ही तुम्हामध्ये असताना अव्यवस्थितपणे वागलो नाही. आणि आम्ही कोणाचे अन्न फुकट खाल्ले नाही. परंतु तुम्हापैकी कोणावरही भार घालू नये म्हणून आम्ही रात्रंदिवस श्रम व कष्ट करून काम केले.”—१ थेस्सलनीकाकर २:९; २ थेस्सलनीकाकर ३:७, ८.
८ याचप्रमाणे, देवाच्या कळपाचे विश्वासू मेंढपाळ मेंढरांपाशी असणाऱ्या गोष्टींचा लोभ धरीत नाहीत तसेच त्यांच्यावर खर्च लादून अन्यायीपणे कमाई मिळवीत नाही. (लूक १२:१३–१५; प्रे. कृत्ये २०:३३–३५) पौलाने दाखविले की देखरेखे होण्याची इच्छा धरणाऱ्यांनी ‘अनीतीने पैसा मिळविणारे नसावे.’ (तीतास १:७) याउलट त्यांनी उत्सुकतेने सेवा करावी. आपल्या कामात उत्साह प्रदर्शित करावा व त्यांना सोपून दिलेल्या मेंढरांच्या फायद्यास्वत परिश्रम करावे. (फिलिपै २:४) असे केल्यास या मेंढपाळांना यहोवा देव व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त यांनी दाखविली तशीच निस्वार्थ काळजी व्यक्त करता येईल.
९. ख्रिस्ती मेंढपाळाने देवाच्या लोकांवर धनीपण करणारे का असू नयेत?
९ पेत्राने आणखी म्हटले की वडीलांनी देवाच्या लोकांची देखरेख “धनीपण करणारे नव्हे तर कळपाला कित्ते” होऊन करावयाची आहे. कोणी प्रेमाळू मेंढपाळ स्वतःमध्ये गर्विष्ठपणाची भावना बळावू नये व मेंढरावर धनीपण केले जाऊ नये याकरता दक्ष असतो. गर्विष्ठ आत्मा ख्रिस्तीत्वाचे लक्षण नाही याकरता यहोवास संतुष्ट करण्याची इच्छा करणाऱ्या सर्वांनी तो टाळला पाहिजे. नीतीसूत्रे २१:४ म्हणते: “चढेल दृष्टी, गर्विष्ठ अंतःकरण, तसाच दुर्जनांच्या शेताचा उपज ही पापरूप होत.” येशूने आपल्या अनुयायांना म्हटले होते: “परराष्ट्रीय व त्यांचे अधिपती प्रभुत्व चालवितात व मोठे लोकही अधिकार करतात हे तुम्हास ठाऊक आहे. तसे तुम्हामध्ये नाही. तर जो कोणी तुम्हामध्ये श्रेष्ठ होऊ इच्छितो तो तुमचा सेवक होईल आणि जो कोणी तुम्हामध्ये पहिला होऊ पाहतो तो तुमचा दास होईल.” (मत्तय २०:२५–२७) खरेच, वडीलांनी हे लक्षात ठेवावे की ज्यांचा मिळून कळप तयार होतो ते सर्व देवाची मेंढरे आहेत त्यामुळे त्यांच्यासोबत त्यांनी कटु पद्धतीने व्यवहार राखावयास नको.
१०. (अ) यहेज्केलाच्या काळी काही मेंढपाळ लोकांबद्दल काय करीत होते? (ब) निष्ठावंत देखरेखे कळपास कसे सुदंर उदाहरण आहेत?
१० यहेज्केलाच्या काळात स्वतःचाच स्वार्थ पाहणाऱ्या मेंढपाळांना यहोवा म्हणाला: “तुम्ही निर्बलांस बलवान करीत नाही, रोग्यांस बरे करीत नाही. घायाळांचे घाय बांधीत नाही, घालवून दिलेल्यांस परत आणीत नाही. हरवलेल्यांस शोधीत नाही. तरी तुम्ही त्याजवर सक्तीने व कडकपणे सत्ता चालविता.” यहोवाने आणखी पुढे म्हटले की या कडक मेंढपाळांनी ‘अशक्तांस आपल्या अंगाने व खांद्याने धक्के देऊन . . . हाकून दिले. (यहेज्केल ३४:४, २०, २१) पण हे “देवाच्या कळपाची” राखण करणाऱ्या प्रेमळ मेंढपाळाबद्दल दिसत नाही. ते आपल्या अधिकारपदाचा दुरुपयोग करीत नाहीत आणि कोणा मेंढरास अडखळवू देत नाहीत. (पडताळा मार्क ९:४२) उलटपक्षी हे प्रेमळ वडील प्रेमळ मदत व प्रोत्साहन देतात. यासोबत ते यहोवावर प्रार्थनापूर्वक विसंबून राहतात आणि “भाषण, वर्तन, प्रीती, विश्वास व शुद्धता याविषयी चांगले उदाहरण राखण्याचा प्रयत्न ठेवतात. (१ तिमथ्यी ४:१२) यामुळे मेंढरे समाधानी होतात व त्यांना सुरक्षित वाटते कारण त्यांना प्रेमळ व देवभिरू मेंढपाळांची देखरेख लाभलेली असते.
मेंढरांसमोर उभी राहणारी संकटे
११. आधुनिक काळच्या मेंढपाळांनी देवाच्या कळपाची इतकी चांगली काळजी का करावी की ज्यामुळे मेंढरांना सुरक्षितता असल्याचे वाटू लागेल?
११ कळपाची राखण करण्यासाठी वडील जे उत्तम लक्ष देतात त्यामुळे मेंढरासमान लोकांना आज सुरक्षित व खात्रीदायक वाटले पाहिजे. (यशया ३२:१, २) ख्रिश्चनांना या “शेवटल्या काळी” “कठीण दिवसात” पुष्कळ संकटांचा सामना द्यावा लागत असल्यामुळे त्याचा खासपणे अनुभव येण्यास हवा. (२ तिमथ्यी ३:१–५) स्तोत्रकर्त्या दाविदाला सुद्धा संकटाचा सामना करावा लागला पण तो म्हणू शकला: “यहोवा माझा मेंढपाळ आहे. . . . मृत्युछायेच्या दरीतूनहि मी जात असलो तरी कसल्याहि अरिष्टांस भिणार नाही, कारण तू माझ्याबरोबर आहेस.” (स्तोत्र संहिता २३:१–४) देवाच्या कळपाच्या आधुनिक काळाच्या मेंढपाळांनी मेंढरांची एवढी चांगली काळजी घेण्यास हवी की ज्याकरवी दावीदाप्रमाणेच मेंढरासमान लोकांना यहोवाच्या अगदी समीप असल्याचे वाटले पाहिजे. देवाच्या संस्थेचे एक भाग म्हणून त्यांना सुरक्षित वाटावयास हवे.
१२. सध्याच्या कोणत्या प्रवृत्तिपासून मेंढरांचे संरक्षण होण्याची गरज आहे आणि याबाबतीत वडीलांना कोणती मदत देता येईल?
१२ देवाच्या कळापाला आज ज्या संकटांचा वा धोक्यांचा सामना करावा लागतो त्यापैकी एक आहे विजोड व अनैतिक वागणूकीकडे असणारा सध्याचा कल. दुरदर्शन आणि मनोरंजनाच्या इतर माध्यमाकरवी लोकांनी अशा जीवनमानाचा अवलंब केला आहे जो देववचनामध्ये असणाऱ्या दर्जाच्या थेट विरोधात आहे. काहीही चालण्याजोगे आहे अशी ही जगाची सध्याची प्रवृत्ति व सोबत त्याची लैंगिक बाबतीतील गैरवागणूक यांना मंडळीत प्राप्त होणाऱ्या शास्त्रवचनीय सूचनांद्वारे प्रतिकार होण्यास हवा. याकरताच मेंढपाळांना पवित्र शास्त्र नैतिकतेच्याबाबतीत काय शिकविते याची पुरेपूर माहिती असण्यास हवी. यासोबत त्यांनी मेंढरांपुढे, यहोवाच्या सेवेकरता शुद्ध राहण्याची जबाबदारी सातत्याने ठेवावी.—तीतास २:१३, १४.
१३. (अ) यहुदाचे पत्र कोणत्या धोक्याविरुद्ध सबळ सूचना देते? (ब) धर्मत्याग्यांविषयी वडीलांनी कोणती भूमिका घ्यावी?
१३ शिवाय धर्मत्याग्यांपासून सुद्धा धोके वा संकटे उद्भवतात. १९ शतकांआधी मंडळीत खोटे शिक्षण देणारी “अभक्त माणसे” घुसली होती हे आठवा. ते “पाण्याखाली झाकलेले खडक” या भयंकर रूपात खोटे मेंढपाळ होते. ते स्वतःलाच भरवीत. त्यांची स्वभाववृत्ति पशूंसारखी होती आणि त्यांजमध्ये आध्यात्मिकतेचा अभाव होता. यहुदाच्या पत्राने यांच्याबाबतीत असा सबळ सल्ला दिला ज्यामुळे वडील व इतर सर्व विश्वासू जनांस “विश्वासासंबंधीचे सुयुद्ध” करण्यास समर्थ केले गेले. (यहुदा ३, ४, १२, १९) तद्वत, मंडळीत फूट पाडू इच्छिणाऱ्या कोणाविषयीही वडीलांनी दृढ भूमिका निश्चये घेतली पाहिजे. कारण पौलाने लिहिले: “तुम्हाला जे शिक्षण मिळाले आहे त्याविरुद्ध जे फुटी व अडथळे घडवून आणीत आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवा आणि त्यांच्यापासून दूर व्हा.” (रोमकर १६:१७) अशाप्रकारे या किंवा “मेंढरांचे कातडे पांघरलेल्या लांडग्या ‘प्रमाणेच्या कोणाही माणसापासून कळपाचे रक्षण करण्याची मेंढपाळांवर जबाबदारी आहे.—मत्तय ७:१५.
आणखी काही मार्गाद्वारे मेंढरांना मदत देणे
१४, १५. एकमेकांस कठोरतेने वागविणाऱ्या समविश्वासूना वडील कसे मदत देऊ शकतील?
१४ ‘देवाच्या कळपाची राखण करण्यामध्ये’ मेंढरांना, मंडळीमध्येच उद्भवणाऱ्या विविध समस्यांबद्दल मदत देणेही समाविष्ट आहे. कधी कधी तर मेंढरूच दुसऱ्या एखाद्या मेंढरासोबत भांडू लागेल. एका छोटया घटने द्वारे काहीजण दुसऱ्यांना कठोरपणे वागवू लागतील. हे लोक एकमेकांची निंदाही करतील व शेवटी यहोवाच्या सेवेत इतर साथीदारांसोबतचा सहवास सोडून देतील.—नीतीसूत्रे १८:१.
१५ अशा समविश्वांसूना आध्यात्मिक मेंढपाळांनी मदत देण्यासाठी सदा जागृत राहावे. जसे की, निंदा करणे हे कितीचुकीचे आहे पण तेच सर्व निष्ठांवंत ख्रिश्चनांनी मंडळीचे ऐक्य राखून ठेवण्यास कसे झटावे हे वडीलांनी मंडळीत दाखवून देण्याची गरज भासेल. (लेवीय १९:१६–१८; स्तोत्रसंहिता १३३:१–३; १ करिंथकरांस १:१०) पौलाने वदविलेल्या इशाऱ्याकडे निर्दश करून वडीलांना मदत देता येईल का, “तुम्ही जर एकमेकांस चावता व खाऊन टाकिता तर परस्परांच्या हातून एकमेकांचा संहार होऊ नये म्हणून जपा.”—गलतीकर ५:१३–१५; याकोब ३:१३–१८.
१६. मंडळीत कोणतीही विनाशकारी लक्षणे दिसल्यास वडीलांनी काय केलेच पाहिजे?
१६ वडीलांनो, हे लक्षात ठेवा की सैतान हा “गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधीत” फिरत आहे. (१ पेत्र ५:८) सर्व खऱ्या ख्रिश्चनांना रक्त व मांसाबरोबर नव्हे तर दुरात्म्यांच्या समूहासोबत लढत द्यावयाची आहे. (इफिसकर ६:१०—१३) सैतानाने कोणा मेंढरावर झडप घालावी हे कोणाही विश्वासू मेंढपाळाला निश्चये वाटणार नाही. त्यामुळेच कोणी सभा चुकवण्यास सुरुवात केली आहे असे दिसते त्यावेळी काळजी करणाऱ्या वडीलांनी त्याविषयीचे निश्चित कारण जाणून घेऊन आवश्यक ती आध्यात्मिक मदत द्यावी. मेंढपाळांनी आपल्या कळपाची स्थिती जाणली पाहिजे आणि मंडळीत कोणतीही अपायकारक लक्षणे दिसताच त्याबद्दल जागे राहून हालचाल केली पाहिजे. (नीतीसूत्रे २७:२३) क्षेत्रकार्याकडे दुर्लक्ष होत आहे, वैयक्तिक अभ्यासाची टाळाटाळ दिसते आहे किंवा करमणूकीच्या व जडवादी गोष्टीत अवास्तव वेळ दिला जात आहे अशी लक्षणे दिसली की त्या जबाबदार पुरुषांनी परिस्थितीवर योग्य त्या उपायाची अंमलबाजावणी करावी. यहोवा देव व उत्तम मेंढपाळ येशू ख्रिस्त यांच्या उदाहरणास अनुसरुन “देवाच्या कळपाची” निगा राखणारे वडील योग्य ती व्यक्तिगत मदत देतील वा मंडळीच्या सभेत आवश्यक ती सूचना देऊ करतील. (गलतीकर ६:१) या व इतर मार्गाकरवी प्रेमळ वडील आपली जबाबदारी गंभीरपणे पूर्ण करीत आहे याचा पुरावा देतात.—प्रे. कृत्ये २०:२८.
मेंढपाळकत्व ही गंभीर गोष्ट आहे
१७. वडीलपदासाठी लायक होण्याकरता कशाची गरज आहे?
१७ एक वडील या नात्याने “देवाच्या कळपाचे” पालन करणे हे जबर काम आहे. या हक्कप्राप्तीकरता लायक ठरण्यासाठी जी उच्च गुणवत्ता लागते ती १ तिमथ्यी ३:१–७, तीत १:५–९ आणि १ पेत्र ५:१–४ मध्ये लिखित आहे. कोणाही बांधवाला या क्षमतेमध्ये सेवा सादर करता येऊ शकत नाही. केवळ आध्यात्मिक माणसांनाच ही जबाबदारी चांगली पेलू शकते. (१ करिंथकर २:६–१६) सध्या वडील नसणाऱ्या पुष्कळ पुरुषांना या हक्कासाठी लायक होता येईल पण त्यासाठी त्यांनी ‘देखरेख्याच्या पदावर कसे पोहचता येईल’ ते प्रथम विचारात घेतले पाहिजे. त्यांनी देवाच्या वचनाचे उत्साही अभ्यासक असले पाहिजे की त्याकरवी त्यांना त्याची गाढ समज असेल. दुसरी गोष्ट ही की, वडील किंवा “देवाच्या मंडळीचा” सुयोग्य मेंढपाळ याच्या नियुक्तिस अनुसरुन असणाऱ्या सर्व शास्त्रवचनीय गरजा पूर्ण करण्याद्वारे शिफारसीला पात्र आहे हे प्रत्यक्षात दाखवून देण्यास हवे.
१८. पौलाला मंडळयाविषयी काय वाटले, त्याच्या या भावनेत आणखी कोणी सहभागी आहेत का?
१८ ख्रिस्ती मंडळीचा मस्तक येशू ख्रिस्त हा उत्तम मेंढपाळ असा यहोवा देवाच्या अधीन राहून सेवा सादर करतो. (योहान १०:११; १ करिंथकर ११:३; इफिसकर ५:२२, २३) शिवाय आपल्या हाताखाली मेंढरांचे योग्य नेतृत्व करणारे व संरक्षण देणारे कळपाचे सहमेंढपाळ आहेत याचा येशूला किती आनंद होत असावा बरे! ही आध्यात्मिक माणसे ख्रिस्ती वडीलांसाठी असणाऱ्या उच्च शास्त्रवचनीय गुणवत्ता पूर्ण करतात. याशिवाय त्यांना मेंढरांसाठी, प्रेषित पौलाने व्यक्त केलेल्या कळकळीसारखीच गाढ चिंता आहे. त्याने लिहिले: “शिवाय हया (त्रास व संकटे) . . . खेरीज माझ्या मनावरचे दैनंदिन ओझे म्हणजे सर्व मंडळयांवषियीची चिंता ही आहे. एखादा दुर्बळ असला तर मी दुर्बळ होत नाही काय? आणि एखादा अडखळविला गेला तर मला संताप येत नाही काय?” (२ करिंथकर ११:२३–२९) पौलाने खूप प्रवास केला, त्याला “मंडळयांविषयीची चिंता” प्रतिदिवशी होती आजच्या फिरत्या देखरेख्यांचा अनुभव असाच आहे. याचप्रमाणे विशिष्ट मंडळयात नियुक्त करण्यात आलेले वडील. त्यांना आध्यात्मिक मेंढपाळ या नात्याने जो कळप सोपून दिलेला आहे त्यातील मेंढरांविषयीची चिंता व्यक्त करीत आहेत.
१९. इब्रीयांस १३:१७चा अवलंब झालल्यास आणि वडील आपली मेंढपाळकत्वाची जबाबदारी सातत्याने गंभीरपणे घेत राहिल्यास कोणता परिणाम दिसेल?
१९ “देवाच्या कळपाचे” मेंढपाळकत्व करणे हे परिश्रमाचे काम आहे पण त्यातून मिळणारा बहुमानही मोठा आहे. या कारणामुळे, कळपाच्या मेंढपाळांनों, तुम्हास प्राप्त झालेल्या मोलवान हक्काचे रक्षण करा. देवाच्या मेंढरांची चांगली काळजी घ्या. पवित्र आत्म्याद्वारे नियुक्ति लाभलेल्या सर्व सहमेंढपाळांना सर्व मेंढरासमान लोकांकडून पूर्ण सहकार्य लाभो. “तुम्हामध्ये नेतृत्व करणाऱ्यांच्या आज्ञेत राहा व त्यांच्या अधीन असा,” पौलाने आर्जविले, “कारण आपणास हिशेब द्यावयाचा आहे हे समजून ते तुमच्या जिवांची राखण करितात.” इब्रीयांस १३:१७) यहोवाच्या कामाची निष्ठा राखणाऱ्या सर्वांनी पूर्णहृदयाने एकत्र मिळून ऐक्याने काम केले तर आपली मेंढपाळकत्वाची जबाबदारी गंभीरपणे घेणाऱ्या ख्रिस्ती वडीलांच्या विश्वासू सेवेपासून मोठे आध्यात्मिक आशीर्वाद व लाभ निष्पण्ण होतील.
तुम्हास विवेचीत करता येईल का?
◻ आध्यात्मिक मेंढपाळांनी स्वेच्छेने का सेवा करावी?
◻ अनीतीने पैसा मिळविण्याच्या मोहापासून वडीलांनी का दूर राहण्यास हवे?
◻ देवाच्याकळपावर धनीपण करणे वडीलांकरता चुकीचे का आहे?
◻ देखरेख्यांनी कळपाला उदाहरण का असावे?
◻ असे कोणते धोके वा संकटे आहेत ज्यापासून मेंढपाळांनी “देवाच्या कळपाचे” रक्षण केले पाहिजे?
[१२ पानांवरील चित्र]
प्राचीन काळातील काळजी वाहणाऱ्या मेंढपाळाप्रमाणे आधुनिक काळचे वडील “देवाच्या कळपाची राखण” करतात