वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w86 ११/१ पृ. ६-७
  • देवाच्या वचनापासून सांत्वन मिळविणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देवाच्या वचनापासून सांत्वन मिळविणे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • प्रतिफळास लक्षात ठेवा
  • “यहोवा मदत करतो”
  • ईयोब—धीर व सत्वनिष्ठेचे ज्वलंत उदाहरण
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
  • ‘यहोवावर आशा ठेवा’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
  • “तुम्ही ईयोबाच्या धीराविषयी ऐकले आहे”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
  • “सर्व सांत्वनदाता देव” यहोवा याच्यावर भरवसा ठेवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
w86 ११/१ पृ. ६-७

देवाच्या वचनापासून सांत्वन मिळविणे

यहोवा “करूणाकर पिता व सर्व सांत्वनदाता देव, तो आमच्यावरील सर्व संकटात आमचे सांत्वन करणारा” आहे. (२ करिंथकर १:३, ४) यास्तव आम्ही विपत्तीच्या काळात विरंगुळा व खऱ्‍या सांत्वन प्राप्तीसाठी त्याजकडे व त्याच्या वचनाकडे वळले पाहिजे.—रोमकर १५:४.

आम्ही देवास विश्‍वासू आहोत तर तो “आम्हास कधीही विसरणार व सोडणार नाही.” आम्ही आत्मविश्‍वासाने म्हणू शकतो की: “यहोवा माझा साहाय्यकर्ता आहे, मी भिणार नाही, मनुष्य माझे काय करणार?” (इब्रीकर १३:५, ६; स्तोत्रसंहिता ३७:३९, ४०; १४५:२०) यास्तव आम्ही कडव्या आपत्तींना तोंड देतो तेव्हा आम्हास खात्रीने खिन्‍न व निराश होण्याचे कारण नाही.

त्याच्या भविष्यवादाच्या भागाची भव्य पूर्णता आमच्या दिवसात होत आहे याबद्दल येशू म्हणाला: “आईबाप, भाऊबंद, नातलग व मित्र हे देखील तुम्हास धरून देतील; आणि तुमच्या मधील कित्येकास जिवे मारितील, माझ्या नामामुळे सर्वजण तुमचा द्वेष करतील.” यानंतर येशू पुढे म्हणाला: “तरी तुमच्या मस्तकावरील एका केसाचाही नाश होणार नाही.” (लूक २१:१६–१८) हे कसे काय? पुनरुत्थानाच्या आशेमुळे. याच आशेमुळे पौलाला टिकवून ठेवले गेले होते. (योहान ५:२८, २९; २ करिंथकर १:९, १०) भवितव्याची आमची विलोभनीय आशा मरणसुद्धा आम्हापासून अलग करु शकत नाही हे जाणणे सांत्वनकारक नाही का?

क्रूरतेमुळे अपंग व पंगु, धार्मिक स्त्री जिच्यावर जबरदस्ती करण्यात आली, जबरदस्तीने पालकांना लेकरांपासून विलग करण्यात आले अशांना ही आशा व देवाच्या मदतीचे आश्‍वासन छळामध्ये शारीरिकतेत भिषणता सहन करणाऱ्‍यांना कसे सांत्वन देऊ शकते याचा विचार करा. होय, यहोवाच्या वचनात आम्हास सांत्वन व खात्री देणाऱ्‍या पुष्कळ गोष्टी आढळतात ज्या आपत्तीतही आम्हास आनंद मानण्यास पुष्टी देतात.—मत्तय ५:१०–१२.

प्रतिफळास लक्षात ठेवा

आपत्ती व क्लेश यांचा अनुभव घेताना याची आठवण ठेवा की आम्हावर गुदरत आहे ते यहोवाच्या इतर विश्‍वासू सेवकावरही आले होते. यहोवाची सेवा करण्याची थांबवावे म्हणून दियाबलाने केलेल्या प्रयत्नास आम्ही प्रेषित पेत्राने आर्जविलेले करू तर प्रतिविरोध करू शकतो: “त्याच्या विरूद्ध [दियाबल] विश्‍वासात दृढ असे उभे राहा; कारण तुम्हाला माहीत आहे की जगातील तुमच्या बंधूवर्गाला हीच दुःखे भोगावी लागत आहेत.” (१ पेत्र ५:९) होय, इतर ख्रिश्‍चन सुवार्तेखातर कोणत्याही तडजोडीविना यासारख्याच परिक्षांना सहन करीत आहेत. आम्हीही तेच करू शकतो.

जे खंबीरतेने उभे राहिले होते त्याचीच केवळ नव्हे तर त्यांना प्राप्त झालेल्या प्रतिफळांचीही दखल घ्यावी. उदाहरणार्थ, सैतानाने इयोब हा स्वार्थासाठी यहोवाची सेवा करतो हे शाबीत करू असा दावा केला तेव्हा या देवभिरु व्यक्‍तिवर एकामागून एक पीडा आणल्या गेल्या. प्रथम त्याची जनावरे, त्यानंतर त्याचे सेवक व सरतेशेवटी त्याची दहा मुले नष्ट झाली. त्याने तो तृप्त झाला नाही तेव्हा त्याने इयोबावर “जिवघेण्या गळवांनी . . . पायापासून डोक्यापर्यंत भरविले.” (इयोब अध्याय १ व २) इयोबाने त्याची देवासोबतची सचोटी या पीडांमुळे भंगविली का?

नाही, त्याने तसे केले नाही. परंतु प्रतिपळाबद्दल काय? बरे, यहोवाने त्याला शरीरसंपदा पुन्हा दिली. त्याची संपत्ती त्याला दुप्पट दिली व त्यास यशवंत जीवन बहाल केले. (इयोब ४२:१०–१७) यासोबतच याहून अधिक असे पृथ्वीवरील नंदनवनात चिरकालिक जीवनाचे भवितव्य असणारे पुनरुत्थान त्याला दिले जाईल. (इयोब १४:१३–१५) खात्रीने इयोबाचा अनुभव छळास तोंड देणाऱ्‍या आमच्या ख्रिश्‍चनांना शक्‍ति व दिलासा देतो.

“यहोवा मदत करतो”

आता दुसऱ्‍या महायुद्धात जर्मनीमध्ये राजकीय कैद्यांच्या कोंडवाडयात पुष्कळ वर्षे छळ सहन केलेल्या एका ख्रिस्ती स्त्रींच्या अनुभवाचा विचार करा. भयानक परिस्थितीतच क्रूर छळ व उपासमारी यासोबत पाच वर्षे तिचा नवरा व लेकरे यांच्यापासून दबावाने अलग करण्यात आले. त्यांचे काय होत आहे याविषयी तिला काही एक खबर नव्हती. सरतेशेवटी, काही वर्षें विश्‍वासूपणे सहन केल्यानंतर तिची तिचा पती व मुलाबरोर भेट झाली. तेव्हापासून ते तिघे आजपावेतो यहोवाची विश्‍वासूपणे सेवा करीत आहेत. तिच्या अनुभवाबद्दल तिचे अभिप्राय लक्षात घ्या:

“जर्मनीतील राजकीय कैद्यांच्या कोंडवाडयातील माझ्या वर्षांनी मला उल्लेखनीय धडा शिकविला. तो म्हणजे तुम्ही अति परीक्षेत असता तेव्हा यहोवाचा आत्मा तुम्हास कसा प्रचंड रीतीने शक्‍तीमान करतो तो आहे. मला बंदीवान करण्यापूर्वी मी एका बहिणीचे पत्र वाचले जी म्हणत होती की अति कठीण परिक्षेत यहोवाचा आत्मा स्थैर्य देण्यास कारणीभूत होतो. मला काहीसे वाटले की ती राईचा पर्वत तर करीत नाही ना. परंतु मी स्वतः परीक्षेतून गेले तेव्हा मला माहीत झाले की तिचे शब्द खरे होते. ते तसेच घडून येते. तुम्ही अनुभवले नाही तर याची कल्पना करणे कठीण दिव्यच. माझ्याबाबत ते तसेच घडले. यहोवा मदत करतो.”

तुम्हास या वाच्यतेने सांत्वन व शक्‍तिमान केले नाही का? परीक्षेत तिची सचोटी राखण्याने ही ख्रिस्ती स्त्री तिच्या कुटुंबासहित तिची चिरकालिक जीवनाची आशा सामोरी ठेवून आहे. (इब्रीकर १०:३९) विश्‍वासूपणाचे केवढे अप्रतिम फळ!

वर्षानुवर्षे छळाचा अनुभव घेतल्यावर आमच्या प्रिय बंधू पौलाला कसे वाटले? निराशा? धैर्य खचलेले? खिन्‍न? केव्हाच नाही! त्याने सहन केले म्हणून तो आनंदी, आशादायक व आत्मविश्‍वासू होता. “जे सुयुद्ध ते मी केले आहे, मी शेवटपर्यंत धाव संपविली आहे, विश्‍वास राखिला आहे” असे पौल म्हणाला. “माझ्यासाठी नीतीमत्वाचा मुकूट ठेवला आहे. प्रभू जो नीतीमान न्यायधीश आहे तो मला त्या दिवशी देईल.” (२ तिमथ्यी ४:७, ८) पौलाने कोणत्याही अनिश्‍चिततेविना आपले मार्गाक्रमण केले व त्याचे स्वर्गीय बक्षीस मिळविले. (फिलिपैकर ३:४–१४) कोणास अशा उदाहरणाने समाधान होणार नाही? अशा प्रकारच्या संकटांचा सामना आम्ही करू या. शास्त्रवचनातून सांत्वन मिळवून व आपल्या प्रेमळ देव यहोवाला निष्ठावंत राहू या.

[७ पानांवरील चित्र]

इयोबाचा अनुभव आजच्या काळात त्रास सहन करणाऱ्‍या ख्रिस्ती जणांना बळ पुरवितो

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा