वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w86 १०/१ पृ. ४-७
  • तुम्ही देवासमागमे चालू शकता

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्ही देवासमागमे चालू शकता
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • अदृश्‍य असणाऱ्‍या त्या एकास पाहणे
  • देवासमागमे चालणे—त्याचे फायदे
  • आमचे युद्ध चालविण्यात मदत
  • देवाबरोबर चालणे—पहिली पावले
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • तुम्ही देवाबरोबर चालाल का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००५
  • देवाच्या मार्गानुसार चालत राहा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • देवाबरोबर चालत राहा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
w86 १०/१ पृ. ४-७

तुम्ही देवासमागमे चालू शकता

“पूर्वसंकेत केल्याशिवास दोघेजण एकत्र चालतील काय?” असे संदेष्टा आमोस विचारतो. (आमोस ३:३) परंतु, आम्ही देवासमागमे चालण्याचा “पूर्वसंकेत” करू शकतो का?

होय! यासाठी त्याचे मित्र बनण्याचे आमंत्रण देऊन देव स्वतःच पुढाकार घेतो. परंतु तो आम्हास अशा मित्रत्वात येण्यास भाग पाडत नाही. तो आम्हास त्याच्या विलक्षण गुणांनी जवळ खेचतो. उत्पत्ती कार्यच केवळ त्याच्या देवपणाची किती मुबलक साक्ष देतात बरे! “त्याचे अदृश्‍य गुण म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य व देवत्व ही निर्मिलेल्या पदार्थावरून ज्ञात होऊन सृष्टीच्या उत्पत्ती कालापासून स्पष्ट दिसत आहेत.” (रोमकर १:२०) किंवा प्रेषित पौलाने प्रे. कृत्ये १४:१७ मध्ये म्हटल्याप्रमाणे: “त्याने [देवाने] स्वतःस साक्षीविरहीत राहू दिले नाही, म्हणजे त्याने उपकार केले, आकाशापासून पर्जन्य व फलदायी ऋतु तुम्हास दिले आणि अन्‍नाने व हर्षाने तुम्हास मन भरून तृप्त केले.”

हनोख व नोहाप्रमाणे असणारे लोक देवाच्या मित्रत्वाविषयीचे आमंत्रण स्विकारण्यास आतुर होते. त्यांना आकलन झाले होते की देव “स्तुती व गौरव स्विकारावयास योग्य आहे.” (प्रकटीकरण ४:११) यास्तव त्यांनी देवाच्या आमंत्रणाचा स्विकार केला व त्याजकडे विश्‍वासाने धाव घेतली. “विश्‍वासाविना त्याला संतोषविणे कठीण आहे” असे पौल म्हणाला, “कारण देवाजवळ जाणाऱ्‍याने असा विश्‍वास धरिला पाहिजे की तो आहे व त्याचा शोध झटून करणाऱ्‍यास तो प्रतिफळ देतो.” (इब्रीकर ११:६) यास्तव त्याच्या नातेसंबंधाचा शोध घेण्याकडून तुम्ही सुद्धा त्याजसोबत “पूर्व संकेत” करू शकता. स्तोत्रकर्ता म्हणतो, “ज्याला तू [देव] निवडून घेतोस व आपल्या सान्‍निधी आणतोस तो धन्य!”—स्तोत्र संहिता ६५:४.

देवाबरोबरचे मित्रत्व हे त्याजकडील शर्तीवर अवलंबून असल्यामुळे एखाद्याने “देवाची जी उत्तम व ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा” काय आहे हे समजून घेण्यासाठी त्याचा शब्द पवित्र शास्त्राचा अभ्यास केलाच पाहिजे. (रोमकर १२:२) “खरोखरी कोणीतरी मार्ग दाखविल्यावाचून [यशयाचा भविष्यवाद समजण्यास] मला कसे समजेल?” पवित्र शास्त्रीय काळात प्रांजळपणे शोध करणाऱ्‍याने हे विचारले होते. कदाचित तुम्हास सुद्धा तसेच वाटेल. तथापि, देवाने ते पाहिले की फिलिप्प नामे शिष्याने त्या मनुष्याची भेट घेतली व भविष्यवाद स्पष्ट केला. (प्रे. कृत्ये ८:३०–३५) आजही जे प्रांजळपणे त्याचा शोध घेतात त्याकडे देव यापेक्षा कमी आस्था दाखवतो का? तुम्ही हे जे पवित्र शास्त्रावर आधारीत नियतकालिक वाचत आहात तेच देव तुम्हामध्ये आस्थेवाईक आहे हे प्रदर्शित करते. ज्यांच्यापासून हे नियतकालिक तुम्हास प्राप्त झाले आहे त्यांना देवाबाबत तुम्हास अधिक शिकण्यास मदत करण्यास परवानगी देणे हे सूज्ञपणाचे ठरणार नाही का?

अदृश्‍य असणाऱ्‍या त्या एकास पाहणे

तुम्ही देवाबाबतच्या तुमच्याज्ञानात वाढाल तसे तो तुम्हास अधिक वास्वविक वाटेल. तो काही नामविरहित शक्‍तीचा गोळा नाही तर त्याऐवजात नाव असणारी व्यक्‍ति आहे याची तत्काळ गुणग्राहकता जाणाल. स्तोत्रसंहिता ८३:१८ मध्ये पवित्र शास्त्र म्हणते: “तू केवळ, तूच यहोवा या नामाने सर्व पृथ्वीवर परात्पर आहेस असे त्यांना कळून येईल.” व्यक्‍ति या नात्याने यहोवास गुण आहेत, आवड तसेच नावडीच्या भावनाही आहेत!—निर्गम ३४:६, ७; स्तोत्रसंहिता ७८:४० पडताळा.

देवासही नीतीमत्तेचा दर्जा आहे. उदाहरणार्थ, नीतीसूत्रे ३:३२ म्हणते: “कारण यहोवाला कुटीलाचा वीट आहे, पण सरळांबरोबर त्याचे रहस्य आहे.” योसेफ हा एक “सरळ” मनुष्य होता. पवित्र शास्त्र सांगते की त्याचा मिसरी धनी पोटीफर याच्या बायकोने, योसेफाने तिच्या सोबत लैंगिक सलगी करावी म्हणून योसेफाची वारंवार गयावया केली. तरीही त्याने ते, “एवढे घोर कर्म करून मी देवाचे अपराधी कसा होउ?” असे म्हणून लाथाडले.—उत्पत्ती ३९:९.

योसेफापुढे यहोवा जणू काय खराच होता. त्याजपाशी त्याचे दृढ भय होते व त्याने तो अक्षरशः समोर आहे अशी हालचाल केली. योसेफ हा स्तोत्रकर्त्याने म्हटल्याप्रमाणे होता: “मी आपणापुढे यहोवास नित्य ठेवले आहे, तो माझ्या उजवीकडे आहे, म्हणून मी ढळणार नाही.” (स्तोत्रसंहिता १६:८; पडताळा नीतीसूत्रे ३:५, ६) मोशेजवळ यासारखाच विश्‍वास होता. तो “जो अदृश्‍य त्याला जणू काय पाहत असल्यासारखा होता.”—इब्रीकर ११:२६.

देवासमागमे चालणे याचा अर्थ ज्ञान घेण्यापेक्षा अधिक आहे. याचा अर्थ देवाने स्पष्ट केलेली इच्छा व उद्देशासोबत जुळता जीवनीमार्ग स्विकारणे होय.’ हेच प्रेषित पौल असे सांगतो: “यास्तव तुम्ही खाता, पिता किंवा जे काही करता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा.”—१ करिंथकर १०:३१.

देवासमागमे चालणे—त्याचे फायदे

द मॅजिक ऑफ वॉकींग या त्यांच्या पुस्तकात सुसमॅन व गुडे म्हणतात: “बळ व स्नायुंची काटकसर याकरता वैद्यक व आरोग्य अधिकाऱ्‍यांनी चालणे हे अचंबित वाटणारे फायदे आणते अशी त्यास मान्यता दिली आहे.” दावा केलेल्या फायद्यात वजनाचे नियंजण, शांत झोप, मानसिक दबावातून सुटका व हृदयविकारांचे प्रतिबंध हे आहेत. हे शारीरिक चालण्यासोबत खरे आहे तर देवासोबत चालण्याचे अधिक फायदे आहेत अशी आम्ही अपेक्षा करू शकतो.

तथापि, काही भावनाप्रधान गहन अनुभवांची अपेक्षा करू नका. पण तुम्ही, प्रार्थना व विश्‍वासूपणे वागण्याने “देवाच्या निकट याल” तसे तुम्ही “देवाची शांती सर्व विचार राखते” याचा आनंद लुटाल. [याकोब ४:८; फिलिप्पैकर ४:६, ७) उदाहरणार्थ, एक स्त्री सतत औदासिन्यामुळे अति मद्यपान व मादक औषधाच्या दुरुपयोगात गढून गेली होती. तिने ख्रिस्ती राष्ट्रसमूहाच्या पुष्कळ पंथात जाऊन प्रयोग केला होता. नंतर तिने यहोवाचे साक्षीदारांसोबत पवित्र शास्त्राभ्यास करण्यास सुरुवात केली. ती म्हणते: “काहीही प्रयास मी केले होते तरी माझे औदासिन्य दूर झाले नव्हते पण यहोवाचे उद्देश जाणण्याने माझ्या जीवनात अर्थ भरला.” होय, एखादी व्यक्‍ति देवाच्यासामागमे चालण्याची सुरुवात करते तेव्हा त्यास आध्यात्मिक व भावनात्मक फायद्याच्या मार्गावर मार्गदर्शित केले जाते.—यशया ३०:३१ पडताळा.

सुक्ष्मदृष्टी असणाऱ्‍या अबीगईल नावाच्या स्त्रीने आणखीन एका फायद्याकडे निर्देश केला. तिने दावीदास म्हटले: “एक मनुष्य तुमचा पाठलाग करावयास व तुमचा प्राण घ्यावयास उठला आहे, तरी माझ्या स्वामींचा प्राण तुमचा देव यहोवा याजपाशी जीवन कुंडात बांधलेला आहे हे सिद्ध होईल.” त्याची कल्पना करा! त्याच्या शत्रूंनी धमकावले तेव्हा दाविदाचा प्राण जणू एखादी मोलवान वस्तु काळजीपूर्वक सुरक्षितपणे गूंडाळून ठेवली जाते त्याप्रमाणे यहोवाच्या सुरक्षित कोठडीत असल्याप्रमाणे होता. तथापि देवाच्या सेवकांना नेहमीच शारीरिक संरक्षण दिले जाईल अशास अनावश्‍यकपणे लागू करू नये तर तो आज जे त्याच्या समागमे चालतात त्यांची चिरकालिक आस्था सुरक्षित राखण्यास खात्रीदायक आहे.—१ शमुवेल २५:२९; पडताळा स्तोत्रसंहिता ११६:१५.

असे असले तरी तुम्हास मानवजात सर्वसामान्यपणे तोंड देत असलेल्या समस्यापासून दूर राखले जाईल व ख्रिश्‍चन आनंदी जीवन कंठेल असा त्याचा अर्थ होत नाही. शलमोनाने न्याहाळले: “सर्वावर अनपेक्षित प्रसंग येतात.” (उपदेशक ९:११) उदाहणार्थ, प्रेषित पौलाला “शरीरातील काटा” बहुदा शारीरिक दुर्बलतेचा त्रास झाला होता. (२ करिंथकर १२:७; गलतीकर ४:१३–१५) त्याचा सोबती तिमथ्यी याला सुद्धा त्याचप्रमाणे “वारंवार आजारपणाचा” त्रास झाला. (१ तिमथ्यी ५:२३) याप्रमाणेच आजच्या ख्रिश्‍चनांनाही आजारपणाचा व प्रासंगिक नैराश्‍य किंवा खिन्‍नतेचा त्रास होतो.

याशिवाय, यहोवा देव कधी कधी क्षणिक परिक्षांना आम्हास शुद्ध करण्यासाठी वाव देतो जसे त्याने योसेफास कैद सोसण्याची मुभा दिली. (स्तोत्रसंहिता १०५:१७–१९) काहींना स्तेफनाप्रमाणे हिंसक छळकर्त्याकडून अकाली मृत्यु सहन करावा लागेल. (प्रे. कृत्ये ७:५७–६०) परंतु देवाच्या मित्रांना त्यागलेले असे कधीही वाटू नये. (२ करिंथकर ४:८, ९ पडताळा.) तुमचे कार्य व त्याच्या नावावर तुम्ही दाखविलेली प्रीती विसरून जाण्यास देव अन्यायी नाही.” (इब्रीकर ६:१०) अन्यायामुळे काही वर्षे तुरुंगवास सहन करून त्यातून बचावून राहिलेल्या एका ख्रिश्‍चन बहिणीने म्हटले: “जे यहोवाच्यासेवेत आवेशाने राहतात त्यांना नैराश्‍याचा अनुभव येणारच नाही याची मला खात्री पटली आहे. मी माझ्या पूर्ण हृदयाने यहोवा व त्याचे भरवसादायक शब्द, ‘मी तुला सोडून देणार नाही व तुला टाकणार नाहीच’ यावर विसंबून होते.”—इब्रीकर १३:५.

आमचे युद्ध चालविण्यात मदत

अशा प्रकारचे मार्गाक्रमण सोपे नाही. सैतान व त्याची दुरात्मिक सेना आम्हास जाळयात पकडण्यात मग्न आहे. (इफिसकर ६:१२) याशिवाय त्याच्या मोहक आकर्षणाने भरलेले हे सद्य दुष्ट व्यवस्थीकरण आहे. पहिल्या शतकातील देमास नावाचा ख्रिश्‍चन “या व्यवस्थीकरणावर प्रेम ठेवल्या” मुळे मार्गभ्रष्ट झाला. (२ तिमथ्यी ४:१०) सरतेशेवटी दुष्टतेकडे झुकणारे आमचे पापीष्ठ शरीर आहे. (रोमकर ७:२१–२३) आम्हास देवासमागमे चालणे सातत्याने ठेवायचे असल्यास याप्रभावाविरूद्ध सतत लढत देणे जरूरी आहे.

देवाने आमच्या मदतीसाठी तीन शक्‍तिशाली उपकरणे उपलब्ध केली आहेत: (१) त्याचा शब्द पवित्र शास्त्र, जो निकडीचे ते मार्गदर्शन पुरवितो. (स्तोत्रसंहिता ११९:१०५) (२) त्याची दृश्‍य संस्था, ख्रिश्‍चन मंडळी, जी देवाचा अध्यात्मिक भरवणूकीचा कार्यक्रम राबवीत आहे. (मत्तय २४:४५–४७; इफिसकर ४:११–१६) द वॉचटॉवर सोसायटी या मासिकाचे प्रकाशक त्या संस्थेसोबत निकट संबंधीत आहेत. (३) त्याचा पवित्र आत्मा, जो आम्हास प्रार्थना, शास्त्रवचनांचा अभ्यास व त्याच्या लोकांच्या संगतीमुळे मिळतो. यातील एकाही तरतुदीकडे दुर्लक्ष करणे गंभीर चुकीचे होईल. संदेष्टा मीखा आम्हास उपदेश करतो, “तुमच्या देवासमागमे चालण्यात मर्यादशील असा.” (मीखा ६:८) याचा अर्थ आमच्यामर्यादा जाणणे व देवावर पुर्णतया विसंबून असणे होय.

खरोखर आमचे देवासमागमे चालणे हे मोठ्या वादळात बापाचा हात धरू चालणाऱ्‍या लहान मुली सोबत करता येईल. तिने त्याचा हात सोडून दूर जाणे किंवा तिच्या स्वमार्गाने जाण्याचे ठरविले तर ती झटकन गायब होईल. परंतु तिने हात घट्ट पकडला तर ती तिच्या बापासोबत सुरक्षित व आत्मविश्‍वासाने चालू शकेल. आम्ही सुद्धा, देवाचे मार्गदर्शन जे त्याचा शब्द व संस्थेद्वारा दिले जाते त्यास आम्हास अधीन करण्याची काळजी घेण्यास हवी. स्वातंत्र्य आम्हास आशाविरहिततेत दूर जाण्यास लावू शकते. देवासमागमे नम्रपणे चालणे आम्हास येणाऱ्‍या आर्मगिद्दोनच्या वावटळीतून सुरक्षितपणे वचनयुक्‍त नवीन व्यवस्थी–करणासाठी बचावून राहण्यास मार्गदर्शित करील. तेथे मृत्यु व पीडा गतकाळातील असतील. (प्रकटीकरण १६:१६; २१:३, ४; २ पेत्र ३:१३) यास्तव तुम्ही त्याच्यासोबत चालण्याचे दयापूर्ण आमंत्रण स्विकाराल का?

[६ पानांवरील चित्र]

देवाचा शब्द, आत्मा व संस्था आम्हास “देवासमागमे चालणे” विश्‍वासूपणे राखण्यात मदत करू शकते

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा