येशूचे जीवन व उपाध्यपण
यरुशलेमाचा प्रवास
वसंत ऋतुचे आगमन झाले आहे. त्यामुळे आताची वेळ दरवर्षीप्रमाणे योसेफाच्या कुटुंबाचे मित्र व नातेवाईक यांच्यासह यरूशलेमात वल्हांडण सण साजरा करण्यास जाण्याची आहे. त्यांना जवळजवळ ६५ मैल (१०५ कि.मी.) इतका प्रवास करावयाचा आहे, या कारणास्तव या प्रवासाविषयी सर्वांनाच मोठे औत्सुक्य आहे. आतातर येशू १२ वर्षांचा झाला आहे आणि तो या सणाची विशेष कुतूहलाने वाट पाहतो.
येशू व त्याचा परिवार यांना वल्हांडण सण म्हणजे केवळ एक दिवसाचा समारंभ नाही. पुढील सात दिवसाच्या बेखमीर भाकरीसाठीही ते तेथे थांबत असतात कारण हाही वल्हांडण सणाचा एक भाग आहे असे मानले जात होते. आशाप्रकारे नासरेथ येथील त्यांच्या घरापासून यरूशलेमाचा त्यांचा एकूण प्रवास व तेथील वास्तव्य दोन आठवड्यापर्यंत होई. पण ह्या वर्षी येशूच्या कोणत्यातरी अडचणीने त्यांचा हा प्रवास आणखी लांबला.
यरूशलेमेपासून परतीचा प्रवास करीत असताना ही समस्या उघडकीस आली. सोबतच्या मित्रमंडळी किंवा नातेवाईकांबरोबर येशू आहे असे योसेफ व मरीया यांना वाटते. पण रात्र झाली आणि ते निवाऱ्यासाठी एका जागी थांबले असताना तेथे त्यांना येशू दिसत नाही तेव्हा ते आपल्या प्रवासी सोबत्यात त्याचा शोध घेतात. पण तो कोठेच आढळत नाही. त्यामुळे योसेफ व मरीया परत यरूशलेमाच्या मार्गाने त्याला शोधत जातात.
संपूर्ण दिवस ते त्याची शोध करतात पण त्याना यश मिळत नाही. दुसऱ्या दिवशीदेखील त्यांना तो दिसत नाही. शेवटी, तिसऱ्या दिवशी ते मंदिरात जातात. तेथील एका सभास्थानामध्ये यहुदी गुरुजनांमध्ये बसून त्यांचे ऐकताना व त्यांना प्रश्न विचारताना त्यांना येशू दिसतो.
‘बाळा, तू आमच्याबरोबर असा का वागलास?’ मरीया विचारते, ‘पहा, तुझा बाप व मी कष्ठी होऊन तुझा शोध करीत येथवर आलो आहोत.’
तो कोठे असणार हे त्यांना माहीत नसलेले पाहून येशूला त्यांचे आश्चर्य वाटते. ‘तुम्ही माझा शोध का घेत राहिला?’ तो विचारतो. ‘मी माझ्या बापाच्या घरी असावे हे तुमच्या ध्यानात आले नाही का?’
त्याच्या आईवडिलांना हे कसे माहीत झाले नाही हे येशूला समजत नाही. त्याचवेळी तो आपल्या आईवडिलांबरोबर घरी परततो व त्यांच्या आज्ञेत राहतो. तो शरीराने व ज्ञानाने पूर्ण होत राहून वाढतो व त्यावर देवाची व मानसांची कृपा राहते. होय, त्याच्या बालपणपासून येशू केवळ आध्यात्मिक आस्थेबाबतच नव्हे तर पालकांसंबंधीचा आदर दाखविण्यात एक उत्तम उदाहरण ठेवतो. लूक २:४०-५२; २२:७.
◆ वसंत ऋतुमध्ये येशू त्याच्या परिवारासह कोणता प्रवास नियमित करीत असे? व तो केवढा असे?
◆ येशू बारा वर्षांचा असताना या प्रवासामध्ये काय घडले?
◆ येशूने आजच्या युवकांसाठी कोणते उदाहरण मांडले?