देवावरील विश्वास—तो पुरेसा आहे का?
“तुम्ही देवावर किंवा विश्वव्यापी आत्म्यावर विश्वास ठेवता का?” असे सुप्रख्यात पोलस्टर जॉर्ज गॅलप ज्युनिअर यांनी विचारले. प्रौढ (३० वर्षे वयावरील) आणि किशोर वयीन या दोहोंच्या ९५ टक्के लोकांनी होय, असे प्रतिपादन केले तेव्हा बहुतेकांना आश्चर्यच वाटले! परंतु विश्वास कोठवर कार्यात उतरतो? उघडपणे बोटावर मोजण्याएवढयांचा. श्रीमान गॅलपनी अहवाल दिला की काही प्रौढांना, “तुमचा धार्मिक विश्वास तुमच्या दैनंदिन विचारसरणीवर व कृतीवर कोणत्या स्थरापर्यंत प्रभाव पाडतो” असे विचारले होते तेव्हा केवळ २६ टक्क्यांनी “खूपच” असे म्हटले.a—द सर्च फॉर अमेरिकाज फेथ, जॉर्ज गॅलप ज्युनिअर व डेर्व्हीड पोलिंग लिखित.
देवावरील नुसता विश्वास पुरेसा नाही हे आता स्पष्ट झाले. शिष्य याकोब लिहितो: “एक देव आहे असा विश्वास तू धरतोस हे बरे करतोस; भूतेही विश्वास धरतात व कापतात. . . . क्रियेवाचून विश्वास निरर्थक आहे.” (याकोब २:१९, २०) उलटपक्षी, पवित्र शास्त्र विश्वासाच्या पुढेही गेलेल्या व्यर्क्तिची माहिती देते. उदाहरणार्थ, हनोख “खऱ्या देवाच्या सामागमे राहात असे.” (उत्पत्ती ५:२४) हनोख व त्याचा देव यांच्यामधील नातेसंबंध अशाप्रकारे निकटवर्तीय बनले होते की जणू काय ते हातात हात घालून चालत! पण अशा अतुलनीय नातेसंबंधाची कृपादृष्टि हनोखावर का झाली होती? एक गोष्ट ही की तो निकृष्ट स्थितीस पोहचलेल्या धार्मिक वातावरणात, जेथे धक्कादायक “अनितीची कृत्ये” सार्वजनिक ठिकाणी होत, तेथे हनोखाने नीतीमत्वतेचा मार्ग चोखाळला होता. त्याकाळच्या लोकांची दुष्कृत्ये त्याने धैर्याने व स्पष्टपणे असे म्हणून उघड केली: “सर्वांचा न्यायनिवाडा करावयास व त्यापैकी अभक्त असलेल्या लोकांनी अभक्तिने केलेल्या आपल्या सर्व अभक्तिच्या कर्मावरून व ज्या सर्व कठोर गोष्टी अभक्त पापी जनांनी त्याच्याविरूद्ध सांगितल्या त्यावरून त्या सर्वास दोषी ठरवावयास यहोवा आपल्या लाखो पवित्र जनांनी वेष्ठित असा आला.”—यहुदा १४, १५.
देवासमागमे चालण्याने हनोखास अति धोक्यात लोटले. त्याच्या शत्रूंनी त्याचा वध करून त्याच्या त्रासदायक संदेशाचा अंत करण्याचा कट रचला. तरीपण ज्या देवासमागमे तो चालत होता त्याने हस्तक्षेप केला. पवित्र शास्त्र म्हणते: “मरणानुभव येऊ नये म्हणून विश्वासाने हनोखाला लोकांतरी नेण्यात आले; तो सापडला नाही; कारण त्याला देवाने लोकांतरी नेले.” होय, “देवाने [मरणात] त्याला नेले”, स्पष्टपणे त्याच्या शत्रूच्या हातून होणाऱ्या हिंसक मरणातून राखले.—इब्रीयांस ११:५, १३; उत्पत्ती ५:२४; पडताळा योहान ३:१३.
नोहा हा “खऱ्या देवासमागमे चालणारा” आणखी एक होता. हनोखा प्रमाणेच, “नोहा धार्मिक मनुष्य होता. त्याकाळच्या लोकात त्याने स्वतःस निर्दोष सिद्ध केले.” (उत्पत्ती ६:९) त्याच्या दिवसात अनीती प्रचलित होती व हिंसाचार माजला होता. तरीपण नोहाने इश्वरी भय प्रदर्शित केले व “नीतीमत्तेचा उपदेशक” राहिला म्हणून देवाने त्यास व त्याच्या कुटुंबियास पूर्वीच्या जागावर त्याने जलप्रलय आणला त्यावेळी वाचविले.”—२ पेत्र २:५; इब्रीयांस ११:७; उत्पत्ती ६:५, ११.
देव अद्यापि त्याजसमागमे चालण्याचे आमंत्रण देऊन आहे का? होय! प्रेषित पौलाने म्हटले, देव “आम्हातील कोणापासूनही दूर नाही” परंतु आम्ही “त्याचा शोध खरेपणाने व चाचपडत केला” तरच. (प्रे. कृत्ये १७:२७) आम्ही ते कसे करू शकतो? देवासमागमे चालणे यात खरोखरी काय गोवले आहे?
[तळटीपा]
a एकोणचाळीस टक्क्यांनी म्हटले “काहीच” १४ टक्क्यांनी म्हटले “एवढे काही नाही” आणि १२ टक्क्यांनी म्हटले “काहीच नाही”.