वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • lmd धडा ४
  • नम्रपणे वागा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नम्रपणे वागा
  • लोकांवर प्रेम करा—शिष्य बनवा
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • पौलने काय केलं?
  • पौलकडून आपण काय शिकतो?
  • पौलने केलं तसं करा
  • नम्रतेचे लेणे का परिधान करावे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • यहोवा आपल्या नम्र सेवकांची कदर करतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१९
  • अनुकरण करण्यासाठी लीनतेची उदाहरणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
  • खरी नम्रता आत्मसात करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००५
अधिक माहिती पाहा
लोकांवर प्रेम करा—शिष्य बनवा
lmd धडा ४

संभाषण सुरू करण्यासाठी

प्रेषित पौलला सैनिकाने साखळीने बांधलंय आणि तो राजा अग्रिप्पा, राज्यपाल फेस्त आणि बर्णीका यांच्याशी आदराने बोलतोय.

प्रे. कार्यं २६:२, ३

धडा ४

नम्रपणे वागा

तत्त्व:  “नम्रतेने इतरांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ समजा.”​—फिलिप्पै. २:३.

पौलने काय केलं?

प्रेषित पौलला सैनिकाने साखळीने बांधलंय आणि तो राजा अग्रिप्पा, राज्यपाल फेस्त आणि बर्णीका यांच्याशी आदराने बोलतोय.

व्हिडिओ: पौल अग्रिप्पा राजाला प्रचार करतो

१. व्हिडिओ पाहा किंवा प्रेषितांची कार्यं २६:२, ३ वाचा. मग पुढे दिलेल्या प्रश्‍नांवर विचार करा:

  1. क. अग्रिप्पा राजासोबत बोलताना पौलने नम्रता कशी दाखवली?

  2. ख. पौलने स्वतःकडे लक्ष वेधण्याऐवजी यहोवा आणि शास्त्रवचनांकडे कसं लक्ष वेधलं?​—प्रेषितांची कार्यं २६:२२ पाहा.

पौलकडून आपण काय शिकतो?

२. आपण जेव्हा नम्रपणे आणि आदराने संदेश सांगतो तेव्हा लोकांना तो जास्त ऐकायला आवडतो.

पौलने केलं तसं करा

३. स्वतःला श्रेष्ठ समजू नका. आपल्यालाच सगळं माहीत आहे आणि समोरच्याला काहीच माहीत नाही असं वागू नका. उलट त्याच्याशी आदराने बोला.

४. तुम्ही जे काही सांगत आहात ते बायबलमधून आहे हे स्पष्टपणे सांगा. देवाचं वचन एखाद्याच्या विचारांवर आणि भावनांवर प्रभाव पाडू शकतं. म्हणून बायबलचा उपयोग करा. त्यामुळे तुम्ही जे शिकवता ते बायबलमधून आहे हे त्यांना कळेल. आणि त्यावरचा त्यांचा विश्‍वास वाढेल.

५. शांतपणे बोला. आपलाच मुद्दा बरोबर आहे हे सिद्ध करायचा प्रयत्न करू नका. आपल्याला वाद घालायचा नाही. त्याऐवजी आपण शांत राहिलं पाहिजे आणि वाद सुरू होण्याआधीच तिथून निघून गेलं पाहिजे. असं करून आपण नम्रता दाखवतो. (नीति. १७:१४; तीत ३:२) शांतपणे बोलल्यामुळे पुढच्या वेळी ती व्यक्‍ती कदाचित आनंदाचा संदेश ऐकायला तयारही होईल.

ही वचनंही पाहा

रोम. १२:१६-१८; १ करिंथ. ८:१; २ करिंथ. ३:५

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा