वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • lmd धडा ३
  • दयाळूपणे वागा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • दयाळूपणे वागा
  • लोकांवर प्रेम करा—शिष्य बनवा
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • येशूने काय केलं?
  • येशूकडून आपण काय शिकतो?
  • येशूने केलं तसं करा
  • इतरांचा विचार करा
    लोकांवर प्रेम करा—शिष्य बनवा
  • यहोवासारखं नेहमी दयाळूपणे वागा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
  • निर्दयी जगात दयाळूपणे वागण्याकरता झटणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
  • देवाच्या लोकांनी दयेची प्रीती धरली पाहिजे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
अधिक माहिती पाहा
लोकांवर प्रेम करा—शिष्य बनवा
lmd धडा ३

संभाषण सुरू करण्यासाठी

येशू एका आंधळ्या माणसाला दयाळूपणे बरं करत आहे.

योहा. ९:१-७

धडा ३

दयाळूपणे वागा

तत्त्व:  ‘प्रेम दयाळू असतं.’​—१ करिंथ. १३:४.

येशूने काय केलं?

येशू एका आंधळ्या माणसाला दयाळूपणे बरं करत आहे.

व्हिडिओ: येशू आंधळ्या माणसाला बरं करतो

१. व्हिडिओ पाहा किंवा योहान ९:१-७ वाचा. मग पुढे दिलेल्या प्रश्‍नांवर विचार करा:

  1. क. येशूने आधी काय केलं, आंधळ्या माणसाला बरं केलं की त्याला साक्ष दिली?—योहान ९:३५-३८ पाहा.

  2. ख. तो माणूस आनंदाचा संदेश लगेच ऐकायला तयार का झाला असेल?

येशूकडून आपण काय शिकतो?

२. आपल्याला समोरच्याची काळजी आहे हे त्याला जाणवलं, तर तो आपला संदेश ऐकून घ्यायची शक्यता जास्त आहे.

येशूने केलं तसं करा

३. समोरच्याला समजून घ्या. तुम्ही त्याच्या जागी असता तर तुम्हाला कसं वाटलं असतं याचा विचार करा.

  1. क. स्वतःला विचारा: ‘त्याला कशाची चिंता असेल? त्याला कशामुळे सांत्वन मिळेल किंवा काय ऐकल्याने त्याला बरं वाटेल?’ यांवर विचार केल्यामुळे तुम्हाला अगदी मनापासून त्याच्याशी दयाळूपणे वागता येईल.

  2. ख. समोरच्याचं लक्ष देऊन ऐका. असं केल्यामुळे त्याच्यासाठी ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या तुम्ही मनापासून ऐकत आहात हे त्याला जाणवेल. त्याला काय वाटतं किंवा त्याने एखाद्या समस्येबद्दल सांगितलं तर विषय बदलू नका.

४. दयाळूपणे आणि आदराने बोला. तुम्हाला जर समोरच्याबद्दल सहानुभूती वाटत असेल आणि त्याला मनापासून मदत करावीशी वाटत असेल, तरच तुमच्या बोलण्यातून त्याला ते जाणवेल. म्हणून तुम्ही काय बोलता आणि कसं बोलता याचा नीट विचार करा. त्याला वाईट वाटेल असं काहीही बोलू नका.

५. मदत करा. व्यावहारिक मार्गाने समोरच्याला योग्य ती मदत कशी करता येईल याची संधी शोधा. दयाळूपणे वागल्यामुळे एका चांगल्या संभाषणाची सुरुवात व्हायला मदत होऊ शकते.

ही वचनंही पाहा

रोम. १२:१५, १६; गलती. ६:१०; इब्री १३:१६

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा