वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • lmd धडा ५
  • समजूतदारपणे वागा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • समजूतदारपणे वागा
  • लोकांवर प्रेम करा—शिष्य बनवा
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • पौलने काय केलं?
  • पौलकडून आपण काय शिकतो?
  • पौलने केलं तसं करा
  • देवाचा “शोध घ्यावा आणि . . . तो त्यांना सापडावा”
    देवाच्या राज्याबद्दल “अगदी पूर्णपणे साक्ष” द्या
  • नम्रपणे वागा
    लोकांवर प्रेम करा—शिष्य बनवा
  • तुमच्या क्षेत्रातल्या लोकांबद्दल तुम्ही काय विचार करता?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२०
  • खऱ्‍या न्यायासाठी आम्ही कोणाकडे पहावे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
अधिक माहिती पाहा
लोकांवर प्रेम करा—शिष्य बनवा
lmd धडा ५

संभाषण सुरू करण्यासाठी

प्रेषित पौल अथेन्सच्या लोकांशी तर्क करून बोलतोय.

प्रे. कार्यं १७:२२, २३

धडा ५

समजूतदारपणे वागा

तत्त्व:  ‘तुम्ही उत्तर देण्यासाठी नेहमी तयार राहा, पण सौम्यतेने आणि मनापासून आदर दाखवून असं करा.’​—१ पेत्र ३:१५.

पौलने काय केलं?

प्रेषित पौल अथेन्सच्या लोकांशी तर्क करून बोलतोय.

व्हिडिओ: पौल अथेन्सच्या लोकांना प्रचार करतो

१. व्हिडिओ पाहा किंवा प्रेषितांची कार्यं १७:२२, २३ वाचा. मग पुढे दिलेल्या प्रश्‍नांवर विचार करा:

  1. क. अथेन्समधल्या खोट्या धार्मिक प्रथा पाहून पौलला कसं वाटलं?​—प्रेषितांची कार्यं १७:१६ पाहा.

  2. ख. अथेन्सच्या लोकांना चुकीचं ठरवण्याऐवजी, पौलने त्यांच्याच धार्मिक विश्‍वासांचा आधार घेऊन समजूतदारपणे आनंदाचा संदेश कसा सांगितला?

पौलकडून आपण काय शिकतो?

२. लोकांशी काय, कसं आणि कधी बोलायचं याचा जर आपण व्यवस्थित विचार केला, तर ते आपलं ऐकण्याची जास्त शक्यता आहे.

पौलने केलं तसं करा

३. विचार करून बोला. उदाहरणार्थ, तुम्ही एका ख्रिश्‍चन नसलेल्या व्यक्‍तीशी बोलत असाल, तर अशा वेळी तुम्ही काय बोलून ‘बायबल’ किंवा ‘येशू’ यांचा उल्लेख करणार आहात याचा विचार करा.

४. समोरच्याचं बोलणं मधेच तोडू नका. समोरच्याला मनमोकळेपणे बोलू द्या. बायबल शिकवणींच्या विरोधात तो काही बोलला तर लगेच वाद घालू नका. (याको. १:१९) तुम्ही जर त्याचं बोलणं लक्ष देऊन ऐकलं, तर तो नेमकं असं का बोलतोय आणि त्याचा दृष्टिकोन काय आहे हे तुम्हाला समजेल.​—नीति. २०:५.

५. शक्य तिथे सहमत व्हा आणि प्रशंसा करा. समोरच्याची कदाचित त्याच्या धार्मिक विश्‍वासांवर मनापासून आस्था असेल. म्हणून सुरुवातीला तुम्ही दोघं कोणत्या विषयावर सहमत आहात ते पाहा. आणि त्याबद्दल त्याची प्रशंसा करा. मग हळूहळू बायबल नेमकं काय शिकवतं ते समजायला त्याला मदत करा.

ही वचनंही पाहा

नीति. २५:१५; २ तीम. २:२३-२६; कलस्सै. ४:६

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा