वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • lmd धडा २
  • स्वाभाविकपणे बोला

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • स्वाभाविकपणे बोला
  • लोकांवर प्रेम करा—शिष्य बनवा
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • फिलिप्पने काय केलं?
  • फिलिप्पकडून आपण काय शिकतो?
  • फिलिप्पने केलं तसं करा
  • फिलिप्प—आवेशी सुवार्तिक
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—साक्ष देण्यास पुढाकार घ्या
    आमची राज्य सेवा—२०१४
  • इतरांचा विचार करा
    लोकांवर प्रेम करा—शिष्य बनवा
  • “येशूविषयीचा आनंदाचा संदेश” घोषित करण्यात आला
    देवाच्या राज्याबद्दल “अगदी पूर्णपणे साक्ष” द्या
अधिक माहिती पाहा
लोकांवर प्रेम करा—शिष्य बनवा
lmd धडा २

संभाषण सुरू करण्यासाठी

रथात बसून गुंडाळी वाचत असलेल्या इथियोपियाच्या माणसाशी प्रचारक फिलिप्प बोलत आहे.

प्रे. कार्यं ८:३०, ३१

धडा २

स्वाभाविकपणे बोला

तत्त्व:  “योग्य वेळी बोललेला शब्द किती चांगला असतो!”​—नीति. १५:२३.

फिलिप्पने काय केलं?

रथात बसून गुंडाळी वाचत असलेल्या इथियोपियाच्या माणसाशी प्रचारक फिलिप्प बोलत आहे.

व्हिडिओ: फिलिप्प कूशी षंढाला प्रचार करतो

१. व्हिडिओ पाहा किंवा प्रेषितांची कार्यं ८:३०, ३१ वाचा. मग पुढे दिलेल्या प्रश्‍नांवर विचार करा:

  1. क. फिलिप्पने बोलायला कशी सुरुवात केली?

  2. ख. स्वाभाविकपणे बोलणं सुरू करायची आणि शास्त्रवचनांतून काहीतरी नवीन शिकवायची ही एक चांगली पद्धत का होती?

फिलिप्पकडून आपण काय शिकतो?

२. बोलण्याच्या ओघात आपण जर चर्चा सहज पुढे जाऊ दिली, तर समोरची व्यक्‍ती आपल्याशी आरामात बोलेल आणि आपला संदेश ऐकायला तयार असेल.

फिलिप्पने केलं तसं करा

३. पाहा, लक्ष द्या. एखाद्याच्या चेहऱ्‍यावरून किंवा हावभावांवरून आपल्याला बरंच काही समजू शकतं. समोरचा बोलायला तयार होईल असं वाटतं का? बायबलमधलं काहीतरी सांगण्यासाठी तुम्ही त्याला असा एक साधासा प्रश्‍न विचारू शकता: “तुम्हाला माहितीए . . . ?” पण जर त्याला बोलायची इच्छा नसेल, तर त्याला उगाच बोलायची बळजबरी करू नका.

४. धीर धरा. बायबलमधूल लगेचच काहीतरी सांगितलं पाहिजे असा विचार करू नका. योग्य वेळेची वाट पाहा. बोलता-बोलता विषय सहज बायबलच्या सत्याकडे वळवा. पहिल्याच भेटीत हे कदाचित शक्य होणार नाही; त्यासाठी तुम्हाला पुढच्या भेटीपर्यंतही वाट पाहावी लागेल.

५. विषयाशी जुळवून घ्या. तुम्ही कदाचित एका विशिष्ट विषयावर बोलायचं ठरवलं असेल. पण बोलता-बोलता समोरची व्यक्‍ती कदाचित वेगळाच विषय काढेल. अशा वेळी त्या बदललेल्या विषयाला धरून  काहीतरी बोलायला तयार असा.

ही वचनंही पाहा

उप. ३:१, ७; १ करिंथ. ९:२२; २ करिंथ. २:१७; कलस्सै. ४:६

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा