वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • th अभ्यास ११ पृ. १४
  • आवेश

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आवेश
  • वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
  • मिळती जुळती माहिती
  • हृदयापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करा
    वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
  • उत्साहाने शिकवा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • प्रेम व सहानुभूती
    वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
  • श्रोत्यांना शिकता येईल अशी माहिती
    वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
अधिक माहिती पाहा
वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
th अभ्यास ११ पृ. १४

अभ्यास ११

आवेश

उल्लेखीत शास्त्रवचन

रोमकर १२:११

सारांश: आवेशाने बोलून श्रोत्यांच्या मनाला चालना व उत्तेजन द्या.

हे कसं कराल:

  • मनापासून तयारी करा. सादरतेची तयारी करताना तुमचा संदेश किती महत्त्वाचा आहे यावर मनन करा. ती माहिती इतक्या चांगल्या प्रकारे समजून घ्या की ती सादर करताना तुम्ही मनापासून बोलू शकाल.

  • श्रोत्यांचा विचार करा. तुम्ही जी माहिती वाचून दाखवाल किंवा शिकवाल तिचा इतरांना कसा फायदा होईल यावर मनन करा. श्रोत्यांच्या मनात कदर वाढवण्यासाठी ही माहिती कोणकोणत्या पद्धतीने सादर करता येईल त्याचा विचार करा.

  • तुमच्या सादरतेत जिवंतपणा आणा. आवेशाने बोला. तुमचे हावभाव नाटकी नाही, तर स्वाभाविक आहेत हे इतरांना समजलं पाहिजे.

    व्यावहारिक सूचना

    तेच-तेच हावभाव सारखे-सारखे करत राहिलात तर ती तुमची सवय होऊन जाईल आणि त्यामुळे श्रोत्यांचं लक्ष तुमच्या बोलण्याकडे नाही, तर तुमच्या हातवाऱ्‍यांकडे जाईल. तुम्ही जे हातवारे कराल ते विनाकारण करत आहात असं वाटू नये. खासकरून मुख्य मुद्दे शिकवताना व श्रोत्यांना कार्य करण्यास प्रवृत्त करताना आवेशाने बोला. पण संपूर्ण भागच तुम्ही एकदम आवेशाने सादर केला तर श्रोत्यांचं लक्ष राहणार नाही.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा