वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • th अभ्यास १० पृ. १३
  • आवाजात चढ-उतार

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आवाजात चढ-उतार
  • वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
  • मिळती जुळती माहिती
  • अर्थावर जोर आणि स्वरनियमन
    ईश्‍वरशासित सेवा प्रशाला मार्गदर्शक पुस्तक
  • आवेश
    वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
  • खातरीने बोला
    वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
  • रोजच्या बोलण्याची शैली
    वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
अधिक माहिती पाहा
वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
th अभ्यास १० पृ. १३

अभ्यास १०

आवाजात चढ-उतार

उल्लेखीत शास्त्रवचन

नीतिसूत्रे ८:४, ७

सारांश: आवाजात चढ-उतार करून, आवाज कमी-जास्त करून, बोलण्याची गती कमी-जास्त करून, मुद्दे स्पष्टपणे सांगा आणि श्रोत्यांच्या मनापर्यंत पोचा.

हे कसं कराल:

  • आवाजात चढ-उतार. मुख्य मुद्दे सांगण्यासाठी आणि श्रोत्यांना उत्तेजन देण्यासाठी आवाज थोडा वाढवा. तसंच, वचनात न्यायदंडाविषयी काही असेल तर ते वाचतानाही आवाज थोडासा वाढवा. श्रोत्यांच्या मनात उत्सुकता वाढवण्यासाठी किंवा भीती, चिंता यांबद्दल सांगताना आवाज कमी करा.

    व्यावहारिक सूचना

    सतत मोठ्या आवाजात बोलू नका नाहीतर श्रोत्यांना वाटेल की तुम्ही त्यांना रागवत आहात. नाटकी शैलीत बोलण्याचं टाळा नाहीतर श्रोत्यांचं लक्ष तुमच्या बोलण्यावर नसून तुमच्यावर राहील.

  • आवाज कमी-जास्त करा. तुमच्या भाषेत योग्य असेल तर आवेश व्यक्‍त करण्यासाठी किंवा आकार, अंतर यांबद्दल सांगण्यासाठी मोठ्याने बोला. दुःख किंवा चिंता व्यक्‍त करताना कमी आवाजात बोला.

  • बोलण्याची गती कमी-जास्त करा. एखादी आनंदाची गोष्ट व्यक्‍त करत असाल तर बोलण्याची गती वाढवा. महत्त्वाचे मुद्दे सांगत असता तेव्हा हळूहळू बोला.

    व्यावहारिक सूचना

    श्रोत्यांनी दचकू नये म्हणून अचानक काहीतरी मोठ्याने किंवा भरभर बोलू नका. इतकं भरभरही बोलू नका, की तुमच्या तोंडून अर्धवट किंवा अस्पष्ट शब्द येतील.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा