वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • th अभ्यास १८ पृ. २१
  • श्रोत्यांना शिकता येईल अशी माहिती

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • श्रोत्यांना शिकता येईल अशी माहिती
  • वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
  • मिळती जुळती माहिती
  • आवेश
    वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
  • हृदयापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करा
    वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
  • व्यावहारिक फायदे स्पष्ट करा
    वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
  • शास्त्रवचन कसं लागू होतं ते स्पष्ट करा
    वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
अधिक माहिती पाहा
वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
th अभ्यास १८ पृ. २१

अभ्यास १८

श्रोत्यांना शिकता येईल अशी माहिती

उल्लेखीत शास्त्रवचन

१ करिंथकर ९:१९-२३

सारांश: श्रोत्यांच्या विचारांना चालना द्या. ते ऐकत असलेल्या विषयावर त्यांना विचार करायला लावा. त्यामुळे आपण काहीतरी महत्त्वाचं शिकलो असं त्यांना वाटेल.

हे कसं कराल:

  • श्रोत्यांकडे आधीच कोणती माहिती आहे याचा विचार करा. त्यांनी आधी ज्या गोष्टी ऐकल्या आहेत त्याच पुन्हा सांगण्याऐवजी त्या विषयाकडे आता एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्यास त्यांना मदत करा.

    व्यावहारिक सूचना

    माहीत असलेले मुद्दे सांगण्यात जास्त वेळ घालवू नका. पण नवीन मुद्दे सांगताना थोडा जास्त वेळ द्या.

  • संशोधन आणि मनन करा. मुख्य मुद्दे समजावून सांगताना श्रोत्यांनी फार कमी वेळा ऐकले असतील अशा मुद्यांचा किंवा चालू घडामोडींचा उल्लेख तुम्ही करू शकता. तुम्ही सादर करत असलेल्या माहितीवर खोलवर विचार करा. आणि ही माहिती व तुम्ही जे मुद्दे सादर करण्याचं ठरवलं आहे त्यात काय संबंध आहे यावरही विचार करा.

    व्यावहारिक सूचना

    माहितीचं परीक्षण करताना, स्वतःलाच ‘काय, का, केव्हा, कुठे, कोणी व कसं,’  यांसारखे प्रश्‍न विचारून आपल्या विचारांना चालना द्या. आणि मग भाग सादर करताना यांपैकी काही प्रश्‍न विचारून आणि त्यांची उत्तरं देऊन आपल्या शिकवण्याच्या कलेत जिवंतपणा आणा.

  • तुम्ही सांगत असलेल्या संदेशाचा फायदा सांगा. बायबलवर आधारित असलेल्या मुद्द्‌यांचा, श्रोत्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनात कसा फायदा होऊ शकतो ते समजावून सांगा. श्रोत्यांना लागू होणाऱ्‍या विशिष्ट परिस्थितींबद्दल चर्चा करा. तसंच त्यांनी कशी मनोवृत्ती दाखवली पाहिजे आणि कोणती कार्यं केली पाहिजेत यांवर चर्चा करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा