वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • th अभ्यास १९ पृ. २२
  • हृदयापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • हृदयापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करा
  • वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
  • मिळती जुळती माहिती
  • आवेश
    वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
  • व्यावहारिक फायदे स्पष्ट करा
    वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
  • उत्तेजन देणारं आणि सकारात्मक
    वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
  • प्रेम व सहानुभूती
    वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
अधिक माहिती पाहा
वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
th अभ्यास १९ पृ. २२

अभ्यास १९

हृदयापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करा

उल्लेखित शास्त्रवचन

नीतिसूत्रे ३:१

सारांश: शिकत असलेल्या गोष्टींचं महत्त्व समजून त्यानुसार आपल्या जीवनात बदल करण्यास श्रोत्यांना मदत करा.

हे कसं कराल:

  • श्रोत्यांना स्वतःचं परीक्षण करण्याचं उत्तेजन द्या. असे प्रश्‍न विचारा ज्यामुळे श्रोते स्वतःच्या मनातील भावनांचं परीक्षण करून पाहतील.

  • चांगली मनोवृत्ती बाळगायला मदत करा. ते चांगली कामं का  करतात याचं परीक्षण करायला श्रोत्यांना मदत करा. चांगली मनोवृत्ती बाळगायला मदत करा; जसं की यहोवा, सहमानव आणि बायबलमधील शिकवणी यांच्याबद्दल प्रेम वाढवायला त्यांना मदत करा. बायबलमध्ये बुद्धीच्या गोष्टी सांगितल्या आहेत हे पाहायला त्यांना मदत करा, पण त्यांना भाषण देऊ नका. त्यांना लाज वाटेल अशा गोष्टी बोलण्याऐवजी तुमच्या सादरतेनंतर त्यांना उत्तेजन मिळाल्यासारखं वाटलं पाहिजे. “मी शक्य तो प्रयत्न करेन” अशी प्रेरणा त्यांना मिळाली पाहिजे.

  • यहोवाकडे त्यांचं लक्ष वेधा. बायबलमधील शिकवणी, तत्त्वं, नियम यांतून देवाचे गुण, आपल्याबद्दल असलेलं त्याचं प्रेम कसं दिसून येतं त्यावर जोर द्या. कुठलीही गोष्ट करण्याआधी, यहोवाला कसं वाटेल, त्याला मी संतुष्ट कसं करू शकेन याचा विचार करण्याची इच्छा त्यांच्या मनात उत्पन्‍न करा.

    व्यावहारिक सूचना

    यहोवा  लोकांना आकर्षित करतो ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. लोकांना कार्य करण्यास प्रवृत्त करण्यासाठी बायबलचा उपयोग करा.

सेवेत

घरमालक काय मानतो हे माहीत करून घेण्यासाठी शक्य असेल तेव्हा प्रश्‍नांचा उपयोग करा. त्याच्या चेहऱ्‍यावरील हावभाव, आवाजातील चढ-उतार यावरून त्याच्या नेमक्या भावना काय आहेत हे समजून घ्यायचा प्रयत्न करा. पण असं करताना धीर धरा. घरमालकाने त्याच्या मनातील भावना तुम्हाला सांगाव्यात म्हणून तुम्हाला त्याला विश्‍वासात घ्यावं लागेल.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा