वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • th अभ्यास १२ पृ. १५
  • प्रेम व सहानुभूती

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रेम व सहानुभूती
  • वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
  • मिळती जुळती माहिती
  • आवेश
    वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
  • हृदयापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करा
    वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
  • रोजच्या बोलण्याची शैली
    वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
  • उत्तेजन देणारं आणि सकारात्मक
    वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
अधिक माहिती पाहा
वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
th अभ्यास १२ पृ. १५

अभ्यास १२

प्रेम व सहानुभूती

उल्लेखीत शास्त्रवचन

१ थेस्सलनीकाकर २:७, ८

सारांश: प्रामाणिकपणे बोला. तुम्हाला श्रोत्यांची काळजी आहे हे तुमच्या बोलण्यातून त्यांना दिसू द्या.

हे कसं कराल:

  • श्रोत्यांचा विचार करा. श्रोत्यांना कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागतं हे लक्षात ठेवून आपला भाग तयार करा. त्यांना कसं वाटत असेल याची कल्पना करा.

  • योग्य शब्दांची निवड करा. श्रोत्यांना तजेला, सांत्वन देण्याचा आणि त्यांच्यात उत्साह वाढवण्याचा प्रयत्न करा. असे शब्द टाळा ज्यामुळे त्यांना वाईट वाटेल. तसंच ज्यांचा यहोवावर विश्‍वास नाही किंवा जे लोक मनापासून त्यांच्या धर्माचं पालन करतात अशा लोकांबद्दल अनादराने बोलू नका.

  • त्यांच्यात आवड असल्याचं दाखवा. प्रेमळ आवाजात व योग्य हावभावांवरून लोकांना दाखवून द्या, की तुम्हाला त्यांची काळजी आहे. तुमच्या चेहऱ्‍यावरील हावभाव कसे आहेत याबद्दलही विचार करा. स्मितहास्य करा.

    व्यावहारिक सूचना

    भावना नाटकीपणे व्यक्‍त करण्याचं टाळा. तुम्ही काही वाचत असाल तर त्या उताऱ्‍यातील भावना व्यक्‍त करा, पण असं करताना स्वतःकडे लक्ष वेधू नका. तुमच्या बोलण्यातून दया आणि प्रेम दाखवा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा