वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • th अभ्यास ७ पृ. १०
  • अचूक आणि पटण्यासारखं

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अचूक आणि पटण्यासारखं
  • वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
  • मिळती जुळती माहिती
  • शास्त्रवचनांचा चांगल्या प्रकारे परिचय
    वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
  • व्यावहारिक फायदे स्पष्ट करा
    वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
  • प्रश्‍नांचा उपयोग
    वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
  • हृदयापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करा
    वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
अधिक माहिती पाहा
वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
th अभ्यास ७ पृ. १०

अभ्यास ७

अचूक आणि पटण्यासारखं

उल्लेखीत शास्त्रवचन

लूक १:३

सारांश: लोकांना योग्य निष्कर्ष काढता यावा म्हणून भरवसालायक पुरावे द्या.

हे कसं कराल:

  • भरवशालायक माहितीचा उपयोग करा. तुम्ही जे काही बोलता ते देवाच्या वचनाच्या आधारावरच असलं पाहिजे; शक्य असेल तेव्हा सरळ बायबलमधूनच वाचून दाखवा. तुम्ही एखादा वैज्ञानिक पुरावा देणार असाल, बातमी किंवा अनुभव सांगणार असाल किंवा इतर पुरावे सादर करणार असाल, तर ती माहिती भरवशालायक आहे, तसंच जुनी नाही याची खातरी करा.

  • पुराव्यांचा योग्य उपयोग करा. शास्त्रवचनांचा संदर्भ, बायबलचा एकूण संदेश आणि “विश्‍वासू आणि बुद्धिमान दास” यांनी तयार केलेली प्रकाशनं, यांच्या आधारावर स्पष्टीकरण द्या. (मत्त. २४:४५) तुम्ही बायबलच्या व्यतिरिक्‍त इतर पुरावे सादर करत असाल, तर त्यांचा मूळ अर्थ बदलू नका किंवा लेखकाने जे म्हटलं आहे त्याच्यापेक्षा वेगळं काही सांगू नका.

    व्यावहारिक सूचना

    वस्तुस्थिती किंवा संख्या बढवून चढवून सांगू नका. अहवालात जर “काही लोक” म्हटलं असेल तर “बहुतेक लोक” म्हणू नका. तसंच, “काही बाबतीत” असेल तर “नेहमी” किंवा “कदाचित” असेल तर “सहसा” असं बोलू नका.

  • पुराव्यांवर तर्क करा. एखादं वचन वाचल्यावर किंवा माहिती सांगितल्यावर, व्यवहारकुशलतेने प्रश्‍न विचारा किंवा उदाहरण द्या. यामुळे श्रोत्यांना स्वतःच निष्कर्षावर पोचता येईल.

सेवेत

सेवेत लोक तुम्हाला कोणते प्रश्‍न विचारतील यावर आधीच विचार करा आणि त्यांची उत्तरं कशी द्याल त्याची तयारी करा; हवं तर रिसर्चही करा. समजा तुम्हाला घरमालकाने असा एखादा प्रश्‍न विचारला ज्याचं उत्तर तुम्हाला माहीत नाही, तर अशा वेळी ‘मी या विषयाबद्दल आणखी माहिती काढेन आणि पुढच्या वेळेस येऊन तुम्हाला याचं उत्तर देईन,’ असं सांगा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा