वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • th अभ्यास ६ पृ. ९
  • शास्त्रवचन कसं लागू होतं ते स्पष्ट करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • शास्त्रवचन कसं लागू होतं ते स्पष्ट करा
  • वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
  • मिळती जुळती माहिती
  • शास्त्रवचनांचा चांगल्या प्रकारे परिचय
    वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
  • प्रभावी समाप्ती
    वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
  • व्यावहारिक फायदे स्पष्ट करा
    वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
  • शास्त्रवचने वाचून त्याचा अवलंब स्पष्ट करणे
    ईश्‍वरशासित सेवा प्रशाला मार्गदर्शक पुस्तक
अधिक माहिती पाहा
वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
th अभ्यास ६ पृ. ९

अभ्यास ६

शास्त्रवचन कसं लागू होतं ते स्पष्ट करा

उल्लेखीत शास्त्रवचन

योहान १०:३३-३६

सारांश: फक्‍त शास्त्रवचन वाचून पुढच्या मुद्द्‌याकडे जाऊ नका. तुम्ही वाचलेल्या शास्त्रवचनात आणि सांगत असलेल्या मुद्यात काय संबंध आहे हे श्रोत्यांना चांगल्या प्रकारे समजलं पाहिजे.

हे कसं कराल:

  • मुख्य शब्दांवर जोर द्या. शास्त्रवचन वाचल्यानंतर त्यातील अशा शब्दांवर जोर द्या जे तुमच्या मुख्य मुद्द्‌याशी संबंधित आहेत. ते शब्द वारंवार बोलून किंवा वचनातील मुख्य शब्द कोणते आहेत हे श्रोत्यांना प्रश्‍न विचारून तुम्ही असं करू शकता.

    व्यावहारिक सूचना

    शास्त्रवचनात जी गोष्ट सांगितली आहे ती तुम्ही दुसऱ्‍या शब्दात सांगणार असाल, तर बायबलमधील शब्द मुख्य मुद्द्‌याशी कसे संबंधित आहेत ते तुमच्या श्रोत्यांना स्पष्टपणे समजलं पाहिजे.

  • मुख्य मुद्द्‌यांवर जोर द्या. एखादं शास्त्रवचन तुम्ही का वाचत आहात याचं कारण तुम्ही आधी सांगितलं असेल, तर त्या वचनातील मुख्य शब्द त्या कारणाशी कसे संबंधित आहेत हे समजावून सांगा.

    व्यावहारिक सूचना

    शास्त्रवचनावर चर्चा करताना तुमचं बायबल उघडं ठेवा. यामुळे लोकांना तुम्ही जे काही सांगत आहात ते आताच वाचलेल्या वचनाशी संबंधित आहे हे कळेल.

  • शास्त्रवचन कसं लागू होतं हे सोप्या शब्दात सांगा. मुख्य मुद्द्‌याशी संबंधित नसलेली माहिती देण्याचं टाळा. श्रोत्यांना विषयाबद्दल आधीच किती माहिती आहे ते लक्षात घेऊन, त्यांना तो मुद्दा चांगल्या प्रकारे समजावून सांगण्यासाठी आणखी किती माहिती द्यायची हे ठरवा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा