वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • th अभ्यास ३ पृ. ६
  • प्रश्‍नांचा उपयोग

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रश्‍नांचा उपयोग
  • वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
  • मिळती जुळती माहिती
  • व्यावहारिक फायदे स्पष्ट करा
    वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
  • शास्त्रवचनांचा चांगल्या प्रकारे परिचय
    वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
  • हृदयापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करा
    वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
  • प्रभावी प्रस्तावना
    वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
अधिक माहिती पाहा
वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
th अभ्यास ३ पृ. ६

अभ्यास ३

प्रश्‍नांचा उपयोग

उल्लेखीत शास्त्रवचन

मत्तय १६:१३-१६

सारांश: आवड वाढवण्यासाठी, आवड टिकवून ठेवण्यासाठी, ऐकणाऱ्‍यांसोबत तर्क करण्यासाठी आणि मुख्य मुद्द्‌यांवर जोर देण्यासाठी व्यवहारकुशलतेने प्रश्‍नांचा उपयोग करा.

हे कसं कराल:

  • आवड वाढवा आणि ती टिकवून ठेवा. असे प्रश्‍न विचारा ज्यामुळे ऐकणारे लोक तुम्ही सांगितलेल्या मुद्द्‌यावर विचार करायला लागतील किंवा मग त्यांच्या मनात उत्तर जाणून घेण्याची उत्सुकता वाढेल.

  • तर्क करा. असे प्रश्‍न विचारा ज्यामुळे लोक विषयाबद्दल मनातल्या मनात तर्क करतील आणि मग ते स्वतःच योग्य निष्कर्ष काढतील.

  • मुख्य मुद्द्‌यांवर जोर द्या. एखादा मुख्य मुद्दा सांगण्याआधी, उत्सुकता वाढेल असा प्रश्‍न विचारा. महत्त्वपूर्ण मुद्द्‌यावर चर्चा केल्यानंतर किंवा तुमच्या सादरतेची समाप्ती करताना उजळणी प्रश्‍न विचारा.

    व्यावहारिक सूचना

    वचन वाचल्यानंतर त्यातील महत्त्वपूर्ण मुद्द्‌यावर जोर देण्यासाठी प्रश्‍न विचारा.

सेवेत

एखाद्या विषयावर घरमालकाचं मत काय आहे ते त्याला विचारा. आणि तो त्याचं मत मांडत असतो तेव्हा त्याचं बोलणं लक्ष देऊन ऐका. व्यवहारकुशलतेने प्रश्‍न कधी आणि कसे विचारायचे ते ठरवण्यासाठी समजशक्‍तीचा उपयोग करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा