वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • th अभ्यास ८ पृ. ११
  • शिकवण्यासाठी उदाहरणं वापरा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • शिकवण्यासाठी उदाहरणं वापरा
  • वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
  • मिळती जुळती माहिती
  • उचित उदाहरणे
    ईश्‍वरशासित सेवा प्रशाला मार्गदर्शक पुस्तक
  • “दाखल्यावाचून तो त्यांच्याबरोबर काही बोलला नाही”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • सूक्ष्मदृष्टीने आणि मन वळविण्याच्या कलेसह शिकवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • थोर शिक्षकाचे अनुकरण करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
अधिक माहिती पाहा
वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
th अभ्यास ८ पृ. ११

अभ्यास ८

शिकवण्यासाठी उदाहरणं वापरा

उल्लेखीत शास्त्रवचन

मत्तय १३:३४, ३५

सारांश: लोकांची आवड वाढवणाऱ्‍या व त्यांना महत्त्वपूर्ण मुद्दे शिकवणाऱ्‍या साध्या-सोप्या उदाहरणांचा उपयोग करून आपल्या शिकवण्याच्या कलेत सुधारणा करा.

हे कसं कराल:

  • साधी-सोपी उदाहरणं निवडा. येशूने जसं मोठ्या गोष्टी समजावण्यासाठी लहान गोष्टींची उदाहरणं दिली आणि कठीण गोष्टी समजवण्यासाठी सोपी उदाहरणं दिली, तसंच तुम्हीदेखील करा. बारीक-सारीक अनावश्‍यक गोष्टी सांगून उदाहरण समजायला कठीण करू नका. तुम्ही देत असलेलं उदाहरण, तुम्ही शिकवत असलेल्या गोष्टीशी जुळत आहेत याची खातरी करा. कारण तुमच्या उदाहरणातील गोष्टी लागू होत नसतील तर ऐकणारे लोक आणखीनच गोंधळून जातील.

    व्यावहारिक सूचना

    निरीक्षण करा. आपल्या आजूबाजूची परिस्थिती पाहा, ख्रिस्ती प्रकाशनांचा अभ्यास करा आणि कुशल शिक्षकांचं ऐका. असं करत असताना, तुमच्या शिकवण्याच्या कलेत सुधारणा करता यावी म्हणून ते देत असलेल्या उदाहरणांकडे बारकाईने लक्ष द्या. हवं तर ती उदाहरणं लिहून ठेवा.

  • लोकांना फायदा कसा होईल याचा विचार करा. श्रोत्यांच्या दररोजच्या जीवनाशी व त्यांच्या आवडीच्या विषयांशी संबंधित असलेली उदाहरणं निवडा. पण तुमच्या उदाहरणामुळे त्यांना लाजल्यासारखं होऊ नये किंवा त्यांना ते खटकू नये याची काळजी घ्या.

  • मुख्य मुद्दा शिकवा. बारीक-सारीक गोष्टींच्या ऐवजी मुख्य मुद्द्‌यांवर लक्ष केंद्रित करा. श्रोत्यांना फक्‍त तुमचं उदाहरणच नव्हे तर ते उदाहरण देण्यामागचा मुद्दादेखील लक्षात राहिला पाहिजे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा