वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • th अभ्यास ५ पृ. ८
  • अचूक वाचन

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अचूक वाचन
  • वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
  • मिळती जुळती माहिती
  • प्रश्‍न पेटी
    आमची राज्य सेवा—१९९६
  • बायबलचा पूर्ण फायदा कसा घ्याल?
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
  • बायबल वाचन फायदेकारक व आनंददायक
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • दैनंदिन बायबल वाचनातून लाभ मिळवणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
अधिक माहिती पाहा
वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
th अभ्यास ५ पृ. ८

अभ्यास ५

अचूक वाचन

उल्लेखीत शास्त्रवचन

१ तीमथ्य ४:१३

सारांश: जे लिहिलं आहे ते मोठ्याने व अचूक वाचा.

हे कसं कराल:

  • चांगली तयारी करा. हा उतारा का लिहिला होता त्यावर विचार करा. फक्‍त एकेक शब्द नव्हे तर शब्दसमूह वाचण्याचा सराव करा. वाचताना आणखी शब्द टाकून वाचणं, शब्द गाळणं किंवा जो शब्द लिहिला आहे त्याच्याऐवजी दुसरा शब्द टाकून वाचण्याचं टाळा. वाचताना सर्व विरामचिन्हांकडे लक्ष द्या.

    व्यावहारिक सूचना

    एखाद्या मित्राला तुमच्या वाचनाकडे लक्ष द्यायला व तुम्ही कोणता शब्द चुकीचा उच्चारला किंवा वाचला होता ते पाहायला सांगा.

  • प्रत्येक शब्दाचा उच्चार योग्य प्रकारे करा. एखाद्या शब्दाचा उच्चार कसा करायचा हे माहीत नसेल तर डिक्शनरीत पाहा. किंवा त्या प्रकाशनाचं ऑडियो रेकॉर्डिंग असेल तर ते ऐका किंवा एखाद्या चांगल्या वाचकाची मदत घ्या.

  • स्पष्ट बोला. शब्दांचा योग्य उच्चार करा. खाली न बघता समोर बघून आणि तोंड उघडून वाचा. प्रत्येक शब्द स्पष्टपणे वाचण्याचा प्रयत्न करा.

    व्यावहारिक सूचना

    वाचताना प्रत्येकच शब्दाचा उच्चार जोर देऊन करू नका, नाहीतर तुमचं वाचन नाटकी वाटेल.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा