प्रश्न पेटी
◼ सभांमध्ये परिच्छेदांचे वाचन करण्याबाबत काय लक्षात ठेवावे?
टेहळणी बुरूज अभ्यास आणि मंडळीच्या पुस्तक अभ्यासात सर्वाधिक वेळ परिच्छेद वाचण्याकरता दिला जातो. याचा अर्थ, वाचक म्हणून नेमलेल्या बांधवावर शिक्षकाची एक भारी जबाबदारी आहे. त्याने अशा पद्धतीने वाचावे की मजकुराला ‘अर्थ दिला जाईल’ जेणेकरून ऐकणाऱ्यांना केवळ समजणारच नाही तर ते कार्य करण्यास उद्युक्त होतील. (नहे. ८:८) यास्तव, वाचकाने आपल्या नेमणुकीची चांगली तयारी करावयास हवी. (१ तीम. ४:१३; पाहा प्रशाला मार्गदर्शक (इंग्रजी) पुस्तकातील अभ्यास ६.) अर्थपूर्ण जाहीर वाचनाकरता येथे काही आवश्यक गोष्टी दिल्या आहेत.
अर्थावर योग्य जोर द्या: कोणत्या शब्दांवर अथवा शब्दसमूहांवर योग्य समज देण्याकरता जोर देण्याची आवश्यकता आहे हे आधीच ठरवा.
योग्यरितीने शब्द उच्चारा: श्रोत्यांना प्रकाशनात आढळणाऱ्या संज्ञांचे आकलन व्हावयाचे असल्यास, योग्य उच्चार आणि स्पष्टोच्चार आवश्यक आहे. शब्दकोशात, अपरिचित अथवा कम-प्रचलित शब्द काढून पाहा.
मोठ्या आवाजात आणि उत्स्फुर्ततेने बोला: मोठ्याने व उत्स्फुर्ततेने बोलल्यास आस्था वाढते, भावना चेतवल्या जातात आणि ऐकणाऱ्याला उद्युक्त केले जाते.
उबदार आणि संभाषणात्मक असा: अस्खलितपणासोबत स्वाभाविकपणाही येतोच. तयारी आणि सरावाने वाचक तणावरहित असू शकतो आणि यामुळे वाचन एकसुरी व कंटाळवाणे असण्याऐवजी आकर्षक ठरेल.—हब. २:२.
छापलेल्यानुसार साहित्य वाचा: सहसा तळटीपा त्याचप्रमाणे गोल अथवा चौकोनी कंसातील माहिती छापील लिखाणास स्पष्ट करत असल्यास ती मोठ्याने वाचली जाते. मूळ साहित्य कोठून आहे केवळ हे दर्शवणारे संदर्भच याला अपवाद आहेत. परिच्छेदात जेथे तळटीपेचा उल्लेख येतो तेव्हा ती वाचावी व त्याआधी असे म्हणावे: “तळटीप म्हणते . . .” ती वाचून झाल्यावर उर्वरित परिच्छेद वाचून काढावा.
जाहीर वाचन उत्तमरित्या पार पाडले जाते, तेव्हा आपल्या थोर शिक्षकाने ‘जे काही आज्ञापिले आहे ते सर्व इतरांना पाळावयास शिकवण्याचा’ तो एक महत्त्वपूर्ण मार्ग ठरतो.—मत्त. २८:२०.