दैनंदिन बायबल वाचनातून लाभ मिळवणे
“जो पुरूष . . . परमेश्वराच्या नियमशास्त्रात [रमतो,] त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करितो तो धन्य.”—स्तोत्र १:१, २.
१. (अ) वॉचटावर संस्थेच्या जागतिक मुख्यालयातील कारखान्याच्या इमारतीच्या एका बाजूवर कोणते मुख्य चिन्ह दिसते? (ब) या सूचनेचे व्यक्तिशः पालन केल्यावर आपल्याला त्याचा फायदा कसा होऊ शकतो?
“देवाचे वचन पवित्र बायबल दररोज वाचा.” ब्रुकलिन न्यूयॉर्क मधील वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीत जेथे बायबल आणि बायबल आधारित साहित्य छापले जाते त्या इमारतीच्या एका बाजूवर हे शब्द मोठ्या अक्षरात लिहिले आहेत. जगातील जे लोक ते चिन्ह पाहतात केवळ त्यांच्याकरता ही सूचना नाही. यहोवाच्या साक्षीदारांनी जाणून घेतले आहे, की त्यांनीही या सूचनेचा अवलंब केला पाहिजे. नित्याने बायबल वाचन करणारे आणि त्याचे वैयक्तिक अवलंबन करणाऱ्यांना त्यामध्ये दिलेल्या सद्बोधाचा, दोष दाखवण्याचा, सुधारणूकीचा आणि नीतिशिक्षणाचा लाभ होतो.—२ तीमथ्य ३:१६, १७.
२. बंधू रस्सेल यांनी बायबल वाचनाच्या महत्त्वावर जोर कसा दिला?
२ यहोवाचे साक्षीदार त्यांच्या बायबल अभ्यास साधनांची, ज्यामध्ये टेहळणी बुरूज नियतकालिकाचा देखील समावेश आहे गुणग्राहकता बाळगतात, तसेच त्यांचा नित्याने उपयोग करतात. परंतु त्यांना माहीत आहे, की त्यांच्यापैकी कोणतेही पुस्तक बायबलची जागा घेऊ शकत नाही. १९०९ मध्ये, वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीचे पहिले अध्यक्ष चार्लस टेझ रस्सेल यांनी टेहळणी बुरूज नियतकालिकाच्या वाचकांना लिहिले: “बायबल आपल्यासाठी नमुना आहे हे कधीही विसरू नका आणि आम्हाला पुरवलेले साहाय्य देवाकडून असले तरी ते ‘साहाय्यच’ आहे, बायबलच्या जागी नाही.”
३. (अ) जे “देवाचे वचन” वाचतात त्यांच्यावर त्याचा कोणता प्रभाव पडतो? (ब) बिरूयातील लोक शास्त्रवचनांचे वाचन आणि त्याचा अभ्यास कितींदा करत होते?
३ ईश्वरप्रेरित शास्त्रवचनांमध्ये कोणत्याही इतर पुस्तकात नाही असा खोलपणा आणि प्रेरणा आहे. “देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याहि दुधारी तरवारीपेक्षा तीक्ष्ण असून, जीव व आत्मा, सांधे व मज्जा ह्यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू ह्यांचे परीक्षक असे आहे.” (इब्रीयांस ४:१२) बिरूयातील लोक “मोठ्या मनाचे” आहेत असे म्हणून शिष्य लूकने त्यांची प्रशंसा केली. त्यांनी, प्रेषित पौल आणि त्याचा सहकारी सीला यांनी प्रचार केलेल्या वचनाचा मोठ्या उत्सुकतेने केवळ स्वीकार केला नाही तर त्यांना जे काही शिकवले जात होते त्याचा शास्त्रवचनीय आधार मिळण्यासाठी ‘शास्त्रात दररोज शोध केला.’—प्रेषितांची कृत्ये १७:११.
दररोज वाचणे
४. आम्ही बायबल किती वेळा वाचले पाहिजे याच्याबद्दल शास्त्रवचने काय सूचित करतात?
४ आपण बायबल कितींदा वाचले पाहिजे याचा त्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला नाही. परंतु, त्यामध्ये, यहोवाने यहोशवाला त्याचा मार्ग सुखाचा होण्यासाठी आणि देवाने दिलेल्या त्याच्या नेमणूकीत यशःप्राप्ती घडण्यासाठी ‘नियमशास्त्राच्या ग्रंथाचे रात्रंदिवस मनन’ करण्याचा सल्ला नोंदवलेला आहे. (यहोशवा १:८) ते आपल्याला सांगते, की प्राचीन इस्राएलवर जो कोणी राजा होता त्याला शास्त्रवचनांचे “जन्मभर” वाचन करावयाचे होते. (अनुवाद १७:१९) ते पुढे म्हणते: “जो पुरूष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही; . . . तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करितो, तो धन्य.” (स्तोत्र १:१, २) शिवाय, मत्तयाने लिहिलेले शुभवर्तमान आपल्याला सांगते, की येशू ख्रिस्ताने त्याला मोहात पाडणाऱ्या सैतानाच्या प्रयत्नांना हाणून पाडले तेव्हा ईश्वरप्रेरित इब्री शास्त्रवचनांचा संदर्भ घेत म्हटले: “‘मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल,’ असा शास्त्रलेख आहे.” (मत्तय ४:४) आपल्याला शारीरिक अन्न कितींदा लागते? दररोज! आध्यात्मिक अन्न दररोज सेवन करणे याहीपेक्षा महत्त्वपूर्ण आहे कारण यामुळे अनंत जीवनाच्या आपल्या आशेवर प्रभाव पडतो.—अनुवाद ८:३; योहान १७:३.
५. आपल्यावर विश्वासाच्या परीक्षा येतात तेव्हा दैनंदिन बायबल वाचन ‘प्रभूला संतोषविण्याकरिता त्याला शोभेल असे वागण्यास’ कसे मदत करू शकते?
५ आपल्यातील प्रत्येकाला दररोज देवाच्या वचनातून बळकटीची आवश्यकता आहे. दररोज—घरी, कामात, शाळेत, रस्त्यावर, खरेदी करताना, आपल्या सेवेत असताना—आपल्या विश्वासाला आव्हाने दिली जातात. आपण यांचा सामना कसा करू शकतो? बायबलच्या आज्ञा व तत्त्वे तात्काळ आपल्या मनात येतील का? स्वावलंबाच्या भावनेला उत्तेजन देण्याऐवजी बायबल ताकीद देते: “म्हणून आपण उभे आहो असे ज्याला वाटते त्याने पडू नये म्हणून संभाळावे.” (१ करिंथकर १०:१२) जगाला त्याच्या साच्यात आपल्याला कोंबून ठेवण्याची परवानगी देण्याऐवजी ‘सर्व प्रकारे प्रभूला संतोषविण्याकरिता त्याला शोभेल असे वागण्यास’ दैनंदिन बायबल वाचन आपल्याला मदत करील.—कलस्सैकर १:९, १०; रोमकर १२:२.
वारंवार बायबल वाचण्याची गरज
६. बायबलचे वारंवार वाचन करणे लाभदायक का आहे?
६ बायबलचे वाचन कादंबरीच्या वाचनापेक्षा फार वेगळे आहे. प्रसिद्ध कादंबरी एकाच वेळी वाचण्यासाठी बनवण्यात येते; एकदाचे त्या व्यक्तीला कथा आणि तिचा शेवट समजला की ती कादंबरी पुन्हा वाचण्यात काही अर्थ राहत नाही. याच्या विरूद्धतेत, आपण बायबल कितींदाही वाचले तरी पुन्हा एकदा त्याचे वाचन केल्यावर आपल्याला त्याचा पुष्कळ लाभ होतो. (नीतीसूत्रे ९:९) सुज्ञ व्यक्तीला शास्त्रवचनातून नेहमी नवा अर्थ मिळत राहतो. अलीकडच्या महिन्यांमध्ये तिने जे पाहिले, ऐकले व व्यक्तिशः अनुभवले त्याच्या अनुरोधाने शेवटल्या दिवसांबद्दलच्या भविष्यवाण्या तिच्यासाठी खूपच प्रभावकारी होतात. (दानीएल १२:४) सुज्ञ बायबल वाचक, जसजसा जीवनातील त्याचा अनुभव विस्तृत करतो आणि समस्यांचा सामना करतो तसा, पूर्वी सहजपणे वाचलेल्या सल्ल्याची तो आता अधिक गुणग्राहकता बाळगतो. (नीतीसूत्रे ४:१८) तो गंभीरपणे आजारी असल्यास, यातना काढून टाकण्याविषयी व आरोग्य पुन्हा मिळण्याविषयी बायबलच्या अभिवचनांचा त्याच्यासाठी पूर्वीपेक्षा अधिक गहन अर्थ होतो. आप्त आणि कौटुंबिक सदस्यांचा मृत्यू होतो तेव्हा, पुनरुत्थानाचे अभिवचन आणखीनच मौल्यवान होते.
७. आपण जीवनातील एक नवी जबाबदारी स्वीकारतो तेव्हा आपल्याला काय मदत करु शकेल व का?
७ अनेक वर्षांपासून तुम्ही व्यक्तिगतरीत्या बायबल वाचून त्याच्या सल्ल्याचे अवलंबन केले असेल. परंतु आता कदाचित तुम्ही जीवनात नव्या जबाबदाऱ्या घेत असाल. तुम्ही विवाह करणार आहात का? तुम्ही पालक होणार आहात का? तुमच्यावर मंडळीमध्ये वडील किंवा सेवा-सेवक या नात्याने जबाबदाऱ्या सुपूर्त करण्यात आल्या आहेत का? तुम्ही पूर्णवेळेचे सुवार्तिक बनून तुम्हाला प्रचारकार्य आणि शिकवण्याच्या अधिक संधी प्राप्त झाल्या आहेत का? या नवीन जबाबदाऱ्या ध्यानात ठेवून संपूर्ण बायबल पुन्हा वाचून काढणे किती लाभदायक ठरेल!—इफिसकर ५:२४, २५; ६:४; २ तीमथ्य ४:१, २.
८. परिस्थितींमध्ये बदल झाल्यावर, आपल्याला माहीत आहे असा विचार केलेल्या गोष्टींविषयी आपल्याला आणखी शिकून घेण्याची गरज आहे हे कसे दिसून येईल?
८ गतकाळात तुम्ही आत्म्याची फळे चांगल्याप्रकारे प्रदर्शित केली असतील. (गलतीकर ५:२२, २३) तरीसुद्धा, तुमची परिस्थिती बदलली असेल ज्यामुळे तुम्हाला त्या ईश्वरी गुणांबद्दल आणखी शिकून घेण्याची आवश्यकता भासेल. (पडताळा इब्रीयांस ५:८.) पूर्वी प्रवासी पर्यवेक्षक असलेल्या एका बांधवाला ही खास सेवा त्याच्या वृद्ध पालकांची काळजी घेण्यासाठी सोडावी लागली. ते म्हणतात: “मला वाटत असे, की मी योग्यरीतीने आत्म्याची फळे विकसित करतो. आता मला वाटते, की मी पुन्हा एकदा सुरवात केली आहे.” त्याचप्रमाणे, ज्यांचे विवाहसोबती शारीरिक किंवा भावनिकरीत्या गंभीर आजारी आहेत अशा पती आणि पत्नींना दिसून येईल, की व्यक्तिगत काळजी पुरवत असताना ते अधूनमधून तणावामुळे निरूत्साहित करणाऱ्या प्रतिक्रिया दर्शवू लागतात. नित्याचे बायबल वाचन सांत्वन आणि मदतीचा उगम आहे.
बायबल वाचन केव्हा केले जाऊ शकते
९. (अ) व्यग्र व्यक्तीला दररोज बायबल वाचनासाठी वेळ काढण्यास काय मदत करू शकतो? (ब) देवाच्या वचनाचे वाचन वडिलांसाठी खास महत्त्वपूर्ण का आहे?
९ आधीच व्यस्त असलेल्या लोकांना, आणखी दुसरे काहीतरी नियमितपणे करण्यास वेळ काढणे आव्हान आहे हे निश्चित. परंतु आपल्याला यहोवाच्या उदाहरणातून लाभ मिळू शकतो. बायबल प्रकट करते, की तो प्रत्येक गोष्ट ‘नियुक्त समयी’ करतो. (उत्पत्ती २१:२; निर्गम ९:५; लूक २१:२४; गलतीकर ४:४) देवाचे वचन नित्याने वाचण्याच्या महत्त्वाची गुणग्राहकता, आपल्याला त्याच्यासाठी आपल्या दैनंदिन वेळापत्रकात एक वेळ ठरवण्यास मदत करील. (इफिसकर ५:१५-१७) वडिलांना विशेषतः नित्य बायबल वाचनासाठी वेळ बाजूला काढणे आवश्यक आहे जेणेकरून ते जो सल्ला देतील तो बिनचूक बायबलच्या तत्त्वांवर आधारलेला असेल आणि त्यामुळे ते जो आत्मा प्रदर्शित करतील तो ‘वरून येणाऱ्या ज्ञानाला’ प्रतिबिंबित करील.—याकोब ३:१७; तीत १:९.
१०. दैनंदिन बायबल वाचकांना वाचण्यासाठी वेळ कधी मिळतो?
१० ज्यांनी व्यक्तिगत बायबल वाचन कार्यक्रमात यश मिळवले आहे ते त्यांचे वाचन दिवसाच्या कामांची सुरवात करण्याआधी म्हणजे सकाळीच करतात. इतरांना त्यांचे वाचन दुसऱ्या वेळेला योग्यपणे करणे सोपे वाटते. कामाला जाता-येता बायबल कॅसेट (जेथे उपलब्ध आहे) पुष्कळांना प्रवासाच्या वेळेचा चांगला उपयोग करण्यास मदत करतात आणि काही साक्षीदार घरातील दररोजची कामे करत असताना ती ऐकतात. युरोप, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका आणि पूर्वेकडील राष्ट्रांमधील विविध साक्षीदारांना उपयोगी पडलेले कार्यक्रम, “ते केव्हा वाचतात आणि त्यांना त्याचा लाभ कसा होतो” हा लेख २० आणि २१ पृष्ठांवर वर दाखवला आहे.
११. उपलब्ध असलेला वेळ मर्यादित असला तरी दैनंदिन बायबल वाचन कसे करता येऊ शकते?
११ एका वेळेस तुम्ही तुमच्या बायबल वाचनासाठी किती वेळ खर्च करता ते महत्त्वाचे नसून, तुम्ही ते किती नित्याने करता हे महत्त्वाचे आहे. एकाच वेळी एकापेक्षा अधिक तासांसाठी तुम्हाला वाचन करणे, आणखी संशोधन करणे आणि त्यामध्ये पूर्णपणे लवलीन होणे फायदेकारक वाटेल. परंतु तुमचे वेळापत्रक तुम्हाला नियमितरीत्या तसे करण्याची अनुमती देते का? बायबलचे किंचितही वाचन न करता दिवसांमागून दिवस घालवण्यापेक्षा, दररोज १५ किंवा फक्त ५ मिनिटे वाचन करणे बरे नव्हे का? बायबलचे दररोज वाचन करण्याचा दृढनिश्चय करा. मग शक्य तेव्हा, वाचलेल्या भागावर खोलवर संशोधन करा.
बायबल वाचन करण्याच्या विविध पद्धती
१२. बेथेल कुटुंबाच्या नव्या सदस्यांसाठी आणि गिलियड विद्यार्थ्यांसाठी बायबल वाचनाचा कोणता कार्यक्रम आहे?
१२ बायबलचे वाचन करण्याचे विविध मार्ग आहेत. उत्पत्तीपासून प्रकटीकरणापर्यंत वाचन करणे लाभदायक आहे. जागतिक मुख्यालयात किंवा संस्थेच्या एखाद्या शाखा दप्तरात काम करणाऱ्या जगभरातील बेथेल कुटुंबाच्या प्रत्येक सदस्यांना बेथेल सेवेच्या त्यांच्या पहिल्या वर्षी संपूर्ण बायबल वाचावे लागते. (त्यामध्ये बहुतेककरून अध्याय किती मोठा आहे हे लक्षात घेऊन तीन ते पाच अध्याय किंवा प्रत्येक दिवशी चार ते पाच पाने वाचण्याचा समावेश होतो.) वॉचटावर बायबल गिलियड प्रशाळेमधील विद्यार्थ्यांनी देखील पदवीधर होण्याआधी संपूर्ण बायबल वाचणे आवश्यक आहे. आशा केली जाते, की यामुळे त्यांना दैनंदिन बायबल वाचनाला त्यांच्या जीवनाचा एक भाग बनवण्यास मदत होते.
१३. बाप्तिस्मा घेणाऱ्या नवीन साक्षीदारांसाठी कोणते ध्येय सुचवले जाते?
१३ बाप्तिस्मा घेतलेल्या नवोदितांनी स्वतःसमोर संपूर्ण बायबल वाचण्याचे ध्येय ठेवणे फायदेकारक आहे. सन १९७५ मध्ये, फ्रान्समधील एक तरुण बाप्तिस्मा घेण्याच्या तयारीत होता तेव्हा त्याला एका वडिलांनी, त्याचा बायबल वाचनाचा निश्चित कार्यक्रम आहे का असे विचारले. तेव्हापासून आजपर्यंत त्याने प्रत्येक वर्षी संपूर्ण बायबल वाचून काढले, व तो बहुधा त्याचे वाचन कामाला जाण्यापूर्वी रोज सकाळी करत होता. त्याच्या परिणामांबद्दल तो म्हणतो: “मी यहोवासोबत चांगल्याप्रकारे परिचित झालो आहे. तो जे काही करतो ते सर्व त्याच्या उद्देशांसोबत कसे संबंधित आहे आणि अडखळणे उद्भवल्यावर तो कशी प्रतिक्रिया दाखवतो हे मी पाहू शकतो. मला दिसते, की यहोवा त्याच्या सर्व कृत्यांमध्ये धार्मिक त्याचबरोबर चांगला आहे.”
१४. (अ) चालू राहील असा व्यक्तिगत बायबल वाचनाचा कार्यक्रम सुरू करण्यासाठी कशाची गरज आहे? (ब) प्रत्येक बायबल पुस्तकाचे वाचन करत असताना त्याची सामान्य रूपरेषा आठवणीत ठेवण्यासाठी आपल्याला काय मदत करू शकते?
१४ तुम्ही संपूर्ण बायबल वाचले आहे का? नसल्यास, आता सुरू करण्याची चांगली संधी आहे. एक निश्चित कार्यक्रम तयार करा आणि मग त्याप्रमाणे चाला. प्रत्येक दिवशी तुम्ही किती पाने किंवा अध्याय वाचाल हे ठरवा, किंवा तुम्ही किती वेळ व कधी वाचाल ते ठरवा. सगळेच लोक एका वर्षात त्यांचे बायबल वाचन संपवू शकणार नाहीत, परंतु देवाचे वचन नित्याने शक्य असल्यास दररोज वाचणे महत्त्वाची गोष्ट आहे. बायबलचे वाचन करत असताना, तुम्ही जे साहित्य वाचत आहात त्याची सामान्य रूपरेषा तुमच्या मनावर ठसवण्यास विशिष्ट संदर्भ पुस्तकांचा वापर मदतकारी असल्याचे तुम्हाला दिसून येईल. शास्त्रवचनांवर सूक्ष्मदृष्टी (इंग्रजी) हे पुस्तक तुमच्या भाषेत उपलब्ध असल्यास, एखादे विशिष्ट बायबल पुस्तक वाचण्यास सुरू करण्याआधी, सूक्ष्मदृष्टी पुस्तकात पुरवलेल्या ठळक मुद्यांच्या संक्षिप्त रूपरेषेची उजळणी करा.* रूपरेषेतील ठळक अक्षरांच्या मथळ्यांची विशेष नोंद घ्या. किंवा “प्रत्येक शास्त्रलेख परमेश्वरप्रेरित आणि लाभदायक आहे” (इंग्रजी) या पुस्तकात पुरवलेल्या अधिक विस्तृत सारांशाचा अशाचप्रकारे उपयोग करा.a
१५. (अ) पृष्ठ १६ व १७ वर दिलेल्या कोणत्या सूचना तुमचे बायबल वाचन वाढवण्यास मदत करू शकतात? (ब) ठरावीक पृष्ठांचे आचारपद्धतीने वाचन करण्यापेक्षा, आपण कोणत्या महत्त्वपूर्ण गोष्टीकडे अधिक लक्ष दिले पाहिजे?
१५ लागोपाठ बायबल वाचन लाभप्रद आहे, परंतु केवळ आचारपद्धतीचे वाचक होऊ नका. तुम्ही संपूर्ण वर्षात बायबल वाचून काढले असे म्हणण्यासाठी प्रत्येक दिवशी ठरावीक पाने वाचू नका. “तुमचे बायबल वाचन वाढवण्यासाठी सूचना” (पृष्ठे १६ व १७) या चौकोनात दाखवल्याप्रमाणे बायबलचे वाचन करण्याचे व त्याचा आनंद लुटण्याचे अनेक मार्ग आहेत. तुम्ही कोणतीही पद्धत वापरत असला तरी, तुम्ही तुमच्या मनाला आणि अंतःकरणाला पुरवठा करत आहात याची खात्री असू द्या.
तुम्ही जे वाचता त्याचा अर्थबोध करून घ्या
१६. आपण जे काही वाचतो त्यावर मनन करण्यासाठी वेळ काढणे महत्त्वाचे का आहे?
१६ येशू त्याच्या शिष्यांना शिकवत असताना, तो जे काही बोलत होता ते समजण्याच्या महत्त्वावर त्याने अधिक जोर दिला. त्या गोष्टींचे केवळ बौद्धिक आकलन महत्त्वपूर्ण नव्हते तर, त्यांना ‘अंतःकरणातून समजून घ्यावयाचे होते’ जेणेकरून ते आपल्या जीवनात त्याचा अवलंब करतील. (मत्तय १३:१४, १५, १९, २३) एखादी व्यक्ती आतून कशी आहे हे देव पाहतो आणि अंतःकरण त्याचे प्रतिनिधीत्व करते. (१ शमुवेल १६:७; नीतीसूत्रे ४:२३) अशाप्रकारे, बायबल उतारे काय म्हणतात ते आपल्याला समजते याची खात्री करण्याव्यतिरिक्त, आपल्याला त्यांचे मनन व आपल्या जीवनात त्यांचा कसा अवलंब होईल याचा विचार केला पाहिजे.—स्तोत्र ४८:९; १ तीमथ्य ४:१५.
१७. शास्त्रवचनांमधून आपण जे काही वाचतो त्यावर मनन करू शकू असे काही कोणते दृष्टिकोन आहेत?
१७ बायबल अहवालांमधील मूलभूत तत्त्वांना ओळखण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्ही काही प्रसंगांचा सामना करता तेव्हा त्यांना लागू करू शकता. (पडताळा मत्तय ९:१३; १९:३-६.) तुम्ही यहोवाच्या विस्मयकारक गुणांबद्दल वाचता आणि त्यांचे मनन करत असताना त्याच्याबरोबर तुमचा व्यक्तिगत नातेसंबंध आणखी दृढ बनवण्यासाठी, तुमच्यामध्ये ईश्वरी भक्तीची तीव्र भावना वाढवण्यासाठी या संधीचा उपयोग करा. तुम्ही यहोवाच्या उद्देशांची विधाने वाचता तेव्हा त्यांच्या अनुषंगाने कार्य करण्यासाठी तुम्ही काय करू शकता यावर विचार करा. तुम्ही थेट सल्ले वाचता तेव्हा, ‘मला ते माहीत आहे,’ असे म्हणण्यापेक्षा ‘ते जे काही म्हणते त्याप्रमाणे मी वागतो का?’ आणि जर वागतो तर मी आणखी “वृद्धि” कशाप्रकारे करू शकतो हे स्वतःला विचारा. (१ थेस्सलनीकाकर ४:१) देवाच्या अटींविषयी तुम्ही शिकता तेव्हा ज्यांनी या अटींप्रमाणे जीवन व्यतीत केले व ज्यांनी केले नाही अशा बायबलमधील वास्तविक लोकांच्या उदाहरणांची देखील नोंद घ्या. त्यांनी त्याप्रकारे जीवन का व्यतीत केले आणि याचा परिणाम काय झाला त्याचा विचार करा. (रोमकर १५:४; १ करिंथकर १०:११) तुम्ही येशू ख्रिस्ताच्या जीवनाविषयी वाचता तेव्हा, यहोवाने संपूर्ण पृथ्वीवरील सर्व राज्याधिकार येशूला सुपूर्त केला आहे हे ध्यानात ठेवा; देवाच्या नवीन जगाविषयीची उत्कट इच्छा बळकट करण्यासाठी ह्या संधीचा उपयोग करा. तसेच, तुम्ही देवाच्या पुत्राचे जवळून अनुकरण करु शकाल अशा मार्गांचे पृथक्करण करा.—१ पेत्र २:२१.
१८. ‘विश्वासू आणि बुद्धिमान दास’ यांच्याद्वारे पुरवलेले अभ्यास साहित्य आणि आमचे बायबल वाचन यामध्ये आपण समतोल कसा राखू शकतो?
१८ अर्थात, बायबल वाचन करत असताना, ‘विश्वासू आणि बुद्धिमान दास’ यांच्याद्वारे उपलब्ध करून दिलेल्या उत्तम अभ्यास साहित्याचा वापर करणे सोडून देऊ नये. कारण तेही यहोवाच्या तरतूदींपैकीचा अमोल भाग आहे. (मत्तय २४:४५-४७) देवाच्या वचनाच्या नियमित वाचनाला तुमच्या जीवनात प्रथम स्थान आहे याची खात्री करा. शक्य असल्यास, “देवाचे वचन पवित्र बायबल दररोज वाचा.”
[तळटीपा]
a वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ न्यूयॉर्क, इंकाने प्रकाशित केलेले.
तुम्ही कसे उत्तर द्याल?
▫ दररोज बायबलचे काही अंशी वाचन करणे लाभदायक का आहे?
▫ पुनःपुन्हा बायबलचे वाचन करणे जरूरीचे का आहे?
▫ तुमच्या व्यक्तिगत वेळापत्रकात, दैनंदिन बायबल वाचनासाठी कोणता उचित समय आहे?
▫ तुम्ही वारंवार बायबल वाचताना तुमच्या कार्यक्रमाला विविधता कशी प्राप्त होईल?
▫ आपण जे वाचतो त्यावर मनन करणे अधिक महत्त्वाचे का आहे?
[१५ पानांवरील चित्रं]
तुम्ही दररोज बायबलचे वाचन करता किंवा बायबल कॅसेट ऐकता का?
[१६, १७ पानांवरील चौकट]
तुमचे बायबल वाचन वाढवण्यासाठी सूचना
(१) पुष्कळ लोक बायबल पुस्तके नेहमीप्रमाणे जशी छापली जातात म्हणजे, उत्पत्ती पासून प्रकटीकरण या अनुक्रमाने वाचतात. ती सुरवातीला ज्याप्रकारे लिहिण्यात आली त्या क्रमाने देखील तुम्ही वाचू शकता. लक्षात असू द्या, की बायबल ६६ प्रेरित पुस्तकांचा संग्रह, एक ईश्वरी पुस्तकालय आहे. विविधतेसाठी, पृष्ठ क्रमाने वाचण्याऐवजी तुम्हाला, इतिहासाची माहिती देणारी, मग ज्यामध्ये बहुतेक भविष्यवाण्या आहेत अशी पुस्तके, त्यानंतर सल्ल्याची पत्रे वाचावयास आवडतील. तुम्ही जे काही वाचले ते ध्यानात ठेवा आणि संपूर्ण बायबल वाचावयास विसरू नका.
(२) शास्त्रवचनांचा भाग वाचल्यानंतर, तो भाग यहोवाबद्दल, त्याच्या उद्देशाबद्दल, एखादी गोष्ट करण्याच्या त्याच्या पद्धतीबद्दल काय प्रकट करतो; त्याचा तुमच्या जीवनावर कसा प्रभाव पडला पाहिजे; एखाद्याला मदत करण्यासाठी तुम्ही त्याचा कसा उपयोग कराल ते स्वतःस विचारा.
(३) शास्त्रवचनांवर सूक्ष्मदृष्टी (इंग्रजी), (“प्रत्येक शास्त्रलेख परमेश्वरप्रेरित आणि लाभदायक आहे” (इंग्रजी), मध्ये देखील) या पुस्तकात “येशू ख्रिस्त” या मथळ्याखाली प्रकाशित केलेल्या “येशूच्या पार्थिव जीवनाच्या मुख्य घटना” या तक्त्याचा मार्गदर्शक म्हणून उपयोग करून एकापाठोपाठ शुभवर्तमानाच्या प्रत्येक भागाचे समांतर अहवाल वाचा. त्याचबरोबर सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य पुस्तकातील सुसंगत विभागांचा संदर्भ घ्या.
(४) प्रेषितांची कृत्ये यातून तुम्ही पौलाचे जीवन आणि सेवेचा अहवाल वाचता तेव्हा, त्याबरोबर त्याजशी संबंधित प्रेरित पत्रे देखील वाचा. अशाप्रकारे, पौलाने जेथे प्रचार केला त्या शहरांचा किंवा क्षेत्रांचा उल्लेख केलेला आढळतो तेव्हा तुमचे वाचन थांबवा आणि त्या ठिकाणातील सहख्रिश्चनांना त्याने नंतर लिहिलेली पत्रे वाचा. त्याने केलेला प्रवास, न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशनच्या अगदी शेवटच्या पानावर असलेल्या नकाशात पाहिल्याने सुद्धा तुम्हाला मदत होऊ शकते.
(५) निर्गम ते अनुवाद असे वाचन करत असताना, अनेक भविष्यसूचक नमुन्यांचे स्पष्टीकरण मिळण्यासाठी इब्रीयांस लिहिलेले पत्र वाचा. शास्त्रवचनांवर सूक्ष्मदृष्टी (इंग्रजी) या पुस्तकात “नियम” या मथळ्याखालील “नियमशास्त्राच्या कराराची काही वैशिष्ट्ये” ह्या तक्त्याची मदत घ्या.
(६) भविष्यसूचक पुस्तके वाचत असताना, बायबलमध्ये उद्धृत केलेल्या ऐतिहासिक पार्श्वभूमीची उजळणी करण्यासाठी वेळापत्रक बनवा. उदाहरणार्थ, यशयाचे पुस्तक वाचताना, यशया १:१ मध्ये ज्यांचा उल्लेख केला आहे त्या उज्जीया, योथाम, आहाज आणि हिज्कीया राजांबद्दल इतर ठिकाणी काय सांगितले आहे त्याची उजळणी करा. (२ राजे, १५-२० अध्याय; २ इतिहास, २६-३२ अध्याय) किंवा हाग्गय आणि जखऱ्याचे पुस्तक वाचताना, एज्राच्या पुस्तकात काय लिहिले आहे त्याची तपासणी करा.
(७) बायबलचे एखादे पुस्तक निवडा, त्याचा काही भाग (कदाचित एखादा अध्याय) वाचा, मग वॉचटावर पब्लीकेशन्स इंडेक्स किंवा तुमच्या भाषेत संगणकातील टेहळणी बुरूज पुस्तकालय उपलब्ध असल्यास त्याचा उपयोग करून संशोधन करा. वाचलेल्या साहित्याचा तुमच्या व्यक्तिगत जीवनात अवलंब करा. भाषणात आणि क्षेत्र सेवेत त्यांचा वापर करा. त्यानंतर दुसरा विभाग वाचा.
(८) बायबलच्या पुस्तकावर किंवा त्याच्या काही भागावर विवेचन पुरवणारे एखादे वॉचटावर प्रकाशन असल्यास, तो भाग बायबलमधून वाचत असताना नेहमी त्याचा संदर्भ घ्या. (उदाहरणार्थ: गीतरत्न पुस्तकासाठी, टेहळणी बुरूज डिसेंबर १, १९५७, पृष्ठे ७२०-३४; यहेज्केल पुस्तकासाठी, “राष्ट्रांना कळून येईल की मी यहोवा आहे”—कसे? (इंग्रजी); दानिएलसाठी, “तुझी इच्छा पृथ्वीवर पूर्ण होवो” (इंग्रजी) किंवा आपले येणारे जागतिक सरकार—देवाचे राज्य (इंग्रजी); हाग्गय व जखऱ्यासाठी, मानवजातीसाठी पुनर्स्थापित केलेले परादीस—ईश्वरशासनाद्वारे (इंग्रजी); प्रकटीकरणासाठी, प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे!)
(९) वाचत असताना काही प्रतिसंदर्भ पाहा. ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनात थेटपणे उल्लेखलेल्या इब्री शास्त्रवचनातील ३२० उताऱ्यांची त्याचबरोबर ज्यांचा संदर्भ दिला आहे त्या शेकडो इतर उताऱ्यांची व त्याचे अवलंबन कसे करावे त्याबद्दल जे सांगण्यात आले आहे त्याची नोंद घ्या. प्रतिसंदर्भ, बायबलमध्ये दिलेल्या भविष्यवाण्यांच्या पूर्णतेकडे, चरित्रविषयक आणि भौगोलिकरीत्या सविस्तर माहितीकडे तसेच त्याचसारखे समान विचार जे तुम्हाला कदाचित समजण्यास कठीण जात असतील अशा अभिव्यर्क्तिना स्पष्ट करतात त्यांच्याकडे अंगुली दर्शवितात.
(१०) तुमच्या भाषेत न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशनची संदर्भ आवृत्ती उपलब्ध असल्यास तुम्ही जे वाचता त्याच्याशी संबंधित असलेल्या तळटीपा आणि परिशिष्ट लेख पाहा. ते त्यामध्ये वापरण्यात आलेल्या अनुवादांचा तसेच महत्त्वपूर्ण अभिव्यक्ती भाषांतरीत करण्याच्या इतर मार्गांचा आधार दाखवतात. तुम्हाला इतर बायबल अनुवादांमध्ये विशिष्ट वचनांच्या अनुवादांची तुलना करावयास देखील आवडेल.
(११) प्रत्येक अध्याय वाचून झाल्यावर, त्या अध्यायाच्या मुख्य कल्पनेचा संक्षिप्त सारांश लिहा. नंतर त्याचा उजळणी आणि मनन करण्यासाठी आधार म्हणून उपयोग करा.
(१२) बायबल वाचत असताना, तुम्हाला आठवणीत ठेवावयास वाटणाऱ्या वचनांवर चिन्ह करा किंवा त्यांना कार्डांवर लिहून तुम्हाला रोज दिसेल अशा ठिकाणी ठेवा. ती वचने पाठ करा; त्यांचे मनन करा; त्यांचा वापर करा. एकाच वेळी पुष्कळ वचने पाठ करण्याचा प्रयत्न करू नका, तर प्रत्येक आठवडी कदाचित एक किंवा दोन वचने पाठ करा; त्यानंतर पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही बायबल वाचता तेव्हा आणखी वचने निवडा.