गीत १५ (१२७)
लक्षावधी बंधू
(प्रकटीकरण ७:९)
१. लक्षानुलक्ष बांधव,
उभे मजपाशी,
विश्वासू साक्षीदार,
ते सत्व जपती.
लक्षानुलक्ष असती,
दाटी होई अती,
जगतात देशोदेशी,
ईश स्तुती गाती.
२. लक्षानुलक्ष बांधव,
लेती वस्त्रे श्वेत,
करती सेवा याहची,
मंदिरी सतत.
लक्षानुलक्ष असती,
सांगती ते हर्षे,
याह नि कोकऱ्या श्रेय,
तारणाचे असे.
३. लक्षानुलक्ष बांधव,
करती बोधास,
दैवी “सुवार्ता” देती,
ते सर्व लोकांस.
उपदेश करताना,
छळ कधी होई,
शांती मिळे जेथ ख्रिस्त,
कुरणी त्या नेई.