वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g17 क्र. २ पृ. १४-१५
  • देवदूत

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देवदूत
  • सावध राहा!—२०१७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • देवदूत कोण आहेत?
  • प्राचीन काळात देवदूतांनी काय केलं?
  • देवदूत सध्या काय करत आहेत?
  • देवदूत तुम्हाला कशी मदत करू शकतात
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • दिव्यदूत तुमच्या जीवनावर प्रभाव पाडतात का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
  • देवदूत—“परिचारक आत्मे”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • विश्‍वासू स्वर्गदूतांसारखं वागा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—२०१७
g17 क्र. २ पृ. १४-१५
एका जळणाऱ्‍या झुडपात मोशेला एक देवदूत दिसतो

बायबल काय म्हणतं?

देवदूत

साहित्यांमध्ये, चित्रांमध्ये, कलाकृतींमध्ये आणि चित्रपटांमध्ये सहसा देवदूतांचा उल्लेख आढळतो. पण देवदूत नेमके कोण आहेत आणि त्यांची काय भूमिका आहे?

देवदूत कोण आहेत?

बायबलमध्ये काय म्हटलं आहे?

भौतिक विश्‍व आणि पहिल्या मानवी जोडप्याला बनवण्याच्या आधी, देवाने उच्च श्रेणीच्या बुद्धिमान प्राण्यांना निर्माण केलं. ते मानवांपेक्षा खूप जास्त शक्‍तिशाली आहेत. ते देवासोबत राहतात. अशा ठिकाणी जिथे मनुष्य जाऊ शकत नाही किंवा ते ठिकाण पाहू शकत नाही. (ईयोब ३८:४, ७) बायबल त्या बुद्धिमान प्राण्यांना “दूत” किंवा देवदूत असं म्हणतं.—स्तोत्र १०४:४.a

देवदूतांची संख्या किती आहे? त्यांची संख्या खूप जास्त आहे. बायबल म्हणतं, की देवाच्या राजासनाच्या भोवती “त्यांची संख्या हजारो लाखो इतकी” आहे. (प्रकटीकरण ५:११) आपण जर या वचनाचा शब्दशः अर्थ घेतला, तर देवदूतांची संख्या ही लाखोंमध्ये आहे असं म्हणता येईल.

“मग मी पाहिले तेव्हा राजासन [याच्याभोवती] . . . मला अनेक देवदूतांचा आवाज ऐकू आला. त्यांची संख्या हजारो लाखो इतकी होती.”—प्रकटीकरण ५:११.

प्राचीन काळात देवदूतांनी काय केलं?

बायबलमध्ये काय म्हटलं आहे?

देवदूतांनी देवाच्या वतीने बोलण्याचं किंवा संदेश सांगण्याचं काम केलं.b बायबल म्हणतं की देवाने चमत्कार करण्यासाठी त्यांचा वापर केला. अब्राहाम नावाच्या पुरुषाला आशीर्वाद देण्यासाठी देवाने एका देवदूताला पाठवलं. त्या देवदूताने अब्राहामला त्याच्या मुलाचं बलिदान देण्यापासूनही रोखलं. (उत्पत्ति २२:११-१८) मोशे नावाच्या एका व्यक्‍तीला जळत असलेल्या झुडपात एक देवदूत दिसला. त्याने मोशेला एक असा संदेश सांगितला ज्यामुळे मोशेचं जीवनच बदलून गेलं. (निर्गम ३:१, २) तसंच, दानीएल नावाच्या एका संदेष्ट्याला जेव्हा सिंहाच्या गुहेत टाकण्यात आलं, तेव्हा “देवाने आपला दिव्यदूत पाठवून सिंहांची तोंडे बंद केली.”—दानीएल ६:२२.

“तेव्हा परमेश्‍वराच्या दूताने एका झुडपातून अग्निज्वालेत त्यास [मोशेला] दर्शन दिले.” —निर्गम ३:२.

देवदूत सध्या काय करत आहेत?

बायबलमध्ये काय म्हटलं आहे?

देवदूत सध्या काय करत आहेत, याबद्दल सर्व काही माहीत करणं आपल्याला शक्य नाही. पण बायबल आपल्याला सांगतं, की ते आज प्रामाणिक लोकांना देवाबद्दल आणखी शिकून घेण्यासाठी मदत करत आहेत.—प्रेषितांची कार्ये ८:२६-३५; १०:१-२२; प्रकटीकरण १४:६, ७.

यहोवाने याकोब नावाच्या एका सेवकाला एक स्वप्न दाखवलं. याकोबने त्यात एक “शिडी” पाहिली. त्या शिडीवरून देवदूत स्वर्गातून पृथ्वीवर आणि पृथ्वीवरून स्वर्गात ये-जा करत होते. (उत्पत्ति २८:१०-१२) या स्वप्नाचा काय अर्थ होतो? हाच की यहोवा देव विशिष्ट उद्देशाने देवदूतांना पृथ्वीवर पाठवतो. आणि तो उद्देश म्हणजे त्याच्या ज्या प्रामाणिक सेवकांना मदतीची गरज आहे, त्यांना मदत करणं.—उत्पत्ति २४:४०; निर्गम १४:१९; स्तोत्र ३४:७.

“एक शिडी पृथ्वीवर उभी केली असून तिचा शेंडा आकाशाला लागला आहे; आणि तिच्यावरून देवदूत चढतउतरत आहेत.”—उत्पत्ति २८:१२.

a बायबल सांगतं की काही देवदूतांनी देवाच्या अधिकाराविरुद्ध बंड केला. बायबलमध्ये या दुष्ट दूतांना “दुरात्मे” असं म्हटलं आहे.—लूक १०:१७-२०.

b खरंतर बायबलमध्ये “देवदूत” यासाठी मूळ हिब्रू आणि ग्रीक भाषेत वापरण्यात आलेल्या शब्दांचा अर्थ “संदेशवाहक” असा होतो. 

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा