गीत १३ (१२४)
आत्मसंयमाचे फळ
१. ख्रिस्तीजना जप जिवा,
न्यायासनि सत्याला
स्वसंयमासी ना सोडी,
संग्रामी घे विजयाला.
२. प्रतिदिनी सूज्ञता
नि प्रीतीसदाखवूया.
देवासम होण्यासाठी,
आत्म संयमराखूया.
३. शरिरा करावे दास,
मोहातन पडावे.
तारणा आपपरांच्या,
संयमास बाळगावे.
४. परीक्षा नि दबावात
शांत मन ठेवावे.
देवाचा पक्ष घेऊनी,
नीतिमत्वा आलिंगावे.