जगातल्या समस्यांमुळे लोकांच्या जीवनात चिंतेचं प्रमाण वाढत चाललं आहे. आणि नकळत याचा प्रभाव लोकांच्या नात्यांवर होतो.
काही लोक मित्रांना टाळतात आणि एकटं राहू लागतात.
काही घरांत नवरा-बायकोंमधले वाद वाढतात.
आपली मुलं कोणत्या गोष्टींना तोंड देत आहेत याकडे आईवडिलांचं दुर्लक्ष होतं.
तुम्हाला काय माहीत असलं पाहिजे?
खासकरून कठीण काळात शारीरिक आणि मानसिक आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी मित्र असणं आवश्यक आहे.
जगातल्या समस्यांमुळे येणारा तणाव तुमच्या कुटुंबात अनपेक्षित समस्या निर्माण करू शकतो.
सतत ऐकायला मिळणाऱ्या वाईट बातम्यांमुळे मुलांच्या मनावर किती परिणाम होतोय, हे कदाचित तुमच्या लक्षात येणार नाही.
तुम्ही आत्ता काय करू शकता?
बायबल म्हणतं: “खरा मित्र नेहमी प्रेम करतो; दुःखाच्या प्रसंगी तो भावासारखा होतो.”—नीतिवचनं १७:१७.
तुम्हाला मदत करेल आणि चांगला सल्ला देईल असा एखादा मित्र किंवा मैत्रीण तुम्हाला आहे का? कोणालातरी आपली काळजी आहे, ही जाणीव तुम्हाला दररोजच्या समस्यांना तोंड द्यायला मदत करू शकते.