वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g22 क्र. १ पृ. १३-१५
  • ४ | मनातली आशा जपा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ४ | मनातली आशा जपा
  • सावध राहा!—२०२२
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • हे महत्त्वाचं का आहे?
  • तुम्हाला काय माहीत असलं पाहिजे?
  • तुम्ही आत्ता काय करू शकता?
  • बायबल खरी आशा देतं
  • बायबल आपल्याला एक आशा देतं
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
  • बायबल आपल्याला एक आशा देतं
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या-सुरुवातीचे धडे
  • २०२४ मध्ये काही आशा आहे का?​—बायबल काय म्हणतं?
    आणखी विषय
  • अचानक आजारी पडल्यावर काय करायचं?
    आणखी विषय
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—२०२२
g22 क्र. १ पृ. १३-१५
एका फ्लावर पॉटसमोर बायबल उघडून ठेवलंय.

संकटांच्या विळख्यात जग

४ | मनातली आशा जपा

हे महत्त्वाचं का आहे?

जगातल्या समस्यांमुळे येणाऱ्‍या चिंतेचा लोकांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. काही जणांना तर असं वाटतं, की ही परिस्थिती कधीच सुधारणार नाही. आणि म्हणूनच काही जण . . .

  • भविष्याचा विचार करायचं सोडून देतात.

  • दुःख विसरण्यासाठी दारू किंवा ड्रग्जच्या आहारी जातात.

  • जगण्यापेक्षा मेलेलं बरं असा विचार करतात. ते म्हणतात, ‘जगण्यात काय अर्थच नाही!’

तुम्हाला काय माहीत असलं पाहिजे?

  • काही समस्या तात्पुरत्या असतात आणि कधीकधी आपण अपेक्षा केलेली नसतानाही त्यातून काही चांगलंसुद्धा घडतं.

  • तुमची परिस्थिती जरी बदलली नाही तरी समस्यांचा सामना करण्यासाठी तुम्ही काही गोष्टी करू शकता.

  • बायबल आपल्याला खरी आशा देतं. सगळ्या समस्या कायमच्या मिटतील असं ते सांगतं.

तुम्ही आत्ता काय करू शकता?

बायबल म्हणतं: “उद्याची चिंता कधीही करू नका, कारण उद्याचा दिवस नव्या चिंता घेऊन उगवेल. ज्या दिवसाची चिंता त्या दिवसाला पुरे.”​—मत्तय ६:३४.

उद्या काय होईल याबद्दल जास्त चिंता करत बसू नका. आज जे करता येण्यासारखं आहे ते करायचा प्रयत्न करा.

पुढे कोणत्या वाईट गोष्टी होऊ शकतात,  याचा तुम्ही विचार करत बसला, तर तुमचा ताण वाढेल आणि चांगल्या भविष्याची तुमची आशा हळूहळू कमजोर होत जाईल.

कसा कराल सामना?​—काही उपयोगी सल्ले

जीवनातल्या चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्या

एक स्त्री समाधानी चेहऱ्‍याने खिडकीबाहेर पाहत आहे.

बायबल म्हणतं: “दुःखी माणसासाठी सगळेच दिवस वाईट असतात, पण ज्याचं मन आनंदी असतं, त्याच्यासाठी दररोज मेजवानी असते.” (नीतिवचनं १५:१५) जर तुम्ही समस्येचाच जास्त विचार करत बसला, तर उपाय समोर असूनही तो तुम्हाला दिसणार नाही. याउलट, जर तुम्ही चांगल्या गोष्टींवर लक्ष द्यायचं ठरवलं तर तुम्हाला त्या समस्येतून मार्ग काढायला सोपं जाईल.

  • सतत बातम्या पाहू नका आणि त्यांवर जास्त विचार करू नका.

  • दररोज अशा दोन किंवा तीन गोष्टींचा विचार करा, ज्यांबद्दल तुम्हाला इतरांचे आभार मानावेसे वाटतात.

  • दररोज कोणती कामं करायची आहेत त्याची एक लिस्ट बनवा. आणि त्या दिवशी पूर्ण करता येतील अशाच गोष्टी त्यात लिहा. मोठी कामं एका दमात करण्याऐवजी थोडी-थोडी करून पूर्ण करा. त्यामुळे दिवसाच्या शेवटी आजचं काम पूर्ण केल्याबद्दल तुम्हाला समाधान वाटेल.

दुसऱ्‍यांची मदत घ्या

एक वयस्क माणूस एका तरुणाच्या खांद्यावर हात ठेवून त्याला प्रोत्साहन देत आहे.

बायबल म्हणतं: “जो नेहमी एकटा-एकटा राहतो . . . तो सर्व प्रकारची व्यावहारिक बुद्धी नाकारतो.” (नीतिवचनं १८:१) एखादा माणूस खोल खड्ड्यात पडला तर त्याला स्वतःहून बाहेर यायला जमणार नाही. पण जर कोणी त्याला मदतीचा हात दिला तर तो बाहेर येऊ शकतो.

  • आपल्या घरच्या लोकांची आणि मित्रांची मदत घ्या.

  • तसंच, त्यांना  मदत करण्यासाठी तुम्ही  काय करू शकता याचा विचार करा. इतरांची मदत केल्यामुळे तुम्हाला स्वतःच्या समस्या मोठ्या वाटणार नाहीत. उलट त्यांच्याकडे योग्य दृष्टिकोनातून बघायला तुम्हाला मदत होईल.

  • तुम्हाला निराश वाटत असेल आणि जगण्यात काहीच अर्थ नाही असं वाटत असेल तर डॉक्टरांची मदत घ्या. कारण कधी-कधी ही आरोग्याच्या समस्येची, जसं की डिप्रेशनची लक्षणं असू शकतात. बऱ्‍याच लोकांना उपचार घेतल्यामुळे मदत झाली आहे.a

a सावध राहा!  हे नियतकालिक कोणत्याही विशिष्ट उपचार पद्धतीची शिफारस करत नाही.

बायबल खरी आशा देतं

बायबलच्या एका लेखकाने देवाला म्हटलं, की “तुझे शब्द माझ्या पायांसाठी दिव्यासारखे, आणि माझ्या मार्गासाठी प्रकाशासारखे आहेत!” (स्तोत्र ११९:१०५) बायबल दिव्यासारखं आणि प्रकाशासारखं कसं आहे यावर विचार करा:

आपण अंधारात चालत असतो, तेव्हा हातात दिवा असेल तर पुढचं पाऊल कुठे टाकायचं ते आपल्याला कळतं. त्याच प्रकारे बायबलमध्ये रोजच्या जीवनासाठी उपयोगी असलेले सल्ले दिले आहेत. महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतात तेव्हा हे सल्ले आपल्याला खूप मदत करू शकतात.

प्रकाशामुळे आपल्याला दूरपर्यंत पाहायला मदत होते. त्याचप्रमाणे, बायबल आपल्याला भविष्यात काय घडेल हे समजून घ्यायला मदत करतं.

बायबल एक पवित्र पुस्तक आहे. त्यात फक्‍त माणसाचा सुरवातीपासूनचा इतिहासच नाही, तर भविष्याबद्दल खरी आशासुद्धा दिली आहे. त्यात या प्रश्‍नांची उत्तरं मिळतात:

कशी?

दुःख आणि समस्यांची सुरवात कशी झाली? बायबल म्हणतं, की “एका माणसाद्वारे पाप जगात आलं आणि पापाद्वारे मरण आलं आणि अशा रितीने सर्व माणसांमध्ये मरण पसरलं, कारण त्या सगळ्यांनी पाप केलं होतं.”​—रोमकर ५:१२.

का?

माणूस आजपर्यंत जगातल्या समस्या का सोडवू शकला नाही? बायबल म्हणतं, की “मनुष्य आपला मार्ग ठरवू शकत नाही. त्याला तर आपली पावलंही नीट टाकता येत नाहीत.” (यिर्मया १०:२३) जगातल्या परिस्थितीवर एक नजर टाकली तर हे शब्द किती खरे आहेत ते आपल्याला समजतं.

काय?

देव लवकरच काय करेल? बायबल म्हणतं, की “तो त्यांच्या डोळ्यांतून प्रत्येक अश्रू पुसून टाकेल. यापुढे कोणीही मरणार नाही, कोणीही शोक करणार नाही किंवा रडणार नाही आणि कोणतंच दुःख राहणार नाही.”​—प्रकटीकरण २१:४.

“बायबलचा अभ्यास का करावा?” या व्हिडिओतलं एक दृश्‍य. पत्नी बायबलमध्ये वाचलेलं काहीतरी आपल्या पतीला दाखवत आहे.

आणखी जाणून घ्या. बायबलचा अभ्यास का करावा?  हा व्हिडिओ पाहा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा