वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g22 क्र. १ पृ. ७-९
  • २ | पैसा आणि मालकीच्या वस्तू जपा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २ | पैसा आणि मालकीच्या वस्तू जपा
  • सावध राहा!—२०२२
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • हे महत्त्वाचं का आहे?
  • तुम्हाला काय माहीत असलं पाहिजे?
  • तुम्ही आत्ता काय करू शकता?
  • पैसे जपून वापरा
    सावध राहा!—२०२५
  • घरखर्च चालवणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
  • पैशाचे नियोजन कसे कराल?
    तुमचे कुटुंब आनंदी राहू शकते
  • पैशाचं नियोजन
    सावध राहा!—२०१९
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—२०२२
g22 क्र. १ पृ. ७-९
सुतार लाकडात खिळा ठोकत आहे.

संकटांच्या विळख्यात जग

२ | पैसा आणि मालकीच्या वस्तू जपा

हे महत्त्वाचं का आहे?

काही लोकांना आपल्या रोजच्या गरजा भागवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. आणि जगातल्या समस्यांमुळे हे आणखी कठीण होऊ शकतं. का?

  • ज्या ठिकाणी खूप समस्या किंवा विपत्ती असतात त्या ठिकाणी सहसा महागाई खूप वाढते.

  • अशा वेळी बेरोजगारी वाढते किंवा कमी पगारात काम करावं लागतं.

  • विपत्तींमुळे उद्योग-धंद्यांवर वाईट परिणाम होतो. घरांचं आणि मालमत्तेचं मोठं नुकसान होतं आणि बऱ्‍याच लोकांवर गरिबी ओढवते.

तुम्हाला काय माहीत असलं पाहिजे?

  • तुम्ही पैसे जितके जपून वापराल तितकंच कठीण परिस्थितीचा सामना करायला तुम्हाला सोपं जाईल.

  • आर्थिक परिस्थिती आज चांगली आहे म्हणून उद्याही चांगलीच राहील असं नाही. तुमच्या मिळकतीचं, बँकेतल्या पैशांचं आणि मालमत्तेचं मूल्य अचानक घसरू शकतं.

  • आनंद आणि चांगली नाती यांसारख्या गोष्टी पैशाने विकत घेता येत नाहीत.

तुम्ही आत्ता काय करू शकता?

बायबल म्हणतं: “आपल्याजवळ खायला अन्‍न आणि घालायला कपडे असतील, तर आपण त्यांत समाधानी राहू या.”​—१ तीमथ्य ६:८.

समाधानी राहणं म्हणजे, सुखसोयींच्या  मागे धावण्याऐवजी आपल्या रोजच्या गरजा  भागतात तेव्हा त्यात खूश असणं. खासकरून आपल्याला जेव्हा कमी पैशात भागवावं लागतं तेव्हा हे खूप महत्त्वाचं आहे.

समाधानी राहण्यासाठी तुम्हाला कदाचित काटकसरीने राहायला शिकावं लागेल. ऐपतीपेक्षा जास्त खर्च केला तर तुमची आर्थिक परिस्थिती आणखीनच खराब होईल.

कसा कराल सामना?​—काही उपयोगी सल्ले

संकटं आणि समस्या येतात तेव्हा आपल्या गरजा भागवण्यासाठी तुम्ही या गोष्टी करू शकता

काटकसर करा

  • एक वयस्कर स्त्री घरीच लावलेली गाजरं तोडत आहे.

    काटकसरीने राहायचा प्रयत्न करा

    सारख्या-सारख्या नवीन वस्तू किंवा कपडे घ्यायचं टाळा. स्वतःला विचारा: ‘मला खरंच या वस्तूची गरज आहे का? मला घरच्याघरीच भाजीपाला पिकवता येईल का?’

  • कोणतीही गोष्ट खरेदी करण्याआधी स्वतःला विचारा: ‘मला खरंच याची गरज आहे का? हे मला परवडण्यासारखं आहे का?’

  • सरकारकडून किंवा समाजकार्य करणाऱ्‍या संस्थांकडून काही मदत उपलब्ध असेल तर ती मिळवायचा प्रयत्न करा.

“आम्ही कुटुंब मिळून विचार केला, की आपला नेमका कुठे आणि किती खर्च होतोय. मनोरंजनासाठी जास्त पैसे जाणार नाहीत याची आम्ही काळजी घेऊ लागलो. तसंच, खाण्यापिण्याचा खर्चही कसा कमी करता येईल याचा आम्ही विचार केला.”​—गिरीश.

महिन्याचं बजेट बनवा

एक स्त्री कॅल्क्युलेटर घेऊन महिन्याच्या खर्चाचा अंदाज घेत आहे.

महिन्याचं बजेट बनवा

बायबल म्हणतं: “मेहनत करणाऱ्‍यांच्या योजना नक्कीच यशस्वी होतात, पण जे उतावीळपणे वागतात त्यांच्यावर गरिबी आल्याशिवाय राहत नाही.” (नीतिवचनं २१:५) बजेट बनवल्यामुळे मिळकतीपेक्षा जास्त खर्च होणार नाही याची तुम्हाला खातरी करता येईल.

  • सर्वात आधी दर महिन्याला आपल्याला साधारण किती पैसे मिळतात ते लिहा.

  • त्यानंतर, दर महिन्याला काय-काय खर्च असतो त्याची यादी बनवा आणि अनावश्‍यक खर्च कुठे होतोय याकडे लक्ष द्या.

  • मग, आपल्या हातात किती पैसा येतो आणि खर्च किती होतो याची तुलना करा आणि कुठे काटछाट करता येईल ते ठरवा.

“दर महिन्याला आम्ही बजेट बनवतो. आम्ही अनपेक्षित खर्चांसाठी काही पैसे बाजूला ठेवतो. आणि थोडीफार बचतही करायचा प्रयत्न करतो. आम्ही कशासाठी किती खर्च करणार आहोत हे आधीच माहीत असल्यामुळे जास्त चिंता करावी लागत नाही.”​—केशव.

कर्ज टाळा / बचत करा

  • आई आपल्या मुलीला गल्ल्यात पैसे टाकायला सांगत आहे.

    कर्ज टाळा / बचत करा

    कर्ज लवकरात लवकर फेडण्यासाठी योजना करा. शक्यतो कर्ज घ्यावं लागणार नाही असा प्रयत्न करा. त्याऐवजी, आधी पैसे साठवून मग वस्तू विकत घ्या.

  • भविष्यातल्या अपेक्षित आणि अनपेक्षित खर्चांसाठी दर महिन्याला थोडे पैसे बाजूला काढून ठेवा.

मेहनत करा / नोकरी टिकवून ठेवा

बायबल म्हणतं: “मेहनत केल्याने नेहमीच फायदा होतो.”​—नीतिवचनं १४:२३.

  • सुतार लाकडात खिळा ठोकत आहे.

    मेहनत करा / नोकरी टिकवून ठेवायचा प्रयत्न करा

    तुमच्या कामाबद्दल योग्य दृष्टिकोन ठेवा. ते तुमच्या आवडीचं काम नसलं तरी त्यामुळे पैसे मिळतात हे विसरू नका.

  • मेहनतीने आणि इमानदारीने काम करा. त्यामुळे नोकरी टिकवून ठेवायला मदत होईल. आणि नोकरी जरी गेली तरी नवीन काम मिळवायला सोपं जाईल.

“मी मिळेल ते काम करतो, मग ते माझ्या आवडीचं काम नसलं किंवा पगार चांगला नसला तरी मी ते करतो. मी नेहमी चांगल्या दर्जाचं काम करायचा प्रयत्न करतो. आपलंच काम आहे असं समजून मी ते मन लावून करतो.”​—दिनेश.

तुम्ही काम शोधत असाल तर . . .

  • कोणी काम देतंय का याची वाट पाहत बसू नका. तुमच्या फिल्डमधलं काम देऊ शकतील अशा कंपन्यांनी जरी जाहिरात दिलेली नसली तरी त्यांच्याशी स्वतःहून संपर्क करा. तुम्ही काम शोधताय हे ओळखीच्या लोकांना सांगून ठेवा.

  • तडजोड करायला तयार असा. नोकरी शोधताना सगळंच तुमच्या अपेक्षेप्रमाणे असेल असं समजू नका.

आईवडील खर्चाचा हिशोब लावत आहेत आणि चित्रात मागे मुलं खेळत आहेत.

आणखी जाणून घ्या. “कम पैसों में कैसे करें गुज़ारा?” हा लेख पाहा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा