वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • hf भाग ४ भाग १-२
  • पैशाचे नियोजन कसे कराल?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • पैशाचे नियोजन कसे कराल?
  • तुमचे कुटुंब आनंदी राहू शकते
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • १ काळजीपूर्वक नियोजन करा
  • २ प्रामाणिक असा व परिस्थितीची जाणीव राखा
  • घरखर्च चालवणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
  • पैशाबद्दल योग्य दृष्टिकोन बाळगा
    सावध राहा!—२०१५
  • पैसा सगळ्या वाईट गोष्टींचं मूळ आहे का?
    बायबलमधून प्रश्‍नांची उत्तरं
  • पैशांविषयी सुज्ञ दृष्टिकोन कोणता?
    सावध राहा!—२००७
अधिक माहिती पाहा
तुमचे कुटुंब आनंदी राहू शकते
hf भाग ४ भाग १-२
एक जोडपे, पैशाचे नियोजन कसे करावे याचा काळजीपूर्वक विचार करत आहे

भाग ४

पैशाचे नियोजन कसे कराल?

“प्रत्येक बेत मसलतीने सिद्धीस जातो.”—नीतिसूत्रे २०:१८

कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी सर्वांनाच पैशांची गरज भासते. (नीतिसूत्रे ३०:८) कारण, पैसा “आश्रय देणारा आहे.” (उपदेशक ७:१२) पती-पत्नी या नात्याने पैशाबद्दल बोलणे कदाचित कठीण वाटू शकते. पण, पैशामुळे वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होऊ देऊ नका. (इफिसकर ४:३२) पती-पत्नीने एकमेकांवर भरवसा ठेवला पाहिजे आणि पैसे कसे खर्च करावेत हे दोघांनी मिळून ठरवले पाहिजे.

१ काळजीपूर्वक नियोजन करा

बायबल काय म्हणते: “तुमच्यामध्ये असा कोण आहे की त्याला बुरूज बांधावयाची इच्छा असता तो अगोदर बसून व खर्चाचा अंदाज करून आपल्याजवळ तो पुरा करण्याइतकी ऐपत आहे की नाही हे पाहत नाही?” (लूक १४:२८) तुम्ही तुमच्या पैशांचा उपयोग कसा कराल हे एकत्र मिळून ठरवणे खूप महत्त्वाचे आहे. (आमोस ३:३) तुम्हाला कशाची गरज आहे आणि तुम्ही किती पैसे खर्च करू शकता हे ठरवा. (नीतिसूत्रे ३१:१६) एखादी गोष्ट विकत घेण्याची ऐपत असली म्हणजे ती घ्यावीच असे नाही. कर्जबाजारी होण्याचे टाळा. बायबल म्हणते: “उसने घेणारा उसने देणाऱ्‍यांचा सेवक आहे.” (नीतिसूत्रे २२:७, पं.र.भा.) तेव्हा, अंथरूण पाहून पाय पसरा.—नीतिसूत्रे १५:२२.

तुम्ही काय करू शकता:

  • महिन्याच्या अखेरीस तुमच्याकडे पैसे उरले असतील तर त्याचे काय करावे हे एकत्र मिळून ठरवा

  • पैसे अपुरे पडल्यास खर्च कुठे कमी करता येईल हे ठरवा. उदाहरणार्थ, हॉटेलमध्ये जाण्याऐवजी तुम्ही घरीच स्वयंपाक करू शकता

एक जोडपे मोठ्या खर्चाचा विचार करत आहे

२ प्रामाणिक असा व परिस्थितीची जाणीव राखा

बायबल काय म्हणते: “आम्ही प्रामाणिक आहोत हे देवाला माहीत आहे, पण ते प्रत्येकाला माहीत व्हावे.” (२ करिंथकर ८:२१, सुबोधभाषांतर) तुम्ही किती कमवता आणि किती खर्च करता ते प्रामाणिकपणे आपल्या सोबत्याला सांगा.

पैशांबद्दल महत्त्वाचे निर्णय घेताना नेहमी आपल्या सोबत्याशी चर्चा करा. (नीतिसूत्रे १३:१०) यामुळे तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनात शांती राखण्यास मदत मिळेल. कमवलेला पैसा केवळ तुमचा नसून तुमच्या कुटुंबाचाही आहे असा विचार करा.—१ तीमथ्य ५:८.

एक जोडपे, यादीनुसार खरेदी करत आहे

तुम्ही काय करू शकता:

  • जेथे सोबत्याला विचारण्याची गरज नाही असे छोटेमोठे खर्च करण्यासाठी प्रत्येकी किती रक्कम बाजूला ठेवावी हे ठरवा

  • पैशाबद्दल बोलण्यासाठी एखादी समस्या निर्माण होईपर्यंत थांबू नका

पैशाबद्दल तुमचा दृष्टिकोन

जगण्यासाठी पैशाची गरज असली, तरी त्यामुळे तुमचे वैवाहिक जीवन विस्कळीत होऊ देऊ नका किंवा तुमच्यात अनावश्‍यक चिंता निर्माण होऊ देऊ नका. (मत्तय ६:२५-३४) आनंदी जीवन जगण्यासाठी खूप जास्त पैशांची गरज नाही. बायबल म्हणते: “सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा.” (लूक १२:१५) पैशाने तुम्ही बऱ्‍याच मौल्यवान गोष्टी विकत घेऊ शकत असला, तरी तुमच्या वैवाहिक जीवनासमोर त्यांना काहीच मोल नाही. तेव्हा, आहे त्यात समाधानी राहा आणि देवासोबतच्या तुमच्या नातेसंबंधाकडे केव्हाही दुर्लक्ष करू नका. या गोष्टी लक्षात ठेवल्यास, तुमचे कुटुंब एक आनंदी जीवन जगू शकेल आणि तुम्हाला यहोवा देवाची स्वीकृती मिळेल.—इब्री लोकांस १३:५.

स्वतःला विचारा . . .

  • कर्जबाजारी होऊ नये म्हणून कुटुंब या नात्यानं आम्ही काय करू शकतो?

  • पैशांबद्दल मी माझ्या सोबत्याशी प्रामाणिकपणे व नियमितपणे बोलतो का?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा