वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g22 क्र. १ पृ. ४-६
  • १ | आरोग्य जपा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १ | आरोग्य जपा
  • सावध राहा!—२०२२
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • हे महत्त्वाचं का आहे?
  • तुम्हाला काय माहीत असलं पाहिजे?
  • तुम्ही आत्ता काय करू शकता?
  • सुदृढ राहण्यासाठी. . .
    सावध राहा!—२०१५
  • अचानक आजारी पडल्यावर काय करायचं?
    आणखी विषय
  • प्रकृती कशी सांभाळावी
    सावध राहा!—१९९९
  • आपल्या विश्‍वास व आध्यात्मिक आरोग्य राखून ठेवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—२०२२
g22 क्र. १ पृ. ४-६
टेबलवर वेगवेगळ्या प्रकारचे पौष्टिक खाद्यपदार्थ ठेवलेले आहेत.

संकटांच्या विळख्यात जग

१ | आरोग्य जपा

हे महत्त्वाचं का आहे?

जेव्हा एखादं संकट किंवा विपत्ती येते तेव्हा लोकांच्या आरोग्यावर तिचा वेगवेगळ्या मार्गांनी परिणाम होत असतो.

  • कठीण परिस्थिती येते तेव्हा तणाव वाढतो आणि तो जास्त काळ राहिला की आपण आजारी पडण्याची शक्यता जास्त असते.

  • नैसर्गिक विपत्ती किंवा महामारीसारखी संकटं येतात तेव्हा खूप लोक आजारी पडतात. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर भार वाढतो आणि औषधोपचार मिळणं कठीण होऊन जातं.

  • विपत्तीचा लोकांच्या आर्थिक परिस्थितीवर परिणाम होतो. आणि यामुळे पौष्टिक अन्‍न आणि औषधांसारख्या आवश्‍यक गोष्टीसुद्धा मिळवणं त्यांना कठीण होतं.

तुम्हाला काय माहीत असलं पाहिजे?

  • गंभीर आजार आणि मानसिक तणावामुळे आपण सहसा चुकीचे निर्णय घेतो. त्यामुळे आरोग्यासाठी फायदेकारक असणाऱ्‍या गोष्टींकडे आपलं दुर्लक्ष होतं आणि आपली तब्येत आणखीनच बिघडते.

  • आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्या आणखी वाढू शकतात आणि त्यामुळे आपल्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो.

  • तुमचं आरोग्य जितकं चांगलं असेल तितकं संकटांदरम्यान चांगले निर्णय घेणं तुम्हाला शक्य होईल.

  • तुमची आर्थिक परिस्थिती कशीही असली, तरी आरोग्य जपण्यासाठी तुम्ही योग्य ती पावलं उचलू शकता.

तुम्ही आत्ता काय करू शकता?

जेव्हाही शक्य असतं तेव्हा सूज्ञ माणूस पुढे येणारे धोके ओळखून त्यांना टाळण्यासाठी योग्य ती पावलं उचलतो. हीच गोष्ट आरोग्याच्या बाबतीतही खरी आहे. चांगली स्वच्छता राखल्यामुळे तुम्ही बरेच आजार आणि त्यांचे गंभीर परिणाम टाळू शकता. उपचारांपेक्षा प्रतिबंध कधीही चांगला!

“स्वतःची आणि आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता राखल्यामुळे आपण डॉक्टर आणि औषध-पाण्याचा बराच खर्च वाचवू शकतो.”​—अमेयa

a काही नावं बदलण्यात आली आहेत.

कसा कराल सामना?​—काही उपयोगी सल्ले

संकटाच्या काळात ही व्यावहारिक पावलं उचलून तुमचं आरोग्य जपा

स्वच्छता राखा

एक माणूस घराबाहेर साबणाने आपले हात धूत आहे.

स्वच्छता राखा

बायबल म्हणतं: “शहाणा धोका पाहून लपतो.” (नीतिवचनं २२:३) तुमच्या आरोग्याला हानिकारक असणाऱ्‍या गोष्टी आधीच ओळखून त्या टाळायचा प्रयत्न करा.

  • साबण आणि पाण्याने आपले हात वारंवार धुवा; खासकरून अन्‍नपदार्थांना हात लावण्याआधी आणि शौचालयाचा वापर केल्यानंतर.

  • जंतूनाशक वापरून घर नेहमी स्वच्छ ठेवा; खासकरून अशा गोष्टी जिथे वारंवार हात लागतो.

  • संसर्गजन्य रोग असलेल्या लोकांच्या जवळ जायचं शक्यतो टाळा.

पौष्टिक आहार घ्या

टेबलवर वेगवेगळ्या प्रकारचे पौष्टिक खाद्यपदार्थ ठेवलेले आहेत.

पौष्टिक आहार घ्या

बायबल म्हणतं: “कोणताही माणूस स्वतःच्या शरीराचा द्वेष करत नाही. उलट, तो त्याचं पालनपोषण करतो.” (इफिसकर ५:२९) खाण्यापिण्याच्या बाबतीत सावध राहून आपल्याला आपल्या शरीराची काळजी असल्याचं दिसून येतं.

  • भरपूर पाणी प्या.

  • वेगवेगळी फळं आणि भाज्या खा.

  • तेलकट पदार्थ, मीठ आणि साखरेचा कमी वापर करा.

  • तंबाखू आणि ड्रग्जसारखे मादक पदार्थ घेऊ नका. तसंच, मद्याचा मर्यादित वापर करा.

“आजारी पडू नये म्हणून आम्ही पौष्टिक आहार घेतो. नाहीतर आम्हाला बराच पैसा औषधपाण्यालाच घालवावा लागेल. त्यापेक्षा चांगल्या आहारावर खर्च करणं आम्हाला योग्य वाटतं.”​—केशव.

व्यायाम करा आणि पुरेशी विश्रांती घ्या

एक माणूस शेताजवळच्या रस्त्यावरून धावत आहे.

व्यायाम करा

बायबल म्हणतं: “वाऱ्‍यामागे धावण्यापेक्षा आणि कष्टाने भरलेल्या दोन मुठींपेक्षा, विश्रांतीची एक मूठ चांगली.” (उपदेशक ४:६) कामासोबत आपण विश्रांतीही घेतली पाहिजे.

  • थोडाफार व्यायाम करत राहा. सुरवातीला तुम्ही नियमितपणे चालायला जाऊ शकता. तुम्ही वयस्कर असला किंवा तुम्हाला एखादी व्याधी किंवा आजारपण जरी असलं, तरी थोडाफार व्यायाम केल्यामुळे तुमचं आरोग्य नक्कीच चांगलं राहील.

  • एक तरुणी झोप घेत आहे.

    पुरेशी विश्रांती घ्या

    चांगली विश्रांती घ्या. चांगली झोप घेतली नाही तर तणाव वाढतो आणि कामातही लक्ष लागत नाही. शिवाय पुढे जाऊन आरोग्याच्या गंभीर समस्याही निर्माण होऊ शकतात.

  • पुरेशी झोप मिळावी म्हणून झोपण्याची आणि उठण्याची एक निश्‍चित वेळ ठरवा आणि ती वेळ पाळा.

  • झोपताना टिव्ही किंवा मोबाईल बघायचं टाळा.

  • रात्रीचा हलका आहार घ्या. झोपण्याआधी चहा-कॉफी सारखी पेयं किंवा मद्य घेऊ नका.

“पुरेशी झोप घेतली नाही तर आरोग्यावर कसा परिणाम होतो ते मी पाहिलंय. व्यवस्थित झोप झाली नाही तर कधीकधी माझं डोकं दुखतं आणि अंग जड होतं. पण तेच जेव्हा माझी झोप पूर्ण होते तेव्हा मला दिवसभर एकदम फ्रेश वाटतं. काम करायला उत्साह येतो आणि मी क्वचितच आजारी पडतो.”​—जयेश.

“वायरसचा फैलाव—कसा कराल बचाव?” या व्हिडिओतलं एक दृश्‍य. एक स्त्री दार उघडते आणि दारावर एक विषाणू उभा आहे.

आणखी जाणून घ्या. वायरसचा फैलाव​—कसा कराल बचाव? हा व्हिडिओ पाहा. तसंच “सुदृढ राहण्यासाठी . . .” हा लेखसुद्धा वाचा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा