वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g99 ४/८ पृ. १०-१२
  • विमाने किती सुरक्षित आहेत?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • विमाने किती सुरक्षित आहेत?
  • सावध राहा!—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • वैमानिक कक्षेत सुरक्षा
  • तुम्ही काय करू शकता?
  • विमान प्रवासाची भीती?
  • विमान कसे तयार झाले?
    सावध राहा!—१९९९
  • विमाने सुस्थितीत कशी राहू शकतात?
    सावध राहा!—१९९९
  • ८०१ उड्डाण—अपघातातून मी वाचलो
    सावध राहा!—१९९८
  • उड्डाणाचे स्वप्न
    सावध राहा!—१९९९
सावध राहा!—१९९९
g99 ४/८ पृ. १०-१२

विमाने किती सुरक्षित आहेत?

एका वर्षात, सुमारे पाच लाख लोक रस्त्यांवर मरतात. त्याउलट, विमान अपघातांमध्ये १९९६ साली मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या १,९४५ इतकी होती. १९९७ साली ही संख्या १,२२६ वर घसरली. बोईंग उत्पादकाकडे असलेल्या आकडेवारीनुसार, “व्यापारी जेट विमानांचा प्रत्येक दहा लाख उड्डाणांमध्ये २ पेक्षा कमी वेळा अपघात होतो.”

तरीही, प्रत्येक विमानाच्या अपघाताच्या बातमीला सर्वात जास्त प्रसिद्धी मिळते पण रस्त्यांवर दररोज होणाऱ्‍या कत्तलीचे लोकांना काहीच वाटत नाही. अमेरिकेत, बसचा प्रवास हा विमान प्रवासापेक्षा थोडा सुरक्षित मानला जातो.

सहसा विमान कारपेक्षा सुरक्षित का असते? त्याचे एक स्पष्ट कारण म्हणजे, रस्त्यावरील वाहनांप्रमाणे विमाने एकमेकांच्या फारच जवळून उडत नसतात. दुसरे कारण म्हणजे, बहुतांश विमानातील कर्मचारी उत्तमरित्या प्रशिक्षित असून आपल्या जबाबदाऱ्‍या पार पाडण्यात ते एकदम वाकबगार असतात. बोईंग ७४७ चा कप्तान सहसा पन्‍नाशीतला असतो आणि त्याला उड्डाण करण्यात सुमारे ३० वर्षांचा अनुभव असतो. सर्व कर्मचारी सुरक्षिततेला सर्वात जास्त महत्त्व देतात. शेवटी, त्यांचाही जीव धोक्यात असतो.

वैमानिक कक्षेत सुरक्षा

तुम्ही प्रवासी विमानाच्या वैमानिक कक्षेत डोकावून पाहिले, तर सर्व प्राथमिक साधने आणि नियंत्रकांचे दोन संच असतात हे तुमच्या लक्षात येईल—डाव्या बाजूला कप्तानासाठी आणि उजव्या बाजूला सह-वैमानिकासाठी.a म्हणून, हवाई प्रवासी मार्गदर्शक पुस्तिका (इंग्रजी) यात दिल्यानुसार, “शक्यता नसतानाही, एखादा वैमानिक अयशस्वी झालाच तर दुसऱ्‍याकडे सुरक्षित उड्डाण करण्याचे सर्व नियंत्रक असतात. उड्डाणाच्या वेळी, प्रत्येक वैमानिक दुसऱ्‍या साधनांवर लक्ष ठेवून दोन्हीकडे सारख्याच सूचना येत आहेत का हे पाहू शकतो.”

वैमानिक कक्षेत आणखी एक सुरक्षा म्हणजे, खबरदारी घेण्यासाठी कप्तान आणि सह-वैमानिकाचे जवण वेगवेगळे असते. ते का? त्याचे असे आहे की, अन्‍नातून विषबाधा झालीच—याचीही शक्यता नसते—तर फक्‍त एका व्यक्‍तीवरच त्याचा परिणाम होईल.

हलणारे भाग जसे की, उच्चालक, अवतरण यंत्रणा आणि ब्रेक यांच्या नियंत्रणाची खात्री मिळावी म्हणून “विमानांमध्ये सहसा तातडीच्या वेळासाठी दोन किंवा त्याहून अधिक हायड्रॉलिक व्यवस्था असतात.” बहुतेक आधुनिक विमानांमध्ये, दोन-दोन किंवा तीन-तीन यंत्रणा असणे हा साधारण सुरक्षा उपाय आहे.

तुम्ही काय करू शकता?

येथे काही सोपे उपाय दिले आहेत ज्यांची खबरदारी सर्व प्रवासी घेऊ शकतात: तातडीच्या प्रसंगाचे सूचना पत्र वाचा आणि प्रत्येक उड्डाणाच्या सुरवातीला विमान सेवक ज्या सुरक्षा पद्धतींविषयी समजावून सांगतात त्या नीट लक्षपूर्वक ऐका. आपल्या जागी बसल्यावर, सर्वात जवळचा बाहेर निघण्याचा दरवाजा कोठे आहे हे पाहून घ्या. तातडीच्या वेळी, विमान सेवकाच्या सूचनांचे पालन करा. अडचण आलीच तर ती हाताळण्यासाठी ते उत्तमरित्या प्रशिक्षित केलेले असतात. सूचना दिल्या जातात तेव्हा, प्रवाशांनी वेळ न दवडता कार्य करावे आणि आपल्या वस्तू गोळा करत बसण्याची चिंता करू नये हे महत्त्वाचे आहे. वस्तूंपेक्षा जीवन जास्त महत्त्वाचे आहे.

आधुनिक विमाने हवामानाच्या वरून किंवा आसपास उडतात, म्हणून दीर्घ पल्ल्याची बहुतेक उड्डाणे सुरळीत पार पडतात. त्यामुळे, मोजक्याच लोकांना विमानाने प्रवास करण्याचा त्रास होतो. काही गडबड निर्माण होण्याची अपेक्षा असल्यास, सुरक्षा उपाय म्हणून बहुधा कप्तान प्रवाशांना सीट बेल्ट लावून घेण्याची सूचना देतो.

विमानाचा प्रवास अधिक सुरक्षित असू शकतो का? त्याचे उत्तर होय असे आहे. पण पुष्कळशा प्रवाशांना आवश्‍यक बदल करायला आवडणार नाही. तो काय असेल? प्रवाशांना पुढे तोंड करून बसण्याऐवजी मागे तोंड करून बसायला सांगणे! यात फायदा काय आहे? विमान अचानक खाली सूर मारते तेव्हा पोटावरून फक्‍त सीट बेल्ट असण्याऐवजी सीटचा संपूर्ण मागचा भाग आधाराला असेल; कारचे सीट बेल्ट तिरपे असतात म्हणून त्यांच्या तुलनेत विमानाचे सीट बेल्ट अर्धवट सुरक्षा देतात. परंतु, लोकांना मागचे पाहण्याऐवजी पुढचे पाहण्याची जास्त उत्सुकता असते!

विमान प्रवासाची भीती?

असा अंदाज केला जातो की, अमेरिकेतल्या प्रौढ लोकसंख्येत ६ पैकी एका व्यक्‍तीला विमान प्रवासाची भीती वाटते. काहींना फक्‍त भीती नाही तर भयगंड आहे—हा अवास्तव भीतीचा प्रकार आहे ज्यामुळे असंयमित प्रतिक्रिया दाखवल्याने गोंधळ उडू शकतो. त्यावर काय उपाय?

प्रवास करण्याआधी माहिती करून घेतल्याने बऱ्‍याच प्रमाणात भीती नाहीशी होऊ शकते. दरवर्षी, जगभरात जवळजवळ १०,००० विमानतळांना सेवा देणारे सुमारे १५,००० विमाने १२० कोटींहून अधिक लोकांना तुलनात्मकपणे कमी अपघात किंवा धोक्याच्या घटना न घडता पोहंचवतात. “लंडनच्या लॉईड्‌स [विमा कंपनीच्या] मते, कारने प्रवास करण्यापेक्षा विमानाने प्रवास करणे २५ पटीने सुरक्षित आहे.”

तुम्हाला हवेतून प्रवास करण्याची भीती वाटत असल्यास, उड्डाण, विमाने आणि वैमानिकांचे प्रशिक्षण यांवरची पुस्तके वाचा. वैमानिकांना केवढ्या उच्च दर्जाचे प्रशिक्षण घ्यावे लागते त्याविषयी आणि उड्डाणाआधी किती झोप घ्यावी, किती मर्यादित मद्य घ्यावे आणि अचानक मादक औषधांसाठी केलेली तपासणी यासंबंधीच्या नियमांविषयी वाचा. शिवाय वैमानिकांना दर सहा महिन्यातून एकदा उड्डाण सादृशित्राची परीक्षा द्यावी लागते; तातडीच्या वेळी त्यांची प्रतिक्रिया कशी असते हे तपासण्यासाठी ही परीक्षा घेतली जाते. ही सादृशित्रे इतकी खरी वाटतात की काही वैमानिक सादृशित्रातून बाहेर येतात तेव्हा “थरथरत आणि घामेघूम झालेले” असतात. वैमानिक सादृशित्राच्या परीक्षेत नापास झाला तर व्यापारी विमान उडवण्याचा त्याचा परवाना रद्द होऊ शकतो.

हे दर्जे वाहन चालकांसाठी असलेल्या दर्जांपेक्षा फारच उच्च आहेत. म्हणून, विमान आणि वैमानिकांविषयी तुम्ही जितके अधिक शिकून घ्याल तितकाच तुमचा आत्मविश्‍वास वाढू शकेल.

तसेच विमानतळाला भेट दिल्यानेही मदत मिळू शकते. प्रवाशांसाठी काय पद्धत आहे आणि प्रवासी कशी प्रतिक्रिया दाखवतात त्याचे निरीक्षण करा. तुम्हाला दिसेल की बहुतेक लोक जणू बसमधून उतरत असल्यासारखे विमानातून उतरतात. त्यांच्यासाठी हवाई प्रवास अत्यंत सर्वसामान्य आहे. विमाने आकाशात कशी झेपावतात आणि खाली कशी उतरतात ते पाहा. उड्डाण ज्यामुळे शक्य होते आणि सुरक्षित पार पडते त्या वायुगतिशास्त्राची वैज्ञानिक तत्त्वे समजून त्यांची प्रसंशा करा.

पहिल्यांदाच उड्डाण करत असताना, तुम्ही विमानातून पहिल्यांदाच प्रवास करत असल्यामुळे कदाचित जरा घाबराल हे विमान सेवकाला आधीच सांगा. या वाकबगार विमान सेवकांना, तुम्ही घाबरू नये म्हणून मदत कशी करावी हे ठाऊक असते आणि त्यांना यंत्रणेवर संपूर्ण भरवसा असतो. शांत राहण्याचा प्रयत्न करा. विमानात चालू शकता असे कप्तानाकडून सूचना मिळाल्यास उठून जरा फिरून पाहा. तुमची विमानातून प्रवास करण्याची भीती कदाचित नाहीशी होत असेल!

[तळटीपा]

a बऱ्‍याच वेळा, विमान पार्क केलेले असताना कप्तान तुम्हाला वैमानिकाच्या कक्षेत डोकावून पाहायला अनुमती देईल. तो तुमच्या प्रश्‍नांचे उत्तरही देईल.

[११ पानांवरील संक्षिप्त आशय]

“लंडनच्या लॉईड्‌स [विमा कंपनीच्या] मते, कारने प्रवास करण्यापेक्षा विमानाने प्रवास करणे २५ पटीने सुरक्षित आहे”

[१२ पानांवरील चित्र]

शांत राहायला शिकल्याने विमानातील प्रवास सुखावह वाटू शकतो

[१० पानांवरील चित्राचे श्रेय]

Photograph courtesy of Boeing Aircraft Company

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा