वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g99 ४/८ पृ. १३
  • वादळानंतर, ख्रिस्तीत्वाचा प्रत्यय

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • वादळानंतर, ख्रिस्तीत्वाचा प्रत्यय
  • सावध राहा!—१९९९
  • मिळती जुळती माहिती
  • मदत करण्याच्या प्रवृत्तीमुळे आशीर्वाद मिळतात
    आमची राज्य सेवा—२००६
  • ‘आपण सर्वांचे बरे करावे’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • म्यानमारच्या चक्रीवादळाचा फटका बसलेल्यांना मदत मिळते
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • देवाच्या स्तुतीसाठी पवित्र शास्त्र साहित्याचे उत्पादन
    यहोवाचे साक्षीदार जगभरात देवाची इच्छा ऐक्याने आचरीत आहेत
सावध राहा!—१९९९
g99 ४/८ पृ. १३

वादळानंतर, ख्रिस्तीत्वाचा प्रत्यय

मोझांबिकमधील “सावध राहा!” नियतकालिकाच्या बातमीदाराकडून

मार्च २, १९९८ च्या संध्याकाळी, मोझांबिकमधील मापुटो शहराला वादळाचा जबरदस्त तडाखा बसला. दुसऱ्‍या दिवशी सकाळी पाहिले, तर वादळामुळे पुष्कळ नुकसान झाले होते. किनाऱ्‍यावर झाडे पडली होती, पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे रस्त्यांची नासधूस झाली होती, काही घरांची छपरे उडाली होती आणि इतर घरे कोसळली होती.

यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा दप्तराच्या इमारती मात्र शाबूत राहिल्या. पण शेजारचे लाकडी फ्रेमचे आणि पन्हळी पत्र्यांचे छप्पर असलेले घर तग धरून राहू शकले नाही. जोरदार वाऱ्‍यांपुढे टिकाव धरण्याइतके ते घर मजबूत नव्हते आणि ते कोसळले होते. पण आनंदाची गोष्ट म्हणजे, त्या घरातली सर्व मंडळी, एक स्त्री आणि तिची पाच मुले बचावली होती आणि त्यांना काहीच दुखापत झालेली नव्हती. पण त्यांच्या मालमत्तेचे पूर्णतः नुकसान झाले होते.

पहाटे, वॉचटावर संस्थेच्या शाखा दप्तरातले स्वयंसेवक त्या कुटुंबाला भेटायला गेले तेव्हा कुटुंबातले लोक कोसळलेल्या ढिगाऱ्‍यातून जेमतेम वस्तू गोळा करत असल्याचे दृश्‍य त्यांनी पाहिले. भौतिक नुकसान झाल्यामुळे त्यांना जास्तच दुःख झाले होते कारण घर पुन्हा बांधायला त्यांच्याकडे पुरेसा पैसा नव्हता. वडील नसल्यामुळे, त्यांना तिथल्या बाजारात अन्‍न पदार्थ विकून मिळत असलेला पैसा मोजकाच होता.

परिस्थितीचे परीक्षण केल्यावर, यहोवाचे साक्षीदार त्यांना मदत करायला पुढे आले. कोसळलेल्या घरातून उरलेले साहित्य पुन्हा वापरता येण्यासारखे नव्हते हे ठरवण्यात आले. म्हणून स्वयंसेवकांच्या एका गटाने आवश्‍यक असलेले सर्व साहित्य गोळा करून छोटेसे पण मजबूत घर बांधायला सुरवात केली.

सुरवातीला शेजारी उत्सुकतेने पाहत होते पण कामाचा वेग वाढू लागला तेव्हा त्यांना आश्‍चर्य वाटले. पाच दिवसांच्या आत घर बांधून राहण्यालायक झाले. नव्या घरात पाऊल टाकल्यावर, त्या स्त्रीच्या तोंडून शब्दच फुटेनात. परंतु, काही बोलून दाखवायची गरजही नव्हती कारण त्या स्त्रीच्या आणि तिच्या मुलांच्या हसऱ्‍या चेहऱ्‍यांतून आणि कृतज्ञतेने भरलेल्या डोळ्यांतून त्यांचा आनंद स्वयंसेवकांना दिसत होता.

स्वयंसेवक देखील फार खुश होते. खऱ्‍या ख्रिस्तीत्वाचा आत्मा व्यावहारिकपणे प्रदर्शित करण्याची संधी मिळाल्याचा त्यांना आनंद झाला होता.—गलतीकर ६:१०.

[१३ पानांवरील चित्र]

मार्च ५

मार्च ६

मार्च ७

तेथे राहणाऱ्‍या साक्षीदारांनी या कुटुंबाचे घर बांधून दिले

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा