वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g99 ४/८ पृ. ६-९
  • विमान कसे तयार झाले?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • विमान कसे तयार झाले?
  • सावध राहा!—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • उड्डाण यंत्रांसाठी व्यापारी भविष्य नाही?
  • सबंध जगावर प्रभाव
  • प्रगतीची किंमत
  • वैमानिक कलेचे आद्य प्रवर्तक
    सावध राहा!—१९९९
  • उड्डाणाचे स्वप्न
    सावध राहा!—१९९९
  • विमाने किती सुरक्षित आहेत?
    सावध राहा!—१९९९
  • विमाने सुस्थितीत कशी राहू शकतात?
    सावध राहा!—१९९९
सावध राहा!—१९९९
g99 ४/८ पृ. ६-९

विमान कसे तयार झाले?

सरतेशेवटी, हवेपेक्षा जड उड्डाण यंत्रे तयार करण्यात रचनाकारांना यश कसे मिळाले? त्यांनी उड्डाणाचे खरे उस्ताद—पक्षी—यांच्याकडे लक्ष वळवले. सन १८८९ मध्ये, जर्मन अभियंता, ऑटो लिलियनथाल याने करकोच्यांच्या उड्डाण पद्धतींनी प्रेरित होऊन “पक्ष्यांचे उड्डाण हा विमानचालनाचा आधार” (इंग्रजी) हे पुस्तक प्रकाशित केले. दोन वर्षांनी त्याने एक साधेसुधे ग्लायडर बनवले. सन १८९६ मध्ये, ग्लायडरमधून सुमारे २,००० वेळा उड्डाण केल्यावर मोनोप्लेनचा सराव करत असताना लिलियनथाल ठार मारला गेला. ऑक्टेव शनूट या फ्रान्समध्ये जन्मलेल्या अमेरिकन अभियंत्याने लिलियनथालच्याच डिझाईनमध्ये आणखी भर घालून दोन पंखांचे ग्लायडर तयार केले; हवेपेक्षा जड उड्डाण यंत्रांच्या रचनेत ही महत्त्वाची प्रगती ठरली.

यावेळी राईट बांधवांनी प्रवेश केला. डेटन, ओहायो, अमेरिका येथे सायकलचे दुकान चालवणारे ऑर्विल आणि विल्बर राईट, लिलियनथाल आणि शनूट यांच्या रचनांमध्ये आणखी सुधार करून १९०० साली प्रथमच ग्लायडिंगचे प्रयोग करू लागले. राईट बंधू हळूहळू आणि पद्धतशीरपणे पुढच्या तीन वर्षांपर्यंत कार्य करत राहिले; किटी हॉक, उत्तर कॅरोलिनामध्ये त्यांनी वारंवार उड्डाणाचे प्रयोग करून पाहिले. वातविवरांच्या साहाय्याने त्यांनी नवीन रचना केल्या; सर्वात पहिली रचना त्यांनी स्वतःसाठीच लाँड्रीच्या स्टार्च बॉक्समधून तयार केली होती. इंजिन बसवलेल्या पहिल्या विमानासाठी त्यांनी स्वतःच चार सिलेंडरचे, १२ अश्‍वशक्‍ती असलेले इंजिन तयार करून नवीन विमानाच्या खालच्या पंखावर बसवले. या इंजिनमुळे विमानाच्या मागच्या सुकाणूच्या दोन्ही बाजूला बसवलेल्या दोन परिचालकांना शक्‍ती मिळत होती.

डिसेंबर १४, १९०३ साली, राईट बंधूंनी तयार केलेले नवीन विमान पहिल्या वेळी लाकडी ट्रॅकवरून आकाशात झेपावले—आणि साडे तीन सेकंद हवेत तरंगत राहिले! तीन दिवसांनी राईट बंधूंनी पुन्हा एकदा विमान उडवले. शेवटी, ते संपूर्ण एक मिनिट हवेत तरंगत राहिले आणि त्याने २६० मीटर अंतर पार केले. ते विमान यशस्वी ठरले.a

आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे, हा महत्त्वाचा शोध लागला तेव्हा जगाने त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. जानेवारी १९०६ साली, सरतेशेवटी द न्यूयॉर्क टाईम्समध्ये राईट बंधूंबद्दल लेख छापला गेला तेव्हा त्यात म्हटले होते की, त्यांनी अत्यंत गुप्ततेत “उड्डाण यंत्र” तयार केले होते आणि त्यांना १९०३ साली “हवेत उड्डाण करण्यात फारसे यश हाती आले नाही.” वास्तविक पाहता, ते ऐतिहासिक उड्डाण करण्यात आले त्याच रात्री ऑर्विलने आपल्या वडिलांना एक तार केली ज्यात वृत्तपत्रांना याविषयी कळवावे असे म्हटले होते. परंतु, त्यावेळी अमेरिकत फक्‍त तीन वृत्तपत्रांनी ही गोष्ट छापण्याविषयी रस दाखवला.

उड्डाण यंत्रांसाठी व्यापारी भविष्य नाही?

विमानचालनाची नुकतीच सुरवात झाली होती तेव्हा सबंध जगाने त्याबद्दल संशय व्यक्‍त केला. विमानचालनातील प्रसिद्ध अग्रेसर शनूट याने देखील १९१० मध्ये असे भाकीत केले: “कार्यक्षम तज्ज्ञांच्या मते, उड्डाण यंत्राचा व्यापारासाठी उपयोग करण्याची अपेक्षा अर्थहीन आहे. त्याची वाहून नेण्याची क्षमता मर्यादित असल्यामुळे प्रवासी किंवा माल वाहून नेण्यावर प्रतिबंध असेल.”

परंतु, राईट बांधवांच्या पहिल्या उड्डाणांनंतरच्या वर्षांमध्ये, विमानचालन तंत्रज्ञानात झपाट्याने प्रगती झाली. पाच वर्षांच्या आत, राईट बंधूंनी दोन व्यक्‍तींचा एक विमान बनवला जो ताशी ७१ किलोमीटर वेगाने उडू शकत होता आणि ४३ मीटर उंची गाठू शकत होता. सन १९११ मध्ये, अमेरिकेचा खंड सर्वप्रथम पार करण्यात आला; न्यूयॉर्क ते कॅलिफोर्नियापर्यंतचा हा प्रवास करायला ४९ दिवस लागले! पहिल्या महायुद्धादरम्यान, विमानांची गती ताशी १०० किलोमीटरपासून ताशी २३० किलोमीटरहून अधिक करण्यात आली. त्यानंतर, लागलीच ९,००० मीटर उंची गाठण्याचे विक्रम करण्यात आले.

सन १९२० च्या दशकात विमानचालनातले विक्रम वृत्तपत्रांच्या ठळक मथळ्यांमध्ये झळकत राहिले. दोन अमेरिकन लष्करी अधिकाऱ्‍यांनी १९२३ साली, न थांबता, संयुक्‍त संस्थाने पार करणारे प्रथम उड्डाण केले; त्यांनी एका किनारपट्टीपासून दुसऱ्‍या किनारपट्टीपर्यंत २७ हून कमी तासांत प्रवास केला. चार वर्षांनंतर, चार्ल्झ ए. लिंडबर्ग याने न्यूयॉर्क ते पॅरिसपर्यंत न थांबता ३३ तास आणि २० मिनिटांमध्ये प्रवास करून एका रात्रीत प्रसिद्धी मिळवली.

दरम्यान, नवीनच सुरू झालेल्या व्यापार विमानांकडे ग्राहक आकर्षित होऊ लागले होते. सन १९३९ च्या शेवटी शेवटी विमानाने प्रवास करणे इतके लोकप्रिय झाले होते की, यु.एस. एअरलाईन्सने दरवर्षी सुमारे ३० लाख प्रवासी प्रवास करत होते. १९३० च्या दशकाच्या उत्तरार्धातील नेहमीचे विमान, डीसी-३, ताशी २७० किलोमीटरच्या वेगाने फक्‍त २१ प्रवाशांना घेऊन जायचे; पण दुसऱ्‍या महायुद्धानंतर, व्यापारी विमानांचा आकार आणि शक्‍ती बरीच वाढवण्यात आली; ताशी ४८० किलोमीटरहून अधिक वेगाने ती उडू लागली. ब्रिटिश लोकांनी १९५२ साली टर्बोजेटची व्यापारी सेवा सुरू केली. तर, ४०० आसनांचे बोईंग ७४७ सारखी जंबो जेट विमाने १९७० साली सुरू झाली.

सन १९७६ मध्ये ब्रिटिश आणि फ्रेंच अभियंत्यांच्या एका गटाने कॉनकॉर्ड हे विमान बनवले तेव्हा विमानचालनाच्या क्षेत्रात हे आणखी एक मोठे पाऊल होते; कॉनकॉर्ड विमानाचे त्रिकोणी पंख पाठीमागच्या टोकापर्यंत गेलेले आहे आणि ते १०० प्रवाशांना घेऊन ध्वनीपेक्षा दुप्पट वेगाने (स्वनातीत)—ताशी २,३०० किलोमीटर वेगाने जाणारे विमान आहे. परंतु, जास्त खर्चामुळे व्यापारी कारणांसाठी अशा स्वनातीत विमानांचा सर्रास वापर केला जात नाही.

सबंध जगावर प्रभाव

तुम्ही कधीच विमानाने प्रवास केला नसला, तरी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झालेल्या या झटपट प्रगतींचा प्रभाव आपल्या जीवनांवर झाला आहे. विमान सेवांनी संपूर्ण जगाला व्यापून टाकले आहे; सहसा आपण खात असलेले अन्‍न, घालत असलेले कपडे, आणि कामाच्या ठिकाणी किंवा घरी वापरत असलेली यंत्रे समुद्रापलीकडून किंवा वेगळ्या खंडातून विमानाने वाहून आणलेली असतात. पत्रे आणि टपाल एका देशातून दुसऱ्‍या देशात विमान सेवेनेच झटपट पोचवली जातात. दररोजचे व्यवहार चालवण्यासाठी व्यापार तर मोठ्या प्रमाणात कुरिअर सर्व्हिसेसवर अवलंबून असतात. आपल्याला मिळणारा माल आणि सेवा तसेच त्यांच्यासाठी आपण देत असलेली किंमत हे सर्व मानवाच्या उड्डाण क्षमतेमुळेच प्रभावित झालेले आहे.

विमानचालनामुळे फार मोठे सामाजिक बदलही घडून आले आहेत. विमानचालनामुळेच जग फार लहान वाटू लागले आहे. आपल्याला परवडण्यासारखे असेल, तर काही तासांतच जगातल्या वाटेल त्या कोपऱ्‍यात पोहंचता येते. इकडची बातमी तिकडे पोचायला वेळ लागत नाही तसेत लोकांनाही इकडून तिकडे पोचायला वेळ लागत नाही.

प्रगतीची किंमत

पण या प्रगतीसाठी किंमत मोजावी लागली आहे. वायू वाहतूक वाढत असल्याने, आकाश अधिकाधिक धोक्याचे ठिकाण बनत असल्याची भीती काहींना वाटते. दरवर्षी खाजगी तसेच व्यापारी विमानांच्या अपघातांमुळे पुष्कळ लोकांचे प्राण जातात. “स्पर्धा वाढत असल्यामुळे पुष्कळशा विमान कंपन्या, सुरवातीला ग्राहकांकडून जादा खर्च घेऊन जे अधिक सुरक्षा उपाय करायचे त्यांच्याकडे आता कानाडोळा करत आहेत,” असे फॉर्च्यून पत्रिका म्हणते. अमेरिकेत, हवाई प्रवासाच्या सुरक्षेची पाहणी करणाऱ्‍या संयुक्‍त विमानचालन व्यवस्थापनाकडे “पुरेसा पैसा नाही, पुरेसे कामगार नाहीत आणि तिथला कारोबार नीट हाताळला जात नाही,” असे त्या पत्रिकेने वृत्त दिले.

त्याचवेळी, जेट विमाने वाढल्यामुळे हवा तसेच ध्वनी प्रदूषणाचा वाढता धोका बऱ्‍याच पर्यावरणवादींना जाणवू लागला आहे. ध्वनी प्रदूषणाच्या समस्यांची हाताळणी हा “जनतेवर प्रभाव पाडणाऱ्‍या जागतिक विमानचालन क्षेत्रातील सर्वात वादग्रस्त विषय आहे,” असे अव्हिएशन वीक ॲण्ड स्पेस टेक्नोलॉजी या पत्रिकेने म्हटले.

विमाने जास्त जुनी होत चालली आहेत यामुळे या समस्येत आणखी भर पडली आहे: १९९० साली, यु. एस. एअरलाइनर्सच्या प्रत्येक ४ विमानांमधील १ विमान २० वर्षांहून जुने असल्याचे आढळले होते, आणि त्यांच्यामधील एक तृतीयांश विमाने उत्पादकाने सांगितलेल्या ‘उपयुक्‍त आयुष्यमानाच्या मर्यादेपलीकडे’ वापरण्यात आली होती.

अशाप्रकारे, विमानोड्डाण अभियंत्यांसमोर आता मोठी आव्हाने उभी आहेत. खर्च आणि पर्यावरणाच्या समस्या वाढत असतानाही जास्त प्रवाशांना वाहून नेणारे सुरक्षित आणि स्वस्त मार्ग त्यांनी शोधून काढायला हवेत.

खर्च कमी करण्याचे काही उपाय आताच काढले जात आहेत. एशियावीक पत्रिकेत लिखाण करणारे जिम एरिकसन म्हणतात की, एरोस्पेशल आणि ब्रिटिश एरोस्पेसचा फ्रॅन्को-ब्रिटिश गट, ध्वनीच्या दुप्पट गतीने ३०० प्रवाशांना वाहून नेणारा विमान तयार करायच्या योजना करत आहे. प्रत्येक प्रवाशामागचा खर्च आणि लागणारे इंधन कमी असेल. पुष्कळ विमानतळांवर वाहतुकीची गजबज असल्याने, विमान उद्योगातल्या काही लोकांनी ने-आण करणारे मोठे हेलीकॉप्टर—प्रत्येकात १०० प्रवासी मावतील इतके मोठे—निर्माण करण्याच्या कल्पनेचा प्रस्ताव मांडला आहे. त्यांच्या मते, सध्या नेहमीच्या फिक्स्ड-विंग विमानाने केला जाणारा जवळचा प्रवास एके दिवशी ही विमाने करू लागतील.

येणाऱ्‍या वर्षांमध्ये महाकाय हेलिकॉप्टर आणि स्वनातीत विमाने खरोखर विमान उद्योगाच्या वाढत्या गरजा पूर्ण करू शकतील का? उड्डाणासाठी ‘आकाश मोकळे’ करण्याचा आपला प्रयत्न मानव पुढे जारी ठेवेल तसे या प्रश्‍नाचे उत्तर वेळच देईल.

[तळटीपा]

a काहीजण असा दावा करतात की, १९०१ साली, जर्मनहून देशांतर करून कनक्टीकट, अमेरिका येथे राहिलेल्या गस्टेव व्हाईटहेड (विस्सकॉफ) यानेही स्वतः बनवलेले विमान उडवले होते. परंतु, हा दावा सिद्ध करण्यासाठी कोणतेही फोटो नाहीत.

[६ पानांवरील चित्र]

ऑटो लिलियनथाल, १८९१ च्या सुमारास

[चित्राचे श्रेय]

Library of Congress/Corbis

[७ पानांवरील चित्र]

ॲटलांटिक ओलांडून पॅरिसला उड्डाण करून आल्यावर १९२७ मध्ये लंडनमध्ये परतत असताना चार्ल्झ ए. लिंडबर्ग

[चित्राचे श्रेय]

Corbis-Bettmann

[७ पानांवरील चित्र]

१९१७ मध्ये सॉपविथ कॅमेल

[चित्राचे श्रेय]

Museum of Flight/Corbis

[७ पानांवरील चित्र]

१९३५ मध्ये डीसी-३

[चित्राचे श्रेय]

Photograph courtesy of Boeing Aircraft Company

[७ पानांवरील चित्र]

१९३७ मध्ये सकॉक्सी एस-४३ हवाई जहाज

[८ पानांवरील चित्र]

मदतीसाठी असलेला कोस्ट गार्ड हेलिकॉप्टर

[८ पानांवरील चित्र]

लवचीक असलेले पिट्‌स विमान, सॅमसनचा हुबेहूब नमुना

[८ पानांवरील चित्र]

कॉनकॉर्डची निर्धारित उड्डाणे १९७६ सालापासून सुरू झाली

[९ पानांवरील चित्र]

अंतराळातून पृथ्वीच्या वातावरणात परतल्यावर अंतराळ यान, वेगवान ग्लायडर बनते

[९ पानांवरील चित्र]

“रूटन वॅरी-ईज,” १९७८

[९ पानांवरील चित्र]

एअरबस ए३००

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा