वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g99 २/८ पृ. २६-२७
  • देवाचा पवित्र आत्मा काय आहे?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देवाचा पवित्र आत्मा काय आहे?
  • सावध राहा!—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • कार्यरत असणारी शक्‍ती
  • पवित्र आत्म्याची निरनिराळी कार्ये
  • आपल्यासाठी केलेला देवाच्या शक्‍तीचा उपयोग
  • देवाच्या आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार का चालावे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
  • देवाच्या आत्म्याद्वारे मार्गदर्शित—पहिल्या शतकात आणि आज
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
  • पवित्र आत्मा—देवाची क्रियाशील शक्‍ती
    तुम्ही त्रैक्य मानावे का?
  • आत्म्याच्या प्रेरणेने चालण्याद्वारे आपल्या समर्पणाचे वचन पूर्ण करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९९
g99 २/८ पृ. २६-२७

बायबलचा दृष्टिकोन

देवाचा पवित्र आत्मा काय आहे?

“सर्व लोकांनी बाप्तिस्मा घेतला व येशूहि बाप्तिस्मा घेऊन प्रार्थना करीत असता असे झाले की, आकाश उघडले गेले, पवित्र आत्मा देहरूपाने कबुतराप्रमाणे त्याच्यावर उतरला, आणि आकाशातून अशी वाणी झाली की, तू माझा प्रिय पुत्र आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे.”—लूक ३:२१, २२.

प्राचीन ग्रीसमधील तत्त्ववेत्त्यांना भाषण देताना प्रेषित पौलाने देवाविषयी म्हटले, की तो “स्वर्गाचा व पृथ्वीचा प्रभु,” आहे. पौलाने सांगितले, की “जग व त्यातले अवघे निर्माण केले” आणि तोच ‘जीवन, प्राण व सर्वकाही सर्वांना देतो.’ (प्रेषितांची कृत्ये १७:२४-२८) ही सगळी कार्ये देव कशी करतो? त्याच्या पवित्र आत्म्याच्या अर्थात कार्यकारी शक्‍तीच्या माध्यमाने.

देवाबद्दल बायबल असेही म्हणते, की तो ‘थोर सामर्थ्याचा आणि अमर्याद शक्‍तीचा’ देव आहे. (यशया ४०:२६; सुबोध भाषांतर) होय, हे सबंध विश्‍व देवानेच निर्माण केले; आणि त्यातून आपल्याला त्याचे थोर सामर्थ्य आणि शक्‍ती दिसून येते.

कार्यरत असणारी शक्‍ती

पवित्र आत्मा केवळ देवाची शक्‍ती आहे असे म्हणणे योग्य ठरणार नाही. कारण शक्‍ती सुप्त अवस्थेत किंवा एखाद्या व्यक्‍तीत किंवा वस्तूत निष्क्रिय अवस्थेत असू शकते. उदाहरणार्थ, न वापरलेल्या परंतु चार्ज केलेल्या बॅट्रितील शक्‍ती. पण बायबल जेव्हा केव्हा देवाच्या आत्म्याविषयी बोलते तेव्हा तो गतिशील असल्याचे ते सांगते. उदाहरणार्थ, वापरात असलेल्या एखाद्या बॅट्रितून विद्युत प्रवाह वाहतो काहीसे त्याप्रमाणे. (उत्पत्ति १:२) त्यामुळे, देवाचा पवित्र आत्मा त्याने प्रक्षेपित केलेले त्याचे सामर्थ्य किंवा त्याची कार्यकारी शक्‍ती आहे.

कधी कधी, पवित्र आत्मा एखादे कार्य करत असल्याचे किंवा देवापासून दूर, एका वेगळ्या ठिकाणी असल्याचेही बायबल सांगते. (मत्तय २८:१९, २०; लूक ३:२१, २२; प्रेषितांची कृत्ये ८:३९; १३:४; १५:२८, २९) बायबलमधील हे उतारे वाचून काही असे गृहीत धरतात, की पवित्र आत्म्याला देवापेक्षा वेगळे असे आपले स्वतःचे व्यक्‍तित्व आहे. मग बायबलमध्ये अशा प्रकारची भाषा का वापरली आहे? पवित्र आत्म्याला खरोखरच देवापेक्षा वेगळे असे आपले स्वतःचे एक अस्तित्व आहे का?

सर्वसमर्थ देव त्याच्या भौतिक सृष्टीहून उच्च अशा पातळीवर आहे. तो एक आत्मा असून आपल्या मर्यादित ज्ञानेंद्रियांनी आपण त्याला पाहू शकत नाही. (योहान ४:२४) बायबल म्हणते, की यहोवा देव स्वर्गात राहतो आणि तिथून तो सबंध मानवजातीला न्याहाळतो. (स्तोत्र ३३:१३, १४) हे समजण्याजोगे आहे. तर मग, सृष्टीकर्ता ज्या घटकांशी व्यवहार करतो त्यांच्यापेक्षा तो नक्कीच श्रेष्ठ असला पाहिजे. तो त्यांच्यावर सत्ता गाजवतो, त्यांचा हवा तसा उपयोग करून घेतो आणि त्यांचे नियंत्रण करतो.—उत्पत्ति १:१.

आपल्या अदृश्‍य निवासस्थानातून हवी ती गोष्ट, हव्या त्या ठिकाणी देव घडवून आणू शकतो. त्यामुळे, त्याची कार्यकारी शक्‍ती ज्या ठिकाणी कार्य करते त्या ठिकाणी त्याला स्वतः उपस्थित राहण्याची गरज नसते. आपला आत्मा पाठवून तो एखादे काम पूर्ण करू शकतो. (स्तोत्र १०४:३०) हल्ली वायरलेस रिमोट कंट्रोलवर घरगुती उपकरणे चालवणाऱ्‍या लोकांना ही गोष्ट सहज समजण्याजोगी आहे. विद्युत किंवा अवरक्‍त तरंगांसारख्या अदृश्‍य शक्‍तींच्या शक्‍तीविषयी आपण जाणून आहोतच. त्याचप्रमाणे, आपल्या अदृश्‍य पवित्र शक्‍तीने किंवा आत्म्याने देव आपले उद्देश पूर्ण करू शकतो आणि असे करण्यासाठी त्याला एका ठिकाणाहून दुसऱ्‍या ठिकाणी जावे लागत नाही.—यशया ५५:११.

ही गोष्ट समजणे कदाचित बायबलच्या काळात कठीण गेले असावे. पण, एक वेगळी शक्‍ती असे पवित्र आत्म्याचे जे वर्णन केले आहे त्यामुळे विशिष्ट ठिकाणी वैयक्‍तिकपणे हजर न राहता देव आपल्या शक्‍तीचा उपयोग कसा करतो हे समजून घ्यायला वाचकांना मदत मिळाली असेल यात शंका नाही. पवित्र आत्म्याने अमुक काम केले असे म्हणताना बायबल खरे तर हेच सांगत असते, की आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वतः देवाने विशिष्ट व्यक्‍तींना किंवा वस्तूंना आपली शक्‍ती प्रदान केली किंवा त्यांमध्ये आपली शक्‍ती घातली.

पवित्र आत्म्याची निरनिराळी कार्ये

सजीव आणि निर्जीव अशा सर्व वस्तूंची निर्मिती करण्यासाठी यहोवाने पवित्र आत्म्याचा उपयोग केला. (स्तोत्र ३३:६) जलप्रलयाद्वारे हिंसक, अपश्‍चातापी लोकांच्या एका विशिष्ट पिढीचा नाश करण्यासाठी देखील त्याने त्याचा उपयोग केला. (उत्पत्ति ६:१-२२) आणि पुढे याच कार्यकारी शक्‍तीद्वारे, देवाने आपल्या पुत्राचे मौल्यवान जीवन यहुदी कुमारी मरिया हिच्या उदरात स्थलांतरित केले.—लूक १:३५.

कधीकधी, जीव धोक्यात असतानाही आपल्या शत्रुंपुढे निर्भयतेने, धैर्याने सत्य बोलण्याची शक्‍ती देखील पवित्र आत्म्याने लोकांना दिली. (मीखा ३:८) आणि बायबलमध्ये अशी कित्येक उदाहरणे आहेत जेव्हा याच शक्‍तीद्वारे स्त्रीपुरुषांना खास अंतर्दृष्टी किंवा समज देण्यात आली होती, विशेषतः भविष्यवाणीसंबंधित. आत्म्याचे हे नक्कीच एक उल्लेखनीय कार्य आहे असे म्हणता येईल कारण भविष्यात आपल्यासाठी काय वाढून ठेवले आहे हे कुठलीही व्यक्‍ती अचूकपणे सांगू शकत नाही.—२ पेत्र १:२०, २१.

पवित्र आत्मा लोकांना चमत्कारिक शक्‍ती देखील देऊ शकतो. उदाहरणार्थ, याच शक्‍तीमुळे येशूला नैसर्गिक शक्‍तींचे नियंत्रण करता आले, लोकांना बरे करता आले आणि मृतांना जीवदानही देता आले. (लूक ४:१८-२१; ८:२२-२६, ४९-५६; ९:११) याशिवाय, सबंध पृथ्वीवर देवाचे साक्षीदार म्हणून सेवा करण्याकरता सुरवातीच्या ख्रिश्‍चनांना संघटित करण्यासाठी तसेच त्यांना शक्‍ती देण्यासाठी देखील पवित्र आत्मा कारणीभूत ठरला.—प्रेषितांची कृत्ये १:८; २:१-४७; रोमकर १५:१८, १९; १ करिंथकर १२:४-११.

आपल्यासाठी केलेला देवाच्या शक्‍तीचा उपयोग

आज देवाच्या मानवी सेवकांना ही अमर्याद शक्‍ती मिळवणे शक्य आहे का? होय! आपली इच्छा काय आणि ती कशी पूर्ण करावी हे समजण्यासाठी देव विपुल प्रमाणात आपल्या लोकांना पवित्र आत्मा देतो. जे लोक प्रांजळपणे, प्रार्थनाशील वृत्तीने विनंती करतात, ज्यांचे हेतू चांगले आहेत आणि जे त्याच्या अपेक्षा पूर्ण करतात अशांना तो आपला आत्मा देतो. (१ करिंथकर २:१०-१६) अडिअडचणी असतानाही विश्‍वासूपणे देवाची सेवा करत राहण्यासाठी हाच आत्मा पापी मानवांना ‘पराकोटीचे सामर्थ्य’ देऊ शकतो. तर मग, देवभीरू लोकांना देवाचा हा आत्मा प्राप्त करण्याची आणि तो बाळगण्याची इच्छा नसेल का? निश्‍चितच असेल!—२ करिंथकर ४:७; लूक ११:१३; प्रेषितांची कृत्ये १५:८; इफिसकर ४:३०.

या दुष्ट जगातील अन्यायाचा आणि दुःखाचा अंत करण्यासाठी देव लवकरच आपल्या या महाशक्‍तीचा उपयोग करील; जेणेकरून त्याच्या थोर आणि पवित्र नावाचे पवित्रीकरण होईल. पवित्र आत्मा जे काही करील त्यामुळे सबंध मानवजातीचा फायदा होईल, सगळ्यांना त्याचे प्रतिफळ प्रत्यक्ष दिसतील आणि त्यामुळे आत्म्याच्या उत्पन्‍नकर्त्याचा गौरव होईल.—गलतीकर ५:२२, २३; प्रकटीकरण २१:३, ४.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा