वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g98 २/८ पृ. २९
  • जगावरील दृष्टिक्षेप

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जगावरील दृष्टिक्षेप
  • सावध राहा!—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • टोकियोचे प्रवासी कावळे
  • नैसर्गिक साधनसंपत्ती धोक्यात
  • स्तनपानाचा प्रश्‍न
  • विलक्षण स्नेहबंधन
  • जगातील स्वच्छता पातळी खालावते
  • गूटनबर्ग बायबल हाती लागते
  • गुटेन बर्ग यांनी जगाला दिलेले वरदान!
    सावध राहा!—२००१
  • धाड घालण्यास निघालेले लष्कर!
    सावध राहा!—२००३
  • कोणती गोष्ट तुमचे आरोग्य ठरवते—तुम्ही करू शकता त्या गोष्टी
    सावध राहा!—१९९५
  • मातेच्या दुधासाठी पुरावा
    सावध राहा!—१९९४
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९८
g98 २/८ पृ. २९

जगावरील दृष्टिक्षेप

टोकियोचे प्रवासी कावळे

द डेली योमीयूरीने दिलेल्या माहितीनुसार जपानच्या टोकियो शहरातील कावळ्यांना, दररोज शहर-उपनगर असा प्रवास करण्याची सवय लागली आहे. पक्षी तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की हा प्रवास अलीकडील काही वर्षांपासूनच सुरू झाला आहे; टोकियो उद्याने व मंदिर परिसरातील कावळ्यांच्या संख्येत इतकी बेसुमार वाढ झाली की कावळ्यांना आपली घरटी इतरत्र बांधावी लागली. याच वेळी, कावळ्यांना उपनगरातील सुखी जीवनाची ओळख घडली. पण, शहरातले चटकदार अन्‍न—केरकचरा व टाकून दिलेले उरलेसुरले अन्‍न मिळत नसल्यामुळे त्यांना चुकल्या चुकल्यासारखे वाटू लागले. “पगारी कर्मचाऱ्‍यांसारख्या प्रवास पद्धती” विकसित करून त्यांनी या समस्येवर उपाय शोधला आहे. द डेली योमीयूरी म्हणते: “अन्‍नाच्या शोधात ते सकाळीच शहराच्या दिशेने उड्डाण करतात आणि मग संध्याकाळी उपनगरांत परततात.”

नैसर्गिक साधनसंपत्ती धोक्यात

वनस्पती व प्राणी जीवनांनी समृद्ध असलेल्या भारतातील ईशान्य प्रदेशात वनस्पतींच्या ६५० जाती, तर प्राण्यांच्या ७० जातींचे अस्तित्व सध्या धोक्यात असल्याची नोंद आहे. बांगला देशच्या सीमेवरील मेघालय राज्यातील निकृष्ट परिसंस्था, त्या १८ ‘चिंताजनक क्षेत्रांपैकी’ एक असल्याची ओळखली जाते जेथे जीवसृष्टी-वैविध्य धोक्यात आहे. एशियन एज यात दिलेल्या अहवालानुसार इतर घटकांव्यतिरिक्‍त लूटमार आणि चोरटी शिकार यांमुळे देखील परिसंस्थेवर घाला पडला आहे. भारताच्या ईशान्येतील सात राज्यांचे जीवसृष्टीतील वैविध्य, परिस्थितीकीदृष्ट्या देशातील इतर भागांपेक्षा अधिक निकृष्ट व संवेदनशील असल्याचे समजले जाते.

स्तनपानाचा प्रश्‍न

द न्यूयॉर्क टाईम्स म्हणते: “दोन दशकांपर्यंत, डॉक्टर्स आणि सार्वजनिक आरोग्य एजन्सींनी गरीब राष्ट्रांतील नवोदित मातांना एकच सल्ला दिला आहे: आपल्या अर्भकांचे आरोग्य टिकवण्यासाठी स्तनपान सर्वात उत्तम. पण आता मात्र एड्‌सची साथ, या सरधोपट सल्ल्यात आमूलाग्र बदल करत आहे. अभ्यास दाखवून देतात, की एड्‌सचा प्रादुर्भाव झालेल्या माता, मोठ्या प्रमाणात आपल्या दुधातून एड्‌स विषाणू फैलावण्याची शक्यता आहे. . . . अलीकडेच संयुक्‍त राष्ट्रांनी असा अंदाज बांधला आहे, की एचआयव्हीची लागण झालेल्या अर्भकांपैकी एक तृतीयांश अर्भकांनी हे विषाणू आपल्या आईंच्या दुधातून ग्रहण केले.” यावर, अर्भक दूध मिश्रण हा एक पर्याय असला तरी याच्या देखील अनेक समस्या आहेत. कित्येक देशांतील मातांना हे पर्यायी दूध, अथवा दुधाच्या बाटल्या निर्जंतूक करणे परवडत नाही, शिवाय त्यांना शुद्ध पाणी देखील सुलभ नाही. परिणामी मुलांना डायरिया, डिहायड्रेशन तसेच श्‍वसन आणि पचनसंस्थेसंबंधी रोग जडतात. दुधाचे प्रमाण वाढविण्यासाठी गरीब कुटुंबे दुधात जास्त पाणी मिसळतात पण त्यामुळे अर्भकांचे कुपोषण होते. आता मात्र, आरोग्य अधिकारी या दोन समस्यांतून मार्ग काढण्यासाठी संघर्ष करत आहेत. जगभरात, अर्भकांतील एचआयव्ही संसर्गाची प्रकरणे प्रती दिवशी १,००० पेक्षाही जास्त झाली आहेत.

विलक्षण स्नेहबंधन

कित्येक वर्षांपासून वैज्ञानिकांनी, मुंग्या आणि आफ्रिकेतील बाभळीची वृक्षे यांच्यातील ऋणानुबंधाचे कौतुक केले आहे. ही वृक्षे मुंग्यांना अन्‍न व निवारा पुरवतात. आणि या बदल्यात मुंग्या, वृक्षांचे नुकसान करणाऱ्‍या कीटकांवर हल्ला करतात व वृक्षांची पाने फस्त करणाऱ्‍या प्राण्यांना चावतात. आपल्या अस्तित्वासाठी ही वृक्षे या संरक्षणावर विसंबून असल्याचे दिसते. परंतु, फुलांचे परागसिंचन करण्यासाठी वृक्षांना, उडणाऱ्‍या कीटकांची देखील गरज असते. पण या मुंग्या असताना, परागसिंचन करणाऱ्‍या कीटकांना आपली कामगिरी पूर्ण करणे कसे काय जमते बरे? निसर्ग (इंग्रजी) या वैज्ञानिक नियतकालिकाच्या मते वृक्षे, “फुलांच्या सर्वोच्च फलनक्षम काळात” येतात तेव्हा ते एक विशिष्ट रसायन उत्पन्‍न करतात जे मुंग्यांना दूर ठेवते. यामुळे, कीटकांना “या महत्त्वपूर्ण काळात” फुलांना भेटी देणे सुकर बनते. नंतर मग, फुलांचे परागसिंचन पूर्ण होते तेव्हा मुंग्या रक्षणाच्या कामावर पुन्हा तैनात होतात.

जगातील स्वच्छता पातळी खालावते

“जवळजवळ तीन महापद्म लोकांना, म्हणजे जगातील निम्म्याअधिक लोकसंख्येला किमान स्वच्छ शौचालयांची देखील सोय उपलब्ध नाही,” असा अहवाल द न्यूयॉर्क टाईम्स देते. युनीसेफने (युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड) संचालित केलेला राष्ट्रांची प्रगती (इंग्रजी) हे वार्षिक सर्वेक्षण देखील प्रकट करते की, “जगभरातील स्वच्छता स्थर सुधारण्याऐवजी दिवसेंदिवस बिकटच होत चालले आहे.” उदाहरणार्थ, गरीब लोकांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यात प्रगती केलेली राष्ट्रे पुरेशी मलप्रवाह व्यवस्था पुरवण्यात मात्र मागे पडतात. हा मूलभूत स्वच्छता अभाव, नवनवीन साथींचा फैलाव करण्यात व जुन्या रोगराईंना पुनरुज्जीवित करण्यात लक्षणीय हातभार लावतो, असे अहवाल म्हणतो. दर वर्षी, अंदाजे २० लाखांपेक्षा अधिक बालके अस्वच्छ परिस्थितींसंबंधी आजारांमुळे मृत्युमुखी पडतात. सदर अभ्यासाचे लेखक, आखतार हामीद खान म्हणतात: “तुमची स्वच्छता पातळी मध्ययुगीन असते तेव्हा तुमच्यातील रोग पातळी देखील मध्ययुगीनच असते.”

गूटनबर्ग बायबल हाती लागते

योहानस गूटनबर्ग यांनी १५ व्या शतकात मुद्रित केलेल्या बायबलचा एक हिस्सा, रेन्ट्‌सबूर्ग, जर्मनी येथील चर्चच्या अभिलेखागारात सापडला आहे. सन १९९६ च्या पूर्वार्धात हा हाती लागल्यानंतर, मूळ गूटनबर्ग प्रत म्हणून त्याची घोषणा करण्याआधी, १५० पृष्ठांच्या या बायबलच्या हिस्स्याचे कसून परीक्षण करण्यात आले, असा वीअसबॅडनर कूरीरने अहवाल दिला. जगभर, गूटनबर्ग बायबलच्या ४८ प्रती असून, पैकी २० पूर्ण स्वरूपात आहेत. वर्तमानपत्राचे म्हणणे आहे की, “योहानस गूटनबर्ग यांनी मुद्रित केलेले दोन खंडांचे विख्यात बायबल, पुस्तक मुद्रणातील सर्वात पहिली प्रमुख साध्यता असल्याची समजली जाते.” अलीकडेच हाती लागलेल्या त्यांच्या बायबल हिस्स्याला, “बायबलची चोरी होऊ नये म्हणून व्यासपीठाला बांधण्यासाठी असलेली ती मूळ पुस्तक साखळी अद्यापही शाबूत आहे.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा