वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g98 २/८ पृ. २७-२८
  • एका प्रेमळ देवाचे भय तुम्ही कसे बाळगू शकता?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • एका प्रेमळ देवाचे भय तुम्ही कसे बाळगू शकता?
  • सावध राहा!—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • स्वर्ग आणि देवाची महानता
  • क्षमाशील देव
  • देवाच्या न्यायदंडांचे भय राखणे
  • यहोवाचे भय मानणारे हृदय उत्पन्‍न करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • बायबलचा अभ्यास का करावा?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • मानवाचे नव्हे तर देवाचे भय का धरावे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
  • यहोवाचे भय बाळगण्यात आनंद मिळवण्याचे शिकणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९८
g98 २/८ पृ. २७-२८

बायबलचा दृष्टिकोन

एका प्रेमळ देवाचे भय तुम्ही कसे बाळगू शकता?

‘जो मनुष्य यहोवाचे भय धरितो तो धन्य!’—स्तोत्र ११२:१.

‘देव प्रीती आहे,’ असे बायबल म्हणते तर मग त्याचे भय का बाळगावे बरे? (१ योहान ४:१६) प्रेम आणि भय, या दोन गोष्टी बहुधा विसंगत असल्याचे मानले जाते. तर मग, देवाबरोबरील आपल्या नातेसंबंधात भय कोणत्या अर्थाने सामील आहे? प्रेममय देवाची भीती का बाळगावी? बायबलमध्ये, “भय” या शब्दाचा कशाप्रकारे प्रयोग केला गेला आहे याचे परीक्षण केल्याने या बाबतीत अधिक चांगली समज प्राप्त करण्यास आपल्याला मदत होईल.

अनेक भाषांमध्ये केवळ एकाच शब्दाच्या, संदर्भानुसार विविध अर्थछटा असू शकतात. त्याचप्रमाणे बायबल देखील निरनिराळ्या प्रकारच्या भयाबद्दल सांगते. देवाच्या उपासनेसंबंधी बायबल, भय या शब्दाचा प्रयोग करते, तेव्हा दहशत, धास्ती किंवा लवकरच होणाऱ्‍या शिक्षेसंबंधीच्या भावनेला ते सूचित करत नाही. उलटपक्षी, देवाचे भय हितकर भावना—भयमिश्रित आदर, श्रद्धा, नितांत सन्मान यांस सूचित करते. या उदात्त भावनांच्या जोडीला, भयापोटी पळ काढण्याची किंवा लपण्याची भावना नव्हे, तर देवाबद्दलचे प्रेम व आकर्षण देखील असते.

देवाबद्दलचे भय, विकृत किंवा थरकाप उडवणाऱ्‍या भयास पळवून लावते. देवाचे भय बाळगणाऱ्‍या मनुष्याबद्दल स्तोत्रकर्ता लिहितो: “तो वाईट बातमीला भिणार नाही; त्याचे मन परमेश्‍वरावर भाव ठेवून अढळ राहते.” (स्तोत्र ११२:७) दुष्ट लोकांची अथवा खुद्द सैतानाची भीती देखील, यहोवाप्रती असलेला आपला नितांत आदर व श्रद्धा, यांवर मात करू शकत नाही. (लूक १२:४, ५) शिवाय, प्राथनेद्वारे यहोवाच्या जवळ जाण्यास आपण घाबरू नये. उलटपक्षी, या बाबतीत पाहू जाता, “प्रीति भीति घालवून देते.”—१ योहान ४:१८.

स्वर्ग आणि देवाची महानता

प्राचीन काळचा दावीद राजा एक देवभीरू मनुष्य होता. सृष्टीची सुंदरता व जटिलता यांवर मनन करताना त्याचे मन भयमिश्रित आदराने भरून आले होते. त्याने उद्‌गारले: “भयप्रद व अद्‌भुत रीतीने माझी घडण झाली आहे, म्हणून मी तुझे उपकारस्मरण करितो; तुझी कृत्ये अद्‌भुत आहेत हे माझा जीव पूर्णपणे जाणून आहे.” (स्तोत्र १३९:१४) रात्रीच्या आकाशाकडे दृष्टी लावून त्याने असे उद्‌गार काढले: “आकाश देवाचा महिमा वर्णिते.” (स्तोत्र १९:१) या अनुभवामुळे दावीद घाबरून गेला होता असे तुम्हाला वाटते का? उलट, यहोवाचे गुणगाण करण्यास तो प्रवृत्त झाला होता.

आज अवकाशाबद्दलचे प्रगतिशील ज्ञान, आदरयुक्‍त होण्यास आपल्याला सबळ कारण पुरवते. अलीकडेच, हबल स्पेस टेलिस्कोपच्या साहाय्याने खगोलशास्त्रज्ञांनी एका अपूर्व प्रमाणात अवकाशाचा सखोल अभ्यास केला. भूस्थित दुर्बिणींतून रिकामा वाटणारा अवकाशाचा एक भाग त्यांनी निवडला आणि एका हाताच्या अंतरावर धरलेल्या वाळूच्या कणाइतक्या क्षेत्रावर त्यांनी हबल केंद्रित केले. निर्माण झालेले छायाचित्र, मोजक्या ताऱ्‍यांनी नव्हे तर अगणित तारे असलेल्या व मानवी दृष्टीस पूर्वी कधी पडल्या नव्हत्या त्या आकाशगंगांनी भरलेले होते!

विश्‍वाचे परिमाण, गूढ आणि चमत्कार, निरीक्षण करणाऱ्‍या एखाद्या उत्सुक व्यक्‍तीमध्ये आदर भावना जागविते. तथापि, अशी चमत्कृत्ये, निर्माणकर्त्याचे वैभव आणि सामर्थ्य यांची केवळ एक झलक आहे. बायबल, यहोवा देवाला ‘ज्योतिमंडळाचा पिता’ असे संबोधिते, शिवाय तो “ताऱ्‍यांची गणती करितो; तो त्या सर्वांना त्यांची त्यांची नावे देतो,” असेही ते म्हणते.—याकोब १:१७; स्तोत्र १४७:४.

विश्‍वाचा अफाटपणा, अवकाशातील घटनांना लागणाऱ्‍या समयातूनही डोकावतो. हबल स्पेस टेलिस्कोपने छायाचित्रित केलेला आकाशगंगांचा प्रकाश, महापद्म वर्षे अंतराळातून प्रवास करत होता! अवकाशाच्या स्थायीत्वाच्या तुलनेत आपले अलीकडेच अस्तित्वात येणे आणि आपले क्षुद्रपण यांनी, ताऱ्‍यांची निर्मिती करणाऱ्‍याला श्रद्धा आणि परम आदर दाखविण्यास आपल्याला प्रवृत्त करू नये का? (यशया ४०:२२, २६) ज्या देवाने या सर्व गोष्टींची निर्मिती केली तो ‘मर्त्य मनुष्याची आठवण करतो व त्याची काळजी वाहतो’ ही जाणीव, निर्माणकर्त्याबद्दल आपला आदर अधिक वाढविते व त्याला अधिक जाणून घेऊन त्यास संतुष्ट करण्यास आपल्याला प्रवृत्त करते. (स्तोत्र ८:३, ४) बायबलमध्ये अशा उदात्त आदराला व कृतज्ञतेलाच देवाचे भय म्हटले आहे.

क्षमाशील देव

आपण सर्वच अपरिपूर्ण आहोत. योग्य ते करण्याचा प्रयास करत असतानाही नकळत आपल्या हातून पाप होत असते. असे होते तेव्हा देवाचा अनुग्रह गमावून बसण्याची भीती आपल्याला वाटण्यास हवी का? स्तोत्रकर्त्याने लिहिले: ‘हे परमेशा, तू अधर्म लक्षात आणिशील, तर हे प्रभू, तुझ्यापुढे कोण टिकाव धरील? तरी पण लोकांनी तुझे भय धरावे म्हणून तुझ्या ठायी क्षमा आहे.” (स्तोत्र १३०:३, ४) ‘थोर निर्माणकर्ता’ इतका प्रेमळ आणि क्षमाशील असावा, हीच बाब त्याच्या उपासकांमध्ये सखोल कृतज्ञता व आदर भावना जागविते.—यशया ५४:५-८.

देवाबद्दलचे भय आपल्याला योग्य ते करण्यास व देवाला ज्या गोष्टी अनिष्ट वाटतात त्या टाळण्यास उत्तेजित करते. स्वर्गीय पित्यासोबतच्या आपल्या नातेसंबंधाची तुलना, एका उत्तम मानवी पित्याचा त्याच्या मुलांसोबत असलेल्या नातेसंबंधाशी केली जाऊ शकते. कधीकधी, आपले वडील आपल्याला रस्त्यावर का खेळू देत नाहीत हे मुलांच्या लक्षात येणार नाही. पण तरीही, रहदारीच्या मार्गापर्यंत चेंडूच्या मागे धावण्यास मुले उत्तेजित होतात तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांच्यावर घातलेल्या प्रतिबंधाचा विचारच असे करण्यास त्यांना अटकाव घालील—कदाचित मृत्यूपासूनही त्यांचा बचाव करील. त्याचप्रमाणे, एखाद्या प्रौढास असलेले यहोवाबद्दलचे भय त्याला असले कोणतेही कृत्य करण्यास अटकाव घालील ज्यामुळे त्याचे स्वतःचे आणि इतरांचेही जीवन उद्ध्‌वस्त होऊ शकते.—नीतिसूत्रे १४:२७.

देवाच्या न्यायदंडांचे भय राखणे

याच्या अगदी विपरीत, ज्या व्यक्‍तीचा विवेक देवाला नाखुश करण्यापासून स्वतःला अटकाव घालत नाही, त्याला संपूर्णतः वेगळ्या प्रकारचे भय बाळगण्याचे कारण आहे. मानवी सरकार, अपराध्यांना शिक्षा करतात त्याप्रमाणेच देवालाही हेतूक, निःपश्‍चात्तापी अपराध्यांविरुद्ध पावले उचलण्याचा अधिकार आहे. देवाने अल्पावधीसाठी दुष्टाईला दिलेल्या अनुमतीमुळे काही जण अधम मार्गात निब्बर झाले आहेत. परंतु, बायबल सुस्पष्टपणे दाखवून देते, की लवकरच तो दिवस येईल जेव्हा देव, पृथ्वीवरील सर्व दुष्ट घटक नाहीसे करील. (स्तोत्र ३७:९, १०; उपदेशक ८:११; १ तीमथ्य ५:२४) निःपश्‍चात्तापी दुष्ट व्यक्‍तींना देवाकडून होणाऱ्‍या शिक्षेचे भय राखण्यास कारण आहे. पण, तरीही बायबल शिफारस करते त्याप्रकारचे हे भय नाही.

या उलट, बायबल यहोवाच्या भयाचा संबंध, जीवनातील अतिसुंदर गोष्टींसोबत जोडते; गीत गाणे, हर्ष, भरवसा, सुबुद्धी, दीर्घायुष्य, विश्‍वास, भरभराट, आशा आणि शांती ही त्यांच्यापैकी काही आहेत.a आपण निरंतर यहोवाचे भय राखून चालल्यास, अशा आशीर्वादांचा सर्वकाळ आस्वाद घेत राहू.—अनुवाद १०:१२-१४.

[तळटीप]

a पाहा निर्गम १५:११; स्तोत्र ३४:११, १२; ४०:३; १११:१०; नीतिसूत्रे १०:२७; १४:२६; २२:४; २३:१७, १८; प्रेषितांची कृत्ये ९:३१.

[२७ पानांवरील चित्राचे श्रेय]

Courtesy of Anglo-Australian Observatory, photograph by David Malin

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा