वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g97 १०/८ पृ. ३-४
  • द्वेष एवढा का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • द्वेष एवढा का?
  • सावध राहा!—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • कल्याणकारक आणि अकल्याणकारक द्वेष
  • द्वेषाचं हे चक्र का सुरू आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२२
  • आपण द्वेषावर विजय मिळवू शकतो!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२२
  • द्वेषाचा कधी अंत होईल का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • लवकरच द्वेष कायमचा संपेल!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२२
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९७
g97 १०/८ पृ. ३-४

द्वेष एवढा का?

जर्मनीमधील सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून

“का”—एवढासाच हा शब्द आहे, मात्र तो उत्तराची मागणी करतो. उदाहरणार्थ, १९९६ सालच्या मार्च महिन्यात स्कॉटलंडमध्ये डनब्लेन शहरात एका शाळेबाहेर असंख्य पुष्पगुच्छ आणि टेडी बेअर्स ठेवलेले होते ज्यांत एका कागदाच्या चिटोऱ्‍यावर हाच लहानसा शब्द, “का,” उत्तराची मागणी करीत होता. काही दिवसांपूर्वीच, एका माणसाने या शाळेत घुसून १६ लहान मुलांची आणि त्यांच्या शिक्षिकेची गोळ्या घालून हत्या केली होती. इतरही बऱ्‍याच जणांना त्याने जखमी केले, मग शेवटी स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली. या माणसाच्या मनात स्वतःविषयी, इतरांविषयी आणि सर्वसामान्य लोकसमाजाविषयी जबरदस्त द्वेष भरला होता, हे उघडच आहे. मृत मुलांचे शोकसंतप्त आईवडील आणि आप्तेष्ट, तसेच जगभरातील कोट्यवधी लोक एकच प्रश्‍न विचारत आहेत, आणि तो म्हणजे ‘का? निष्पाप मुलांना असा भयानक मृत्यू का यावा?’

या जगात बुद्धीला पटणार नाही इतक्या अतिरेकी प्रमाणावर द्वेष भरला आहे हे तुम्हालाही जाणवत असेलच. खरे तर, कोणते न कोणते निमित्त होऊन तुम्ही स्वतः देखील या द्वेषाला बळी पडला असाल. तुम्हालाही कदाचित कित्येकदा, ‘का’ या प्रश्‍नाने सतावले असेल.

कल्याणकारक आणि अकल्याणकारक द्वेष

“द्वेष” या शब्दाची व्याख्या, “तीव्र वैरभाव आणि तिटकारा” अशी करण्यात आली आहे. अर्थात, ज्या गोष्टी अपायकारक असतात किंवा वैयक्‍तिक नातेसंबंधांना बाधक असतात अशा गोष्टींविषयी “तीव्र वैरभाव आणि तिटकारा” असणे केव्हाही चांगलेच. सर्वांनाच या प्रकारच्या गोष्टींसाठी द्वेष असता तर या जगात जगणे नक्कीच सुसह्‍य झाले असते. पण खेदाने म्हणावे लागते की, अपरिपूर्ण मनुष्य सहसा नको त्या गोष्टींचा आणि नको त्या कारणांमुळे द्वेष करतात.

विध्वंसकारक द्वेष हा पूर्वग्रह, अज्ञान, किंवा गैरसमजांवर आधारित असून एका विशिष्ट व्याख्येनुसार तो सहसा “भीती, क्रोध किंवा अपमानाच्या भावनांमधून” उत्पन्‍न होत असतो. योग्य आधार नसल्यामुळे हा द्वेष दुःखदायक ठरतो आणि परिणामी, ‘का’ हा प्रश्‍न वारंवार उपस्थित होतो.

आपण सर्वजण अशा काही लोकांना ओळखतो, ज्यांच्या काही विशिष्ट गुणांमुळे किंवा सवयींमुळे आपल्याला प्रसंगी त्यांची चीड येते आणि अशांसोबत मिसळणे आपल्याला तितके सोपे जात नाही. पण चीड येणे वेगळे, आणि लोकांना शारीरिक दुखापत करण्याची इच्छा बाळगणे वेगळे. एखादी व्यक्‍ती सबंध लोकसमूहांबद्दल, आणि कधीकधी तर ज्यांच्यासोबत तिची प्रत्यक्ष ओळखसुद्धा नसते, अशांबद्दल द्वेषभावना कशी काय जोपासू शकते हे समजणे आपल्याला जड जाते. या लोकसमूहांचे राजनैतिक दृष्टिकोन या व्यक्‍तीसारखे कदाचित नसतील, किंवा ते वेगळ्या धर्माचे अथवा जातीचे असतील; पण ही काय त्यांचा द्वेष करण्याची कारणे झाली?

असे असूनही, असला द्वेष आज अस्तित्वात आहे! आफ्रिकेत, हुतू आणि तुत्सी जमातींमधील द्वेष, १९९४ साली र्‌वांडा येथे झालेल्या त्यांच्या परस्परांच्या संहारास कारणीभूत ठरला; एका महिला रिपोर्टरने तर असा प्रश्‍न केला, की “एवढ्याशा देशात इतका द्वेष आला कुठून?” मध्य पूर्वेतील देशांमधील द्वेष, अरबी आणि इस्राएली जहालमतवाद्यांनी केलेल्या दहशतवादी हल्ल्यांत परिणीत झाला. युरोपात, द्वेषामुळेच पूर्वीच्या युगोस्लाव्हियाचे विभाजन घडले. शिवाय एका बातमीपत्राच्या वृत्तानुसार, एकट्या अमेरिकेतच “जवळजवळ २५० विद्वेषक समूह,” जातीभेदक विचारांचा प्रसार करीत आहेत. का म्हणून एवढा द्वेष? का?

द्वेष इतका खोलवर रुजला आहे की, त्यामुळे जन्मास आलेले वाद तर मिटवले जातात पण त्यांमागचा द्वेष मात्र कायम राहतो. नाहीतर, युद्धग्रस्त आणि दहशतवादाने पीडित असलेल्या देशांत शांती आणि युद्धविरामाची स्थिती टिकवून ठेवणे इतके कठीण जाते यासाठी आणखी कोणते कारण देता येईल? बॉस्निया आणि हर्झेगोविना-क्रोएट फेडरेशनच्या अधीन सारायेवो शहराचे संयुक्‍तिकरण करण्याची तरतूद असलेल्या शांती करारावर १९९५ सालच्या शेवटी पॅरिस शहरात हस्ताक्षर झाल्यानंतरही जे घडले, त्यासाठी आणखी कोणते कारण देता येईल? लष्करी सूड उगवल्या जाण्याच्या भीतीमुळे सारायेवो येथे राहणारे बहुतांश सर्बियन लोक या शहरातून आणि त्याच्या उपनगरांतून पळ काढू लागले. पलायन करणारे हे लोक, जाण्यापूर्वी कसे लुटमार करून इमारती पेटवत होते याविषयी वृत्त देऊन टाईम नियतकालिकाने शेवटी असे म्हटले: “सारायेवोचे तर संयुक्‍तिकरण झाले; पण येथल्या लोकांचे मात्र होऊ शकले नाही.”

एकमेकांचा द्वेष करणाऱ्‍या लोकांत शांती आली तरीसुद्धा ती बनावट शांती असते, बनावट नोटांसारखीच निरुपयोगी. भक्कम आधार नसल्यामुळे, थोड्याशाही दबावाने ही शांती कोलमडून पडते. पण या जगात इतका द्वेष आणि प्रेमाचा इतका अभाव आहे. का?

[४ पानांवरील संक्षिप्त आशय]

विध्वंसकारक द्वेष हा पूर्वग्रह, अज्ञान किंवा गैरसमजांमुळे उत्पन्‍न होतो

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा