वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g97 ९/८ पृ. २८-२९
  • जगावरील दृष्टिक्षेप

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जगावरील दृष्टिक्षेप
  • सावध राहा!—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • पुस्तक वाचण्याचा छंद अद्यापही लोकप्रिय
  • “अज्ञात शत्रुंचा” तपास
  • “पवित्र” माकडे—डोक्याला ताप
  • पुन्हा एकदा पाण्याचा वापर
  • आता—हेपटायटीस जी
  • “सहस्रावधीचा दोष”
  • हत्तीच्या विष्ठेचा कागद
  • अन्‍नातून होणारे संसर्ग
  • पटकीचा विनामूल्य प्रतिबंध
  • आमच्या वाचकांचे मनोगत
    सावध राहा!—१९९८
  • रक्‍त संक्रमण–किती सुरक्षित?
    रक्‍ताने तुमचे जीवन कसे वाचू शकते?
सावध राहा!—१९९७
g97 ९/८ पृ. २८-२९

जगावरील दृष्टिक्षेप

पुस्तक वाचण्याचा छंद अद्यापही लोकप्रिय

पॉलिसी स्टडिझ इन्स्टिट्यूटच्या एका सर्वेक्षणानुसार ब्रिटिश लोकांच्या वाचन सवयी संगणक तंत्रज्ञानाने अद्याप बदलायच्या आहेत. द टाईम्समध्ये वृत्त दिल्यानुसार, “सर्वेक्षण घेतलेले जवळजवळ निम्मे लोक केवळ मन रमवण्यासाठी सध्या पुस्तक वाचत होते असे म्हणाले, या संख्येत १९८९ पासून आतापर्यंत जास्त काहीच फरक पडलेला नाही.” पुरुषांपेक्षा स्त्रिया जास्त वाचन करतात आणि त्यातल्या त्यात ५५ पेक्षा अधिक वय असलेले लोक तर अधिकच वाचन करतात. सर्वात जास्त वाचन पाककृती पुस्तकांचे केले जाते आणि त्या मागोमाग गुन्हे किंवा थरारक गोष्टींची पुस्तके, रोमान्स कादंबऱ्‍या आणि २० व्या शतकातल्या कथा-कादंबऱ्‍यांचा नंबर लागतो. ३० टक्के घरांमध्ये संगणक असले, तरीही त्यांपैकी केवळ ७ टक्के संगणकांमध्ये पुस्तकांचा स्पर्धक, सीडी-रॉम वापरला जाऊ शकतो. टाईम्स म्हणते की, लॅपटॉप संगणक जसा, सुटीमध्ये समुद्रकिनाऱ्‍यावर गेलेले असताना वाळूमुळे किंवा गजबजलेल्या सबवेमधल्या धक्काबुक्की देणाऱ्‍या गर्दीमुळे खराब होऊ शकतो तसे एखादे पुस्तक खराब होत नसते; शिवाय कलापूर्ण पद्धतीने तयार केलेले पुस्तक “मनोरंजक असू शकते आणि त्यातली माहिती ज्ञानवर्धकही असू शकते.”

“अज्ञात शत्रुंचा” तपास

सन १९९७ मध्ये, इटलीतल्या रोममधील रहिवाश्‍यांना ॲलर्जी किंवा पराग ज्वर एरवीपेक्षा दोन महिन्यांआधीच येऊ लागला असे वृत्त कोरीरे डेला सेरा देते. “ग्रहाचे साधारण तापमान वाढल्यामुळे हिवाळ्याचा कालावधी उल्लेखनीयरित्या कमी झाला आहे” आणि म्हणून परागकणांचा त्रास लवकरच सुरू झाला असे एका ॲलर्जीस्टचे म्हणणे आहे. हे वृत्तपत्र असे निरीक्षण करते की, “या उत्तम ऋतुमुळे अज्ञात परागकण आले आहेत आणि या क्षेत्रातले तज्ज्ञ त्यासाठी काहीच करू शकलेले नाहीत.” “अज्ञात कारणाचा शोध” जारी आहे पण दरम्यान, “रुग्णांना ॲलर्जींचा त्रास होत आहे आणि त्यांची कारणे ठरवता येत नाहीत.”

“पवित्र” माकडे—डोक्याला ताप

भारतातल्या वृंदावनमध्ये ऱ्‍हिसस माकडे वर्षानुवर्षे राहिले आहेत, असे प्रायमॅटोलॉजिस्ट इक्बाल मलिक म्हणतात. पुष्कळजण या माकडांना पवित्र मानतात आणि त्या पवित्र हिंदू शहरात ती बिनदिक्कतपणे वावरत आली आहेत—निदान आतापर्यंत तरी. नव वैज्ञानिक (इंग्रजी) पत्रिकेनुसार, तेथे जाणारे अधिकाधिक तीर्थयात्री माकडांना खाऊ घालत असल्यामुळे अलिकडील वर्षांमध्ये तिथल्या ऱ्‍हिसस माकडांची संख्या अतिशय वाढली आहे. माकडांना खाऊ घातल्याने संपन्‍नता मिळते असा समज आहे. तथापि, गेल्या काही वर्षांपासून ही माकडे पूर्णतः लोकांच्या चारण्यावरच अवलंबून राहत होती कारण जंगल काही उरलेलेच नाही. “आता ही माकडे पिशव्या हिसकावून नेऊ लागलीत आणि अन्‍नाच्या शोधात घरांमध्ये शिरकाव करू लागलीत.” तेथील रहिवाशी, ६० टक्के माकडांना धरून इतर ग्रामीण भागांमध्ये सोडायला राजी झाले आहेत. मलिक म्हणतात: “हे देव तर डोक्याला ताप झालेत.”

पुन्हा एकदा पाण्याचा वापर

“ओझोन पातळीवर विपरीत परिणाम न होणाऱ्‍या अग्निशामक रसायनाचा दीर्घकालीन शोध सरतेशेवटी . . . पाण्यावरच येऊन थांबला,” असे नव वैज्ञानिक (इंग्रजी) म्हणते. “प्रयोगातल्या शेकडो अग्नी शमवल्यावर, ट्रॉन्डहेममधील नॉर्वेजियन अग्नी संशोधन प्रयोगशाळेने हा निष्कर्ष काढला, की अग्निशामकांमध्ये अद्याप सर्रास वापरल्या जाणाऱ्‍या ओझोन-नाशक हॅलोन्ससाठी पाण्याचे तुषार हाच उत्तम पर्याय आहे.” हॅलोन्स—कार्बन, ब्रोमीन आणि फ्लोरीनचे घटक—आगीला शमवतात. पाण्याच्या तुषारांनीही हेच होते; हे तुषार ऑक्सीजनला घालवण्यासाठी बाष्पात रूपांतर होऊन त्यांच्या मूळ आकारमानापेक्षा १,७०० पटीने विस्तारतात. जास्त धूर असलेल्या लहान आगींमध्येच हे तुषार हॅलोन्सपेक्षा कमी प्रभावकारी ठरले कारण पाण्याचे बाष्पीभवन व्हायला पुरेसे तापमान वाढले नव्हते. पण, अजूनही हॅलोन्ससाठी कृत्रिम पर्याय शोधले जात आहेत कारण पाण्याची आणखी एक समस्या म्हणजे: त्यातून जास्त पैसा कमावता येत नाही.

आता—हेपटायटीस जी

जपानमधल्या डॉक्टरांनी निश्‍चित केले की, रक्‍त संक्रमणे घेतल्यानंतर एका महिन्याच्या आतच रुग्णांना हेपटायटीस जी व्हायरसचे संक्रमण झाले; या नवीन प्रकाराचा शोध संयुक्‍त संस्थानांत १९९५ मध्ये लागला होता. टोकियोच्या टोरॉनोमॉन इस्पितळात १९९२ ते १९९४ दरम्यान, यकृताचा कर्करोग असलेल्या ज्या रुग्णांनी शस्त्रक्रिया करवून घेतली त्यांचे रक्‍त पुन्हा तपासल्यानंतर डॉक्टरांच्या लक्षात आले की, ५५ रुग्णांपैकी २ जणांना शस्त्रक्रियेआधी लागण झाली होती तर आणखी ७ जणांना शस्त्रक्रियेनंतर लागण झाली. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, सातही रुग्णांमधल्या प्रत्येकाला रक्‍तदान केलेल्या सरासरी ७१ लोकांकडून दूषित रक्‍त मिळाले; त्यामुळे वापरलेल्या रक्‍त साठ्यापैकी १.४ टक्के साठा नवीन विषाणूने दूषित झाल्याचे निष्पन्‍न झाले. असाही इव्हनिंग न्यूझ यानुसार, हेपटायटीस जी व्हायरसविषयी किंवा हा विषाणू असलेल्या किती टक्के लोकांना हेपटायटीस अथवा यकृताचा कर्करोग होईल याविषयी अतिशय कमी माहिती आहे.

“सहस्रावधीचा दोष”

“सहस्रावधीचा दोष, सन २००० ची समस्या किंवा सरळसोपे ‘Y2K’ म्हणून ओळखली जाणारी ही समस्या, आधुनिक बेरीज करण्यातली सर्वात भयकारी समस्या आहे,” असे यू.एस.न्यूझ ॲण्ड वर्ल्ड रिपोर्ट म्हणते. तिची सुरवात १९६० च्या दशकात झाली जेव्हा संगणक अतिशय महाग होते आणि त्यांची स्मरणशक्‍ती मर्यादित होती. कमीत कमी जागा वापरण्यासाठी, प्रोग्राम लिहिणारे केवळ वर्षाचे शेवटले दोन अंकच वापरून तारखा घालत असत. संगणक, १९९७ या वर्षाला केवळ “९७” या अंकांनी ओळखत असत. पण समस्या कोणती निर्माण झाली? “जाने. १, २००० रोजी जगातले जवळजवळ ९० टक्के संगणक हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर, तो सन १९०० चा पहिला दिवस आहे असे ‘समजतील’.” अशा चुका आधीच झाल्या आहेत. “एका राज्य तुरुंगात, या दोषामुळे संगणकांनी अनेक तुरुंगवासीयांच्या शिक्षेची चुकीची गणना केल्यामुळे त्यांची सुटका करण्यात आली,” असे न्यूझवीकमध्ये सांगण्यात आले. “‘००’ या अंतिम मुदतीच्या तारखांमुळे संगणकांना घोटाळा झाल्याने दुकानांमध्ये आणि रेस्टॉरन्ट्‌समध्ये काही क्रेडिट काड्‌र्स नाकारण्यात आले. शिवाय, अनेक राज्यांमध्ये संगणकांना सहस्रावधीनंतरच्या तारखा असलेले नवीनीकरण अर्ज हाताळता आले नाहीत तेव्हा अनेक ट्रक चालकांचे आंतरराज्यीय परवाने रद्द करण्यात आले.” तारखांचे संकेत बदलण्यासाठी जगभरात संस्थांना अंदाजे ६०० अब्ज डॉलर खर्च करावे लागतील—आणि उर्वरित दोन वर्षांमध्ये हे पार पाडता येईल याची ते आशा धरतात.

हत्तीच्या विष्ठेचा कागद

जेव्हा माइक बुगारांच्या अंगणात हत्तीची विष्ठा मडक्यांमध्ये उकळत असलेली शेजाऱ्‍यांनी पाहिली तेव्हा साहजिकच त्यांना चिंता वाटू लागली. काहींना वाटले, हा चेटूकाचा प्रकार असावा, पण वास्तविक पाहता ते कागद तयार करत होते. श्री. बुगारांनी प्रथम केळीच्या, मक्याच्या आणि निलगिरीच्या पानांपासून कागद तयार केला. पण, केनियातल्या हत्तींची तंतूमय विष्ठा भरपूर प्रमाणात उपलब्ध असल्याने हे उत्सुक पर्यावरण संरक्षणवादी यातून कागद तयार करता येईल का याच्या विचारात मग्न झाले. “हत्तींचे संरक्षण करण्याच्या महत्त्वाविषयी जनजागरण” वाढवण्याचा हा उत्तम मार्ग ठरेल असा निश्‍चय त्यांनी केला असे वृत्त नव वैज्ञानिक पत्रिका देते. या वर्षी असलेल्या केनिया वन्यजीवन सेवेच्या ५० व्या जन्मदिन आमंत्रण पत्रिकांसाठी त्याने तयार केलेल्या हत्तीच्या विष्ठेच्या कागदाचा वापर केला जात आहे.

अन्‍नातून होणारे संसर्ग

“वर्षभर विविध ताज्या फळ-भाज्यांच्या” वाढत्या मागणीच्या जोडीला “जगभर रातोरात एका ठिकाणाहून दुसऱ्‍या ठिकाणी उत्पादने पोस्त करणाऱ्‍या जागतिक बाजारपेठेमुळे” संयुक्‍त संस्थानांत अन्‍नातून संक्रमित होणाऱ्‍या नव-नवीन आजारांच्या निर्मितीला हातभार लागत आहे असे वृत्त जामा (द जर्नल ऑफ द अमेरिकन मेडिकल असोसिएशन) देते. गेल्या दहा वर्षांमध्ये घेतलेल्या अभ्यासांनुसार शास्त्रज्ञ असा अंदाज काढतात की, अन्‍नातल्या सूक्ष्मजंतुंमुळे “संयुक्‍त संस्थानांत दर वर्षी ६५ लाख ते ८.१ कोटी लोक आजारी पडतात, तर सुमारे ९००० मृत्यू संभवतात.” काही तज्ज्ञांचा असाही विश्‍वास आहे, की खतपाणी (शेणखत घातलेल्या अन्‍नाचे) घालून वाढवलेल्या अन्‍नाचे अधिक सेवन केल्याने या समस्येत भर पडत असावी. जामाच्या अहवालानुसार, “गाईच्या शेणखतामध्ये इ कोली ७० दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतो आणि हे सूक्ष्मजंतू ठार मारण्यासाठी उष्णता न दिलेले किंवा मिठासारखे ॲडिटिव्ह अथवा प्रिझर्व्हेटिव्ह्स (प्रतिरक्षके) न वापरलेले खत घालून वाढवलेल्या अन्‍नामध्ये त्यांची वाढ होऊ शकते.”

पटकीचा विनामूल्य प्रतिबंध

पटकीचा प्रतिबंध करण्यासाठी शास्त्रज्ञांना विनामूल्य पद्धतीचा शोध लागल्याचा त्यांचा विश्‍वास आहे—ती पद्धत म्हणजे साडीतून पिण्याचे पाणी गाळून घेणे! पटकी ज्यांमुळे होते ते सूक्ष्मजंतू, पाण्यातल्या प्लँक्टनसारख्या कवचधारी कोपपॉड प्राण्यांच्या आंतड्यांत असतात असे संयुक्‍त संस्थानांतल्या मॅरीलंड विद्यापीठेतील तसेच बांगलादेशच्या ढाका येथील अतिसार रोग संशोधनाच्या आंतरराष्ट्रीय केंद्रामधील संशोधकांना आढळून आले आहे. साडीच्या कापडाच्या चार पदरी गाळणीतून पाणी गाळून घेतल्याने ९९ टक्क्यांपेक्षा अधिक पटकीचे सूक्ष्मजंतू काढले जाऊ शकतात. मग साडी दोन तास थेट उन्हात ठेवून किंवा पावसाळ्यात, अगदीच स्वस्त जंतुनाशक औषधातून काढून निर्जंतुक केली जाऊ शकते. या वर्षी, संसर्गित भागांमध्ये राहणाऱ्‍या लोकांना हे करण्याचे शिकवल्यावर त्याचा प्रयोग करून पाहिला जाईल असे वृत्त लंडनचे बातमीपत्र द इन्डिपेन्डेन्ट देते.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा