वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g97 ९/८ पृ. ३०
  • आमच्या वाचकांचे मनोगत

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आमच्या वाचकांचे मनोगत
  • सावध राहा!—१९९७
  • मिळती जुळती माहिती
  • आमच्या वाचकांचे मनोगत
    सावध राहा!—२००२
सावध राहा!—१९९७
g97 ९/८ पृ. ३०

आमच्या वाचकांचे मनोगत

शिवीगाळ “दुखावणाऱ्‍या शब्दांपासून सुखावणाऱ्‍या शब्दांपर्यंत” (ऑक्टोबर २२, १९९६, इंग्रजी) ही लेखमाला, यहोवाला आपल्याविषयी किती काळजी आहे हे दाखवणाऱ्‍या अनेक लेखांचा केवळ एक भाग आहे. “मद्यासक्‍त आणि त्यांच्या कुटुंबांसाठी मदत” (मे २२, १९९२, इंग्रजी), “स्त्रिया—आदरास पात्र” (जुलै ८, १९९२, इंग्रजी), “घटस्फोटितांच्या मुलांकरता मदत” (एप्रिल २२, १९९१, इंग्रजी), आणि “घरातली हिंसा कधी थांबेल का?” (फेब्रुवारी ८, १९९३, इंग्रजी) या लेखांनी, मला अनेक वर्षांपासून एका दारूड्या नवऱ्‍याकडून होत असलेल्या भावनिक अत्याचारात टिकवून ठेवले आहे. हे लेख वाचल्यावर माझ्या डोळ्यांमधून आनंदाचे आणि दुःखाचेही अश्रू वाहू लागले. आमचे गुप्त भय, दुःख आणि वेदना जाणणाऱ्‍या देवासाठी माझे अंतःकरण कृतज्ञतेनं ओसंडून वाहतं.

जे. सी., कॅनडा

हे लेख मला स्पर्शून गेले. माझ्या पतीसमोर माझी जी स्थिती होती अगदी तिचेच वर्णन त्यांच्यात होते. प्रत्येक वाक्य मी डोळे मिटून मान्य करू शकते. तुम्ही स्त्रियांना अत्यंत प्रेमळ वागणूक देता आणि यावरून यहोवा या संघटनेचा उपयोग करत असल्याची खात्री मला पटते.

पी. एस., जर्मनी

या लेखांनी मला माझ्या तोंडावर ताबा ठेवून माझ्या दुर्बलतेवर मात करायला उत्तेजन दिलंय. मी माझ्या पतीसोबत कसं वागायला हवं हे मला आता कळतंय. हे लेख वाचून माझे डोळे अश्रुंनी डबडबले.

जी. आय., ऑस्ट्रिया

मी कित्येक वर्षांपासून माझ्या पतीकडून शिवीगाळ सहन केलीय. देवाच्या आत्म्याची फळे विकसित करून आणि स्वतःला पूर्णवेळेच्या प्रचार कार्यात व्यस्त ठेवून मी कशीबशी निराशा टाळू शकले आहे. तुमच्या लेखांमुळे मी एकटीच नाही—माझ्या समस्या कुणाला तरी समजतात असं वाटलं.

एम. एन., इटली

मी तुमचे अनेक लेख वाचलेत, पण या लेखांनी मला अगदीच हेलावून सोडलं. पृष्ठ ९ वरचा फोटो पाहून माझ्या डोळ्यांसमोर माझ्या आईचं किंवा बहिणीचंच चित्र उभं राहिलं ज्यांनी कित्येक वर्षं आपल्या पतींकडून छळ सोसलाय. मी या लेखांच्या प्रती काढल्या आणि मला परिचित असलेल्या इतरांना पाठवल्या ज्यांना असलाच त्रास होत आहे. आम्ही देवाच्या नवीन जगाची वाट पाहून आहोत जिथं कोणत्याच प्रकारची शिवीगाळ होणार नाही.

बी. पी., केनिया

मी हे नियतकालिक माझ्या एका मामांना दिलं जे माझ्या मामीचा छळ करायचे तेव्हा त्यांनी पुष्कळदा ते वाचून काढलं. नंतर, त्यांनी आपल्या पत्नीचा छळ बंद केला आणि त्यांच्या घरात त्यापुढं भांडणतंटा झाला नाही असं आम्हाला दिसून आलं. त्यांनी व त्यांच्या पत्नीनेही स्वतःला समजून घेण्याची मदत केल्याबद्दल माझे आभार मानले. हेच आभार मी सावध राहा! नियतकालिकाला सुपूर्त करू इच्छते.

एफ. एफ., नायजेरिया

मार्गदर्शन “बायबलचा दृष्टिकोन: तुम्ही कोणाच्या मार्गदर्शनावर भरवसा करू शकता?” (नोव्हेंबर ८, १९९६, इंग्रजी) हा लेख मला अत्यंत आवडला. मला त्यातून खूप सांत्वन आणि उत्तेजन मिळालं. इतर अनेकांप्रमाणेच, गतकाळात ज्यांच्यावर मी मार्गदर्शनासाठी अवलंबून होते त्यांनी मला निराश केल्यामुळे मला फार दुःख झालं होतं. वडिलांचा हात धरलेल्या लहान लेकराचं चित्र पाहून माझ्या डोळ्यात अश्रू आले. यशया ४१:१३ इथं, यहोवा आपल्या लोकांचा ‘हात धरील’ असं म्हणतो हे ऐकल्यावर किती बरं वाटलं.

एम. एस., संयुक्‍त संस्थाने

मी १७ वर्षांची आहे आणि अलिकडेच माझ्यावर समस्यांचं आभाळंच कोसळलंय. एका मैत्रिणीनं मला प्रार्थना करायला आणि आध्यात्मिक विषयांबद्दलचं काहीतरी वाचायला सांगितलं. “तुम्ही कोणाच्या मार्गदर्शनावर भरवसा करू शकता?” हा लेख वाचल्यावर, आशा सोडून देऊ नये तर स्वर्गीय पित्याचा हात आणखी घट्ट पकडावा असाच मी निश्‍चय केला!

के. जी., संयुक्‍त संस्थाने

ओलीस मी तुरुंगवासी असून मला तुरुंगातून बाहेर निघायला आणखी दोन वर्षं आहेत. “तुरुंगातल्या बंडखोरीत आम्हाला ओलीस ठेवले होते.” (नोव्हेंबर ८, १९९६, इंग्रजी) हा लेख मी दोनदा वाचला. प्रत्येक वेळा माझे डोळे अश्रुंनी डबडबले आणि माझा कंठ दाटून आला. या तुरुंगात यहोवाच्या साक्षीदारांच्या भेटींसाठी मी नेहमी आसुसलेला असतो. त्या खूप आल्हाददायक असतात!

जे. के., संयुक्‍त संस्थाने

मी या आधी तुम्हाला कोणत्याही लेखाबद्दल कधीच लिहिलं नाही, पण ओलीसांविषयीचा लेख खरोखरच विश्‍वास बळकट करणारा होता. यहोवा संकटात सापडलेल्या आपल्या लोकांना निश्‍चित बळ देतो याची मला पुन्हा एकदा खात्री पटली.

के. डी., संयुक्‍त संस्थाने

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा