वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g97 ६/८ पृ. ११-१३
  • देव कायम माझा मित्र राहील का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देव कायम माझा मित्र राहील का?
  • सावध राहा!—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • “शरीरात एक काटा”
  • संकटांवर मात करण्यासाठी साहाय्य
  • देवाची मदत कशी प्राप्त करावी
  • देवासमवेत कार्य करणे
  • “परमेश्‍वर किती चांगला आहे ह्‍याचा अनुभव घेऊन पाहा”
  • ‘शरीरातील काट्याला’ तोंड देणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • यहोवाचे सामर्थ्य मानवी कमतरतांमुळे प्रकट होते
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • अशक्‍त असूनही सशक्‍त
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • तुमच्या “शरीरात एक काटा” आहे का?
    आमची राज्य सेवा—१९९८
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९७
g97 ६/८ पृ. ११-१३

युवा लोग पूछते हैं . . .

देव कायम माझा मित्र राहील का?

दावीद राजा एक असा मनुष्य होऊन गेला, ज्याने देवाबरोबरील मैत्रीचा पुरेपूर आनंद लुटला. परंतु, एके क्षणी तो उद्‌गारला: “माझ्या हृदयाचे क्लेश वाढले आहेत.” केवळ इतरांकडून होणाऱ्‍या गैरवागणुकीमुळेच नव्हे तर आपल्या स्वतःच्या अपराधांपायी देखील दावीद व्यथित झाला होता. त्याला असे वाटू लागले जणू देवानेसुद्धा आपल्याकडे पाठ फिरवली आहे आणि यामुळेच त्याने प्रार्थना केली: “माझ्याकडे वळ आणि माझ्यावर दया कर, कारण मी निराश्रित व पीडलेला आहे.”—स्तोत्र २५:११, १६-१९, पं.र.भा.

कदाचित, तुम्हालाही व्यथित झाल्यासारखे वाटत असेल. कुटुंबात अथवा शाळेत, तुम्ही कदाचित एका अत्यंत अनिष्ट स्थितीत लोटले गेले असाल जी काही केल्या न पेलवणारी आहे. याव्यतिरिक्‍त, तुम्हाला आरोग्याच्या गंभीर समस्या असतील किंवा तुमच्या वाट्याला आलेल्या काही दौर्बल्यांमुळे तुम्ही हताश झाला असाल. कारण काहीही असो, पण तुम्हाला एकट्याला ही व्यथा सहन करण्याची गरज नाही; देव, दिलदारपणे आपली मैत्री आणि पाठबळ आपल्याला देऊ करतो.a तुम्ही आधीच त्याच्याबरोबर एक नातेसंबंध जोपासण्यास सुरवात केली असल्यास, तुम्हाला हे जाणून हायसे वाटेल, की त्याचे मित्र कठीण काळातून जात असता तो त्यांचा कदापिही त्याग करत नाही. असे असले तरी, तुमच्यावर समस्यांची आतषबाजी होत असता तुम्हाला असे भासेल जणू देव खूप खूप दूर आहे. तुम्हाला असेही वाटेल, की तो तुम्हाला काहीएक मदत करत नाही. परंतु, हे सगळे खरे आहे का?

“शरीरात एक काटा”

प्रथम, कृपया २ करिंथकर १२:७-१० वाचा. तिथे, “शरीरात एका काटा” असे म्हटल्या जाणाऱ्‍या काही गोष्टीमुळे प्रेषित पौल कसा व्यथित झाला होता याबद्दल तो सांगतो. हा “काटा” बहुधा, कोणतीतरी शारीरिक विकलता, कदाचित त्याच्या दृष्टिसंबंधी असावी. तो काटा काहीही असो, परंतु तो भावनिकरित्या त्याला ‘सतत चपराक’ मारत होता. “काटा” दूर करण्यासाठी तीन वेळा देवाकडे कळकळीची विनंती करून देखील तो तसाच राहिला.

यहोवा पौलाच्या प्रार्थनेकडे दुर्लक्ष करत होता का? निश्‍चितच नाही! देवाने त्यास म्हटले: “माझी कृपा तुला पुरे आहे; कारण अशक्‍तपणातच शक्‍ति पूर्णतेस येते.” देवाने जरी तो “काटा” दूर केला नाही तरी त्याने पौलाला वाऱ्‍यावर सोडले नाही. देवाच्या अपात्री कृपेमुळे पौलाने देवाबरोबरील एक घनिष्ट नातेसंबंध अनुभवला. पौलाला आपल्या विकलतेवर मात करण्यासाठी हे “पुरे” होते. असे करण्यासाठी संघर्ष करत असता, पौलाला एका अभिनव व वैयक्‍तिक मार्गाने देवाच्या अविरत शक्‍तीचीही प्रचिती येणार होती.

संकटांवर मात करण्यासाठी साहाय्य

पौलाप्रमाणे तुमच्यामध्येही, तुम्हाला सतत टोचणारा, तुम्हामध्ये नैराश्‍य आणि नाउमेदी निर्माण करणारा कोणता तरी “काटा” अथवा समस्या असेल. देवाने पौलाच्या बाबतीत केले अगदी तसेच समस्या जारी राहण्याची तो अनुमती देईल. पण त्याचा अर्थ, तो आता तुमचा मित्र राहिला नाही असा होत नाही. देवाने प्रेषित पौलाला सांगितले: “अशक्‍तपणातच [माझी] शक्‍ति पूर्णतेस येते.” (तिरपे वळण आमचे.) तुमच्या स्वतःच्या शक्‍तीवर नव्हे तर देवाच्या शक्‍तीवर विसंबून राहिल्यास तुम्ही तग धरून राहू शकता. तुम्हाला पूर्वी अशक्य वाटणाऱ्‍या गोष्टी आता देवाच्या आत्म्याच्या मदतीने तुम्ही साध्य करू शकता हे देखील तुमच्या प्रत्ययास येईल. पौलाने म्हटले: “दुर्बलता, . . . ह्‍यात मला संतोष आहे; कारण जेव्हा मी अशक्‍त तेव्हाच मी सशक्‍त आहे.”

मायाb नामक एका तरुणीला याच्या सत्यतेची प्रचिती आली. वयाच्या १४ व्या वर्षी, काचबिंदुमुळे तिने आपली दृष्टी गमावली. त्याच वर्षी अचानक तिच्या आईचा मृत्यू झाला. या दुखऱ्‍या ‘काट्यांशी’ लढत देण्यास सुरवात करण्याविषयी माया म्हणते: “आता यहोवाशिवाय माझं कोणीच नव्हतं. मला हे ठाऊक होतं, की जर एक यशस्वी लढत द्यायची असेल तर मला यहोवाच्या निकट राहायलाच हवं.” मायाने अगदी हेच केले आणि सरतेशेवटी एक पूर्ण वेळेची सुवार्तिक म्हणून तिने सेवा केली. ती म्हणते: “सर्व गोष्टीत यहोवानं मला मदत करावी अशी मी त्याच्याकडं विनवणी केली. आणि त्यानं निश्‍चित माझी मदत केली.”

अनेक तरुणांना याची जाणीव झाली आहे, की संकटांचा अनुभव, खरे तर त्यांना देवाच्या अधिक जवळ येण्यास सहायक ठरतो. तरुण जेफचेच उदाहरण विचारात घ्या. त्याच्या बाबांनी कुटुंबाला वाऱ्‍यावर सोडून दिले; आणि एकट्या जेफच्या आईला सात मुलांचे संगोपन करावे लागले. त्यावेळी अवघ्या १२ वर्षांचा असलेला जेफ कबूल करतो की, “बाबांची उणीव मला तीव्रपणे भासू लागली. दररोज निर्माण होणारी भावनिक पोळकी कोणीतरी भरून काढावी असं मनापासून मला वाटू लागलं.” जेफने काय केले बरे? “ही गरज तृप्त करण्यासाठी मी यहोवाकडं प्रार्थना केली.” आपल्या प्रार्थनांच्या एकवाक्यतेत त्याने कृती केली आणि आध्यात्मिक कार्यहालचालींत तो पूर्णपणे गर्क झाला. योग्य समयी, यहोवाच्या पाठबळाची—उभारणी देणाऱ्‍या त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे आणि ख्रिस्ती मंडळीद्वारे पुरवलेल्या पाठबळाची जेफला जाणीव होऊ शकली. (पडताळा स्तोत्र २७:१०) आता वयाच्या २७ व्या वर्षी तो आठवून सांगतो: “माझं संरक्षण करू शकेल असं कोणीच नव्हतं, त्यामुळं मी यहोवाच्या अगदी समीप गेलो.” या घनिष्ट नातेसंबंधास तो, “या संकटप्रसंगातून परिणीत होणारा एक बहुमोल आशीर्वाद” असे संबोधतो.

देवाची मदत कशी प्राप्त करावी

तुमचा स्वर्गीय पिता तुमच्या संकटप्रसंगी तुम्हालाही मदत करील यात काही शंकाच नाही. परंतु, तुम्ही काय केले पाहिजे? कोणतीही मैत्री बहरायची असेल तर त्यासाठी दळणवळणाची आवश्‍यकता आहे. प्रार्थनेमार्फत आपण देवाबरोबर दळणवळण राखू शकतो. त्याद्वारे आपण त्याला हे दाखवून देतो, की आपल्याला त्याच्या मदतीची गरज आहे. तथापि, प्रार्थना ही भावनाशून्य अथवा यांत्रिक असल्यास ती कवडीमोलाची ठरेल. वर उल्लेखिलेल्या युवकांप्रमाणे तुम्ही देवासमोर ‘आपले मन मोकळे केले’ पाहिजे! (स्तोत्र ६२:८) तुम्हाला विनंत्या करण्याचीही आवश्‍यकता असेल. (फिलिप्पैकर ४:६) विनंत्यांचा अर्थ, अशा प्रार्थना ज्या विशेषकरून आवेशी व कळकळीच्या असतात.

समजा, तुम्हाला तुमच्या विचारांवर ताबा ठेवण्यासंबंधी अथवा एखाद्या वाईट सवयीवर मात करण्यासंबंधी काही समस्या आहे. मग यहोवाकडे विनंती करा! मोहपाशाच्या प्रसंगी त्याच्याकडे मदतीची याचना करा. असे करणे नेहमीच सोपे नसेल. गॅरी असे कबूल करतो: “काही वाईट गोष्ट करण्याची मला तीव्र इच्छा होते तेव्हा प्रार्थना करण्यास मी स्वतःस भाग पाडतो. कधीकधी मला असं वाटतं, ‘मी कोणतं तोंड घेऊन यहोवापुढं जाऊ?’ असं वाटत असलं, तरीही मी त्याच्याकडे मदतीकरता विनवणी करतो. तग धरून राहण्यास आवश्‍यक असलेलं सामर्थ्य तो मला पुरवतो.” असे करणे सुरवातीला कठीण वाटत असले तरी देवाकडे आपले हृदय मोकळे करत राहा.

परंतु, तुमच्या प्रार्थना निरुत्तरित राहात असल्याचे भासल्यास काय करावे? उदाहरणार्थ लिला, हस्तमैथुनाच्या घाणेरड्या सवयीवर मात करण्यास खूप झटत होती. “मी प्रामाणिकपणे या समस्येविषयी यहोवाशी बोलायचे, पण काही केल्या ती सवय सुटत नव्हती,” असे स्पष्टीकरण ती देते. काही वेळा, आपल्या विनंत्यांसंबंधी आपल्याला किती गांभीर्य वाटते हे प्रदर्शित करण्याची अनुमती देव देईल. (पडताळा स्तोत्र ८८:१३, १४.) यास्तव, आपण प्रार्थनेत तत्पर असावे! (मत्तय ७:७; रोमकर १२:१२) लिलाने अगदी हेच केले. त्याबरोबरच, सदर विषयावर वॉच टावर संस्थेच्या साहित्यात आढळणाऱ्‍या अंकांतील सूचनाही ती लागू करू लागली.c योग्य समयी, याचे परिणाम तिला दिसून आले. तिला आठवते: “जेव्हाजेव्हा मी यशस्वीरित्या मोहपाशांवर मात करायचे त्या प्रत्येक वेळी मी यहोवाचे आभार मानायचे कारण मला माहीत होते, की यहोवा माझ्या पाठिशी होता.” हे खरे, की तुमच्या समस्यावर प्रभुत्व मिळवण्यास संघर्ष करताना काही वेळा पुन्हा चुकत असल्याचेही तुम्ही अनुभवाल. परंतु, जोवर तुम्ही लढत देता आणि तुमच्या दौर्बल्यांसमोर हेतुपुरस्सर हात टेकत नाही तोवर यहोवा तुमच्या ‘प्रांजळ प्रयत्नांनी’ प्रसन्‍न होईल आणि कायम तुमचा मित्र राहील.—२ पेत्र १:५.

देवासमवेत कार्य करणे

देवाची मदत प्राप्त करण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे त्याचे “सहकारी” होण्याच्या त्याच्या निमंत्रणाचा स्वीकार करणे. (१ करिंथकर ३:९) यात, इतरांना देवाविषयी शिकण्यास मदत करण्यात सहभागी होणे अंर्तभूत आहे. (मत्तय २८:१९, २०) तुम्हाला व्यथित अथवा नाउमेद झाल्याचे वाटते तेव्हा कोणत्याही कार्यात निमग्न होण्याची कल्पना रुचकर वाटणार नाही. तथापि, ‘प्रभूच्या कामात सर्वदा पुष्कळ करत राहिल्यामुळे’ निश्‍चितच मदत होऊ शकेल. (१ करिंथकर १५:५८) निदान तुमच्या समस्यांवर तरी तुम्ही विचार करत बसणार नाहीत. (पडताळा नीतिसूत्रे १८:१.) आधी उल्लेखिलेली माया, आपल्या कठीण काळाबद्दल म्हणते: “यहोवासाठी केलेल्या कार्यामुळेच मला तग धरून राहण्यास मदत मिळाली!”

देवासमवेत कार्य केल्याने, देवाने आपल्याला वाळीत टाकले आहे अशी मनांत कोठेतरी असलेली भावना देखील दूर करण्यास मदत मिळेल. जेव्हा दोन व्यक्‍ती एकाच ध्येयासाठी संघभावाने कार्य करतात तेव्हा ते दोघेही, मित्र या नात्याने एकमेकांच्या अधिक निकट येत नाहीत का? प्रचार कार्यात सहभाग घेत असता तुम्ही वेळोवेळी आव्हानांना सामोरे जाता. मदतीकरता यहोवाकडे वळत असल्याचे तुम्ही पाहता. आणि जेव्हा देव तुमचे श्रम आशीर्वादित करतो तेव्हा त्याच्यासोबतचे तुमचे स्नेहबंधन अधिक वास्तविक बनते. सहकारी म्हणून देवाने तुमच्यावर किती भरवसा ठेवला आहे याची तुम्हाला जाणीव होऊ लागते. हेच तुमच्या आत्मविश्‍वासास खरी चेतना देणारे असू शकते.

उदाहरणार्थ, मंजूला अतिशय असुरक्षित वाटत होते. तिच्या आईने आत्महत्या केली होती आणि छळणूक करणारे तिचे वडील कायम तिची मानहानी करत असत. परंतु, वयाच्या १७ व्या वर्षी ती एक यहोवाची साक्षीदार बनली व तिने प्रचाराचे कार्य हाती घेतले. पूर्ण वेळेची सुवार्तिक या नात्याने आता दहा वर्षे पूर्ण केल्यानंतर ती म्हणते: “या कार्यानं मला पुष्कळ मदत केली आहे कारण यहोवा मला आशीर्वादित करत असल्याचं मी जाणलं. मी स्वतःची समजूत घालत असते की, ‘जर देव माझ्यावर प्रेम करतो तर मग मी निश्‍चितच मौल्यवान आहे.’ यहोवाचं नाव विदित करण्यासाठी तो माझा उपयोग करत असल्यामुळं मला अधिक सुरक्षित वाटतं.”

“परमेश्‍वर किती चांगला आहे ह्‍याचा अनुभव घेऊन पाहा”

एका जीवघेण्या संकटप्रसंगातून शिकस्तीने सुटका झाल्यावर दावीदाने लिहिले, “त्याने [देवाने] माझ्या सर्व भयापासून मला सोडविले.” (स्तोत्र ३४:४, ६, मायना; १ शमुवेल २१:१०-१२) यामुळे आपल्या स्वतःच्या अनुभवावरून दावीद म्हणू शकला: “परमेश्‍वर किती चांगला आहे ह्‍याचा अनुभव घेऊन पाहा; जो त्याच्यावर भाव ठेवितो तो पुरुष धन्य!”—स्तोत्र ३४:८.

दावीदाचा जीव धोक्यात आला त्याप्रमाणे कदाचित तुमचे जीवन कधीही धोक्यात येणार नसले तरी वेळोवेळी ताणतणाव तर निश्‍चितच ओढवतील. ‘तुमच्या हृदयाचे क्लेश वाढतात’ तेव्हा यहोवाकडे याचना करा. (स्तोत्र २५:१७) देव त्याच्यासोबतच्या आपल्या मैत्रीवर पाणी घालेल अशी भयशंका बाळगू नका. तुम्ही निमूटपणे सहन करत राहून यहोवाचे पाठबळ आणि काळजी प्रत्यक्ष अनुभवता तेव्हा “परमेश्‍वर किती चांगला आहे” याचा तुम्ही स्वतः ‘अनुभव घ्याल.’ शिवाय, तो कायम तुमचा मित्र राहील.—याकोब ४:८.

[तळटीपा]

a जुलै २२, १९९५, (इंग्रजी) या आमच्या अंकात “तरुण लोक विचारतात . . . मी खरोखरच देवाचा मित्र होऊ शकतो का?” हा लेख पाहा.

b काही नावे बदललेली आहेत.

c वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित तरुणांचे प्रश्‍न—उपयुक्‍त उत्तरे (इंग्रजी) या पुस्तकातील अध्याय २५ आणि २६ पाहा.

[१२ पानांवरील चित्र]

विपत्काली देव त्याच्या मित्रांना वाऱ्‍यावर सोडतो का?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा