वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g97 २/८ पृ. ७-९
  • लवचिक, तरीही ईश्‍वरी दर्जांना बांधील

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • लवचिक, तरीही ईश्‍वरी दर्जांना बांधील
  • सावध राहा!—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • निर्माता —आपला महान आदर्श
  • खंबीर तरीही लवचिक
  • अति सहिष्णू असण्याचा पाश
  • यहोवासोबत एक दृढ ऋणानुबंध
  • काळ बदलत आहे
  • सहिष्णुता एका टोकापासून दुसऱ्‍या टोकापर्यंत
    सावध राहा!—१९९७
  • सहनशील असणं म्हणजे नेमकं काय?
    सावध राहा!—२०१५
  • योग्य समतोल तुमच्या जीवनात गोडवा आणू शकतो
    सावध राहा!—१९९७
  • तुम्ही खरोखरच सहनशील आहात का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९७
g97 २/८ पृ. ७-९

लवचिक, तरीही ईश्‍वरी दर्जांना बांधील

“सहिष्णू लोक कदापि मुर्ख नसतात आणि मुर्ख लोक कदापि सहिष्णू नसतात,” अशी एक चिनी म्हण आहे. सहिष्णू असण्यात वर्तनाच्या योग्य दर्जांना बांधील असण्याची अपेक्षा अंतर्भूत असल्यामुळे हे एक आव्हान आहे; म्हणूनच उपरोल्लेखित म्हण पुष्कळ काही सांगून जाते. परंतु, आपण कोणत्या दर्जांना बांधील असण्यास हवे? मानवजातीच्या निर्मात्याने आपले वचन, पवित्र बायबलमधील दर्जे अनुसरणे तर्कशुद्ध नसेल काय? देव स्वतः, आपल्या दर्जांनुरूप चालण्यात एक सर्वोत्कृष्ट आदर्श मांडतो.

निर्माता —आपला महान आदर्श

सर्वसमर्थ देव यहोवा, अत्यल्प अथवा अतिरेकी सहिष्णुता प्रदर्शित करत नसल्यामुळे सहिष्णुतेसंबंधी तो परिपूर्णपणे संतुलित आहे. आपल्या नावाला काळिमा फासणारे, मानवजातीला भ्रष्ट करणारे तसेच पृथ्वीतलाचा दुरुपयोग करणाऱ्‍यांसंबंधी तो हजारो वर्षांपासून सहिष्णू राहिला आहे. रोमकर ९:२२ येथे नमूद केलेल्या अहवालाप्रमाणे प्रेषित पौलाने असे लिहिले की देवाने “नाशासाठी सिद्ध झालेल्या क्रोधाच्या पात्रांना मोठ्या सहनशीलतेने [सहिष्णुतेने] . . . वागवून घेतले.” इतक्या काळापर्यंत देवाने सहिष्णुता का दर्शवली आहे बरे? कारण त्याची सहिष्णुता उद्देशपूर्ण आहे.

मानवजातीसंबंधी देव सहनशील आहे कारण “कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्‍चात्ताप करावा अशी आहे.” (२ पेत्र ३:९) निर्मात्याने मानवजातीला बायबल दिले आहे आणि वर्तनाचे दर्जे सर्वत्र विदित करण्याचा आदेशही आपल्या सेवकांना दिला आहे. खरे ख्रिस्ती या दर्जांना बांधील आहेत. पण याचा अर्थ, देवाच्या सेवकांनी सर्व परिस्थितींत सख्त असावे असा होतो का?

खंबीर तरीही लवचिक

अनंत जीवन प्राप्त करू इछिणाऱ्‍यांना येशूने ‘अरुंद दरवाजाने आत जाण्यास’ प्रोत्साहित केले. परंतु, अरुंद दरवाजाने आत जाण्याचा अर्थ संकुचित मनोवृत्तीचे असणे असा होत नाही. चार लोकांत असता निर्दयीपणे हुकूम गाजवण्याकडे वा दुराग्रही बनण्याकडे आपला कल असल्यास ही प्रवृत्ती लगामी धरल्याने, निश्‍चितच सर्वांकरता जीवन अधिक सुखकर होईल. परंतु ते कसे बरे?—मत्तय ७:१३; १ पेत्र ४:१५.

थीऑफॉनो नामक एक ग्रीक भाषिक विद्यार्थीनीने स्पष्टीकरण दिले, की निरनिराळ्या पार्श्‍वभूमी असणाऱ्‍या लोकांच्या सहवासात घालवलेल्या क्षणांनी अशा लोकांना अधिक चांगल्याप्रकारे जाणून घेण्यास तिला साहाय्य केले; ती पुढे म्हणाली: “आपले विचार त्यांच्यावर लादण्याऐवजी त्यांच्या विचारधारेशी स्वतःला जुळवून घेणे महत्त्वाचे आहे.”

अशाप्रकारे, एखाद्यास अधिक जवळून जाणून घेतल्याने, खाण्यापिण्याविषयी त्याच्या आवडीनिवडी तसेच त्याच्या बोलण्याची लकब, आपण विचार केला होता तितकी विलक्षण नसल्याचे प्रत्यंतर आपल्याला येईल. प्रत्येक वेळी काहीसे जास्तच बोलण्याचा अथवा अखेरचा शब्द आपलाच असण्याचा अट्टाहास करण्यापेक्षा त्याचे विचार ऐकल्याने आपण पुष्कळ उपयुक्‍त गोष्टी शिकतो. निश्‍चितच, मनमोकळा स्वभाव असलेल्या लोकांच्या जीवनाचे सार्थक होते.

जेव्हाकधी वैयक्‍तिक आवडीनिवडीचा प्रश्‍न उठतो तेव्हा आपण लवचिक असावे आणि इतरांना त्यांच्या आवडीनिवडीचा आस्वाद घेऊ द्यावा. परंतु, आपल्या निर्मात्याप्रती आज्ञाधारक असण्यासंबंधीच्या वर्तनाचा प्रश्‍न उठतो तेव्हा मात्र आपण खंभीर असण्यास हवे. सर्वसमर्थ देव सर्वच प्रकारच्या वर्तनाचा मज्जाव करत नाही. भूतकाळात आपल्या सेवकांशी केलेल्या व्यवहारांतून त्याने हे दाखवून दिले.

अति सहिष्णू असण्याचा पाश

प्राचीन इस्राएल राष्ट्रातील महायाजक एली देवाचा सेवक होता जो अति सहिष्णू असण्याच्या पाशात सापडला. इस्राएल लोक देवाच्या नियमांचे पालन करण्याची इच्छा दाखवून देवाबरोबर एका कराराच्या नातेसंबंधात बांधले गेले होते. पण एलीचे दोघे पुत्र हफनी व फिनहास लोभी व नीतिभ्रष्ट असून सर्वसमर्थाचा अतिशय अनादर करणारे होते. देवाच्या नियमशास्त्रात पारंगत असताही एलीने त्यांना केवळ सौम्य ताडना दिली आणि शिस्त लावण्यात त्याने हलगर्जीपणा केला. देव दुष्टाई सहन करील असा एक चुकीचा विचार त्याने केला. दौर्बल्य आणि दुष्टाई यांत निर्माता भेद करतो. हेतुपुरस्सर देवाच्या नियमशास्त्राचे उल्लंघन केल्यामुळे एलीच्या पुत्रांना कडक शिक्षा ठोठावण्यात आली—आणि हे अगदी उचित होते.—१ शमुवेल २:१२-१७, २२-२५; ३;११-१४; ४:१७.

आपली मुले वारंवार करत असलेल्या अपराधासंबंधी डोळ्यांवर पट्टी ओढणे, कुटुंबात प्रमाणापेक्षा अधिक सहिष्णू असण्याची किती ही शोकांतिका असेल! ‘यहोवाच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवणे’ किती श्रेयस्कर आहे बरे! याचाच अर्थ, आपण स्वतः आचरणाच्या ईश्‍वरी दर्जांना जडून राहावे व तेच आपल्या मुलांमध्येही बिंबवावेत.—इफिसकर ६:४.

याचप्रमाणे, ख्रिस्ती मंडळीही कोणत्याही परिस्थितीत दुष्टाई सहन करू शकत नाही. जर एखादा सदस्य घोर अपराध करतो व पश्‍चात्ताप करण्याचे नाकारतो तर त्याला काढून टाकण्यात यावे. (१ करिंथकर ५:१९-१३) तथापि, मंडळीच्या आणि कौटुंबिक वर्तुळाच्या बाहेर खरे ख्रिस्ती समाजाला संपूर्णतः बदलण्याचा प्रयत्न करत नाहीत.

यहोवासोबत एक दृढ ऋणानुबंध

चिंतेच्या वातावरणात असहिष्णुता उपजते. तथापि, देवाबरोबर आपला एक निकटचा वैयक्‍तिक नातेसंबंध असल्यास आपणास निर्भय वाटते ज्यामुळे योग्य संतुलन राखण्यास मदत मिळते. “परमेश्‍वराचे [“यहोवाचे,” NW] नाम बळकट दुर्ग आहे, त्यांत धार्मिक धावत जाऊन निर्भय राहतो,” असे आपण नीतिसूत्रे १८:१० येथे वाचतो. खरेच, निर्माता त्याचा उचित समय हाताळणार नाही अशी कोणतीच हानी आपणास अथवा आपल्या प्रिय जणांस पोहंचणार नाही.

देवाबरोबरील एका निकटच्या नातेसंबंधामुळे ज्यास पुष्कळ लाभ झाला तो म्हणजे प्रेषित पौल. शौल म्हणून ज्ञात असलेला एक यहुदी या नात्याने त्याने येशू ख्रिस्ताच्या अनुयायांचा छळ केला आणि तो रक्‍तपातासंबंधी देखील दोषी होता. परंतु, शौल स्वतः एक ख्रिस्ती बनला आणि प्रेषित पौल या नात्याने त्याने पुढे पूर्णवेळेच्या सुवार्तिक कार्यात स्वतःस वाहून घेतले. सर्व लोकांना—“हेल्लेणी व बर्बर, ज्ञानी व अज्ञानी” यांना प्रचार करण्यात पौलाने मनमोकळा स्वभाव प्रदर्शित केला.—रोमकर १:१४, १५; प्रेषितांची कृत्ये ८:१-३.

त्याला हा पालट कसा काय शक्य झाला? शास्त्रवचनांचे अचूक ज्ञान प्राप्त करून आणि निःपक्षपाती निर्मात्याप्रती आपली प्रीती वृद्धिंगत केल्याने त्याला हे शक्य झाले. पौल हे शिकला, की देव न्यायी आहे आणि संस्कृती अथवा जात या धर्तीवर नव्हे तर तो किंवा ती कशी आहे आणि काय करते या धर्तीवर देव न्याय करतो. होय, देवाच्या नजरेत कृती महत्त्वपूर्ण आहे. पेत्राने निरीक्षिले की, “देव पक्षपाती नाही . . . तर प्रत्येक राष्ट्रात जो त्याची भीति बाळगतो व ज्याची कृत्ये नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे.” (प्रेषितांची कृत्ये १०:३४, ३५) सर्वसमर्थ देव पूर्वग्रही नाही. हे, जगातल्या काही नेत्यांच्या अगदी उलट आहे जे आपल्या स्वतःच्या उद्दिष्टांकरता हेतुपुरस्सर असहिष्णुतेचा उपयोग करू शकतात.

काळ बदलत आहे

इंग्लंडच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाचे जॉन ग्रे यांच्यानुसार सहिष्णुता “एक सदगुण आहे जो सध्या फार दुर्मिळ आहे.” पण यात बदल होईल. सहिष्णुता आणि त्याच्या जोडीला असणारी ईश्‍वरी बुद्धी अस्तित्वात असेल.

जवळ येऊन ठेपलेल्या देवाच्या नवीन जगात असहिष्णुता लयास गेलेली असेल. सहिष्णुतेचे अतिरेकी प्रकार अर्थात पूर्वग्रह आणि हटवाद लोप पावतील. आता संकुचित मनोवृत्ती जीवनातील आनंद आटवून टाकणार नाही. मग काश्‍मीरच्या खोऱ्‍यापेक्षाही नेत्रदीपक असे एक परादीस असेल.—यशया ६५:१७, २१-२५.

त्या नवीन जगात वस्ती करण्याची तुम्ही आस धरून आहात का? काय हा विशेषाधिकार आणि ते किती रोमांचक असेल!

[८ पानांवरील चित्र]

प्रेषित पौलाने योग्य संतुलन राखले कारण यहोवाबरोबर त्याचा नातेसंबंध होता

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा