वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g97 २/८ पृ. १०-१२
  • मी माझं पाप कबूल करावं का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मी माझं पाप कबूल करावं का?
  • सावध राहा!—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • “काही गुप्त नाही”
  • वाचा फोडणे
  • आपल्या पालकांजवळ मन मोकळे करणे
  • मदतीकरता वडिलांकडे वळणे
  • ‘बहिष्कृत होण्याची मला भीती वाटते’
  • यहोवाची शिक्षा नेहमी स्वीकारा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
  • तुमच्या हातून गंभीर पाप झालं तर काय?
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
  • दुसऱ्‍यांचा पापकर्मात सहभागी होऊ नका
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
  • दोषी भावना—“माझे पाप दूर करून मला निर्मळ कर”
    यहोवाकडं परत या
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९७
g97 २/८ पृ. १०-१२

तरुण लोक विचारतात . . .

मी माझं पाप कबूल करावं का?

“मला इतकी शरम वाटते, काय करावं तेच समजत नाही. आईबाबांशी बोलावसं वाटतं, पण मला खूप शरम वाटते.”—लिसा.a

असे अत्यंत उद्विग्न मनःस्थितीत असणाऱ्‍या एका तरुणीने लिहिले. काही वर्षांपासून, सत्य न मानणाऱ्‍या एका व्यक्‍तीमध्ये तिचे मन गुंतले होते आणि एके दिवशी मद्याच्या नशेत तिने त्याच्याशी शरीरसंबंध राखले.

खेदाने म्हणावे लागते, की वेळोवेळी अशा गोष्टी चक्क ख्रिस्ती युवकांमध्येही घडत असतात. आपण जितके जवान आणि अननुभवी असतो तितक्या अधिक चुका करण्याकडे बहुधा आपला कल असतो. आपण सगळेच लहानसहान चुका करत असलो तरी लैंगिक अनैतिकता यासारख्या गंभीर अपराधात स्वतःला गोवणे ही एक गंभीर स्वरूपाची बाब आहे. (१ करिंथकर ६:९, १०) असे घडते तेव्हा एखाद्या युवकाला मदत प्राप्त करणे आवश्‍यक असते. मात्र समस्या ही आहे, की आपले अपराध कबूल करणे वाटते तितके सोपे नाही.

एका ख्रिस्ती मुलीने विवाहापूर्वी लैंगिक संबंध राखले होते. तिने मंडळीतील वडिलांजवळ कबूल करण्याचे मनाशी ठरवले येथपर्यंत, की हे केव्हा करणार याकरता तिने एक तारीखही ठरवून टाकली. पण तिने ही तारीख लांबणीवर टाकली. पुढे तिने ही तारीख आणखी लांबणीवर टाकली. पाहता पाहता, एक संपूर्ण वर्ष उलटून गेले.

“काही गुप्त नाही”

तुम्ही एखादे गंभीर पाप केले असल्यास मूग गिळून गप्प बसणे ही सर्वात वाईट कल्पना असल्याची जाणीव तुम्हाला होण्यास हवी. याचे कारण, कधी ना कधी सत्य उघडकीस येतेच. लहान असताना मार्कच्या हातून भींतीवरील सिरॅमिक सजावटीची एक वस्तू मोडली होती. तो सांगतो: “मी ते पुन्हा काळजीपूर्वक जोडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यावरील चीरा पुष्कळ दिवस माझ्या आईबाबांच्या नजरेआड राहिल्या नाहीत.” हे खरे, की तुम्ही काही आता बालक नाहीत. परंतु, आपल्या मुलांचे काही बिघडले असल्यास बहुधा पुष्कळसे पालक ते जाणवू शकतात.

ॲन नामक एक १५ वर्षीय तरुणी म्हणते: “मी खोटं बोलून आपल्या समस्यांवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला, पण परिस्थिती आणखीनच कठीण होऊन बसली.” बहुतेककरून लबाडीचा गौप्यस्फोट होतोच. तुम्ही पालकांना खोटे बोललात हे त्यांना समजते तेव्हा—मोकळ्या मनाने तुम्ही चूक कबूल केल्यानंतर ते जितके क्षुब्द झाले असते त्यापेक्षाही अधिक ते क्षुब्द होण्याची आता शक्यता आहे.

ह्‍यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे, बायबल अशाप्रकारे म्हणते: “प्रगट होणार नाही असे काही गुप्त नाही आणि कळणार नाही आणि उघडकीस येणार नाही असे काही झाकलेले नाही.” (लूक ८:१७, सुबोध भाषांतर) आपण जे काही केले होते व अद्यापही जे काही करत आहोत ते सर्व यहोवाला ठाऊक आहे. ज्याप्रमाणे आदाम, कोणतीच गोष्ट यहोवाच्या नजरेआड ठेवू शकला नाही त्याप्रमाणेच तुम्हीही कुठलीच गोष्ट यहोवाच्या नजरेआड ठेवू शकत नाही. (उत्पत्ति ३:८-११) कालांतराने, तुमची पापेही चारचौघांत कदाचित उघड होतील.—१ तीमथ्य ५:२४.

मूग गिळून गप्प बसणे तुम्हास इतर मार्गांनीही हानी पोहंचवू शकते. स्तोत्रकर्त्या दावीदाने लिहिले: “मी गप्प राहिलो होतो, तेव्हा सतत कण्हण्यामुळे माझी हाडे जीर्ण झाली; कारण रात्रंदिवस तुझ्या हाताचा भार माझ्यावर होता.” (स्तोत्र ३२:३, ४) होय, गुपित ठेवण्याच्या प्रचंड दडपणामुळे भावनिकरित्या तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागेल. विवंचना आणि सदोषता तसेच गौप्यस्फोट होण्याची भीती यांमुळे तुम्ही हवालदिल होऊ शकता. तुम्ही कदाचित आपल्या स्नेहीमंडळींतून व कुटुंबातून अंग काढू लागाल. तुम्हाला असे वाटेल जणू देवानेसुद्धा तुमच्याकडे पाठ फिरवली आहे! अँड्रू नामक एका युवकाने लिहिले: “यहोवाला दुखावल्याच्या एका सदोष विवेकाशी मी झुंज देत होतो. ते सतत माझ्या मनाला खात होतं.

वाचा फोडणे

ह्‍या भावनिक प्रक्षोभातून सुटका मिळवण्याचा काही मार्ग आहे का? होय, निश्‍चित आहे! स्तोत्रकर्ता म्हणाला: “मी आपले पाप तुझ्याजवळ कबूल केले; मी आपली अनीति लपवून ठेविली नाही; . . . तू मला माझ्या पापदोषाची क्षमा केली.” (स्तोत्र ३२:५; पडताळा १ योहान १:९.) अशाचप्रकारे अँड्रूलाही आपले पाप कबूल केल्यावर सुटका मिळाल्यासारखे वाटले. तो सांगतो: “मी मदतीसाठी यहोवाकडे धाव घेतली आणि त्याच्या क्षमेसाठी कळकळून प्रार्थना केली.”

तुम्हीसुद्धा असेच करू शकता. यहोवाला प्रार्थना करा. तुम्ही जे काही केले आहे ते सर्व त्याला ठाऊक आहे तरी प्रार्थनेत नम्रपणे ते सर्व त्याच्याजवळ कबूल करा. आपण खूप दुष्ट आहोत व मदतीस पारखे झालो आहोत अशा विचाराने पीछेहाट करू नका तर क्षमेची याचना करा. आपण अपरिपूर्ण असताही यहोवासमोर आपल्याला एका उत्तम भूमिकेचा आनंद घेता यावा याकरताच येशू मरण पावला. (१ योहान २:१, २) आवश्‍यक ते बदल करण्याकरता तुम्ही सामर्थ्याची मागणी देखील करू शकता. अशा प्रकारे देवाच्या समीप जाण्यास स्तोत्र ५१ चे वाचन करणे तुम्हाला विशेषतः मदतगार ठरू शकते.

आपल्या पालकांजवळ मन मोकळे करणे

केवळ देवापाशी कबूल करणे पुरेसे नाही. तुमच्या पालकांजवळ आपले मन मोकळे करणे तुमचे कर्तव्य आहे. तुम्हाला ‘यहोवाच्या शिस्तीत व शिक्षणात वाढवण्याकरता’ त्यांना देवापासून आदेश मिळालेला आहे. (इफिसकर ६:४) असे करणे त्यांना तेव्हा शक्य होईल जेव्हा त्यांना तुमच्या समस्या समजतील. शिवाय, आईवडिलांपाशी मन मोकळे करणे कदाचित म्हणावे तितके सोपे अथवा सुखावहही नसेल. परंतु, त्यांच्या प्रारंभिक प्रतिक्रियेनंतर ते बहुधा आपल्या भावनांस बांध घालतील. आपली समस्या त्यांच्यापाशी उघड करण्याइतका तुम्ही त्यांच्यावर भाव ठेवला यामुळे ते सुखावतीलही. उधळ्या पुत्राविषयीचा येशूचा दाखला, लैंगिक अनैतिकतेच्या जाळ्यात सापडलेल्या एका तरुणाविषयी सांगतो. परंतु, जेव्हा त्याने हे शेवटी कबूल केले तेव्हा त्याच्या पित्याने त्याचे मनस्वी स्वागत केले! (लूक १५:११-२४) तुमचे पालकही तुमच्या मदतीला धावून येतील यात कोणतीही शंका नाही. काहीही झाले असले तरी शेवटी तुमच्यावर त्यांचे प्रेम तर आहेच.

हे खरे, की तुम्हाला कदाचित तुमच्या पालकांना दुखावण्याची भीती वाटेल. परंतु, पापांची कबुली ही तुमच्या पालकांना दुखावत नसते; तर पाप करणे हे पालकांना दुखावत असते! कबूल करणे, दुःखाचे ते मळभ वितळण्याचे पहिले पाऊल आहे. आधी उल्लेखिलेल्या ॲनने आपल्या पालकांजवळ मन मोकळे केले आणि त्यानंतर तिला खूप हायसे वाटले.b

तथापि, कबूल करण्यास बाधक असणारी दुसरी एक गोष्ट म्हणजे शरम आणि लाज. विश्‍वासू शास्त्री एज्राने स्वतः कोणतीही पापे केली नव्हती परंतु, आपल्या सहयहुद्यांचे पाप कबूल करताना त्याने म्हटले: “हे माझ्या देवा, मला लाज वाटते. मला तुझ्यापुढे तोंड वर करण्यास शरम वाटते.” (एज्रा ९:६) काहीतरी चूक केले असल्यास शरम वाटणे खरोखर योग्यच आहे. तुमचा विवेक अद्याप कार्यरत असल्याचे ते सूचित करते. तसेच कालांतराने, अशा शरमेच्या भावना शमतीलही. अँड्रूने अशाप्रकारे कथन केले: “कबूल करणे ही अतिशय कठीण व लज्जास्पद गोष्ट आहे. पण, यहोवा विपुल प्रमाणात दया दाखविल हे जाणल्याने समाधान मिळते.”

मदतीकरता वडिलांकडे वळणे

तुम्ही एक ख्रिस्ती असल्यास आपल्या पालकांजवळ मन मोकळे केल्याने त्या गोष्टीला पूर्णविराम मिळत नाही. अँड्रू म्हणतो: “मी माझी समस्या मंडळीतील वडिलांच्या कानावर घालावी हे मला माहीत होतं. मला मदत करण्यासाठी ते हजर होते हे जाणून किती हायसं वाटलं!” होय, यहोवाच्या साक्षीदारांमधील युवक, साहाय्य आणि उत्तेजनासाठी मंडळीतील वडिलांकडे जाऊ शकतात आणि त्यांनी गेलेच पाहिजे. परंतु, केवळ यहोवाला प्रार्थना करून त्या गोष्टींचा तुम्ही सोक्षमोक्ष का लावू शकत नाही? कारण ‘तुमच्या जिवांची राखण करण्याची’ जबाबदारी यहोवाने वडिलांवर सोपवलेली आहे. (इब्री लोकांस १३:१७) पुन्हा एकदा पापाच्या गर्तेत पडण्यापासून तुम्हाला सावरण्यासाठी ते तुमच्या पाठीशी असू शकतात.—पडताळा याकोब ५:१४-१६.

तुम्ही स्वतःला सावरू शकता असा तर्क करून स्वतःची फसवणूक करून घेऊ नका. तसे करण्यास तुम्ही खरोखरच जर सक्षम असता तर पहिल्यांदाच तुम्ही पापात पडले असता का? स्पष्टतः, तुम्हाला दुसऱ्‍या कोणाच्या मदतीची गरज आहे. अँड्रूने निडरपणे असेच केले. त्याचा सल्ला? “जो कोणी एखाद्या गंभीर पापात पडला असेल अथवा काही काळापासून गंभीर पाप करत आला असेल अशास मी उत्तेजन देतो, की त्याने यहोवाकडे तसेच यहोवाच्या एखाद्या मेंढपाळाकडे आपले अंतःकरण खुले करावे.”

परंतु, तुम्ही एखाद्या वडिलाकडे कसे जाल बरे? अशा एखाद्या वडिलाकडे जाण्याचे ठरवा ज्यांच्या सहवासात तुम्हाला वाजवीपणे मोकळे वाटते. तुम्ही असे म्हणून सुरवात करू शकता: “मला तुमच्याशी काही बोलायचंय” किंवा “माझी एक समस्या आहे” किंवा असे देखील म्हणू शकता की, “माझी एक समस्या आहे आणि मला तुमची मदत हवीय.” तुमचा प्रामाणिकपणा व मोकळेपणा, तुमचा पश्‍चात्ताप तसेच बदल करण्याची तुमची मनसा प्रकट करील.

‘बहिष्कृत होण्याची मला भीती वाटते’

या संभवतेबद्दल काय? हे खरे, की एखादे घोर पातक करणे एखाद्याला बहिष्कृतीकरता पात्र ठरवते, परंतु असे आपोआपच होत नाही. बहिष्कृती त्यांच्याकरता असते जे पश्‍चात्ताप करण्यास नाकारतात—जे हेकेखोरपणे बदल करण्यास नाकारतात. नीतीसूत्रे २८:१३ म्हणते: “जो आपले दोष झाकितो त्याचे बरे होत नाही, जो ते कबूल करून सोडून देतो त्याजवर दया होते.” ज्या अर्थी मदतीकरता तुम्ही वडिलांकडे धाव घेतली हीच बाब, बदल करण्याच्या तुमच्या इच्छेचा पुरावा आहे. वडीलजन शिक्षा ठोठावणारे नाहीत तर मुख्यतः रोग बरे करणारे आहेत. देवाच्या लोकांना मायेने व सभ्यतेने वागवण्यास ते बांधील आहेत. ‘तुमच्या पायांसाठी सरळ वाटा करण्यास’ तुमची मदत ते करू इच्छितात.—इब्री लोकांस १२:१३.

हे कबूल, की दगलबाजी अथवा दीर्घ काळापासून गंभीर पाप करण्याच्या प्रघाताचा प्रश्‍न उठतो तेव्हा ‘पश्‍चात्तापास शोभणाऱ्‍या खात्रीलायक कृत्यांचा’ अभाव असेल. (प्रेषितांची कृत्ये २६:२०) कधीकधी बहिष्कृतही केले जाते. तसेच, अपराधी पश्‍चात्तापी असला तरी त्याला काहीतरी शिक्षा देण्यास वडील बांधील आहेत. त्यांच्या निर्णयामुळे तुम्ही क्रोधित अथवा प्रक्षोभित व्हावे का? इब्री लोकांस पत्र १२:५, ६ येथे पौल आर्जव करतो: “माझ्या मुला परमेश्‍वराच्या शिक्षेचा अनादर करू नको, आणि त्याच्याकडून दोष पदरी पडला असता खचू नको; कारण ज्यावर परमेश्‍वर प्रीति करितो, त्याला तो शिक्षा करतो आणि त्या पुत्रांना तो स्वीकारतो त्या प्रत्येकाला फटके मारतो.” तुम्हाला जी काही शिक्षा दिली जाईल ती, यहोवा तुमच्यावर प्रीती करत असल्याचा पुरावा आहे या दृष्टिकोनातून तिच्याकडे पाहा. लक्षात ठेवा, अस्सल पश्‍चात्ताप पुन्हा एकदा तुम्हाला आपल्या दयावंत पित्याबरोबरील एका श्रेयस्कर ऋणानुबंधनात बांधील.

आपल्या चुका कबूल करण्यास निश्‍चित धैर्य लागते. पण, तसे केल्याने तुम्ही केवळ आपल्या पालकांबरोबरच नव्हे तर स्वतः यहोवा देवासोबतही दिलजमाई करू शकता. भीती, गर्व अथवा लाज या गोष्टींना तुम्हास मदत मिळण्यात अडसर घालू देऊ नका. लक्षात असू द्या: यहोवा “भरपूर क्षमा करील.”—यशया ५५:७.

[तळटीपा]

a काही नावे बदललेली आहेत.

b आपल्या पालकांच्या समीप जाण्यासंबंधीच्या माहितीकरता, वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित तरुणांचे प्रश्‍न—उपयुक्‍त उत्तरे (इंग्रजी) या पुस्तकातील अध्याय २ पाहा.

[१२ पानांवरील संक्षिप्त आशय]

‘ज्यांनी पाप केले आहे अशा सर्वांना, यहोवाकडे आपले हृदय मोकळे करण्याचे मी उत्तेजन देतो!’

—अँड्रू

[११ पानांवरील चित्र]

पालकांजवळ पाप कबूल करणे आध्यात्मिक रोगमुक्‍ती घडवून आणील

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा