योग्य समतोल तुमच्या जीवनात गोडवा आणू शकतो
सहिष्णुता ही कॉफीत घातलेल्या साखरेसमान आहे. तिचे योग्य प्रमाण जीवनात गोडवा आणू शकते. परंतु, साखरेच्या बाबतीत आपण दिलदार असलो तरी सहिष्णुतेसंबंधी मात्र आपण बहुधा कंजूषच असतो. याचे कारण?
“मनुष्य प्राणी सहिष्णू होऊ इच्छित नाही,” असे मिशिगन राज्य विद्यापीठातील सहप्राध्यापक आर्थर एम. मेलझर यांनी लिहिले. “स्वाभाविकपणे जे दिसून येते ते म्हणजे . . . पूर्वग्रह.” यास्तव, असहिष्णुता हे निव्वळ एक स्वभावातील वैगुण्य नव्हे जे केवळ काही मूठभर लोकांवरच प्रभाव करू शकते; सर्व मानवजात अपरिपूर्ण असल्यामुळे आपण सर्व स्वाभाविकपणे संकुचित मनोवृत्तीचे आहोत.—पडताळा रोमकर ५:१२.
संभवनीय ढवळाढवळ करणारे
सन १९९१ साली टाइम नियतकालिकाने अमेरिकेतील वाढत्या संकुचित मनोवृत्तीसंबंधी अहवाल दिला. ह्या लेखाने, आचरणासंबंधी आपले स्वतःचे दर्जे इतरांवर लादण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांचे वर्णन “जीवन-शैलीत ढवळाढवळ करणारे” असे केले. यांच्याशी सहमत न होणारे शिकार बनले आहेत. उदाहरणार्थ, बॉस्टन येथील एका स्त्रीला, ती सौंदर्यप्रसाधने वापरत नसल्यामुळे कामावरून कमी करण्यात आले होते. लॉस ॲन्जेलेस येथील एका मनुष्याचे वजन जादा असल्यामुळे त्याला बडतर्फ करण्यात आले. इतरांना आपल्या साच्यात अडकवण्याचा इतका अट्टाहास तो का?
संकुचित मनोवृत्तीचे लोक गैरवाजवी, अप्पलपोटी, ताठर आणि स्वमताग्रही असतात. परंतु, पुष्कळशे लोक थोड्याफार फरकाने गैरवाजवी, अप्पलपोटी, ताठर किंवा स्वमताग्रही नसतात का? ह्या लक्षणांनी आपल्या व्यक्तिमत्त्वात भक्कम मूळ धरले असल्यास आपण संकुचित मनोवृत्तीचे होऊ.
तुमच्या स्वतःबाबत काय? खाण्यापिण्याच्या बाबतीत इतरांच्या आवडीनिवडीप्रती तुम्ही नापसंती दाखवता का? संभाषणात, तुम्हाला सर्वसामान्यपणे अखेरचे निर्णायक मत मांडायचा तुमचा अट्टाहास असतो का? एखाद्या समूहात कार्य करत असता त्यांनी तुमची विचारसरणी अनुसरावी अशी तुमची अपेक्षा असते का? असल्यास तुमच्या कॉफीत आणखी थोडीशी साखर घालणे बरे असेल!
परंतु, आधीच्या लेखात उल्लेखित केले होते त्याप्रमाणे असहिष्णुता शत्रूभावाच्या पूर्वग्रहाचे रूप घेऊ शकते. असहिष्णुतेला विकोपास नेऊ शकणारे एक कारण म्हणजे तीव्र चिंता.
“अनिश्चिततेची एक गाढ भावना”
जातीय पूर्वग्रह केव्हा आणि कोठे दिसून आला याचा सुगावा लावण्यासाठी मानववंशशास्त्रज्ञांनी मानवजातीच्या इतिहासात डोकावले आहे. त्यांच्या निदर्शनास आले, की अशा प्रकारची असहिष्णुता सदैव दिसून येत नाही किंवा प्रत्येक देशात सारख्याच प्रमाणातही तिचा आविष्कार होत नसतो. जर्मन नैसर्गिक विज्ञान नियतकालिक जीओ अहवाल देते, की आणीबाणीच्या काळात जेव्हा “लोकांमध्ये अनिश्चिततेची गाढ भावना असते आणि आपले तादात्म्य जोखिमेत आल्याची त्यांना प्रकर्षाने जाणीव होते” अशा वेळेस जातीय संघर्ष आपले डोके बाहेर काढतो.
अशा प्रकारची “अनिश्चिततेची गाढ भावना” आज सर्व व्याप्त आहे का? निश्चितच. पूर्वी कधी नव्हते तितके संकटप्रसंग एकापाठोपाठ एक मानवजातीवर कोसळत आहेत. बेकारी, वाढता राहणी खर्च, अतिरिक्त लोकसंख्या, ओझोन थराचा विरळ, शहरांमधील गुन्हेगारी, पिण्याच्या पाण्याचे प्रदूषण, जगव्याप्त उष्णता—यांपैकी कशाचेही अखंड भय चिंता वाढवते. संकटप्रसंग चिंतेला जन्म देतात आणि बेसुमार चिंता असहिष्णुतेला आमंत्रित करतात.
ही असहिष्णुता मग आविष्काराचा एक मार्ग शोधते, उदाहरणार्थ काही युरोपीय देशांत दिसून येते त्याप्रमाणे विविध जातीय व सांस्कृतिक गट एकजुटीने नांदतात तेव्हा ती प्रकट होते. राष्ट्रीय भौगोलिक (इंग्रजी) याच्या १९९३ च्या अहवालानुसार पश्चिम युरोपीय देश त्यावेळी २.२ कोटी आप्रवाशांचे यजमान बनले होते. अनेक युरोपीय, विविध भाषा, संस्कृती किंवा धर्म अनुसरणाऱ्या “नवोदितांच्या ओघामुळे भांबावून गेले.” ऑस्ट्रिया, बेल्जियम, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली आणि स्वीडन येथे परराष्ट्रद्रोही भावना तीव्र झाली आहे.
जागतिक नेत्यांबाबत काय? १९३० ते १९४० च्या दशकादरम्यान हिटलरने असहिष्णुतेस एक सरकारी धोरण बनविले. दुःखाची बाब अशी, की आज काही राजकीय व धार्मिक नेत्यांनी आपली वैयक्तिक ध्येये गाठण्यासाठी असहिष्णुतेचा उपयोग केला आहे. हेच ऑस्ट्रिया, फ्रान्स, आयर्लंड, रशिया, र्वांडा आणि संयुक्त संस्थाने येथे देखील घडले आहे.
विरक्तीचा पाश टाळा
आपल्या कॉफीत साखरेचे प्रमाण खूपच कमी असल्यास काहीतरी कमी असल्याची आपल्याला लगेच जाणीव होते तर खूपच जास्त असल्यास एकप्रकारची गुळचट चव आपल्या तोंडात निर्माण होते. हेच सहिष्णुतेबाबतही सत्य आहे. संसुक्त संस्थाने येथील एका महाविद्यालयात शिकवणाऱ्या एका मनुष्याचा अनुभव लक्षात घ्या.
काही वर्षांपूर्वी, डेवीड आर. कॉर्लीन ज्युनिअर यांना वर्ग चर्चा चेतवण्याकरता एक साधासोपा परंतु तितकाच प्रभावशाली मार्ग गवसला. आपले विद्यार्थी बंड करतील याची पूर्वमाहिती असल्यामुळे आपल्या दृष्टिकोनांना आव्हान करण्यासाठी रचलेले एखादे विधान ते मांडत. याचा परिणाम, एक जोरदार चर्चा व्हायची. तथापि, १९८९ साली कॉर्लीन यांनी लिहिले, की हीच पद्धत आता प्रभावशाली राहिली नाही. का नाही बरे? ते जे काही सांगत त्याजशी विद्यार्थी सहमत नसले तरी पुढे यावर आणखीन वादविवाद घालण्याची विद्यार्थ्यांनी तसदी घेतली नाही. कॉर्लीन स्पष्टीकरण देतात, की त्यांनी “संशयवादासंबंधी सुकर सहिष्णुता,”—एक बेफिकीर, बेपर्वा वृत्ती पत्करली होती.
बेपर्वा प्रवृत्ती आणि सहिष्णुता यांच्यात साधर्म्य आहे? कोण काय विचार करत आहे अथवा काय करत आहे याची कोणी पर्वाच केली नाही तर कोणतेच दर्जे अस्तित्वात राहत नाहीत. दर्जांचा अभाव म्हणजे विरक्ती—स्वारस्याचा संपूर्णतः अभाव. अशी अवस्था कशी निर्माण होऊ शकते बरे?
प्राध्यापक मेलझर यांच्या मते, वर्तनाचे विविध दर्जे स्वीकारणाऱ्या समाजात विरक्ती फैलावू शकते. लोक असा विश्वास बाळगू लागतात, की आचरणाचे सर्व प्रकार स्वीकारहार्य असून सर्वकाही केवळ व्यक्तिगत आवडीनिवडीचा प्रश्न असतो. काय स्वीकारहार्य आहे आणि काय नाही याचा विचार करण्यास शिकण्याऐवजी लोक “बहुधा विचारच न करण्याचे शिकतात.” इतरांच्या असहिष्णुतेविरुद्ध उभे राहण्यास एखाद्या व्यक्तीला समर्थ करणाऱ्या नैतिक आधारस्तंभाची त्यांच्यात कमी असते.
तुमच्याबाबत काय? तुम्ही वेळोवेळी एक बेपर्वा वृत्ती आत्मसात करत असल्याची जाणीव तुम्हास होते का? अश्लील अथवा वंशसंबंधित विनोदांमुळे तुम्हाला फाजील आनंद होतो का? तुम्ही तुमच्या किशोरवयीन मुलामुलीस, लोभ वा अनैतिकता यांना खतपाणी घालणारे व्हिडिओ पाहण्यास देता का? तुमच्या मुलांनी हिंसक व्हिडिओ गेम्स खेळणे तुम्हाला ठीक वाटते का?
अति सहिष्णुतेमुळे एखाद्या कुटुंबास अथवा समाजास अपरिमित दुःख भोगावयास लागेल कारण योग्य काय किवा अयोग्य काय आहे याची कोणालाच माहिती—किंवा पर्वा नसते. अमेरिकेच्या सेनेटचे सभासद डॅन कोट्स यांनी “सहिष्णुतेचा पाश विरक्ती” असल्याचा इशारा दिला. सहिष्णुतेमुळे मनमोकळेपणा निर्माण होऊ शकतो; अति सहिष्णुतेमुळे—विरक्ती—ते अगदी पोकळ मनोवृत्ती निर्माण होऊ शकते.
तर मग आपण काय सहन करावे आणि काय नाकारावे? योग्य समतोल साधण्याचे गूढ काय आहे? हा पुढील लेखाचा विषय असेल.
[५ पानांवरील चित्र]
परिस्थितींप्रती संतुलित प्रतिक्रिया दर्शवण्यास होता होईल तितके झटा