वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g97 १/८ पृ. १४-१५
  • पत्नीची अधीनता—म्हणजे नेमके काय?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • पत्नीची अधीनता—म्हणजे नेमके काय?
  • सावध राहा!—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • चाणाक्षपणाची आवश्‍यकता
  • पती जबाबदारीकडे दुर्लक्ष करतो अशावेळेस
  • ‘एकमेकांच्या अधीन असणे’
  • ती समंजसपणे वागली
    त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा
  • ती समंजसपणे वागली
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
  • “प्रत्येक स्त्रीचं मस्तक पुरुष आहे”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२१
  • एक बुद्धिमान स्त्री अरिष्ट टाळते
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९७
g97 १/८ पृ. १४-१५

बायबलचा दृष्टिकोन

पत्नीची अधीनता—म्हणजे नेमके काय?

देवाचे वचन बायबल, इफिसकर ५:२२, येथे म्हणते: “स्त्रियांनो, तुम्ही जशा प्रभूच्या अधीन तशा आपआपल्या पतीच्या अधीन असा.” याचा नेमका अर्थ काय आहे? काहीही झाले तरी, पत्नीने डोळे मिटून पतीला जे हवे त्यास मान्यता द्यावी का? तिने स्वतःहून कधीच काही करू नये का, अथवा तिने त्याच्यापेक्षा वेगळी मते कधीच बाळगू नयेत का?

बायबलमधील अबीगईलचा अहवाल विचारात घ्या. तिने केलेले कार्य सुज्ञपणाचे असले तरीही, नाबालाच्या अर्थात तिच्या धनाढ्य पतीच्या इच्छेविरुद्ध होते. देवाने इस्राएलाचा राजा होण्याकरता ज्याला निवडले होते त्या दावीदाच्या माणसांनी नाबालास अनुग्रहाने वागवले तरीसुद्धा, नाबाल मात्र “त्यांच्या अंगावर ओरडला” होता. नाबालाची कृतघ्न मनोवृत्ती पाहून दावीद संतापला आणि त्याला जिवे मारायला निघाला. आपले संपूर्ण घराणे धोक्यात आहे याची अबीगईलला जाणीव झाली. तिने कशीबशी दावीदाची मनधरणी केली. हे तिने कसे केले?—१ शमुवेल २५:२-३५.

अबीगईलने दावीदाजवळ कबूल केले की नाबाल हा “अधम” होता आणि नाबालाने देण्यास नाकारलेल्या वस्तू देखील तिने दावीदाला दिल्या. सहसा, पतीपत्नींनी एकमेकांच्या चुकांची जाहिरात करणे अयोग्य असते. तथापि, अशाप्रकारे बोलताना आणि वागताना अबीगईल विद्रोह करीत होती का? नाही. ती नाबाल व त्याच्या घराण्याचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात होती. ती नेहमीच अनादर करणारी किंवा मन मानेल तसे वागणारी होती असे सुचविणारा कोणताही पुरावा आढळत नाही. शिवाय, कशानेही समाधान न मानणाऱ्‍या नाबालाने, त्याच्या भल्या मोठ्या संपत्तीची देखरेख करण्यात ती जे साहाय्य करीत होती त्याविषयी मात्र कधीच असमाधान व्यक्‍त केलेले नव्हते. परंतु, या पेचप्रसंगात तिने स्वतःहून कार्य करावे हेच शहाणपणाचे होते. त्यातल्या त्यात, बायबल देखील अबीगईलने जे केले त्याविषयी मान्यता दर्शवते.—१ शमुवेल २५:३, २५, ३२, ३३.

अबीगईलच्याही पुष्कळ काळाआधी, काही कुलपितांच्या पत्नींनी आपल्या पतींना जे हवे होते त्यापेक्षा वेगळे मत प्रदर्शित केले होते व तसे कार्य देखील केले होते. तरीसुद्धा, ‘देवावर आशा ठेवणाऱ्‍या या पवित्र स्त्रियांना’ अधीनतेच्या बाबतीत आदर्श म्हणून ख्रिस्ती पत्नींसमोर ठेवले जाते. (१ पेत्र ३:१-६) उदाहरणार्थ, अब्राहामाचा पुत्र इश्‍माएल याच्यामुळे आपल्या पुत्राला, इसहाकाला धोका संभवतो आहे याची चाहूल लागताच सारेने निर्णय घेतला की इश्‍माएलला घालवून देण्यात यावे. यामुळे ‘अब्राहामाला फार वाईट वाटले.’ तथापि देवाने अब्राहामाला म्हटले: “तू वाईट वाटून घेऊ नको; सारा तुला जे काही सांगते ते सगळे ऐक.”—उत्पत्ति २१:११, १२.

चाणाक्षपणाची आवश्‍यकता

तर मग, एखादी गोष्ट अत्यंत अज्ञानीपणाची आहे अथवा देवाच्या तत्त्वांचा भंग करणारी आहे हे माहीत असताना, अधीनतेच्या नावाखाली अशी गोष्ट करण्याच्या दबावाला बळी पडणे पत्नीसाठी शहाणपणाचे ठरणार नाही. तसेच, अबीगईल व सारा यांप्रमाणे एखाद्या अत्यावश्‍यक बाबतीत स्वतःहून कार्य केल्यास तिला दोषी ठरवण्यात येऊ नये.

पत्नीची अधीनता म्हणजे पत्नीने पतीच्या इच्छेशी नेहमीच सहमत असावे असे नाही. पण फरक कसा ठरवायचा? योग्य तत्त्वे धोक्यात येतात तेव्हा कदाचित तिला आपल्या पतीशी असहमत होणे भाग पडेल. तथापि, ईश्‍वरी अधीनतेची एकंदर मनोवृत्ती तिने अशा प्रसंगीही प्रदर्शित करावी.

अर्थात केवळ हेकेखोरपणा, आकसखोरपणा यामुळे किंवा इतर अयोग्य हेतू साध्य करण्यासाठी तिने आपल्या पतीच्या इच्छेविरुद्ध जाता कामा नये. तिने चाणाक्ष व अबीगईल हिच्याप्रमाणे बुद्धिवान असले पाहिजे.—१ शमुवेल २५:३.

पती जबाबदारीकडे दुर्लक्ष करतो अशावेळेस

आपल्या पतीला सहकार्य करण्याद्वारे व त्याच्या निर्णयांना समर्थन देण्याद्वारे यहोवाला संतोषविणे हाच मुळात पत्नीच्या ईश्‍वरी अधीनतेचा प्रथम उद्देश व मूलसिद्धान्त आहे. आणि पती आध्यात्मिकदृष्ट्या पोक्‍त असल्यास हे सहसा सोपे जाते. तथापि, असे नसल्यास ते एक आव्हान ठरू शकते.

अशा परिस्थितीला तिने कसे तोंड द्यावे? ती त्याच्याजवळ कळकळीची विनंती करू शकते किंवा कुटुंबाच्या कल्याणाच्या दृष्टीने कोणते निर्णय उपयुक्‍त ठरतील हे सुचवू शकते. तिने ‘संसाराचा गाडा’ त्याला चालवू दिल्यास, कदाचित तो यात आणखीन निपुण बनू शकेल. पतीसमोर उठता बसता रडगाणे गाणे उचित अधीनतेच्या मूलसिद्धान्ताच्या विरोधात जाते. (नीतिसूत्रे २१:१९) यद्यपि, त्याच्या धोरणामुळे कुटुंबाचे कल्याण धोक्यात आहे हे स्पष्ट झाल्यास, ती सारेने केले त्याप्रमाणे, सुधारित उपाय सुचवण्याचा मार्ग पत्करू शकते.

पती सत्य न मानणारा असल्यास, पत्नीसमोर असलेले आव्हान आणखीनच बिकट बनते. तरीपण, तो तिला बायबलच्या कायद्यांचा भंग करण्यास सांगत नाही तोपर्यंत तिने त्याच्या अधीन असले पाहिजे. पण तो तिला बायबलच्या कायद्यांचा भंग करण्यास सांगतो तेव्हा मात्र ख्रिस्ती पत्नीची प्रतिक्रिया, एका न्यायालयाने देवाच्या आज्ञांचा भंग करण्यास सांगितले तेव्हा शिष्यांची जशी होती, तशीच असली पाहिजे: “आम्ही मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे.”—प्रेषितांची कृत्ये ५:२९.

तथापि, पुरेसा अनुभव नसल्यामुळे आणि मर्यादित ज्ञान असल्यामुळे कधीकधी प्रामाणिक हेतू बाळगणारे पती आणि पत्नी देखील आपल्या भूमिकांच्या पलीकडे जाऊ शकतात. पती कदाचित तितकासा समजूतदार नसेल किंवा पत्नी कदाचित आपल्या मनाप्रमाणे व्हावे याविषयी अवाजवी अट्टाहास करत असेल. यावर कोणता उपाय आहे? दोघांनी स्वतःविषयी माफक दृष्टिकोन बाळगणे महत्त्वाचे आहे कारण, “आपण सगळेच पुष्कळ चुका करितो.”—याकोब ३:२.

पुढाकार घेताना एखादी पत्नी समंजस असल्यास, बरेच पुरुष, पुढेमागे कधीतरी तिचा हा प्रांजळ हेतूने घेतलेला पुढाकार समजून घेतील. तसेच, दोघांनी आपल्या हातून चुका झाल्यावर क्षमा मागितल्यास परस्परांतील सहकार्य वाढते. यहोवा जसा आपल्या दररोजच्या लहानमोठ्या चुका क्षमा करतो त्याचप्रकारे आपणही इतरांना क्षमा केली पाहिजे. “हे परमेशा, तू अधर्म लक्षात आणिशील, तर हे प्रभू, तुझ्यापुढे कोण टिकाव धरील? . . . तुझ्या ठायी क्षमा आहे.”—स्तोत्र १३०:३, ४.

‘एकमेकांच्या अधीन असणे’

आपल्या सर्वांच्याच लाभाच्या दृष्टीने शास्त्रवचने सल्ला देतात: “ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकांच्या अधीन असा.” एकमेकांना प्रेमळपणे आदर द्या; परस्परांच्या आड येऊ नका आणि चढाओढही करू नका. हे वचन पुढे म्हणते: “स्त्रियांनो, तुम्ही जशा प्रभूच्या अधीन तशा आपआपल्या पतीच्या अधीन असा. कारण जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे तसा पति पत्नीचे मस्तक आहे.”—इफिसकर ५:२१-२३.

पौलाने इफिसकर ५:२१, २२ येथे उपयोगात आणलेला ग्रीक शब्द, बळजबरीने अधीन केल्या जाण्याचा नव्हे तर स्वतःहून अधीन होण्याचा अर्थबोध देतो. शिवाय, ही अधीनता केवळ विवाहातील सुरळीतपणासाठीच नव्हे, तर प्रभूसाठी असते. ख्रिस्ताची अभिषिक्‍त मंडळी स्वेच्छेने, आनंदाने ख्रिस्ताला अधीन होते. पत्नी देखील आपल्या पतीच्या बाबतीत असेच करते तेव्हा विवाह जरूर आनंदपूर्ण व यशस्वी होईल अशी अपेक्षा करता येते.

शास्त्रवचने असेही म्हणतात: “तुम्हांपैकी [पतींपैकी] प्रत्येकाने जशी स्वत:वर तशी आपल्या पत्नीवर प्रीती करावी,” व तेही भरभरून. (इफिसकर ५:३३; १ पेत्र ३:७) पतीने हे लक्षात ठेवावे की त्यानेही त्याच्या मस्तकाच्या अधीन राहिले पाहिजे कारण बायबल म्हणते: “प्रत्येक पुरुषाचे मस्तक ख्रिस्त आहे.” होय, पतीने ख्रिस्ताच्या शिकवणुकींच्या अधीन असले पाहिजे. ख्रिस्त देखील त्याच्या मस्तकाच्या अधीन राहतो: “ख्रिस्ताचे मस्तक देव आहे.” अशाप्रकारे, एक यहोवाचा अपवाद वगळल्यास प्रत्येकावर कोणी ना कोणी मस्तक आहे. तसेच यहोवा देखील स्वतःच्या नियमांना जडून राहतो.—१ करिंथकर ११:३; तीत १:२; इब्री लोकांस ६:१८.

ख्रिस्ती अधीनता संतुलित असून ती स्त्री व पुरुष दोघांनाही लाभदायक आहे. अधीनतेमुळे विवाहात अशी सुसंगतता व समाधान येते जे केवळ आपला प्रेमळ निर्माताच आपल्याला देऊ शकतो.—फिलिप्पैकर ४:७.

[१४ पानांवरील चित्राचे श्रेय]

Leslie’s

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा