वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g96 १०/८ पृ. १६-१७
  • प्रवाळ खडकांच्या संरक्षणार्थ काय केले जाऊ शकते?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रवाळ खडकांच्या संरक्षणार्थ काय केले जाऊ शकते?
  • सावध राहा!—१९९६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • सर्व राष्ट्रे या लढाईत भाग घेतील का?
  • प्रवाळ धोक्यात व नष्ट होण्याच्या मार्गावर
    सावध राहा!—१९९६
  • महासागर
    सावध राहा!—२०२३
  • विनाशकारी हवामान
    सावध राहा!—१९९८
  • तांबड्या समुद्राच्या लाटेखालील आश्‍चर्य
    सावध राहा!—१९९४
सावध राहा!—१९९६
g96 १०/८ पृ. १६-१७

प्रवाळ खडकांच्या संरक्षणार्थ काय केले जाऊ शकते?

जगभरातील अनेक शास्त्रज्ञ असा विश्‍वास करतात, की जागतिक उष्णता अस्तित्वात आहे व विकसनशील देश औद्योगिक विकास करण्यात प्रगती करतात तसतसे ती बिकटच होत जाईल. ऊर्जेसाठी कोळसा, तेल आणि लाकूड अशी इंधने जाळल्यामुळे तसेच झाडांना तोडल्यामुळे जागतिक वातावरणात दर वर्षी सुमारे तीन अरब मेट्रिक टन कार्बन डायऑक्साइड (C02) सोडला जातो. इंधन दहनाच्या वायुंनी घडणाऱ्‍या तथाकथित हरितगृह परिणामामुळे पुढील शतकाच्या मध्यापर्यंत ३ ते ८ डीग्री फॅरेन्हाईटने वातावरण उष्ण होण्याचा धोका संभावतो असे काही शास्त्रज्ञांचे मत आहे. हे तापमान प्रवाळ आणि खडक वसाहतींकरता घातक ठरेल.

परंतु, प्रवाळ खडक मेल्यावर स्थलजीवनावरही प्रतिकूल परिणाम घडून येईल. नैसर्गिक इतिहास (इंग्रजी) या नियतकालिकाने असे निरीक्षण केले: “तथापि, प्रवाळ खडक स्वतः हरितगृह दृश्‍यातील प्रमुख भूमिका बजावणारे आहेत आणि हरितगृह वायू कमी करण्यात उष्णकटिबंधीय पर्जन्यारण्ये जितक्या महत्त्वाची आहेत तितकेच त्यांचेही महत्त्व असेल. स्वतःच्या सांगाड्यांकरता प्रवाळ कॅल्शियम कार्बोनेट स्रवतात तेव्हा ते सागरातून C02 चे बरेच मोठे प्रमाण काढून टाकतात. झूझॅनथले [प्रवाळाचे सहजीवी निवासी शैवाल] यांच्याशिवाय प्रवाळ जितक्या प्रमाणाच्या कार्बन डायऑक्साइडचे चयापचय करतात ते नाट्यमयरित्या कमी झाले आहे. उपरोधक गोष्ट अशी, की पाण्याखालील या परिस्थितीकीला हानी पोहंचल्याने त्याचा नाश होण्याची जी क्रिया आहे तिचा वेग वाढू शकतो.”

काही शास्त्रज्ञ असा विश्‍वास करतात, की ज्वलनाद्वारे सोडले जाणारे इतर वायू हरितगृह परिणामात आणखी भर घालतात. नायट्रस ऑक्साइड हा एक आणि क्लोरोफ्लुरोकार्बन (CFC) हा दुसरा. खरे म्हणजे, प्रत्येक CFC रेणू उष्णता अडवून धरण्याच्या C02 रेणुच्या क्षमतेपेक्षा २०,००० पटीने कार्यक्षम आहे. पृथ्वीवरील जीवनाला हानीकारक जंबुलातित किरणांपासून सुरक्षित ठेवणाऱ्‍या ओझोनचा थर पातळ होण्यासही CFC प्रमुख कारण आहेत असे आढळले आहे. उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव येथील ओझोन, छेद होण्याइतक्या पुरेशा प्रमाणात पातळ झाला आहे. ही प्रवाळांकरता आणखी दुःखद वार्ता आहे. आधीच उष्ण पाण्याचा तणाव असणाऱ्‍या बारीक प्रवाळ खडकांवर कमी प्रमाणात जंबुलातित प्रकाश पाडल्यावर रंग विटण्याची क्रिया वाढली. वैज्ञानिक अमेरिकन (इंग्रजी) या नियतकालिकाने पश्‍चात्ताप व्यक्‍त केला: “क्लोरोफ्लुरोकार्बनांचे उत्सर्जन आज थांबले, तरी स्थिरावरणीय ओझोनचा नाश घडवणाऱ्‍या रासायनिक प्रक्रिया निदान एका शतकापर्यंत तरी कायम राहतील. त्याचे कारण स्पष्ट आहे: ही संयुगे तितका काळ वातावरणात राहतात आणि उत्सर्जन बंद केल्यावर बऱ्‍याच कालावधीनंतरही क्षोभावरणातील साठ्यातून स्थिरावरणात त्यांचे अभिसरण होत राहते.”

व्यक्‍तिगत स्थरावर, सागरे किंवा किनारपट्टीकडील भाग, टाकाऊ वस्तू किंवा प्रदूषकांनी दूषित न केल्याने व्यक्‍ती जबाबदार असल्याप्रमाणे वागू शकतात. तुम्ही एखादा खडक पाहायला गेल्यास, प्रवाळाला हात लावू नये अथवा त्यांच्यावर उभे राहू नये अशा प्रकारच्या सूचना पाळा. प्रवाळाच्या स्मरणिका घेऊ नका अथवा त्या खरेदी करू नका. उष्णकटिबंधीय खडकांजवळून नौकानयन करत असल्यास, रेताळ तळावर अथवा सागरी अधिकाऱ्‍यांनी पुरवलेल्या तरंगत्या नौकाबंधांवर नांगर टाका. तुमच्या बोटीच्या परिचालकाची गती वाढवू नका अथवा त्याने तळ घुसळू नका. बोटीतील वाहित मल सागरात फेकू नका; तर त्यास स्वीकारणारे धक्के आणि बंदर शोधा. लुई बेट राष्ट्रीय सागरी अभयारण्याचे (फ्लोरिडा, अमेरिका) व्यवस्थापक, बिल कोसी यांनी असे म्हटले: “असंतुलन ज्यामुळे घडते ती समस्या कदाचित मानवच निर्माण करत आहे. आपल्याला जागतिकपणे त्याविषयी जाणीव राखणारे असले पाहिजे. प्रचंड मोठी परिस्थितीकी गमावण्याच्या धोक्याविषयी आपण जनजागृतता वाढवत राहिलो, तर कदाचित आपण बदल घडवून आणू शकतो.”

प्रादेशिक स्थरावर, प्रवाळ खडकांचे संरक्षण करण्याचे कायदे मंजूर करून ते अंमलात आणले जात आहेत. फ्लोरिडाचे राज्य तेथील खडकांना हानी पोहंचवणाऱ्‍या जहाजांच्या मालकांविरुद्ध फिर्याद करते. तळात रुतलेल्या एका मालबोटीने पुष्कळ एकर प्रवाळ नांगरून काढले तेव्हा तिच्या मालकांना ६० लाख डॉलर दंड भरावा लागला. त्यातील काही पैसा सागरी निवासक्षेत्राचे पुनर्वसन करण्यास उपयोगात आणला गेला. १९९४ मध्ये एका जहाजाने हानी पोहंचवलेले प्रवाळ खासप्रकारच्या आसंजकांच्या साहाय्याने पुन्हा चिकटवण्याचा प्रयत्न जीववैज्ञानिक सध्या करत आहेत. आणखी एकदा, एका कंपनीच्या मालबोटीने फ्लोरिडातील एका खडकास हानी पोहंचवल्यामुळे तिच्यावर ३२ लाख डॉलरचा दंड बसवण्यात आला. इतर देश अशाचप्रकारचे कायदे अंमलात आणत आहेत. सूर मारण्याची प्रसिद्ध ठिकाणे, जसे की कॅरिबियन येथील केमन बेटे येथे सूर मारायला परवानगी असलेली मर्यादित क्षेत्रे आहेत. ऑस्ट्रेलियाने ग्रेट बॅरिअर रीफ मरीन पार्क यास तेथील कार्यहालचालींवर नियंत्रण करण्यास स्थापले. पण सर्वांनी पाहिल्यानुसार, जितके अधिक सूर मारणारे असतील तितकीच खडकांना अधिक हानी पोहंचवली जाते.

सर्व राष्ट्रे या लढाईत भाग घेतील का?

जागतिक प्रमाणावर, जागृत शास्त्रज्ञ आणि पुढारी असा निष्कर्ष काढतात, की यावरचा उपाय एक राष्ट्र किंवा अनेक राष्ट्रांच्या हातापलीकडील आहे. वायू आणि पाण्याच्या फिरत्या प्रवाहांमुळे जगभरात प्रदूषण पसरवले जाते ज्याचा परिणाम खडकांवर होतो. व्यक्‍तिगत राष्ट्रांना त्यांच्या क्षेत्रापलीकडील जलांवर अधिकारिता नाही. समुद्राच्या मध्यभागी टाकलेली प्रदूषके शेवटी किनाऱ्‍यांवर येतात. यास्तव संयुक्‍त जागतिक प्रयत्नाची आणि उपायाची गरज आहे.

जगातील अनेक प्रामाणिक आणि कार्यक्षम लोक पृथ्वीच्या विलक्षणीय प्रवाळ भांडारांचे संरक्षण करण्यास झटत राहतील यात काहीच शंका नाही. पृथ्वीच्या पर्यावरणाबद्दल संवेदनशील असणाऱ्‍या आणि काळजी वाहणाऱ्‍या जगातील सरकाराची स्पष्टपणे व आत्यंतिकपणे गरज आहे. आनंदाची गोष्ट अशी, की निर्माणकर्ता स्वतः जागतिक पर्यावरणाला वाचवील. देवाने पहिल्या मानवांना बनवले तेव्हा तो म्हणाला: “समुद्रातील मासे [व सर्व सागरी जीवन] . . . यांवर ते सत्ता चालवितील.” (उत्पत्ति १:२६) देवाने सागरी जीवनाचा दुरुपयोग अथवा त्यास नष्ट केले नसल्यामुळे मानवजातीला त्याने जो हुकूम दिला त्याचा अर्थ, माणसाने जागतिक पर्यावरणाची काळजी घ्यावी असा असावा. बायबल भाकीत करते: “ज्यामध्ये नीतिमत्त्व वास करिते असे नवे आकाश [देवाचे स्वर्गीय राज्य] व नवी पृथ्वी ह्‍यांची त्याच्या वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहो.” (२ पेत्र ३:१३) नजीकच्या भवितव्यात, ते स्वर्गीय सरकार या प्रदूषित पृथ्वीला त्याचप्रमाणे त्यामधील सागरांना देखील पूर्णपणे स्वच्छ करील. मग, देवाच्या राज्याचे नागरिक सुंदर सागरांची आणि त्यांच्यातील सागरी रहिवाशांची पूर्णपणे काळजी घेतील व त्यांचा मनमुराद आनंद लुटतील.

[१७ पानांवरील चित्रं]

पार्श्‍वभूमीत: फीजीजवळ, पॅसिफिक सागरातील एक सुंदर प्रवाळ खडक

आतील चौकटीतील चित्र: १. क्लाऊन फिशचे पाण्याखालील निकट छायाचित्र, २. टेबलासारखे दिसणारे प्रवाळ, ३. प्रवाळावर सफाई करणारा कोळंबी

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा