वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g96 ४/८ पृ. २-५
  • बेकारीची पीडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • बेकारीची पीडा
  • सावध राहा!—१९९६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • प्रगमनशील मोर्चा
  • बेकारीची मोठी किंमत
  • ‘विकृत व्यवस्थेचे कैदी’
  • अंदाज आणि नाउमेदी
  • बेकारी का?
    सावध राहा!—१९९६
  • बेकारीपासून मुक्‍तता कशी व केव्हा?
    सावध राहा!—१९९६
सावध राहा!—१९९६
g96 ४/८ पृ. २-५

बेकारीची पीडा

इटलीमधील सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून

पुष्कळ विकसित देशांमध्ये ही एक तातडीची गोष्ट आहे—परंतु विकसनशील राष्ट्रांनाही ती चिंताग्रस्त करते. जेथे ती जणू अस्तित्वहीन होती अशा ठिकाणी तिने आपला हल्ला चढवला आहे. तिचा परिणाम करोडो लोकांवर होतो—त्यांच्यापैकी अनेक माता आणि पिता आहेत. इटलीतील दोन तृतीयांश लोकांकरता ती एक “प्रमुख धोका” आहे. त्यामुळे नवीन सामाजिक रोग निर्माण होतात. काही प्रमाणात, मादक औषधांमध्ये गोवलेल्या अनेक तरुण लोकांच्या समस्यांचे ती मूळ आहे. ती लाखो लोकांची झोप उडवते, आणि इतर लाखोंच्या पदरी पडण्याच्या बेतात असेल . . .

“बेकारी, कदाचित आपल्या काळात सर्वत्र फैलावलेली सर्वात भीतिजनक गोष्ट आहे,” असे आर्थिक सहकार्य आणि विकासाची संघटना (ओईसीडी) हिने निग्रहाने सांगितले. “याचे विस्तार आणि परिणाम ज्ञात आहेत,” पण “त्याचा सामना करणे कठीण आहे,” असे युरोपीय सामाजाच्या आयोगाने लिहिले. एक तज्ज्ञ म्हणतात, ती “प्राचीन खंडाच्या रस्त्यांना झपाटण्यासाठी परतणारी धास्ती” आहे. युरोपीय संघात, बेकारांची संख्या आता सुमारे दोन करोड इतकी आहे, आणि ऑक्टोबर १९९४ मध्ये एकट्या इटलीत त्यांची अधिकृत संख्या २७,२६,००० इतकी होती. युरोपीय संघाचे अधिकारी पोथरीग फ्लीन यांच्या मते, “बेकारीची समस्या सोडवणे हे आपण सामना करत असलेले सर्वात महत्त्वपूर्ण सामाजिक आणि आर्थिक आव्हान आहे.” तुम्ही बेकार असल्यास किंवा नोकरी गमावण्याच्या धोक्यात असल्यास, त्यामुळे निर्माण होणारी भीती तुम्हाला माहीत आहे.

परंतु बेकारी केवळ युरोपातील समस्या नाही. तिने सर्व अमेरिकन राष्ट्रांनाही झपाटले आहे. ती आफ्रिका, आशिया किंवा ओशिनियास दया दाखवत नाही. पूर्वेकडील युरोपीय राष्ट्रांना अलीकडील वर्षांमध्ये या अडचणीची जाणीव होत आहे. ती सगळीकडे एकाच पद्धतीने मारा करत नाही हे खरे. पण काही अर्थशास्त्रज्ञांच्या मते, युरोप तसेच उत्तर अमेरिकेतील बेकारीचे प्रमाण दीर्घकाळापर्यंत आधीच्या दशकांपेक्षा जास्तच असेल.a अर्थशास्त्रज्ञ रनेटो ब्रुनेट्टा दाखवून देतात की, परिस्थिती, “न्यून रोजगाराची वाढ आणि उपलब्ध कामांच्या दर्जांतील सामान्य ऱ्‍हास यांमुळे बिकट झाली आहे.”

प्रगमनशील मोर्चा

बेकारीने अर्थव्यवस्थेच्या सर्व क्षेत्रांवर एका मागून एक मारा केला आहे: प्रथम कृषी क्षेत्र, यांत्रिकीकरण वाढीस लागल्यामुळे लोक बेकार होतात; मग उद्योग, यावर १९७० च्या दशकापासून ऊर्जेचा संकट प्रसंग आल्यामुळे परिणाम झाला आहे; आणि आता, अनाक्रमणीय मानले जाणारे क्षेत्र—अर्थशास्त्र, शिक्षण हे सेवा क्षेत्र. वीस वर्षांआधी २ किंवा ३ टक्के बेकारीच्या जादा प्रमाणामुळे भयाची मोठ्या प्रमाणात सूचना देण्यात आली. आज बेकारी ५ किंवा ६ टक्क्यांखालीच ठेवल्यास, औद्योगीकरण झालेले ते राष्ट्र यशस्वी मानले जाते, आणि याहूनही जास्त प्रमाण अनेक विकसित राष्ट्रांमध्ये आहे.

आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (आयएलओ) यानुसार, काम नसलेली, काम करण्यास तयार असलेली आणि कामाचा सक्रियतेने शोध घेणारी व्यक्‍ती बेकार असते. पण ज्यांच्याजवळ कायमची पूर्ण वेळेची नोकरी नाही किंवा एका आठवड्यात कसेबसे काही तासांचे काम मिळते अशा व्यक्‍तीबद्दल काय? प्रत्येक देशात अर्ध-वेळेच्या नोकरीकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जाते. विशिष्ट राष्ट्रांमध्ये, जे वास्तविकतेत बेकार आहेत अशांची गणना अधिकृतरित्या रोजगार असलेल्यांमध्ये करण्यात येते. रोजगार आणि बेकारी यांतील अपुरेपणाने स्पष्ट केलेल्या परिस्थितींमुळे खरोखर कोण बेकार आहे हे ठरवणे कठीण बनते, आणि या कारणास्तव आकडेवारी या वास्तविकतेचे केवळ काही अंशीच वर्णन करते. “[ओईसीडी देशांमध्ये] बेकार लोकांची ३ करोड ५० लाखांची अधिकृत संख्या देखील नोकरी नसल्याचे संपूर्ण प्रमाण दाखवत नाही,” असे एक युरोपीय अहवाल सांगतो.

बेकारीची मोठी किंमत

परंतु, आकडेवारी सर्व तपशील देत नाहीत. “बेकारीच्या आर्थिक तसेच सामाजिक किंमती भल्या मोठ्या आहेत,” आणि त्या “केवळ बेकार असलेल्यांच्या कल्याणकारी भरणाच्या थेट खर्चामुळेच नव्हे, तर बेकार लोकांना रोजगार असता तर त्यांनी ज्यातून दान केले असते त्या सरकारी वसुलीत तोटा झाल्यामुळे देखील” निर्माण होतात, असे युरोपीय सामाजांचे आयोग म्हणते. तसेच बेकारीमुळे दिल्या जाणाऱ्‍या आर्थिक मदतीचा केवळ सरकारांनाच नव्हे तर रोजगार असलेल्यांवर अधिक कर लादण्यात येत असल्यामुळे त्यांच्यावर देखील अतिशय बोजा बनत आहे.

बेकारी केवळ माहिती आणि आकडे यांचीच बाब नाही. प्रत्येक नाट्यमय घटना याचा परिणाम आहे कारण ही पीडा लोकांना—प्रत्येक सामाजिक वर्गातील पुरुष, स्त्रिया आणि युवकांना पछाडते. या ‘शेवटल्या काळातील’ इतर सर्व समस्यांसहित बेकारी एक मोठा बोजा ठरू शकते. (२ तीमथ्य ३:१-५; प्रकटीकरण ६:५, ६) इतर सर्वकाही ठीक असता, विशेषतः, “दीर्घ-कालीन बेकारीमुळे” ग्रस्त असल्याने दीर्घ काळापासून बेकार असलेल्या व्यक्‍तीला एखादी नोकरी शोधणे अधिक कठीण वाटेल. दुःखाची गोष्ट अशी की, काहींना कधीच नोकरीवर घेतले जाणार नाही.b

मानसशास्त्रज्ञांना असे आढळून येते, की आजच्या बेकारांमध्ये मनोरुग्ण आणि मानसिक समस्या तसेच भावनात्मक असंतुलन, निराशा, वाढते औदासिन्य व स्वाभिमानाचा अभाव वाढत आहे. मुलांचे संगोपन कराव्या लागणाऱ्‍या व्यक्‍तीची नोकरी गमावते तेव्हा, ती भयानक व्यक्‍तिगत दुःखद घटना असते. त्यांच्या भोवतालचे जग ढासळलेले असते. सुरक्षितता नाहीशी झालेली असते. खरे म्हणजे, काही तज्ज्ञ आज, एखाद्याची नोकरी गमावण्याच्या संभवनीयतेशी संबंधित “अपेक्षित चिंता” कशी उत्पन्‍न झाली याचे निरीक्षण करतात. या चिंतेचा कौटुंबिक नातेसंबंधांवर गंभीर परिणाम होऊ शकतो आणि अलीकडील बेकार व्यक्‍तींच्या आत्महत्या दाखवून देतात त्याप्रमाणे त्यांचे अधिक दुःखद परिणाम होऊ शकतात. शिवाय, श्रमिक बाजारात प्रवेश मिळण्याची अडचण, ही तरुण लोकांमधील हिंसा आणि सामाजिक अलिप्तता, यांच्या संभवनीय कारणांपैकी एक आहे.

‘विकृत व्यवस्थेचे कैदी’

सावध राहा! नियतकालिकाने नोकरी गमावलेल्या अनेक लोकांची मुलाखत घेतली आहे. पन्‍नास वयाच्या अर्मानडो यांनी म्हटले, त्यांच्यासाठी हे “३० वर्षांचे श्रम फुकट जात असल्याचे पाहण्यासारखे होते, आता पहिल्यापासून सुरवात करावी लागणार होती” आणि त्यांना “विकृत व्यवस्थेच्या कैद्यासारखे” वाटत होते. फ्रॅन्सेसकोने ‘त्याच्यावर जणू जग कोसळलेले पाहिले.’ स्टेफॅनोला “सद्य जीवन व्यवस्थेत निराशेची अत्यंत जाणीव झाल्याचे वाटले.”

दुसऱ्‍या बाजूला पाहता, इटालियन मोटार गाडीच्या एका महत्त्वपूर्ण उद्योगातील तांत्रिकी व्यवस्थापनेत सुमारे ३० वर्षे काम केल्यावर, नोकरीवरून काढले तेव्हा, “इतक्या वर्षांच्या आपल्या नोकरीमधील श्रम, इमानदारी आणि विश्‍वसनीयतेला काहीच मूल्य नव्हते हे पाहिल्यावर त्यांना संताप आला आणि फसवणूक केल्यासारखे वाटले.”

अंदाज आणि नाउमेदी

काही अर्थशास्त्रज्ञांनी फारच वेगळ्या दृश्‍यांची अपेक्षा केली होती. सन १९३० मध्ये अर्थशास्त्रज्ञ जॉन मॅनार्ड केनीस यांनी पुढील ५० वर्षांमध्ये “सर्वांकरता नोकरी” मिळण्याबाबत आशावादीपणे अंदाज केला, आणि दशकांपासून संपूर्ण नोकरी हे साधण्याजोगे ध्येय मानले गेले आहे. सन १९४५ मध्ये संयुक्‍त राष्ट्र संघाच्या सनदेने संपूर्ण रोजगाराच्या जलद साध्यतेचे ध्येय राखले. अगदी अलीकडच्या काळापर्यंत, सर्वांकरता प्रगतीचा अर्थ, नोकरी आणि नोकरीवर कमी तास घालवणे असा होईल असा विश्‍वास केला जात होता. परंतु त्याप्रमाणे काही घडले नाही. मागील दशकाच्या गंभीर मंदीने “१९३० च्या दशकातील महामंदीनंतर जागतिक प्रमाणावर सर्वात बिकट रोजगारीचे संकट आणले आहे,” असे आयएलओ म्हणते. दक्षिण आफ्रिकेत, किमान ३०.६ लाख लोक नोकरीविना आहेत व यामध्ये ३० लाख कृष्णवर्णीय आफ्रिकी लोकांचाही समावेश होतो. मागील वर्षी २० लाखापेक्षा अधिक जणांना नोकरी नसून जपान देखील संकट प्रसंगातून पार पडत आहे.

बेकारी जगव्याप्त पीडा का आहे? ती सोडवण्याकरता कोणते उपाय सुचवण्यात आले आहेत?

[तळटीपा]

a बेकारीचे प्रमाण, बेकार असलेल्या एकूण कामगार वर्गाची टक्केवारी आहे.

b १२ महिन्यांपेक्षा अधिक काळ नोकरी नसलेले लोक ‘दीर्घ-कालीन बेकार’ आहेत. युरोपीय संघात, बेकार असलेल्यांपैकी निम्मे या वर्गात मोडतात.

[२, ३ पानांवरील नकाशा]

(For fully formatted text, see publication)

कॅनडा ९.६ टक्के

अमेरिका ५.७ टक्के

कोलंबिया ९ टक्के

आयर्लंड १५.९ टक्के

स्पेन २३.९ टक्के

फिनलंड १८.९ टक्के

अल्बेनिया ३२.५ टक्के

दक्षिण आफ्रिका ४३ टक्के

जपान ३.२ टक्के

फिलीपाईन्स ९.८ टक्के

ऑस्ट्रेलिया ८.९ टक्के

[चित्राचे श्रेय]

Mountain High Maps™ copyright © 1993 Digital Wisdom, Inc.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा